पारगे यांचा पराभव; आबनावे, रामकृष्ण सातव, संतोष नांगरे विजयी; राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीने उडवला धुव्वा!
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत पहावयास मिली असून निकाल मात्र धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया मतमोजणी केंद्र बाहेर व्यक्त केल्या जात आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या वर्गातून राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे नवनाथ पारगे यांचा 90 मतांनी पराभव झाला आहे. तर ग्रामपंचायत गटातून आबासाहेब (नाना) आबनावे, रामकृष्ण सातव यांनी यश संपादन केले आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आली आहे. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर हा एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीने धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. तर 2 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी झाले आहे. या व्यतिरिक्त 3 जागावर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालासह पुणे बाजार समितीमध्ये भाजपचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले आहे. ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे नानासाहेब आबनावे (चंदननगर खराडी) हे ३०७ मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाघोलीतील रामकृष्ण सातव हे सर्वाधिक ४०५ मते घेवून विजयी झाले आहेत. तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी) हे २५६ मते घेवून विजयी झाले आहेत. या गटात महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे पराभूत झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघाच्या एका जागेवर शेतकरी विकास आघाडी सर्वपक्षीय पॅनलचे रवींद्र कंद (लोणीकंद) ३७५ मते घेवून विजयी झाले आहेत. तसेच हमाल मापाडी मतदार संघातून संतोष नांगरे यांच्या विजयाची शिट्टी वाजली आहे. त्यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली. या मतदार संघातील अन्य पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : राजेंद्र चोरघे ४०३, गोरख मेंगडे ३१४, संजय उंद्रे ८, गोपाळ दसवडकर ३ मते मिळाली आहेत. या मतदार संघात 1 जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. एकूण २ हजार ७ पैकी १ हजार ८०२ मतदान (८९.७९ %) झाले. त्यापैकी १ हजार ६१६ मते वैध ठरली. नांगरे यांचे शिट्टी चिन्ह होते. पुणे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या पुण्याच्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात धक्कादायक निकाल लागला आहे. ग्रामपंचायत गटातील चारपैकी दोन भारतीय जनता पक्षाने तर दोन जागांच्यावर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. ग्रामपंचायत गटातुन सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल मधील सुदर्शन जयप्रकाश चौधरी व रवींद्र नारायणराव कंद या दोघांनी बाजी मारली असुन, याच गटातुन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल चे रामकृष्ण हेमचंद्र सातव व आबासाहेब कोंडीबा आबनावे हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत गटातुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांना पराभावाचा धक्का बसला आहे. व्यापारी गटात १३ हजार १७४ मतदार, हमाल, तोलणार गटात २ हजार ७ मतदार, सहकारी सेवा संस्था गटात १९१८ मतदार आणि ग्रामपंचायत गटात ७१३ मतदार असे एकूण १७ हजार ८१२ मतदारांची संख्या आहे. तर त्यापैकी १२ हजार ८७७ जणांनी मतदान केले आहे. त्यामुळे एकूण ७२.२९ टक्के इतके मतदान झाले आहे.
उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे-
रामकृष्ण हेमचंद्र सातव ४०५ मते
सुदर्शन जयप्रकाश चौधरी २५८ मते
राहुल रामचंद्र काळभोर २३६ मते
शुक्राचार्य हिरामण वांजळे २११ मते
व्यापारी-अडते मतदारसंघातून जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले, अनिरुद्ध भोसले विजयी
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी-अडते मतदार संघातील दोन जागांवर जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गणेश घुले यांना सर्वाधिक ५ हजार ८५२ एवढी मते मिळाली तर अनिरुद्ध भोसले यांना ५ हजार ८१६ एवढी मते मिळाली. व्यापारी अडते मतदार संघात १३ हजार १७४ मतदानापैकी ८ हजार ७०७ (६६.०९) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. या निवडणुकीत बाजार समितीचे माजी संचालक विलास भुजबळ यांच्यासह अमोल घुले, सौरभ कुंजीर पराभूत झाले आहेत. या मतदार संघातील वैध मते ८ हजार २९१ असून ४१६ अवैध मते असल्याचे घोषित करण्यात आले. विजयाच्या घोषणेनंतर व्यापाऱ्यांनी सभागृहाबाहेर गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.
पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते-:
सौरभ कुंजीर 1640,
अशोक गावडे 128,
अमोल घुले 374,
रमेश बडदे 32,
सुहास बनसोडे 19,
उमरफारुक बागवान 159,
बाळासाहेब भिसे 194,
विलास भुजबळ 650,
अविनाश शेवते 38,
शिवाजी सुर्यवंशी 1270.
बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक दृष्टिक्षेप | ||
क्र. | मतदारसंघाचे नाव व वर्गवारी | सदस्य संख्या |
1 | सेवा सहकारी संस्था मतदारसंघ | 11 |
अ) सर्वसाधारण | 7 | |
ब) महिला राखीव | 2 | |
क) इतर मागास वर्गीय | 1 | |
ड) विमुक्त जाती/भटक्या जमाती | 1 | |
2 | ग्रामपंचायत मतदारसंघ | 4 |
अ) सर्वसाधारण | 2 | |
ब) अनुसूचित जाती/जमाती | 1 | |
क) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 1 | |
3 | व्यापारी-आडते मतदारसंघ | 2 |
4 | हमाल-मापाडी मतदारसंघ | 1 |
एकूण | 18 |
सविस्तरपणे निकाल
APMC poll: NCP rebels steal show, BJP-backed panel wins
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"