Friday, 31 May 2024

Maharashtra Loksabha Election Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? प्राब संस्थेचा मतदानोत्तर चाचणीतील अंदाज पहा

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा एक्झिट पोल उद्या जाहीर होणार



लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा उद्या 1 जून रोजी पार पडणार आहे. हा टप्पा पार पडताच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल येणार आहे. या निवडणुकीत कुणाला बहुमत मिळेल? कुणाची सत्ता येईल? कोण सत्तेबाहेर राहील? हे स्पष्ट होणार आहे. 4 जून रोजी हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार असला तरी एक्झिट पोल आधीच जाहीर होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे चित्र काय असेल याचा साधारण अंदाज येणार आहे. त्यामुळेच एक्झिट पोलची सर्वजण वाट पाहत असतात. त्यामुळे हे एक्झिट पोल उद्या संध्याकाळी अखेरच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर जाहीर केले जाणार आहेत.

यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी फार वेगळी आहे. महाराष्ट्रात दोन आघाड्या आहेत. महायुती आणि इंडिया आघाडी अंतर्गत महाविकास आघाडी (MVA). महायुतीत भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना (UBT) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्रातील निवडणूक निकालांकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागलेले आहे. 

प्राब संस्थेचा एक्झिट पोल उद्या सायंकाळी जाहीर होणार

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा एक्झिट पोल उद्या सायंकाळी जाहीर होणार आहे. उद्या 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यावर उद्याच सायंकाळी एक्झिट पोल जाहीर होतील. साधारण संध्याकाळी 7 च्या आसपास हे एक्झिट पोल जाहीर होतील. विविध न्यूज चॅनल्स आणि रिसर्च एजन्सींकडून हे एक्झिट पोल जाहीर केले जातात. एक्झिट पोल हे केवळ निवडणूक निकालाचा अंदाज असतात. अनेकदा एक्झिट पोल बऱ्यापैकी योग्यही ठरतात, काही वेळा तंतोतंत खरेही ठरतात. अचूक अंदाज वर्तविण्यात प्राब संस्थेने प्राविण्य मिळवलेले आहे. 

यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी फार वेगळी आहे. महाराष्ट्रात दोन आघाड्या आहेत. महायुती आणि इंडिया आघाडी अंतर्गत महाविकास आघाडी (MVA). महायुतीत भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना (UBT) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्रातील निवडणूक निकालांकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागलेले आहे. प्राब संस्थेकडून लोकसभा मतदारसंघ निहाय निकालांचे विश्लेषण देखील करण्यात येणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांचा कल काय आहे हे विश्लेषणासह अहवाल सशुल्क उपलब्ध करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय अहवालासाठी प्राब संस्थेशी थेट संवाद साधावा. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book