.... म्हणून रश्मी ठाकरे यांनी अनेक कंपन्यांचे संचालकपद सोडले?
उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांच्याकडून 3 कंपन्याचे संचालकपद सोडले आहे तर आदित्य ठाकरे यांनी देखील 2 कंपन्यांचे संचालकपद सोडले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात उमेदवार व अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांची गुंतवणूक व संपत्ती विषयक माहिती द्यावी लागते. किती व कोणती संपत्ती दाखवावी आणि कशाप्रकारे दाखवावी म्हणून चार्टड अकाऊंट याविषयी सल्ला देत असतात किंबहुना तेच स्वतः अशा कंपन्यांचे संचालक होतात व संबंधिताचा राजीनामा दर्शवतात जेणेकरून त्या कंपन्यांचे हितसंबंध, गुंतवणूक जाहीर करणे टाळता येऊ शकते. अगदी असेच काही निवडणूक प्रतिज्ञापत्रात ठाकरे परिवाराने देखील इतर राजकीय नेत्यांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. रश्मी ठाकरे यांनी 3 कंपन्याच्या संचालक पदाचा राजीनामा अनुक्रमे दिनांक 28 मार्च 2020, 31 मार्च 2020, 31 मार्च 2020 रोजी दिलेला आहे. तर गुंतागुंत नको म्हणून कि काय पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील 2 कंपन्याच्या संचालक पदाचा राजीनामे दिनांक 31 मार्च 2020 रोजी दिलेला असल्याचे कंपनी रजिस्टर कार्यालयातील नोंदीवरून दिसून येते. शिवसेनेचे मुखपत्र सामना या वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका असून प्रबोधन प्रकाशन प्रा.लि. या कंपनीची मालकी आहे सद्यस्थितीत प्रबोधन प्रकाशन प्रा.लि. या कंपनीचे शेअर्स रश्मी ठाकरे यांच्याकडे 2 लाख 45 हजार इतके शेअर्स आहेत. संचालक मात्र इतर राजकीय नेतेमंडळीं सारखे नोकरदार अथवा अन्य आहेत. फुलोरा प्रिंटर्स या भागीदारी फर्म मध्ये 7 लाख ७० हजार 628 येणे दर्शवलेले आहे या फर्म मध्ये काही वर्षापूर्वी व्यवस्थापक राहिलेली व्यक्ती आता प्रबोधन प्रकाशन कंपनीचे संचालक असल्याची देखील माहिती व्यक्त केली जात आहे. साधारण काही दिवसांपूर्वी ठाकरे कुटुंब संचालक असलेल्या 13 कंपन्या होत्या त्यातील काही दिवसांपूर्वी 2 बंद केल्या तर उर्वरित सुरु आहेत या ११ कंपन्यामध्ये उद्धव ठाकरे तर काही कंपन्यांमध्ये इतर सदस्य रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे संचालक होते. काळाच्या ओघात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कंपन्याचे संचालक पद कागदोपत्री तरी सोडावे लागले आहे. ठाकरे कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी निवडणूक यापूर्वी लढवली नसल्याने त्यांच्या संपत्ती व आर्थिक हितसंबंध कायदेशीरदृष्ट्या सामान्यांना स्पष्ट होत नव्हते व ते जाणून घेण्यात अडसर होता तो आता काही प्रमाणात का होईना नाहीसा झालेला आहे. राज्यातील जनतेला ठाकरे कुटुंबाची संपत्तीबाबत उत्सुकता होती ती तपशीलवार आता जाणून घेण्यात येत आहे. राजकीय हितसंबंधा बरोबर आर्थिकदृष्ट्या हितसंबंध देखील या निवडणुकीच्या निमित्ताने उघड झालेलं आहेत. दरम्यान रश्मी ठाकरे यांची 4 LLP (एलएलपी) कंपन्यांमध्ये गुंतवणूक असून या कंपन्यांमध्ये COMO STOCKS & PROPERTIES LLP (संचालक- दिनांक 20/03/2014 पासून 28/03/2020 पर्यंत)., HIBISCUS FOOD LLP(संचालक- दिनांक 14/07/2015 पासून 31/03/2020 पर्यंत)., ELIORA SOLAR LLP (संचालक- दिनांक 26/04/2016 पासून 31/03/2020 पर्यंत)., SAMVED REAL ESTATE LLP. यांचा समावेश आहे. तर प्रायव्हेट कंपनी SAHYOG DEALERS PRIVATE LIMITED च देखील शेअर्स गुंतवणुकीत समावेश आहे. सद्यस्थितीत रश्मी ठाकरे SAMVED REAL ESTATE LLP (दिनांक 25/07/2019 पासून) आणि SAHYOG DEALERS PRIVATE LIMITED (दिनांक 05/11/2003 पासून) या कंपन्यांच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर COMO STOCKS & PROPERTIES LLP., HIBISCUS FOOD LLP., ELIORA SOLAR LLP., SAMVED REAL ESTATE LLP. या तीन कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा मार्च महिन्यात दिलेला आहे. दरम्यान रश्मी ठाकरे यांची COMO STOCKS & PROPERTIES LLP आणि SAHYOG DEALERS PRIVATE LIMITED या कंपन्यांची शेअर्स गुंतवणुकीची माहिती उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिसून येत नाही.
खालील कंपन्यांच्या संचालकपदी राहिलेले ठाकरे
कुटुंबाचे सदस्य काही कालावधीत पदापासून दूर झाले असून काही कंपन्यांच्या संचालकपदी
कायम आहेत तर त्यांच्या जागी कोण आहेत याबाबत तपशील
|
|
Company
Details
|
Director
Details
|
ASHAR PROJECTS DM LLP
|
Director AJAY PRATAP ASHAR (Appointment Date 29 March 2019), SHRIDHAR
MADHAV PATANKAR (Appointment Date 29 March 2019)
|
COMO STOCKS & PROPERTIES LLP
|
TEJAS UDDHAV THACKERAY (Appointment Date
3-Sep-19), LUKE BENEDICT FERNANDEZ (Appointment Date 28-Mar-20), RITA
NANDKISHOR CHATURVEDI (Appointment Date 28-Mar-20), RASHMI UDDHAV THACKERAY
(Appointment Date 20-Mar-14), CHATURVEDI NANDKISHOR (Appointment Date
28-Mar-20),
|
COMPOSITE PROPERTIES PRIVATE LIMITED
|
RAJAN DNYANDEO KHANOLKAR (Appointment Date 23 January 2017), SUDHANSHU HANSRAJ DANGAT (Appointment Date 14 August 2019).
|
DEV TRADING PRIVATE LIMITED
|
SUDHANSHU HANSRAJ DANGAT (Appointment Date 14 August 2019), RAJAN
DNYANDEO KHANOLKAR (Appointment Date
04 January 2017).
|
ELIORA SOLAR LLP
|
CHANDRASHEKHAR MARUTI GAONKAR
(Appointment Date 31 March 2020), THACKERAY ADITYA UDDHAV (Appointment Date
26 April 2016)
|
HIBISCUS FOOD LLP
|
ADITYA UDDHAV THACKERAY (Appointment Date 14 July 2015),
CHANDRASHEKHAR MARUTI GAONKAR (Appointment Date 31 March 2020).
|
PRABODHAN PRAKASHAN PRIVATE LIMITED
|
VIVEK TATOJIRAO KADAM (Appointment Date
26 March 2018), SANJAY RAMCHANDRA WADEKAR (Appointment Date 27 March 2018).
|
PRIME TEX TRADING PRIVATE LIMITED
|
AMIT RAMESH RISHI (Appointment Date 08
November 2019), NANDKISHOR CHATURVEDI (Appointment Date 30 March 2017).
|
SAHYOG DEALERS PRIVATE LIMITED
|
Company Status Strike Off -PRASHANT
CHANDRAKANT VAIDYA (Appointment Date 05 November 2003), RASHMI UDDHAV
THACKERAY (Appointment Date 05 November 2003).
|
SAMVED REAL ESTATE LLP
|
RASHMI UDDHAV THACKERAY (Appointment
Date25 July 2019), SHRIDHAR MADHAV PATANKAR (Appointment Date 25 July 2019),
MADHAV GOVIND PATANKAR (Appointment Date 25 July 2019).
|
SHAURIN DEVELOPERS PRIVATE LIMITED
|
Company Status Strike Off
|
SHORE TRADING PRIVATE LIMITED
|
Company Status Strike Off
|
VATSALA TRADE PRIVATE LIMITED
|
NANDKISHOR CHATURVEDI (Appointment Date
30 March 2017), LUKE BENEDICT FERNANDEZ (Appointment Date 16 March 2018).
|
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या HUF एचयुएफ (हिंदू एकत्रित कुटुंब) शेअर्स गुंतवणुकीतील तपशिलात तफावत
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या HUF एचयुएफ एकत्रित कुटुंब शेअर्स गुंतवणुकीतील तपशिलात तफावत असल्याचे आढळून आले आहे. एकूण 5 कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे त्यामध्ये Bctala Global Securities Ltd., Mis. Bio Green Paper Limited.,Mis. GTL Limited., Mis. Meuse Kara & Sungrace Mafatlal Ltd.,Maruli Suzuki India Lid. ( Maruti Udyog )., यांचा समावेश आहे. एकत्रित कुटुंब शेअर्स गुंतवणुकीचा तपशील देण्यात आलेला आहे त्यामध्ये 1 लाख 89 हजार 947 इतके शेअर्स असून उद्धव ठाकरे यांनी या शेअर्सचे चालू मुल्य 29 लाख 58 हजार 149 इतके दर्शवले असून आदित्य ठाकरे यांनी सहा महिन्यांपूर्वी या शेअर्सचे चालू मुल्य 37 लाख 72 हजार 090 इतके दर्शवले आहे. एकत्रित कुटुंब शेअर्स गुंतवणुकीतील तपशिलात शेअर्स संख्येत तफावत नसून शेअर्समध्ये गुंतवणूक कधी केली या तपशिलामध्ये तफावत आढळून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार Bctala Global Securities Ltd या कंपनीमध्ये शेअर्स गुंतवणूक 07.07.2002 रोजी केली आहे तर आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार सन 2001 पूर्वी शेअर्स गुंतवणूक केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार Mis. Meuse Kara & Sungrace Mafatlal Ltd. या कंपनीमध्ये शेअर्स गुंतवणूक 11.03.2011 रोजी केली आहे तर आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 21.12.2006 रोजी शेअर्स गुंतवणूक केली आहे. यामध्ये 5 वर्षांची तारखेतील तफावत दिसून येत आहे. तर Mis. GTL Limited. या कंपनीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 30.07.2007 रोजी गुंतवणूक केली आहे तर आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 30.07.2003 रोजी शेअर्स गुंतवणूक केली आहे. यामध्ये सुमारे 4 वर्षांची तारखेतील तफावत दिसून येत आहे. तर Maruli Suzuki India Lid. ( Maruti Udyog ) या कंपनीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 23.06.2003 रोजी गुंतवणूक केली आहे तर आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 14.07.2003 रोजी शेअर्स गुंतवणूक केली आहे. यामध्ये देखील तफावत दिसून येत आहे.आदित्य ठाकरे यांनी LLP (एलएलपी) कंपन्यांमधील गुंतवणूक उघड केली नाही
आदित्य ठाकरे यांनी LLP (एलएलपी) कंपन्यांमधील गुंतवणूक उघड केली नसल्याची दाखल प्रतिज्ञापत्रा वरून दिसून आले. आदित्य ठाकरे COMO STOCKS & PROPERTIES LLP., HIBISCUS FOOD LLP., ELIORA SOLAR LLP., ASHAR PROJECTS DM LLP. या चार कंपन्याचे संचालक होते. निवडणूक आयोगाला दिनांक 3 ऑक्टोबर 2019 रोजी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संचालक पद असल्याची माहिती देखील त्यांनी उघड केली नव्हती. अनुक्रमे कंपन्यानुसार दिनांक 20/03/2014, दिनांक 14/07/2015, दिनांक 26/04/2016, दिनांक 29/03/2019 रोजी त्यांनी उपरोक्त 4 कंपन्याचे भागीदार म्हणून संचालक पद स्वीकारले होते. HIBISCUS FOOD LLP., ELIORA SOLAR LLP या कंपन्यांची येणे गुंतवणूक रक्कम मात्र दर्शवलेली होती. तथापि या दोन्ही कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा 31/03/2020 रोजी दिलेला आहे. COMO STOCKS & PROPERTIES LLP आणि ASHAR PROJECTS DM LLP या दोन्ही कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा अनुक्रमे दिनांक 03/09/2019 व दिनांक 15/07/2019 रोजी दिलेला असल्याचे कंपनी रजिस्टर कार्यालयातील नोंदीवरून दिसून येत आहे. मात्र या 2 कंपन्यांमधील गुंतवणूक प्रतिज्ञापत्रात उघड केली नसल्याची आढळून येत आहे. एलएलपी कंपन्यां म्हणजे limited liability partnership (LLP) is a partnership in which some or all partners मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी) एक भागीदारी असते ज्यात काही किंवा सर्व भागीदार (कार्यक्षेत्रानुसार) मर्यादित दायित्वे असतात. यामुळे भागीदारी आणि कंपन्यांचे घटक प्रदर्शित होऊ शकतात. एलएलपीमध्ये, प्रत्येक पार्टनर दुसर्या पार्टनरच्या गैरवर्तन किंवा दुर्लक्षासाठी जबाबदार किंवा जबाबदारी नसते.उद्धव ठाकरे यांचे उत्पन्न कमी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मिसेस मुख्यमंत्र्यांचे उत्पन्न दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिस्टेड सेबी नोंदणीकृत कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे अशा शेअर घेतलेल्या कंपन्यांमध्ये Ambalal Sarabhai Enterprise Ltd, Bio Green Paper Ltd., HCL Technologies Ltd., Mahanagar Telephone Nigam., Meuse Kara & Swigrace Mafatlal Ltd आणि रिलायन्स ग्रुपमधील Reliance Capital, Communication, Industries, Infarastructurc, Power, व Reliance Home Finance या कंपन्यांचा समावेश आहे. तर प्रायव्हेट अनलिस्टेड सेबीमध्ये अनोंदणीकृत कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे अशा भागधारक असलेल्या कंपन्यांमध्ये Classic Cicy Jnfopadc Pvt Ltd.., Classic City lnfopadc Pvt Ltd., Rabul Executive I nfratech Pvt. Ltd. यांचा समावेश आहे. तर भवानी सहकारी बँकेचे देखील शेअर असल्याचे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे. तर रश्मी ठाकरे यांनी लिस्टेड सेबी नोंदणीकृत कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे अशा ३८ कंपन्यांचा गुंतवणूक तपशील यादी दिलेली आहे त्यामध्ये 31 कंपन्यांचा समवेश आहे. तर प्रायव्हेट अनलिस्टेड सेबीमध्ये अनोंदणीकृत कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे अशा भागधारक असलेल्या कंपन्यांमध्ये Almighty Freight Station Private Limited., Classic City lnfopark Pvt. Ltd.., Prabodhan Prakashan Private Limited., Rahul Executive lnfratech Pvt. Ltd. यांचा समावेश आहे. २ लाख ८६ हजार ८०७ शेअर्सची संख्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 13 कंपन्यामध्ये शेअर्स खरेदी केली असून त्याचे सद्यस्थितीत मुल्य 18 लाख 14 हजार 986 इतके नमूद केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या शेअरमध्ये केलेल्या गुंतवणुकीमधील ९० टक्के गुंतवणूक टॉपच्या पाच कंपन्यांमध्ये केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे यांनी दाखल केलेल्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या गुंतवणुकीत एचसीएल टेक्नालॉजी या कंपनीत सर्वाधिक गुंतवणूक आहे. या शिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, मारूती सुझुकी इंडिया, बिर्ला कार्पोरेशन, एचसीएल टेक्नालॉजी व कोटक महिंद्रा या कंपन्यांचा यात समावेश आहे. शेअर बाजाराचा विचार करता या सर्व पाच कंपन्यांचे शेअर सध्या टॉपला असून या कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरी गेल्या काही महिन्यात सातत्याने वाढलेली आहे. कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक नेहमीच फायद्यात राहत नाही. बऱ्याचवेळा त्यात नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांचा गुंतवणुकीतील पोर्टफोलिओ पाहता त्यांची संपूर्ण गुंतवणूक स्मार्ट ठरलेली आहे. ठाकरे यांनी शेअरमध्ये केलेल्या एकून गुंतवणुकीपैकी ६६.१ टक्के गुंतवणूक एचसीएल टेक्नालॉजी या कंपनीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गुंतवणुकीपैकी १४ टक्के, मारूती सुझुकी इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये ९.३ टक्के, बिर्ला कार्पोरेशन १.५ टक्के व कोटक महिंद्रा कंपनीत १.४ टक्के शेअर गुंतवणूक केलेली आहे. ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबद्दल साऱ्या महाराष्ट्राला नेहमीच कुतूहल असते. ठाकरे कुटुंबातील कुणीही कधी निवडणूक लढविली नव्हती. निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून नेमकी माहिती बाहेर येण्याची संधी असते. मात्र, ठाकरे निवडणूक लढवत नव्हते, त्यामुळे त्यांच्याबाबत ही शक्यता नव्हती. सहा महिन्यापूर्वी परिस्थिती बदलली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे चिरंजीव अदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविल्याने त्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती समोर आली. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे यांची संपत्तीची माहिती समजली आहे. त्यांच्या चल-अचल संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आली. त्यातील शेअरमधील गुंतवणुकीत वरील पाच कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक स्मार्ट गुंतवणूक ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 184 कोटी रुपयांची आहे. उद्धव यांच्याकडे 97 कोटी आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे 85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाची 50 टक्के मालकी उद्धव ठाकरे आणि 50 टक्के मालकी रश्मी ठाकरे यांची आहे. जवळील एका बंगल्याची 75 टक्के मालकी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील शेतजमीन आणि अकोले येथील भूखंडाचा त्यांच्या मालमत्तांमध्ये समावेश आहे. उद्धव ठाकरे यांची चल-अचल मिळून 97 कोटी 50 लाखांची संपत्ती आहे. रश्मी ठाकरे यांची 85 कोटी नऊ लाख रुपयांची संपत्ती आहे. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून त्यांच्याकडे एक कोटी 58 लाखांची संपत्ती आहे. वेतन, व्याज, लाभांश आणि भांडवली उत्पन्न असे उत्पन्नाचे स्रोत असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर चार कोटी सहा लाखांचे; तर रश्मी ठाकरे यांच्यावर 11 कोटी 44 लाखांचे कर्ज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात एकूण 23 तक्रारी असून ज्यामधील 12 रद्द झाल्या असून बाकीच्या खासगी तक्रारी आहेत. केवळ एकच प्रकरण सध्या त्यांच्या नावावर आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयाबाहेर राडा झाला होता. आजही त्याची नोंद ठाकरेंच्या नावावर आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात आपण नोकरी करत असून पत्नी रश्मी व्यवसाय करीत असल्याचे म्हटले आहे. विविध कंपन्यांचे समभाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. इतके जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नाही. उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात आपण नोकरी करत असून पत्नी रश्मी व्यवसाय करीत असल्याचे म्हटले आहे. विविध कंपन्यांचे समभाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर एचडीएफसी बँकेचे ४ लाखांचे कर्ज आहे. रश्मी यांच्यावर सारस्वत बँकेचे ८ लाखांचे कर्ज आहे. दोघांकडेही मुंबईत दोन बंगले, एक फार्म हाऊस, ठाणे येथे दुकाने नावावर असून विविध कंपन्यांच्या शेअर्सवर मिळणारा डिव्हिडंड हे उत्पन्नाचे स्रोत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. रोख रकमेच्या बाबतीत मात्र मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत रश्मी यांच्याकडे अधिक पैसे (कॅश इन हँड) आहेत. खालापूर येथे उद्धव यांच्या नावावर शेतजमिनीची किंमत ९५,००० रुपये आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कर्जतमधील जमिनीची किंमत ६,४७,६७,६३५ रुपये आहे. अकोले येथे उद्धव ठाकरे यांच्या नावावर गैरशेती जमीन असून त्याची किंमत १३,६४,९४,८४६ रुपये आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावावर ठाणे येथे एक दुकान असून त्याची किंमत ३,१५,,६४,१८५ रुपये आहे. कलानगर, वांद्रे पूर्व येथे मातोश्री आणि मातोश्रीच्या समोरच असलेला मातोश्री २ हे बंगले आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन्ही बंगल्यांचे ५० आणि ७५ टक्क्यांचे मालक आहेत. बाजारभावाप्रमाणे या बंगल्यांची किंमत ८१ कोटी ३७ लाख १७,३२० रुपये आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.=====================================
विधानपरिषद निवडणुकीत इतर बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांची जाहीर संपत्ती
गोपीचंद पडळकर यांनी कोट्याधीश नको म्हणून फॉर्च्युनरचा भाव 14 लाखांनी कमी केला!
विधानपरिषद निवडणुकीतील भाजपचे उमेदवार व नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा भाषणात गरीब व कर्जदार असल्याचे सांगितले होते मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोटीच्या पुढे संपत्ती असल्याचे जाहीर केल्याने सर्व वर्तमानपत्रात गरीब नव्हे कोट्याधीश उमेदवार म्हणून मथळे प्रसिद्ध झाले होते. पुन्हा अशी प्रसिद्धी नको कि, काय म्हणून त्यांनी कोटीच्या आत संपत्ती बहुदा दाखवण्याची कसरत विधानपरिषद निवडणुकीत केलेली दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांची संपत्ती १ कोटी ३ लाख रूपये इतकी दर्शवली होती. तर विधानसभा निवडणुकीत देखील 1 कोटीच्या आसपास संपत्ती दर्शवली होती. यामध्ये टोयाटो फॉर्च्युनर गाडीची किंमत 24 लाख दर्शवलेली होती मात्र ६ महिने होत नाही तर विधानपरिषद निवडणुकीत अचानक फॉर्च्युनर गाडीची किंमत 10 लाखच दर्शवलेली आहे. 5-6 महिन्यात तब्बल 14 लाखांचा भाव ढासळलेला दर्शवलेला आहे. म्हणूनच घट करून ८७ लाख ६३ हजार ११३ रुपये एकूण संपत्ती दर्शवलेली आहे. कोट्याधीश नको म्हणून फॉर्च्युनरचा भाव 14 लाखांनी कमी केला असल्याचा दावा मात्र वंचितचे कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीतील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांची संपत्ती ८७ लाख ६३ हजार ११३ रुपये आहे. पडळकर यांच्याकडे १ लाख ५५ हजाराची रोकड आहे. पडळकर यांच्याकडे १ लाख ५५ हजाराची रोकड आहे. २१ हजार ८१३ रुपयांच्या त्यांच्या ठेवी आहेत. त्यांच्याकडे १० लाख रुपयाची टोयाटो फॉर्च्युनर गाडी आहे. वीस ग्रॅम सोने असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याशिवाय त्यांच्यावर चार लाख रुपयाचे कर्ज आहे. तीन लाख रुपये कारसाठी घेतलेले कर्ज आहे तर एक लाख रुपये पीककर्ज आहे. गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने या निवडणुकीत चार नवीन चेहरे दिले आहेत. गोपीचंद पडळकर सांगली जिल्हातील पडळकरवाडी येथील आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना स्थावर आणि जंगम संपत्ती प्रतिज्ञापत्रात जाहीर केली दिली आहे. त्यांच्याकडे रोख रकमे खेरीज १० एकर २५ गुंठे जमीन आहे. त्यांच्याकडे असलेल्या जमिनी व इतर स्थावर मालमत्तेची आजच्या बाजारभावाने ७५ लाख रुपये किंमत आहे.पडळकर यांच्यावर कॉसमॉस बँकेचे ३ लाख रुपयाचे कारसाठी घेतलेले कर्ज आणि बँक ऑफ इंडियाचे १ लाख रुपयाचे पीककर्ज आहे. पडळकर यांचे शिक्षण विज्ञान शाखेतून बारावी पर्यत झाले आहे. त्याचे शिक्षण सांगली येथे झाले आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच भाजपात प्रवेश करून भाजपाने बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती यावेळी जाहीर केलेल्या 13 पानी शपथपत्रात पडळकर यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे. त्यानुसार, पडळकर यांच्याकडे रोख स्वरुपात 95 हजार रुपयांची रक्कम आहे. पडळकर यांची एकूण जंगम मालमत्ता 26 लाख 682 रुपये एवढी दर्शवलेली होती. त्यामध्ये 24 लाख रुपयांच्या फॉर्च्युनर गाडीचा समावेश आहे. तसेच, 20 ग्रॅम सोनं, रोख रक्कम, आणि बँकेतील ठेवींचाही समावेश होता. तर पडळकर यांची स्थावर मालमत्ता 50 लाखांच्यावर दर्शवलेली होती. आटपाडीतील पिंपरी या गावी त्यांची वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे. तसेच इतर जागा आणि जमीन मिळून स्थावर मालमत्ता 73 लाख रुपयांची आहे. त्यामध्ये 2013 साली गोपीचंद यांनी खरे 6994 चौरसफुट जागा खेरदी केली असून त्याचे सध्या बाजारमूल्य 28 लाख रुपये आहे. पडळकर यांची स्थावर आणि जंगम अशी एकूण संपत्ती 99 लाख 682 रुपये एवढी दर्शवलेली होती.रमेश कराड यांना आहेत मुलांची देणी
भाजपने नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांची उमेदवारी बदलून मिळालेले भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांना मुलांचीच देणी आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक अशी ओळख असलेले रमेश कराड कोट्याधीश असून सोने, महागड्या गाड्या आणि शेती अशी संपत्ती त्यांच्या नावे आहे. संजिवनी कराड यांना बॅंक व इतर वित्तीय संस्थांची ६४ लाख १४ हजार ३४८, तर त्यांच्या मुलांना २९ लाख ८३ हजारांची देणी आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी संजिवनी या देखील कोट्याधीश असून त्यांच्या नावेही स्थावर आणि जंगम मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहे. रमेश कराड यांच्याकडे जंगम आणि स्थावर अशी एकूण ५ कोटी ३६ लाख २८ हजार ६६३ रुपयांची संपत्ती, तर त्यांच्या पत्नी संजिवनी यांच्या नावावर देखील २ कोटी ९ लाख ४६ हजार ९०२ एवढी संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवडूक अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रातील विवरणानूसार रमेश कराड यांच्याकडे रोख रक्कम, विविध बॅंकामधील गुंतवणूक, शेअर्स, विमा, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यासह ५३ तोळे सोने अशी एकूण २ कोटी ४९ लाख ४८ हजार ८७२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ३२ लाखांच्या महागड्या कारसह ट्रॅक्टर, बस अशी वाहने देखील कराड बाळगून आहेत. या शिवाय ३९ एकर ९ गुंठे शेतजमीन, एमआयडीसी व इतर भागामध्ये प्लॉट, कमर्शियल इमारत, बंगला अशी एकूण २ कोटी ८६ लाख ७९ हजार ७९१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर कराड यांना विविध बॅंका व वित्तिय संस्थांची एकूण १ कोटी ३५ लाख ४७ हजार २०२ रुपयांची देणी असल्याचे त्यांनी शपथ पत्रात नमूद केले आहे. रमेश कराड यांच्या प्रमाणेच त्यांच्या पत्नी संजिवनी या देखील करोडपती असून त्यांच्या नावे रोख रक्कमेसह २९ तोळे सोने, फॉर्च्यूनर कार, ट्रॅक्टर, बॅंकेतील शेअर्स, विमा, बचत प्रमाणपत्रांमधील गुंतवणूक अशी एकूण ८८ लाख ६६ हजार ७६२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर १३ एकर ३९ गुंठे शेत जमीनीसह ३२ लाखांच्या बिगरशेत जमीनी म्हणजे प्लॉट आणि ४९ लाखांची कमर्शियल इमारत अशी जंगम आणि स्थावर मिळून एकूण २ कोटी ९ लाख ४६ हजार ९०२ एवढी संपत्ती आहे. या शिवाय कराड यांच्या मुलांच्या नावावर देखील लाखो रुपयांची मालमत्ता दर्शवण्यात आली आहे.प्रवीण दटके यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेला तपशील
नागपूरचे माजी महापौर तसेच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांची विधान परिषदेवर निवड झालेली असून या निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञानुसार, त्यांच्याकडे 91 लाख 43 हजार रुपयांची स्थावर आणि 16 लाख 53 हजार 201 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 16 लाख 57 हजार 300 रुपये आहे. प्रवीण दटके यांच्या पत्नी प्रवदा यांची स्थावर मालमत्ता 9 लाख 89 हजार रुपये, जंगम मालमत्ता 22 लाख 42 हजार 801 रुपये आणि वार्षिक उत्पन्न 13 लाख 18 हजार 940 रुपये आहे. आई प्रतिभा यांची स्थावर मालमत्ता 99 लाख 24 हजार 207, जंगम 12 लाख 33 हजार 602 रुपये आणि वार्षिक उत्पन्न 3 लाख 77 हजार 125 रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. यामध्ये स्वतः प्रवीण यांच्याकडे एक लाख 40 हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड (बुलेट) (क्रमांक एम.एच. 49 टी. 0041) आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 10 लाख 31 हजार 143 रुपये किमतीची स्वीफ्ट कार (क्रमांक एम.एच. 49 एवाय 9909) असल्याचे नमूद केले आहे. प्रवीण दटके यांच्याकडे 3 लाख 4 हजार रुपयांचे आठ तोळे सोने, पत्नी प्रवदा यांच्याकडे सात लाख 60 हजार रुपयांचे 20 तोळे, आई प्रतिभा यांच्याकडे 9 लाख 50 हजार रुपयांचे 25 तोळे, मुलगी प्रत्युक्षाकडे 76 हजार रुपयांचे 2 तोळे आणि दुसरी मुलगी प्राहीकडे दोन तोळे सोने असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. दटकेंच्या विरोधात नागपूर शहराच्या सिताबर्डी, लकडगंज आणि पाचपावली पोलीस ठाण्यांत तीन गुन्हे दाखल आहेत. यांपैकी सिताबर्डी पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम कलम 143, 147, 323, 336, 353 आणि 109 कलमान्वये, लकडगंजमध्ये मुंबई पोलीस अधिनियम कलम 135 तर पाचपावली पोलीस ठाण्यात अधिनियम 3 व 5, कलम 336, 427, 109 व मुंबई पोलीस अधिनियम कलम 37-1 आणि 135 नुसार गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले दाखल आहेत. एकाही प्रकरणात अद्याप ते दोषी आढळलेले नाहीत. त्यांच्या नावे कर्ज नाही. पण त्यांची पत्नी प्रवदा यांच्या नावे 4 लाख 88 हजार रुपयांचे वाहन कर्ज आहे. दटके स्वतः शेतकरी, सामाजिक कार्यकर्ता आणि नगरसेवक आहेत. तर त्यांच्या पत्नी प्रवदा वेतनधारक आहेत असे नमूद केले आहे.रणजितसिंह मोहिते पाटील यांची २७ कोटी ७६ लाख रु. संपत्ती
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवार व नवनिर्वाचित आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची स्थावर व जंगम मालमत्ता २७ कोटी ७६ लाख ३२ हजार ६८५ इतकी आहे. त्यांच्यावर पाच कोटी ६१ लाख १८ हजार १२ रूपयांचे कर्जदेखील आहे. विशेष म्हणजे यात सुमारे 23 लाख 73 हजार रुपये त्यांनी चिरंजीव विश्वतेजसिंह यांच्याकडून घेतल्याचे नमूद केले आहे. ही निवडणूक लढविणाऱ्या सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये मोहिते पाटील हे सर्वात श्रीमंत उमेदवार असावेत. मोहिते-पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज भरला. अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती पुढे आली आहे. कर्जाच्या बहुतांश रकमा या जवळच्या नातेवाईक तसेच त्यांच्याशी संबंधित व्यावसायिक संस्थांच्या आहेत. मोहिते-पाटील यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून बी. ए. ची पदवी प्राप्त केली आहे. शेती व व्यापार हा आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या माध्यमातून गेल्या पाच वर्षात त्यांनी तीन कोटी २५ लाख ४५ हजार ७८७ इतके उत्पन्न मिळाल्याचे प्राप्तीकर खात्याच्या विवरणपत्रात दिले आहे. मोहिते पाटील यांच्या मालमत्तेपैकी ११ कोटी २३ लाख ५८ हजार ४८५ रूपयांची जंगम मालमत्ता आहे. यात विविध बॅंक खात्यातील ठेवी, एलआयसी, सहकारी तसेच इतर कंपन्यांच्या समभागांचा समावेश आहे. १६ कोटी ५२ लाख ७४ हजार २२० रूपये किमतीची स्थावर मालमत्ता असून यात शेती, प्लॉट, फ्लॅट आदींचा समावेश आहे. माळशिरस, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी या मालमत्ता आहेत. मोहिते पाटील यांच्यावर १४ फौजदारी खटले प्रलंबित आहेत. 41 पानांच्या या प्रतिज्ञापत्रात दाखल खटले, कर्ज, स्थावर तसेच जंगम मालमत्तेचा तपशील, गेल्या पाच वर्षात भरलेल्या प्राप्तीकराची संपूर्ण माहिती तपशीलवार देण्यात आली आहे. रणजीतसिंह यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी व चिरंजीव विश्वतेजसिंह यांच्या नावावर असलेल्या विविध ठिकाणांच्या स्थावर तसेच जंगम मालमत्तेचा तपशील देण्यात आला आहे.शशिकांत शिंदे करोडपती पण नावावर एकही गाडी नाही
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचे विवरण दिलेले आहे. बी कॉम असलेले शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीच्या नावावर सर्वाधिक मालमत्ता व आर्थिक गुंतवणूक असल्याचे दिसत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिज्ञापत्रात ते करोडपती असूनही त्यांच्या नावावर एकही गाडी नाही. त्याऐवजी त्यांची पत्नी वैशाली शिंदे यांच्या नावावर मात्र, 42 लाखांच्या टोयाटो फॉर्च्युनर व टोयाटो इनोव्हा अशा दोन गाड्या आहेत. श्री. शिंदे यांच्याकडे दहा हजार रूपयांची पत्नी वैशालीकडे सात हजार रूपये तर विभक्त कुटुंब म्हणून 25 हजार पाचशे रूपयांची तर मुलगा साहिल यांच्याकडे 20 हजार 500 रूपयांची रोकड आहे. विविध बॅंकांत श्री. शिंदे यांची दोन लाख 91 हजारांची मुदत ठेव, तर पत्नीच्या नावे पाच लाख 32 हजारांची तर अविभक्त कुुटुंब म्हणून 22 लाख 71 हजार 669 रूपयांची मुदत ठेवी आहेत. वाशी येथील विविध बॅंकांत 31 लाख 67 हजार 980 रूपये तर पत्नी वैशालीच्या नावे विविध बॅंकांत 38 लाख 24 हजार 421 रूपये आहेत. बंदपत्रे व शेअर्स अशी 12 लाखांची गुंतवणूक असून एलआयसीच्या 20 लाखांवर पॉलिसी आहेत. पत्नीच्या नावे 67 लाखांची गुंतवणूक आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे नऊ लाख रूपयांचे 375 ग्रॅम जडजवाहिर आहे. शशिकांत शिंदेंच्या नावे एक कोट 74 लाखांची तर पत्नीच्या नावे सहा कोटी 24 लाख, विभक्त कुटुंब म्हणून 44 लाख 89 हजारांची तर मुलगा साहिलच्या नावे 23 लाख 60 हजारांची जंगम मालमत्ता आहे. शशिकांत शिंदे यांच्या नावे अकरा लाख 71 हजारांची शेतजमीन तर पत्नी वैशालीच्या नावे एक कोटी 42 लाख 98 हजार रूपयांची जमीन आहे. श्री. शिंदे यांच्या नावे दोन एकर दोन आर क्षेत्राची एक कोटी 57 लाखांची तर पत्नी वैशालीच्या नावे 18 एकर तर मुलगा साहिलच्या नावे दोन एकर सहा आर बिगरशेती जमीन आहे. हुमगाव, ल्हासुर्णे व वाशी मुंबई येथे निवासी इमारती आहेत. असे एकुण शशिकांत शिंदेंच्या नावे स्थावर मालमत्ता नऊ कोटी 25 लाख, 89 हजारांची तर पत्नी वैशालीच्या नावे 21 कोटी 45 लाख, 52 हजारांची तर मुलगा साहिलचंया नावे 50 लाखांची स्थावर मालमत्ता आहे.अमोल मिटकरी आहेत कि करोडपती
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार व नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी करोडपती आहेत कारण यांची स्थावर मालमत्ता ५३ लाख रूपये इतकी आहे तर जंगम मालमत्ता ५२ लाख २९ हजार ६४० रूपयांची आहे. यामध्ये चार एकर शेतजमीनीसह, बांधलेली जागा व माेकळ्या प्लॉटचा समावेश आहे. मिटकरी हे करोडपती आहेत. सोने, एलआयसी पॉलिसी व बँक डिपॉझिट या स्वरूपातील जंगम मालमत्ता ५२ लाख २९ हजार ६४० रूपयांची आहे. त्यांच्यावर १७ लाख ३२ हजार रूपयांचे कर्ज आहे. कृषी कर्ज,वाहन कर्ज तसेच गृह कर्जाचा यात समावेश आहे. गेल्या अर्थिक वर्षात प्राप्तीकर खात्याकडे दाखविलेले उत्पन्न केवळ ३ लाख ४२ हजार ६१९ रूपये आहे. अकोला जिल्ह्यात मिटकरी यांचे गाव आहे. अकोल्यातील युनियन बँकेकडून त्यांनी १० लाख ८५ हजार रूपयांचे गृह कर्ज घेतले आहे. एचडीयेफसी बँकेकडून वाहन कर्ज घेतले आहे. विधान परिषद निवडणूक लढविणारा उमेदवार आणि त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार म्हटले की मोठी मालमत्ता असलेला उमेदवार अशी पक्षाची प्रतिमा आहे. मात्र, मिटकरी यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र पाहता पक्षाने अर्थिकदृष्ट्या सामान्य पण एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचे दिसते. निवडणुकीसाठी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मिटकरी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नव्या पिढीची मुलूख मैदानी तोफ अशी मिटकरी यांची ओळख आहे. पक्षातला नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या भाषणांनी मिटकरी यांनी निवडणुकीचे मैदान गाजवले होते. राज्यभर फिरून जास्तीत जास्त प्रचारसभा घेता याव्यात यासाठी पक्षाने त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरची सोय केली होती. या दोन्ही निवडणुकीत ते पक्षाचे स्टार प्रचारक होते.कॉंग्रेसच्या राठोड यांचे १.३५ लाखाचे वीज बील थकीत
विधान परिषदेतील कॉंग्रेसचे एकमेव असलेले उमेदवार व नवनिर्वाचित आमदार राजेश राठोड यांच्या नावे सहा कोटी रुपयांची मालमत्ता असलल्याचे त्यांनी जोडलेल्या निवडणूक शपथपत्रावरून स्पष्ट झाले आहे. राठोड यांच्याकडे जंगम व स्थावर अशी एकूण सहा कोटीहून अधिकची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ४३ लाखांची जंगम तर ५ कोटी ६५ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विधान परिषदेतील एका जागेसाठी कॉंग्रेसने प्रदेश समिती सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर केली होती. राजेश राठोड हे कॉंग्रेसचे विधान परिषदेतील माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे चिरंजीव आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात राठोड यांच्या शैक्षणिक संस्था असून उमरखेडा हे त्यांचे मुळ गाव आहे. शपथपत्रातील विवरणानूसार मंठा, उमरखेडा येथे राठोड यांच्या नावे शेती, प्लॉट, घर आदी ५ कोटी ६५ लाख ६३ हजार २१२ रुपयांची स्थावर तर रोख, बॅंक डिपॉझीट, शेअर्स इन्शूरन्स, सोने, ट्रॅक्टर, इनोव्हा कार अशी ४३ लाख २४ हजार ६४३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६ लाख ८५३ हजारांच्या जंगम व स्थावर मालमत्तेसह एकूण २७ लाख ९६ हजार ४०० रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या शिवाय विविध बॅंकांची कर्ज, वैयक्तिक व शासकीय अशी ३ कोटी ९ हजार ९७९ रुपयांची देणी असल्याचे राजेश राठोड यांनी स्पष्ट केले आहे. यात महावितरण कंपनीच्या वीज बीलासह एकूण ३१ लाख ४५ हजार ३५९ इतकी शासकीय देणी असल्याचे राठोड यांनी नमूद केले आहे.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.