Friday, 2 April 2021

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन 

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग (वय ५४ वर्षे) यांचे शनिवारी (ता. ३ एप्रिल) पहाटे उपचारादरम्यान ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राजेंद्र सरग यांच्यासाठी केलेले प्रयत्नही कमी पडले. सरग यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. सरग यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समजताच जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी उपचारासाठी मोठे प्रयत्न केले होते. परंतु जिलाधिकाऱ्यांचे प्रयत्नही सरग यांना वाचवू शकले नाहीत. राजेंद्र सरग यांना मागील आठवड्यात कार्यालयात असतानाच त्रास होऊ लागल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवसांतच त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. मनमिळावू अधिकारी म्हणून माध्यम क्षेत्र व प्रशासकीय क्षेत्रात त्याचे नावलौकिक होते. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना सरग यांना कोरोना झाल्याचे समजाताचं त्यांनी अनेक वेळा डॉक्टरांशी संपर्क साधून मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र कोरोना पुढे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मला फोन केला तरी बेड उपलब्ध होणार नाही असे सांगितले.  त्यामुळे परिस्थिती किती भयंकर असल्याचे वास्तव पुढे आले आहे. सरग यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांचे प्रमोशन असल्याने माहिती खात्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजेंद्र सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील दैनिक तरुण भारतमधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यानंतर राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती संचालनालयात नियुक्ती झाली होती. गेली चार वर्षांपासून ते पुण्यात जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्यरत होते. तत्पूर्वी राज्याच्या विविध भागात त्यांनी काम केले आहे. मनमिळावू स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने शासकीय यंत्रणेला आणि पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा माहीती अधिकारी राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
-चंद्रकांत भुजबळ

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================