Thursday 14 December 2017

ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना ; भाजपविरोधातील महायुतीचा प्रयोग यशस्वी

ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष


ठाणे जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आणि काही ठिकाणी काँग्रेस आघाडीने एकहाती विजय मिळवला. 26 जागांवर विजय मिळवत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजप 14 आणि राष्ट्रवादीने 10 जागा मिळवल्या आहेत. भाजपविरोधातील महायुतीचा प्रयोग यशस्वी यशस्वी ठरल्याचे गुरुवारी निकालानंतर स्पष्ट झाले. जेथे शिवसेनेची ताकद आहे तेथे स्वतंत्र्यपणे आणि जेथे ताकद कमी तेथे काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपला अंगावर घेण्याची रणनीती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत आखली होती. जिल्हा परिषदेतील ५२ जागांपैकी शहापुरात १४, तर भिवंडी तालुक्यात २१ अशा ३५ जागा निर्णायक ठरतील याची कल्पना असलेल्या शिवसेना नेत्यांनी भिवंडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र घेतले. मुरबाडमध्ये किसन कथोरे यांच्याशी दोन हात करण्यासाठी तुलनेने तुल्यबळ असलेल्या राष्ट्रवादीला अधिक जागा सोडण्यात आल्या, तर शहापुरात खिजगणतीतही नसलेल्या भाजपकडे कानाडोळा करत राष्ट्रवादीसोबत दोन हात करण्याचा निर्णय पालकमंत्री शिंदे यांनी घेतला. अंबरनाथ, कल्याण तालुक्यातही महायुतीचा हा प्रयोग शक्य तिथे राबविण्यात आला आणि यशस्वीही ठरला. जिल्हा परिषदेच्या शहापूर, भिवंडी, अंबरनाथ गटात भाजपला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेत घेऊन भाजपविरोधी महायुतीचा हा प्रयोग सुरूच राहील अशा पद्धतीची व्यूहरचना केल्याचे दिसत आहे.शिवसेनेने अंबरनाथ आणि शहापूरमध्ये राष्ट्रावादीशी युती केलेली आहे. या दोन्हीही ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली आहे. या निकालामध्ये काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालेली दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी काँग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे. भाजपाला १४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयाला आली आहेत. मागील निवडणुकीवेळी ६६ जागा असलेल्या जिल्हा परिषदेत पालघर जिल्हा निर्मितीमुळे सदस्यसंख्या ५३ झाली आहे. या जिल्हा परिषदेसोबतच भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पंचायत समित्यांच्या एकूण १०६ जागांची निवडणूकही पार पडली. पाच पंचायत समित्यांपैकी फक्त मुरबाडची भाजपाच्या हाती पडली आहे. उरलेल्या भिवंडी, शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समित्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असेल.समृद्धी महामार्गासह ठाणे जिल्ह्यातून जाणाºया वेगवेगळ्या प्रकल्पांना ग्रामीण भागातून विरोध आहे. त्यातही शेतजमिनी देण्याविरोधात आंदोलनही झाले होते. त्यामुळे दीड वर्षाने होणाºया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचा कौल समजून घेण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळेच भाजपाने ती प्रतिष्ठेची केली. त्याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. त्यांना काँग्रेस, मनसे, कुणबी सेना, रिपब्लिकन पक्ष सेक्युलर यांनी साथ दिली. परिणामी, गावागावानुसार व गटा-गणानुसार लढतीचे स्वरूप बदलले. त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात हा प्रश्न होता. पण हे राजकीय समीकरण मतदारांनी स्वीकारल्याचे त्यांनी दिलेल्या कौलातून समोर आले.

पक्षीय बलाबल
ठाणे जिल्हा परिषद

एकूण जागा - ५३
शिवसेना - २६
राष्ट्रवादी - १०
भाजपा - १४
काँग्रेस - १ (बिनविरोध)
अपक्ष - १
एका जागेची मतमोजणी स्थगित

पंचायत
समिती

एकूण जागा - १०६
शिवसेना - ४७
राष्ट्रवादी - १६
भाजपा - ३७
काँग्रेस - २
मनसे - १
रिपब्लिकन पक्ष -१
दोन गणांची मतमोजणी स्थगित
===========================================================

जिल्हा परिषदचा अंतिम निकाल : एकूण जागा - 53

  • शिवसेना - 26

  • भाजपा - 14

  • राष्ट्रवादी - 10

  • काँग्रेस - 1

  • अपक्ष - 1

तालुकानिहाय निकाल -

अंबरनाथ :

जिल्हा परिषद गट - एकूण जागा 4 :

  • शिवसेना-राष्ट्रवादी युती 3

  • भाजपा 1

पंचायत समिती -  एकूण जागा ८ :

  • शिवसेना-राष्ट्रवादी युती 7

  • भाजप 1

कल्याण तालुका :

जिल्हा परिषद गट – एकूण जागा 3 :

  • शिवसेना 3

  • भाजप 3

पंचायत समिती – एकूण जागा १२ :

  • भाजप 5

  • शिवसेना 4

  • राष्ट्रवादी 3


मुरबाड तालुका :

जिल्हा परिषद गट - एकूण जागा 8 :

  • भाजप 4

  • राष्ट्रवादी 3

  • शिवसेना 1

पंचायत समिती – एकूण जागा 16 :

  • भाजपा 10

  • राष्ट्रवादी 5

  • शिवसेना 1

शहापूर तालुका :

जिल्हा परिषद गट - एकूण जागा 14 : (शिवसेना राष्ट्रवादी युती)

  • शिवसेना 9

  • राष्ट्रवादी 5

पंचायत समिती -  एकूण जागा 28 :

  • शिवसेना 18

  • राष्ट्रवादी 6

  • भाजप 3

  • अपक्ष 1

भिवंडी तालुका :

जिल्हा परिषद गट – एकूण जागा 21 :

  • शिवसेना 10

  • भाजप 6

  • काँग्रेस 1

  • राष्ट्रवादी 2

  • अपक्ष 1

  • एक निकाल राखीव

पंचायत समिती – एकूण जागा 42 :

  • शिवसेना 19

  • भाजप 17

  • काँग्रेस 2

  • मनसे 1

  • राष्ट्रवादी 1

  • दोन निकाल राखीव

जिल्हा परिषद निकाल :

शहापूर - जिल्हा परिषद मळेगाव गटातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र विशे विजयी

कल्याण तालुका जि.प.गट एकूण - ६ 

शिवसेना - ३

भाजपा - ३

अंबरनाथ तालुका जि. प. गट एकूण - 

शिवसेना - ३

भाजपा -१

पंचायत समिती :

कल्याण पंचायत समिती एकूण गण - १२

भाजपा - ५

शिवसेना - ४

राष्ट्रवादी - ३

अंबरनाथ पंचायत समिती एकूण गण - ८

शिवसेना - ५

राष्ट्रवादी - २

भाजपा -१

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.