Thursday 28 December 2017

बीडमध्ये मंजरथ गावच्या सरपंचपदाची कमान ऐरोनॉटीकल इंजिनिअर ऋतुजाच्या हाती

बीडमध्ये मंजरथ गावच्या सरपंचपदाची कमान ऐरोनॉटीकल इंजिनिअर ऋतुजाच्या हाती


माजलगांव तालुक्यातील मंजरथ गावच्या सरपंचपदी तालुक्यात सर्वात कमी वय 25 वर्षे असलेली एरोनाॅटीकल इंजिनिअर तरूणी ऋतुजा राजेंद्र आनंदगांवकर ही दोन मातब्बर उमेदवारांचा पराभव करत सरपंच बनली आहे. तालुक्यातील मंजरथ हे गाव धाकटी काशी म्हणून राज्यात ओळखले जाते. मागील तीस वर्षांपासून राजेंद्र आनंदगांवकर हे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन असून, मंजरथ गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. राजेश्री आनंदगांवकर यांची मुलगी ऋतुजा आनंदगांवकर ही उच्चशिक्षित असून, तिने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ऐरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण करून ती इंजिनिअर झाली आहे. तिने एमटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत दोन मातब्बर उमेदवारांचा पराभव करत ऋतुजा आनंदगांवकर मंजरथच्या सरपंच बनल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यमान सरपंच तुकाराम चोरमले यांचा पराभव करत ऋतुजा आनंदगांवकर विजयी झाल्या आहेत. ऋतुजा उच्च शिक्षित आहे. तिने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऐरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले असून ती इंजिनीअर आहे. तिने ‘एम टेक’चे शिक्षणही पूर्ण केले आहे. अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सरपंच झालेल्या ऋतुजाचे स्वप्न गावचा विकास करण्याचे आहे. तिच्या विजयाने गावात आनंदाचे वातावरण आहे.

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मारली बाजी !

शेवगाव तालुक्यात दुसर्‍या टप्यात झालेल्या दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी लोकसंख्या असलेल्या तीन गावांवर भाजपने वर्चस्व मिळवले असून जनशक्ती मंचनेही एका गावात विजय मिळवत खाते उघडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहा ठिकाणी बाजी मारली आहे. या निवडणुकीत आपआपले गड राखण्यात प्रस्थापितांना बर्‍याच प्रमाण यश मिळवले असले तरी बोधेगाव व मुंगीमध्ये सत्तांतर झाले आहे. बोधेगाव येथे निवडणुकीच्या कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने बंद पाळण्यात आला. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण वातावरण आहे. बोधेगाव व बालमटाकळीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले. माजी जि. प. सदस्य नितीन काकडे गटाने सरपंचपदासह 11 जागा जिंकल्या. बालमटाकळीत भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान सरपंच तुषार वैद्य यांच्या गटाला सरपंचपदासह 11 जागा मिळाल्या. शहरटाकळीत राष्ट्रवादीच्या दोन गटातच लढत झाली. तेथे शिवाजी गवळी यांच्या गटाने सरपंचपदासाह आठ जागा मिळविल्या. खरडगाव येथे बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णू बोडखे यांच्या गटाकडे सरपंच पदासह पाच जागा मिळाल्या. कर्‍हेटाकळीत एकाकी लढत देत आपला बालेकिल्ला राखण्यात माजी सरपंच शफीक सय्यद यांना यश मिळाले. ढोरसडे-अंत्रे व हिंगणगाव ने या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या दोन गटांतच लढती झाल्या. मुंगीत राष्ट्रवादीचे निशिकांत राजेभोसले व भाजपच्या एका गटाने युती केली होती. त्यांच्या गटाला सरपंचपदासह 9 जागा मिळाल्या. वरुरमध्ये विद्यमान सरपंच भागवत लव्हाट यांच्या पत्नी मनिषा लव्हाट विजयी झाल्या. भगुरला जनशक्ती मंचच्या कार्यकर्त्यांतच लढत झाली. तेथे जनशक्तीचे वैभव प्रदीप पुरनाळे निवडून आले. ग्रामपंचायत व विजयी उमेदवार असे : बोधेगाव - सरपंच - सुभाष पवळे, ग्रा.पं. सदस्य - प्रकाश गर्जे, महादेव घोरतळे, मनिषा काशिद, सुनिल काशिद, उषा घोरतळे, विश्‍वनाथ कुढेकर, प्रिती अंधारे, विद्या ढवन, फिरोजखान पठाण,  स्नेहल खंडागळे, इंदूबाई मिसाळ, सदानंद गायकवाड, रमजू उस्मान पठाण, अश्‍विनी गुंजाळ, नितीन काकडे, ललिता चव्हाण व छबुबाई अकोलकर. बालमटाकळी-सरपंच-कौसल्या माणिक कवडे. सदस्य- तुषार वैद्य, हिराबाई घोरपडे, सुनंदा बामदळे, शहानजबी शेख, संतोष घोरपडे, अरुण बामदळे, रमा भोंगळे, धनंजय देशमुख, दुर्योधन काळे, शितल घुले, सारीका धाडगे, योगेश गरड, आशा घरजने व शोभा सौंदर. मुंगी - सरपंच - दादासाहेब भुसारी. सदस्य - गुलाब गव्हाणे, विठ्ठल रक्टे, शकुंतला कटारीया, प्रदीप काटे, गयाबाई गरड, हिराबाई अदमाने, अहमद चाँद, अनिता सुरवसे, भागवत देवढे, भैय्यासाहेब दसपुते, बेबीताई गायकवाड, नितीन घोरपडे, अंजना बल्लाळ, मिराबाई घोरपडे व मंगल जाधव. वरुर - सरपंच - मनिषा लव्हाट. सदस्य - बाबासाहेब म्हस्के, गोपाळ खांबट, शारदा म्हस्के, अर्जुन तुजारे, गयाबाई गरुड, रमेश वावरे, गोदावरी सोनटक्के, निर्मला म्हस्के, सुरेश वावरे, दामिनी कर्डीले व शमिना पठाण. भगुर - सरपंच - वैभव पुरनाळे. सदस्य - बेबीताई गंगावणे, दीपक पुरनाळे, प्रसाद गरुड, शिवाजी जायभाये, शारदा साबळे व शुभांगी साबळे आणि लताबाई मुरदारे दोघी बिनविरोध. शहरटाकळी - सरपंच - अलका शिंदे. सदस्य - छाया मिसाळ, रामआप्पा गिरम, उषाबाई मडके, महेश भालेराव, राजेंद्र खंडागळे, हिराबाई राऊत, राजेंद्र चव्हाण, शांता कोल्हे, सुनंदा गवळी, सुनिल गवळी व हिराबाई खंडागळे. खरडगाव - सरपंच - योगिता बोडखे. सदस्य - मल्हारी लवांडे, सुनिता बोडखे, जया लबडे, मच्छिंद्र आमटे, दिनकर सरसे, परविन शेख, सुनिल बोडखे, अंतिका घोरपडे, संगिता झिरपे, विक्रम लबडे व भाग्यश्री बोडखे.  कर्‍हेटाकळी - सरपंच - सय्यद शफीक. सदस्य - विजय ससाणे, सरस्वती ससाणे, शारदा ससाणे, विष्णू राठोड, विनायक गटकळ, ज्योती गटकळ तसेच छाया अंधारे, कमल कटे, संतोष लेंडाळ (तिघे बिविरोध). ढोरसडे - अंत्रे - सरपंच - सारीका वाघमारे. सदस्य - निवृत्ती ढोंबरे, जनार्दन माळवदे, गोकुळदास निकम, ज्ञानदेव निमसे, मधुरा खिलारे, तसेच रुख्मिनी पवार, सरस्वती ठोंबळ, सुनिता ठोंबळ व शांदाबाई माळवदे (चार बिनविरोध). हिंगणगाव- ने - सरपंच - वर्षा पवार. सदस्य - बबन पवार, रुपाली आहेर, विनोद पवार, अनिता पवार, अजित पवार, रेखा पवार व मंदाबाई म्हस्के.

निंबोडी, हिवरेझरे आणि देऊळगावात सत्तांत्तर

सहा ग्रामपंचायतींच्या निकालाने नगर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलू लागले आहेत. मेहेकरी व अरणगाव येथील सरपंचपद एका गटाला आणि सदस्याचे बहुमत मात्र दुसर्‍या गटाला देत, नव्याने निवडून आलेल्या सरपंचाची डाकेदुखी मात्र वाढविली आहे.  माहे जानेवारी महिन्यात मुदत संपणार्‍या मेहेकरी, निंबोडी, देऊळगाव सिध्दी, अरणगाव, बारदरी व हिवरेझरे या ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. बारदरी ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या सात जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे सरपंचपदाचीच निवडणूक झाली होती. सरपंचपदासाठी दुरंगी लढत झाली. या लढतीत नितीन मलिकार्जुन जंगम यांनी बाजी मारली. त्यांनी प्रतिस्पर्धी संतोष विश्‍वनाथ वाकचौरे यांचा  पराभव केला आहे. जंगम यांना 389 तर वाकचौरे यांना 103 मते पडली आहेत.गावकर्‍यांनी बारादरी ग्रामपंचायत पुन्हा सुधीर पोटे व अशोक पोटे यांच्या हाती सोपविली आहे.
अरणगावच्या सरपंचपदी स्वाती मोहन गहिले विजयी झाल्या आहेत. त्यांनी जिजाबाई ज्ञानेव शेळके याचा पराभव केला आहे.गहिले यांना 432 तर शेळके यांना 331 मते मिळाली आहेत. सदस्यपदी पोपट शिंदे, बबन शिंदे,मनिषा गहिले, संपत कांबळे,महेश पवार, शितल ससाणे, गणेश दळवी,वैशाली पुंड,लता शिंदे,सागर कल्हापुरे,मिरा कांबळे,नंदा करांडे व वर्षा कांबळे विजयी झाल्या आहेत. कांबळे केवळ दोन मतांनी विजयी झाल्या आहेत.  निंबोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शंकर बाबासाहेब बेरड हे 992 मते घेवून बाजी मारली आहे. त्यांनी जयराम बेरड यांचा पराभव केला आहे. जयराम बेरड यांना 903 मते मिळाली आहेत. या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी विद्या भिंगारदिवे, शेख रेश्मा, पांडुरंग शेंडगे, शिवाजी बेरड,संगीता बेरड,भिमा बेरड, पारुबाई आवारे, शैलेश भोसले, संदीप पानसरे,जयश्री तडके विजयी झाले आहेत. देऊळगाव सिध्दी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरिभाऊ केरु बुलाखे विजयी झाले आहेत. त्यांना 1 हजार 404 मते पडली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी बुलागे स्वप्नील यांना 1 हजार 96 मते पडली आहेत. सदस्यपदी नाना बोरकर, भीमराज सरगर, विद्या इंगळे, रींद्र कंडकर, संजय वाघमोडे, बाजीराव धायमुक्ते, आशा सुलाखे, मुक्ताबाई बोरकर, रामदास गिरवले, पार्वती देविकर हे विजयी झाले आहेत. 
मेहेकरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष पालवे निवडून आले आहेत. त्यांनी 750 मते घेत बाजी मारली आहे.त्यांचे प्रतिस्पर्धी शंकर पालवे यांना 593 मते पडली आहेत. सदस्यपदी छगन कानडे, सोपान पालवे,मंगल पंडित, शरद बडे, अश्‍विनी आंधळे, सोनाली आंधळे, पांडुरंग वनवे, लहानुबाई पालवे व सुरेखा पालवे विजयी झाल्या आहेत.  हिवरेझरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा मान अनुजा मयुर काटे यांना मिळाला आहे. त्यांना 595 मते मिळाली असून, मंदाबाई काळे यांना फक्त 588 मते पडली आहेत. सदस्यपदी साहेबराव टकले, नाथा काळे, संगिता काळे,भाऊसाहेब काळे, नेहा काळे, गणेश साळवे, प्रतीक्षा आनंदकर, शिला पवार आदी विजयी झाले आहेंत.

सोलापूर ग्रा.पं.चा संमिश्र निकाल

सोलापूर यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपशी संबंधित गटांना संमिश्र यश मिळाल्याचे स्पष्ट झाले. दुसर्‍या टप्प्यात माढा तालुक्यातील 12, करमाळा तालुक्यातील 13, तर बार्शी तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती.
 माढ्यात संमिश्र कौल 
माढा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र स्वरूपाचा कौल दिला. कन्हेरगाव, अंजनगाव, वडशिंगे, मुंगशी या ग्रामपंचायतींत सत्तांतर झाले. टेंभुर्णी, आढेगाव, पिंपळखुंटे या ठिकाणी सरपंच एकाचा, तर बहुमत विरोधकांकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वडोली ग्रामपंचायत वगळता इतर सर्व ग्रामपंचायतींत शिंदे बंधूंचीच सत्ता आली आहे.
करमाळ्यात पाटील गटाचे वर्चस्व
तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींत  आ. नारायण पाटील यांच्या गटाने घवघवीत यश संपादन केले आहे. 13 पैकी 8 ग्रामपंचायतींची सत्ता आ. पाटील गटाकडे मोठ्या मताधिक्क्याने मतदारांनी दिली आहे. जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे गटाकडे 4 ग्रा.पं.ची सत्ता आली आहे. माजी आ. शामल बागल गटाकडे रामवाडी, भगतवाडी, गुलमोहरवाडी या ग्रामपंचायतीची सत्ता आली असून, मौजे उंदरगाव, राजुरी, केत्तूर या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदांवर आमच्या गटाचे  बहुमत असल्याचा दावा बागल गटाकडून करण्यात आलेला आहे.
बार्शीत राष्ट्रवादी, भाजपचे यश
तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने, तर एका ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे.  उंडेगावच्या सरपंचपदी शामलताई साहेबराव सलगर, अंबाबाईचीवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी सत्यवती भारत माळी, तर मुंगशी (वा.) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिनेश रामचंद्र राक्षे हे निवडून आले आहेत. विजयाबाबत दावे प्रतिदावे करण्यात आले. उंडेगाव व अंबाबाईचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी समर्थक निवडून  आल्याचा दावा आ. सोपल गटाकडून करण्यात आला आहे. मुंगशी (वा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाचे समर्थक सरपंचपदावर विराजमान झाल्याचे सांगण्यात आले. अंबाबाईचीवाडी येथे स्थानिक आघाडीचे सदस्य निवडून आले आहेत.

आ. भालके १० आ. परिचारक ३ आवताडेंचेे ६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

मंगळवेढा - दुसर्‍या टप्प्यात झालेल्या 19 गावांच्या ग्रामपंचायती निवडणुकीत आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे गटाला संमिश्र यश मिळाले आहे. यात आ. भालके गटाने 10 जागी आघाडी घेतली आहे, तर आ. परिचारक गटाला 3 जागी चांगले यश मिळाले आहे.  मुंढेवाडी या अगोदरच अविरोध झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भालके गटाने बाजी मारली. भारत बेदरे यांनी बठाण येथे वजन कायम ठेवले आहे. सभापती प्रदीप खांडेकर यांनी हिवरगाव येथे वर्चस्व अबाधित ठेवले, तर तालुक्याचे नेते स्व. दत्ताजी भाकरे यांच्या पत्नी शांताबाई भाकरे सरपंच म्हणून  निवडून आल्या आहेत.  आ. भालके यानी शेलेवाड़ी, बठाण, चिक्कलगी, शिरसी, खुपसंगी, नंदुर, उचेठान, मुंढेवाड़ी येथे तर परिचारक गटाने भाळवणी, जंगलगी  निंबोणी , या गावात आपले सरपंच निवडून आणले आहेत.  तसेच आवताडे गटाने ब्रम्हपुरी, हिवरगाव, आंधळगाव, खड़की, अकोले, जुनोनी येथे सत्ता मिळवली.
गावनिहाय विजयी  सरपंच   बठाण सरपंच- संजय गुंडोंपंत बळवंतराव, उचेठान सरपंच- दत्तात्रय रावसो गडदे, चिक्कलगी सरपंच- दिनेश मल्लेशा पाटील, नंदुर सरपंच- गुरैया शकरया स्वामी, शिरसी सरपंच- सुरेखा बाबासो गायकवाड़, खुपसंगी सरपंच-संभाजी ज्ञानदेव हेगड़े, शेलेवाड़ी सरपंच-विमल जोतिराम चव्हाण, मुंढेवाड़ी  सरपंच-सविता शिवाजी पाटील, अकोले सरपंच-सुखदेव इंगळे, खड़की सरपंच-सविता बेलदार, जुनोनी सरपंच-मालन जाधव, हिवरगाव सरपंच- रवि खांडेकर, आंधळगाव सरपंच- शांताबाई दत्तात्रय भाकरे, ब्रम्हपुरी सरपंच- मनोज पुजारी, जंगलगी सरपंच-  शशिकला चंद्रकांत चौखंडे, महमदाबाद सरपंच-रतन सुरेश हत्तिकर, जालिहाळ सरपंच-सचिन तमन्ना चौगुले, निंबोनी सरपंच- वंदना आप्पा शिंदे, भाळवणी सरपंच-कमल दामाजी चव्हाण.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कुडाळ, वेंगुर्ले व कणकवली तालुक्यांतील दुसर्‍या टप्प्यातील काही ग्रा. पं. च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.  यात वेंगुर्ले, कुडाळ व देवगड तालुक्यांत शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसून आले. तर भाजप व स्वाभिमान पक्ष यांना संमिश्र यश मिळाले. काही ग्रा. पं. वर गाव पॅनेलने विजय मिळविला आहे.देवगड व  कुडाळ तालुक्यांतील काही गावे दिग्गज लोकप्रतिनिधींची असल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरल्या होत्या. अनेक ठिकाणी युतीतील मित्रपक्ष शिवसेना व भाजप या निवडणुकांसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तर काही ठिकाणी स्वाभिमान पक्षाने भाजपला छुपे समर्थन दिले होते.

देवगडमध्ये सेनेची अनपेक्षित घोडदौड 

देवगडातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने सर्वाधिक चार, तर भाजप, समर्थ विकास पॅनेल व गाव विकास पॅनेलने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. दिग्गजांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या  या निवडणुकीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी वळीवंडे ग्रामपंचायत, माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिरवली ग्रामपंचायत स्वत:कडे राखली, तर सभापती जयश्री आडिवरेकर यांचे होम पिच असलेल्या फणसगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत पॅनलला पराभवाचा झटका बसला. माजी उपसभापती नासीर मुकादम हे रामेश्‍वर सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. वळीवंडे, वानिवडे, पावणाई व विठ्ठलादेवी या चार ग्रामपंचायतींवर  शिवसेनेने दावा केला आहे. रामेश्‍वरमध्ये स्वाभिमान, फणसगावमध्ये गाव पॅनेल, तर शिरवलीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले.

मोखाड्यात अटीतटीच्या लढतीत भाजपची सरशी

मोखाडा : मोखाड्यातील सायदे आणि किनिस्ते या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. यामध्ये सायदे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे दिलीप झुगरे 18 तर किनिस्ते सरपंच पदी भारती शिंदे 21 मतांनी विजयी झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी शिवसेनेला धोबीपछाड देत पूर्ण बहुमतात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सायदे ग्रामपंचायती मध्ये 11 सदस्य संख्या आहे. त्यामध्ये   4 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामध्ये सेना आणि भाजपचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले होते. आज झालेल्या मतमोजणीत उर्वरीत 7   जागांपैकी 4 जागी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. तर सरपंच पदाच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे दिलीप झुगरे यांनी शिवसेनेचे देवराम कामडी यांच्या वर 18 मतांची आघाडी घेऊन विजय मिळवत पूर्ण बहुमत सिद्ध केले आहे. दिलीप झुगरे यांना 390 तर देवराम कामडी यांना 372 मते मिळाली आहेत.किनिस्ते ग्रामपंचायतीची निवडणूक ही अटीतटीचीच झाली आहे. येथे भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार भारती शिंदे यांनी शिवसेनेच्या कविता मडके यांच्यावर 21 मतांची आघाडी घेऊन विजय मिळविला आहे. भारती शिंदे यांना 323 तर सेनेच्या कविता मडके यांना  302 मते मिळाली आहेत. किनिस्ते ग्रामपंचायती मध्ये 7 सदस्य संख्या आहे. त्यामध्ये भाजपचे 3 सदस्य अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. तर आज झालेल्या मतमोजणीत पुन्हा 2 सदस्य निवडून आणत भाजपने एकूण 5 उमेदवार निवडून आणत सरपंच पदासह किनिस्ते ग्रामपंचायतीवर पूर्ण बहुमत मिळविले आहे.

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.