Monday 10 April 2023

Lokmitra Prakshan 'DHADPAD' Book Publication Pune; ज्येष्ठ पत्रकार श्‍याम दौंडकर लिखित ‘धडपड’ या पुस्तकाचे प्रकाशन

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची गाथा समाजासाठी उपयुक्त; कौतुकास्पद कार्य- अजित पवार


ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची गाथा ‘धडपड’ या पुस्तकाद्वारे मांडली हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.केवळ राजकारणी व्यक्तींच नव्हे तर समाजकारणात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. 
      लोकमित्र प्रकाशन आणि पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) च्या वतीने निर्मित केलेले व ज्येष्ठ पत्रकार श्‍याम दौंडकर लिखित ‘धडपड’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. ८) श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात संपन्न झाले. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, हभप भोईटे गुरुजी, राष्ट्रतेजचे संपादक व जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. अमरसिंह जाधवराव, प्रकाशक चंद्रकांत भुजबळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
       प्रकाशन कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अचानक सर्व कार्यक्रम रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर लेखक, ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविक करताना अजितदादा पवार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसते तर एखाद्या गरीबाच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले असते असे म्हंटले होते त्यांच्या या विधानाचा संदर्भ घेऊन " एखाद्या गरीबाच्या नव्हे, तर गरीब स्वभावाच्या माणसाच्या हातून या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे," अशा शब्दांत अजितदादा यांनी स्वतःचा परिचय करून देताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
         लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर राज्यात आज चौफेर हल्ले होत आहेत. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने घातक असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही. सध्या घडत असलेल्या घटना पाहता अघोषित आणीबाणी येत आहे की काय असा प्रश्न पडत असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
      पवार म्हणाले, सध्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते दम देतात. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये खोके यावरून रॅप साँग करणाऱ्याला जेलमध्ये टाकले. खोका हा उल्लेख केला परंतु, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एक प्रकारे समर्थन केले आहे. 
      पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. तेव्हा पत्रकारांनी एकजूट केल्यावर त्या पत्रकाराला गुन्ह्यातून वगळले गेले. सुसंकृत महाराष्ट्रात हा प्रकार एक शोकांतिका असून, असे हिणकस प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याची गरज आहे. म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत.
        पुस्तकाचे लेखक श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविक केले, प्रदीप देशमुख यांनी सुत्रसंचालन केले.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)




धडपड पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे प्रसारमाध्यमांमधील प्रसिद्धी- लिंक खालीलप्रमाणे-








Ajit Pawar Live | अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार दौंडकर यांच्या 'धडपड' पुस्तकाचे प्रकाशन
====================
====================
https://www.facebook.com/policenama/videos/live-ज्येष्ठ-पत्रकार-श्याम-दौंडकर-यांच्या-धडपड-या-पुस्तकाचे-प्रकाशन-राज्याचे-विर/757112545973621/
====================
====================
====================
====================
‘खोका’ उल्लेख करणाऱ्याला अटक करून खोक्याचे समर्थनच- अजित पवार April 8, 2023 by pktop20
====================
====================
====================
====================
पत्रकारांवरील हल्ले ही सुसंस्कृत महाराष्ट्रात शोकांतिका ः अजित पवार
====================
====================
====================
====================
Attacks on journalists in the state are a tragedy in cultured Maharashtra – Ajit Pawar
====================
Mr.Chandrakant Bhujbal
Lokmitra Prakashan & Political Research And Analysis Bureau (PRAB) 

"महाराष्ट्रातील राजकारण" 





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.