Tuesday 6 September 2022

APMC Election : राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

APMC Election : राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर


राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणूकीस पात्र 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम (APMC Election) जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया बुधवार 7 सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. ज
गदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. सरकारच्या बदलत्या धोरणानुसार यंदा सभापतींची निवड होणार असल्याने या निवडणूकांना मिनी विधानसभा निवडणूकांचे स्वरुप येणार असल्याचे चित्र आहे. तर कोर्टाच्या निर्देशानुसार राज्यातील 6 बाजार समित्यांची निवडणूक ही 18 व 19 डिसेंबरलाच होणार आहे.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. असे असले तरी 281 बाजार समित्यांची निवडणूक ही 17 जानेवारी रोजी तर उर्वरित 6 बाजार समित्यांची निवडणूक ही 18 व 19 डिसेंबरला होणार आहे. कोर्टाने तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये ज्याचे नावे सातबारा उतारा आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला सहभाग घेता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करणारा हा जनतेमधून निवडूण आलेला असणे गरजेचे असल्याचे म्हणत सरकराने थेट शेतकऱ्यांमधून सभापतीची निवड असा निर्णय घेतला होता. पण यावर एका शेतकऱ्याने याचिका दाखल केली होती. त्यानुसार आता बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून यावरच निवडणूका थेट शेतकऱ्यांमधून की सभासदांमधून हे स्पष्ट होणार आहे.
       प्राधिकरणाने 6 आणि 21 ऑक्टोबर 2021 रोजीच्या आदेशानुसार निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केल्या होत्या. मात्र, कृषी पत संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर 13 याचिका दाखल झाल्या होत्या. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणूकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका तातडीने पूर्ण करुन त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका पूर्ण करण्याबाबत 18 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश दिले. त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने आज निवडणूक कायक्रम जाहीर केला आहे. बाजार समितीच्या निवडणूकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची 27 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक,(APMC Election ) सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी 7 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झालेल्या (Election Program) असता उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत व धारुर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणूका 2 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशानुसार सुरु केलेल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे 18 डिसेंबर व 19 डिसेंबर 2022 रोजी होणार असल्याची माहितीही डॉ.पाटील यांनी दिली आहे.

मतदार यादी व निवडणू‍क कार्यक्रम

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सुची मागवणे- 27 सप्टेंबर 2022 पर्यंत, प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरीता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे- 3 ऑक्टोबर 2022, बाजार समिती सचिवाने नमुना 4 मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करणे- (APMC Election ) 3 ते 31 ऑक्टोबर 2022, बाजार समिती सचिवाने नमुना 4 मधील प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांच्याकडे सादर करणे- 1नोव्हेंबर 2022, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे- 14 नोव्हेंबर 2022, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप/ हरकती मागवणे- 14 ते 23 नोव्हेंबर, प्राप्त आक्षेप/हरकतींवर निर्णय घेणे- 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे- 7 डिसेंबर 2022

निवडणू‍क कार्यक्रम

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे- 23 डिसेंबर 2022, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी- 23 ते 29 डिसेंबर 2022, नामनिर्देशनपत्रांच्या छाननीचा दिनांक- 30 डिसेंबर 2022, छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीचा दिनांक- 2 जानेवारी 2023, उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी- 2 ते 16 जानेवारी 2023, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करण्याचा दिनांक- 17 जानेवारी 2023, मतदान- 29 जानेवारी रोजी आणि मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येतील, असे निवडणूक कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.