Thursday 21 December 2017

काँग्रेसच्या स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या नव्या महापौर; शिवसेनेचा पाठिंबा

काँग्रेसच्या स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या महापौर; शिवसेनेचा पाठिंबा, उपमहापौरपदी सुनील पाटील


कोल्हापुरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत  काँग्रेसच्या स्वाती यवलुजे या विजयी झाल्या. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांचा विजय झाला. शुक्रवारी झालेल्या महासभेत यवलुजे यांना  48 इतकी मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभारलेल्या भाजपच्या मनीषा कुंभार यांना 33 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सुनील पाटील यांना देखील 48 मते मिळाली. तर ताराराणी आघाडीचे उमेदवार कमलाकर भोपळे यांना 33 मते मिळाली. पालिकेच्या सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्याने यवलुजे व पाटील यांची निवड निश्चित मानली जात होती. निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी व्हिप जारी केला होता.पालिकेत काँग्रेसचे 29, राष्ट्रवादीचे 15, ताराराणी आघाडीचे 19, भाजपचे 14 तर शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. महापौर , उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले.

कोल्हापूरचे पक्षीय बलाबल  

एकूण नगरसेवकांची संख्या - 81
काँग्रेस - 29
राष्ट्रवादी काँग्रेस - 15
भाजप - 14
ताराराणी आघाडी - 19
शिवसेना - 4.
या आकड्यांनुसार काँग्रेस आघाडीकडं 44 नगरसेवक आहेत. तर भाजप ताराराणी आघाडीकडं 33 नगरसेवक आहेत. त्यामुळं आता शिवसेना याबाबत कुणाला मतदान करणार याची चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.