Monday 18 December 2017

नंदूरबार, नवापूरला काँग्रेसला सत्ता - काँग्रेसचे नगराध्यक्ष ; तळोद्यात नगराध्यक्ष पदासह भाजपला सत्ता ; वाडा नगरपंचायत निवडणुकीत मंत्री विष्णू सावरांच्या मुलीचा पराभव

नंदूरबार, नवापूरला काँग्रेसला सत्ता - काँग्रेसचे नगराध्यक्ष ; तळोद्यात नगराध्यक्ष पदासह भाजपला सत्ता



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

धुळे, नंदूरबार व नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला नगराध्यक्ष पद मिळाले आहे. त्याचबरोबर सत्ताही मिळाली आहे. तर तळोद्यात नगराध्यक्ष पदासह सत्ताही भाजपला मिळाली. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदूरबारमधील काँग्रेसचा गड कायम ठेवला. मुळात नंदूरबार पालिकेसाठी मोठी चुरस होती. यात अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी वर्चस्व पणाला लावले होते.
नंदूरबार जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यातील नंदूरबार व तळोदा पालिकेसाठी दि. 13 डिसेंबरला मतदान झाले होते. तर तळोद्यात रविवारी मतदान झाले. तीनही पालिकांचे निकाल हाती आले. तेव्हा नंदूरबार व नवापूर पालिकेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविल्याचे पुढे आले. नंदूरबारच्या निकालाकडे राज्यातील धुरिणांचे लक्ष लागून होते. या पालिकेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी या नगराध्यक्ष पदी निवडून आल्या. त्यांनी अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू प्रा. रविंद्र चौधरी यांचा 4781 मतांनी पराभव केला. रत्ना रघुवंशी यांना 36161 मते मिळाली. तर रविंद्र चौधरी यांना 31380 मते मिळाली. नंदूरबारमध्ये नगरसेवक पदाच्या चुरशीच्या निवडीत 38 जागांपैकी काँग्रेसला 27 जागा राखता आल्या. भाजपला 11 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला एक जागा मिळाली.
नवापूर येथे पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हेमलता पाटील या नगराध्यपदी निवडून आल्या. तर नगरसेवक पदासाठी काँग्रेसला 14 राष्ट्रवादीला 04 तर शिवसेनेला 01 व अपक्षाला 01 जागा मिळाल्या. आमदार सुरूपसिंग नाईक यांनी पालिकेवरील सत्ता कायम ठेवली. तळोदा पालिकेत भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे अजय परदेशी निवडून आले. तर नगरसेवक पदासाठी भाजपला 11 जागा मिळाल्या. काँग्रेसला 06 तर शिवसेनेला 01 जागा मिळाली. भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी भाजपची सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले.

नगरपरिषद/ नगरपंचायत
प्रभाग
जागा
उमेदवार
एकूण मतदार
मतदान केंद्रे
सदस्यपदासाठी
अध्यक्षपदासाठी
नंदुरबार
19
39
111
6
1,00,263
126
नवापूर
10
20
95
6
28,791
38


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

मंत्री विष्णू सावरांच्या मुलीचा पराभव, सेनेच्या कोलेकर विजयी


ठाण्यातील वाडा नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या निशा सावरा यांचा त्यांनी पराभव केला. निशा सावरा या आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या आहेत.१७ जागांच्या वाडा नगरपंचायतीत शिवसेना, भाजपला प्रत्येकी ६ तर काँग्रेसला २, बहुजन विकास आघाडीला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. अपक्ष उमेदवारांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे निकालावरून दिसत आहे.सेना आणि भाजपला प्रत्येकी ६ जागा मिळाल्यामुळे बहुमताचा आकडा कोणालाच गाठता आलेला नाही. सत्ता मिळवण्यासाठी आता या दोन्ही पक्षांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

पालघर जिल्ह्यातील नवनिर्मित वाडा नगर पंचायतीबरोबरच जव्हार आणि डहाणू नगर परिषदांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये वाडा नगर पंचायत ही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र तिथे शिवसेनेचा विजय झाला. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीतांजली कोलेकर यांना मतदारांनी पसंती दिली, तर सावरा यांची कन्या निशा सावराचा पराभव झाला. वाडा नगर पंचायतीत शिवसेना 6, भाजप 6, काँग्रेस 2 ,बविआ 2 आणि राष्ट्रवादी 1 असं पक्षीय बलाबल आहे.
जव्हार नगरपरिषदेत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेचे भिकुंभाई पटेल हे नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले असून त्यांनी भाजप आणि प्रतिष्ठान आघाडीचे भरत पाटील यांचा 232 मतांनी पराभव केला. येथे शिवसेना 9, राष्ट्रवादी 6, भाजप 1, प्रतिष्ठान आघाडी 1 असं पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजप प्रत्येकी सहा जागांवर विजयी झाले असून काँग्रेस दोन, बविआ एक रिपिब्लकन पक्ष एक तर राष्ट्रवादी एक जागेवर विजयी झाले आहेत.
निशा सवरा यांना २ हजार ६७७ मते मिळाली. त्या ४४२ मतांनी पराभूत झाल्या. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या अमृता मोरे यांना १ हजार १०५ तर काँग्रेसच्या सायली पाटील यांना ८३९ मते मिळवून त्या चौथ्या क्र मांकावर फेकल्या गेल्या. प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपचे रामचंद्र भोईर हे विजयी झाले आहेत. त्यांना २४३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पधीॅ उमेदवार शिवसेनेचे रविंद्र कामडी यांना १४९ मते मिळाली. प्रभाग क्र मांक दोन मधून भाजपचे अरूण खुलात हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय तरे हे पराभूत झाले. क्र मांक ३ मधून भाजपचे वैभव भोपातराव यांनी शिवसेनेचे श्रीकांत आंबवणे यांचा ८ मतांनी पराभव केला.प्रभाग क्र मांक ३ मधून शिवसेनेच्या नयना चौधरी यांनी भाजपच्या कविता गोतारणे यांचा पराभव केला आहे. प्रभाग क्र मांक पाच मधून भाजपच्या अंजनी पाटील ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी मनसेच्या ताराबाई डेंगाणे यांचा ४७ मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्र मांक ६ मधून भाजपच्या रिमा गंधे यांनी शिवसेनेच्या रश्मी गंधे यांचा पराभव केला आहे. प्रभाग सात मधून शिवसेनेचे संदीप गणोरे विजयी झाले असून त्यांनी बविआ चे देवेंद्र भानुशाली यांचा पराभव केला आहे. ८ मधून शिवसेनेच्या शुभांगी धानवा यांनी १७० मते मिळवून भाजपच्या अश्विनी डोंगरे यांचा ५७ मतांनी पराभव केला. प्रभाग क्र मांक ९ मध्ये बविआ चे विसम शेख निवडून आले आहेत.प्रभाग क्र मांक १० मधून भाजपचे मनिष देहेरकर हे निवडून आले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विकास पाटील यांचा १०८ मतांनी दारूण पराभव केला. या प्रभागात सर्वात जास्त म्हणजेच १० उमेदवार रिंगणात होते. प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेच्या जागृती काळण, प्रभाग क्र मांक १२ काँग्रेसच्या भारती सपाटे, प्रभाग क्र मांक १३ शिवसेनेच्या उर्मिला पाटील, प्रभाग क्र मांक १४ रिपिब्लकन पक्षाचे रामचंद्र जाधव, प्रभाग १५ काँग्रेसच्या विशाखा पाटील, प्रभाग १६ मध्ये शिवसेनेच्या वर्षा गोळे तर प्रभाग क्र मांक १७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुचिता पाटील या विजयी झाल्या आहेत.
डहाणू नगर परिषदेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. भाजपचे भरत राजपूत हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. भाजप 15, राष्ट्रवादी 08, शिवसेना 2 असं पक्षीय बलाबल आहे.
काँग्रेस आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी आणि अंमळनेरचे आमदार शिराष चौधरी यांचे बंधू रविंद्र चौधरी यांच्यात काट्याची टक्कर असल्याने या लढतीकडे संपूर्ण खांन्देशचं लक्ष होतं. मात्र काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्ना रघूवंशी 4 हजार 781 मतांनी विजयी झाल्या. पालिकेत 39 जागांपैकी 24 जागांवर काँग्रेस आणि 4 जागांवर शिवसेना, तर भाजपचे 11 उमेदवार निवडून आले.
नवापूर पालिकेतही काँग्रेसने अबाधित वर्चस्व ठेवलं. या ठिकाणी काँग्रेसच्या  हेमलता पाटील या 1742 मतांनी विजयी झाल्या. तर 20 नगरसेवक संख्या असलेल्या नवापूर पालिकेत काँग्रेसचे 14, राष्टवादीचे 4, शिवसेना आणि अपक्ष असे प्रत्येकी 1 नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे या पालिकेत भाजपला खातंही उघडता आलं नाही.दरम्यान तळोदा पालिकेतील काँग्रेसच्या ताब्यात असलेली सत्ता काबीज करण्यात भाजपाला यश आलं. तळोदा पालिकेत भाजपचे अजय परदेशी हे 1390 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आले. इथे भाजप 11, काँग्रेस 0, तर शिवसेना 1 असं पक्षीय बलाबल आहे.


जव्हार नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला
जव्हार नगरपरिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत, अटीतटीच्या लढतीत शिवसेनेने बाजी मारली आहे. यावेळी प्रथमच थेट मतदारांकडून नगराध्यक्ष पदी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल निवडून आले आहेत. तर 17 जागांपैकी शिवसेनेने 9 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवित भगवा फडकविला आहे.
शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या जव्हार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होती. यावेळी प्रथमच थेट मतदारांकडून नगराध्यक्ष निवडला जाणार होता. नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होती. या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे चंद्रकांत पटेल 192 मतांनी विजयी झाले आहेत. चंद्रकांत पटेल यांना एकूण 1 हजार 768 मते मिळाली आहेत. तर जव्हार प्रतिष्ठान, भाजप युतीचे उमेदवार भरत पाटील यांना 1576 मते मिळाली आहेत. तसेच काँग्रेस पुरस्कृत दिलीप तेंडुलकर 1399 आणि राष्ट्रवादीचे संदिप वैद्य यांना 1317 मते मिळाली आहेत. दरम्यान, 17 सदस्य संख्या असलेल्या जव्हार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आले असून सेनेने एकहाती सत्ता मिळवित भगवा फडकविला आहे. तर राष्ट्रवादी 6 आणि भाजप व जव्हार प्रतिष्ठानचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांची शहरातील विजय स्तरापासून संपूर्ण शहरात मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, गुलाल तसेच शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी शहर दणाणले आहे.भाजपने पहिल्यांदाच स्वबळावर नगरपरिषदेत खाते ऊघडले. भाजपचे जव्हार शहर अध्यक्ष कुणाल उदावंत हे प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक 4 मधून विजयी झाले आहेत. या पूर्वी सेना-भाजप युती असताना भाजपचे निवडून येत होते. स्वबळावर आजवर भाजपचा एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता, मात्र कुणाल उदावंत हे स्वबळावर निवडून आल्याने भाजपने जव्हार नगरपरिषदेत खाते उघडले आहे.

डहाणू नगरपरिषदेत कमळ 
डहाणू : बहुचर्चीत डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे भरत रजपूत निवडून आले असून २५ पैकी १५ नगरसेवकपदी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीला ८ जागांवर तर शिवसेनेला २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निकालाबाबत राष्ट्रवादीचे आ. आनंद ठाकूर यांनी संशय व्यक्त केला आहे.काही फ़रकाने राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक पराभूत झाल्याने आ.आनंद ठाकूर यांनी इव्हिएम मशिन आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत संशय व्यक्त केला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे भरत राजपूत यांनी राष्ट्रवादीचे मिहीर शहा यांना २६०९ मतांनी पराभूत केले.प्रभाग १ ( अ) भावेश देसाई (राष्ट्रवादी ) ४८१ मते, प्रभाग १ (ब) उर्मिला नामकोडा (भाजपा ) ६०६ मते , प्रभाग २ (अ)रश्मी सोनी (भाजपा ) ११२० मते , प्रभाग २ (ब)विक्र म नायक (भाजपा) १०६८मते ,प्रभाग ३(अ) तारा बारी (भाजपा) ९०२ मते, प्रभाग ३ (ब) रोहिंग्टन झाईवाला (भाजपा) ८९० मते, प्रभाग ४ (अ) रमेश काकड (भाजपा) ७३६ मते , प्रभाग ४ ( ब) चंद्रकला सिंह ( भाजपा) ६४६ मते, प्रभाग ५ (अ) तनुजा धोडी ( भाजपा) ११०७ मते, प्रभाग ५ (ब) अनिता माच्छी (भाजपा) ११८० मते ,प्रभाग ५ (क )जगदीश राजपूत ( भाजपा) ११२५ मते, प्रभाग ६ (अ) निमिल गोहिल (भाजपा) ४४१४ मते ,प्रभाग 6 (ब)छाया बोथरा( भाजपा) ३६४ मते, प्रभाग ७ (अ)भास्कर जिटिथोर (भाजपा) ७२४ मते, प्रभाग ७ (ब) कविता बारी (राष्ट्रवादी ) ६९९ मते, प्रभाग ८ (अ), वासू तुंबडे (शिवसेना) ११९० मते , प्रभाग ८(ब) श्वेता पाटील (शिवसेना) १४५८ मते , प्रभाग ९ (अ)दिपाली मेहेर ( राष्ट्रवादी ) ८०२ मते ,प्रभाग 9(ब)समीउद्दीन पीरा(राष्ट्रवादी ) ८७३ मते , प्रभाग १० (अ) किर्ती मेहता( राष्ट्रवादी ) १२९६ मते , प्रभाग १० (ब)राजेंद्र माच्छी(राष्ट्रवादी )१२०२ मते ,प्रभाग ११ (अ)तन्मय बारी ( राष्ट्रवादी) ७४५ मते, प्रभाग ११ (ब)कविता माच्छी( राष्ट्रवादी ) ७७४ मते , प्रभाग १२ (अ) भूषण सोरठी (भाजपा) ८४१ मते , प्रभाग १२ (ब)भारती पाटील(भाजपा) ८५१ मतांनी विजयी झाले आहेत. दरम्यान या निवडणुकीत डहाणू नगर परिषदेत राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष मिहीर शहा, माजी नगराध्यक्ष शशीकांत बारी, माजी नगरसेविका रेणूका राकामुथा, माजी उपनगराध्यक्ष प्रदिप चाफेकर, भाजपच्या उमेदवार माजी नगराध्यक्षा रमिला पाटील , तर शिवसेनेतून माजी नगरसेवक श्रावण माच्छी, काँग्रेसचे माजी नगरसेवक सईद शेख, या दिग्गजांचा झालेला पराभव डहाणूत चर्चेचा विषय झाला आहे.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.