Friday, 10 January 2025

booth capturing in parli assembly election 2024; परळी विधानसभा मतदारसंघातील 8 केंद्रांवर विरोधकांना शून्य मते; निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा केंद्र निहाय निकालातून संशय

उच्च न्यायालयात निवडणूक याचिकांचा वर्षाव, निवडणूक आयोगा विरुद्ध 9 दिवसात 103 उमेदवारांकडून निवडणुकांना आव्हान


राज्यातील बहुतांश आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

High Court Mumbai Bench

2024

2025

Bombay(Original)

120

26

Bombay(Civil)

205

4

Aurangabad(Civil)

242

25

Nagpur(Civil)

191

48

Total Case

758

103

Total (2024+2025)

861

2024 मध्ये निवडणूक विषयक 758 याचिका दाखल

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल पराभूत उमेदवारांना अमान्य असल्याने बहुतांश आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिलेले आहे. आव्हान देण्यासाठी निवडणूक निकालानंतर 45 दिवसांची मुदत असते ती नुकतीच संपुष्टात आली अखेरच्या 8 दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिकांचा अक्षरशः वर्षाव झाला आणि 103 याचिका दाखल झाल्या आहेत.  याचिकाकर्त्यांमध्ये बहुतांश महाविकास आघाडीमधील पराभूत उमेदवारांचा समावेश आहे. याचिका मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झालेल्या असून विजयी उमेदवारांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीतील कवित्व अजूनही पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2024 मध्ये विविध निवडणूक विषयक 758 याचिका दाखल झाल्या असून त्यामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकासह अन्य अशा एकूण 861 याचिकांचा ढीग खंडपीठसह मुंबई उच्च न्यायालयात पडला आहे. 861 याचिकांमुळे 50 कोटींची आर्थिक उलाढाल झालेली आहे. किमान १ लाख ते ५ लाख रु एका याचिकेला खर्च येतो त्या प्रमाणे सरासरी अशी आर्थिक उलाढाल झालेली दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगावर अविश्वास व्यक्त होण्याची पहिलीच वेळ असून उमेदवार व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात कायदेशीर लढाई सुरू केलेली आहे या लढाईला कितपत यश येते हे आगामी काळात स्पष्ट होईलच.
 
दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघात बोगस मतदानाच्या बहुतांश तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या तसेच वेब चित्रण बंद असणे आदि चित्रित गैर प्रकार समाजमाध्यमातून प्रसारित झाले होते. या गैरप्रकारांना पुष्टी मिळत असून परळी विधानसभा मतदारसंघातील 8 केंद्रांवर विरोधकांना शून्य मते मिळाल्याने निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा केंद्र निहाय निकालातून संशय व्यक्त होत आहे. विरोधी उमेदवारांना 59 मतदान केंद्रावर केवळ 0 ते 10 मते प्राप्त झालेली आहेत यावरूनच गैरप्रकार झाल्याचे स्थानिक पातळीवर आरोप केले जात आहेत. विधानसभा निवडणुकी पूर्वी काही कालावधीत लोकसभा निवडणुकीत मात्र ज्या मतदान केंद्रावर विधानसभेला शून्य मते दर्शविली जात आहे त्या केंद्रावर विरोधकांना अनेक मते मिळाली आहेत.

88- बहादूरवाडी, 120- जिरेवाडी, 219- भोपला, 266-भोजनकवाडी, 267- धर्मापूरी, 269- धर्मापूरी, 270-धर्मापूरी, 300-कुसळवाडी या 8 केंद्रांवर विरोधकांना शून्य मते मिळाली आहेत. विजयी उमेदवार धनंजय मुंडे यांना अनुक्रमे 407, 1001, 555, 499, 1122, 611, 1210, 829 मते प्राप्त झालेली आहेत. 183 मतदान केंद्र अशी आहेत की प्रतिस्पर्धी पराभूत प्रमुख उमेदवाराला 100 मतांच्या आत मते मिळाली आहेत. केंद्र निहाय मतदानावर नजर फिरवली आणि लोकसभा निवडणूक निकालाची तुलना केल्यास निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा संशय दृढ होतो. दरम्यान निवडणूक काळात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. परळी विधानसभा मतदार संघात धर्मापुरी, जलालपुर, परळी शहरातील बँक कॉलनी, मलिकपुरा येथे बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप घेतला. अशीच स्थिती मतदार संघात १२२ संवेदनशील मतदार केंद्रांवर आहे. उच्च न्यायालयाने या १२२ मतदान केंद्रावर सीआरपी बंदोबस्तात व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. अशा मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. निवडणूक आयोगाने तसे शपथपत्र ही दिले. मात्र अंमलबजावणी मात्र केली नाही. परिणामी दहशत व गुंडागर्दी करीत बोगस मतदानाची प्रक्रिया राबविल्याचा विरोधी उमेदवाराचा गंभीर आरोप आहे. 

दरम्यान  विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा संशय व्यक्त करत पराभूत उमेदवारांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसच्या विदर्भातील 8 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. संपूर्ण निवडणूक रद्द करून ती नव्याने घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हानसुद्धा देण्यात आले आहे. अॅड. आकाश मून व अॅड. पवन डहाट हे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे, दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव, अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील उमेदवार तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, शेखर शेंडे, संतोषसिंग रावत, सतीश वारजूरकर यांनी ही याचिका सादर केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठी आशा होती. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल, असे दावेही काँग्रेसच्या नेत्यांमार्फत केले जात होते. मात्र निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे फक्त १६ आमदार निवडून आले होते. अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. पहिल्या निवडणुकीपासून कधीच पराभूत झाले नसलेले बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांचा यात समावेश आहे. त्यामुळे अनेकांना निवडणुकीच्या निकालावर शंका आहे.

मुंबई उच्च न्यायालय

क्र.

याचिकाकर्ते नाव

केस नंबर

1

विक्रम सिंह एस

EP/447/2025(stamp)

2

ज्योतिप्रभा प्रभाकर पाटील

EP/22/2025

3

आसिफ अब्दुल सत्तार खान

EP/13/2025

4

चेतन पंडित नरोटे

EP/563/2025(stamp)

5

गजानन शंकर अवलाकर

EP/578/2025(stamp)

6

दीपक रामदास मोगल

EP/585/2025(stamp)

7

पंढरीनाथ ज्ञानेश्वर जाधव

EP/586/2025(stamp)

8

राजू (बाबा) जयवंतराव आवळे

EP/588/2025(stamp)

9

सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे

EP/560/2025(stamp)

10

पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण

EP/20/2025

11

सदानंद सरवणकर

EP/11/2025

12

भारती हेमंत लवेकर

EP/6/2025

13

नरसय्या नारायण आदम

EP/307/2025(stamp)

14

अनिल सुभाष सावंत

EP/10/2025

15

प्रशांत बबन यादव

EP/21/2025

16

रमेश आनंदराव बागवे

EP/548/2025(stamp)

17

अश्विनी नितीन कदम

EP/552/2025(stamp)

18

शशिकांत जयवंत शिंदे

EP/580/2025(stamp)

19

राहुल पांडुरंग पाटील

EP/579/2025(stamp)

20

प्रमोद बंडूकाका पुरुषोत्तम बच्छाव

EP/492/2025(stamp)

21

राहुल तानाजी कलाटे

EP/441/2025(stamp)

22

कम्युनिस्ट नेशन पार्टी-इंडिया

IA/428/2025(stamp)

23

जिवा पांडू गावित

EP/581/2025(stamp)

24

दत्ता रंगनाथ बहिरात

EP/529/2025(stamp)

25

रोहन रामदास साटोणे

EP/15/2025

26

सुलक्षणा राजू धर

EP/18/2025

27

रुपाली प्रशांत लोहार

WP/25/2025

28

सचिन शिवाजीराव दोडके

WP/529/2025(stamp)

29

जयंत रामचंद्र पाटील

WP/75/2025(stamp)

30

गायकवाड निलोबा चंगादेव

IA/214/2025

औरंगाबाद खंडपीठ मुंबई उच्च न्यायालय

1

रुपकुमार बबलू नेहरूलाल चौधरी

EP/31/2025

2

राहुल महारुद्र मोटे

EP/13/2025

3

राम शंकर शिंदे

EP/18/2025

4

सुभाष रामराव भामरे

EPAP/1/2025

5

कैलास किसनराव गोरंट्याल

EP/3/2025

6

राजेश अंकुशराव टोपे

EP/25/2025

7

चंद्रकांत पुंडलिकराव दाणवे

EP/19/2025

8

नितीन माणिक बचके

EP/9/2025

9

विनायकराव किशनराव जाधव पाटील

EP/35/2025

10

सुधाकर संग्राम भालेराव

EP/34/2025

11

शरद कृष्णराव गावित

EP/30/2025

12

शेख अफसर नवाबोद्दीन

WP/352/2025

13

राजाभाऊ श्रीराम फड

EP/7/2025

14

जयप्रकाश रावसाहेब साळुंके दांडेगावकर

EP/12/2025

15

दिलीप बळीराम खोडपे

WP/402/2025

16

कागदा चांद्या पाडवी

EP/26/2025

17

अनिल उमराव गोटे @ अनिल अण्णा गोटे

EP/1/2025

18

सतीश भास्करराव पाटील

EP/29/2025

19

प्रवीण बापू चौरे

EP/28/2025

20

राजेंद्रकुमार कृष्णराव गावित

EP/27/2025

21

मुकिंदा/ मुकींद नंदू चव्हाण

WP/381/2025

22

पृथ्वीराज शिवाजी साठे

EP/6/2025

23

महेबूब इब्राहिम शेख

EP/17/2025

24

अंकुश पांडुरंग वारे

WP/1034/2025(stamp)

25

विद्या ईश्वर महाजन

WP/1170/2025(stamp)

नागपूर खंडपीठ मुंबई उच्च न्यायालय

1

राजेंद्र भास्करराव शिगणे

EP/506/2025(stamp)

2

रमेशचंद्र गोपीकिशनजी बंग

EP/501/2025(stamp)

3

जयश्री सुनील शेळके

EP/499/2025(stamp)

4

मनीष सुधाकरराव गंगणे

EP/494/2025(stamp)

5

संतोषसिंह चंदनसिंह रावत

EP/505/2025(stamp)

6

दुनेश्वर सूर्यभान पेठे

EP/420/2025(stamp)

7

सुभाष रामचंद्रराव धोटे

EP/507/2025(stamp)

8

सतीश मनोहर वारजुकर

EP/518/2025(stamp)

9

वसंत चिंधुजी पुरके

EP/539/2025(stamp)

10

सलील अनिल देशमुख

EP/534/2025(stamp)

11

प्रफुल्ल विनोदराव गुडधे

EP/516/2025(stamp)

12

गिरीश कृष्णराव पांडव

EP/509/2025(stamp)

13

यशोमती चंद्रकांत ठाकूर

EP/524/2025(stamp)

14

राहुल सिद्धिविनायक बोंद्रे

EP/552/2025(stamp)

15

शेखर प्रमोद शेंडे

EP/521/2025(stamp)

16

नारायण दिनबाजी जांभुळे

EP/384/2025(stamp)

17

वीरेंद्र वाल्मिकराव जगताप

EP/421/2025(stamp)

18

गोपालदास शंकरलाल अग्रवाल

EP/422/2025(stamp)

19

चरण सोविंदा वाघमारे

EP/408/2025(stamp)

20

चरण सोविंदा वाघमारे

EP/408/2025(stamp)

21

सुभाष रामचंद्रराव धोटे

EP/507/2025(stamp)

22

राजेंद्र भास्करराव शिगणे

EP/506/2025(stamp)

23

शरद आप्पाराव मेन

EP/406/2025(stamp)

24

संतोषसिंह चंदनसिंह रावत

EP/505/2025(stamp)

25

गिरीश कृष्णराव पांडव

EP/509/2025(stamp)

26

प्रफुल्ल विनोदराव गुडधे

EP/516/2025(stamp)

27

सतीश मनोहर वारजुकर

EP/518/2025(stamp)

28

वीरेंद्र वाल्मिकराव जगताप

EP/421/2025(stamp)

29

दुनेश्वर सूर्यभान पेठे

EP/420/2025(stamp)

30

रमेशचंद्र गोपीकिशनजी बंग

EP/501/2025(stamp)

31

जयश्री सुनील शेळके

EP/499/2025(stamp)

32

मनीष सुधाकरराव गंणगणे

EP/494/2025(stamp)

33

सलील अनिल देशमुख

EP/534/2025(stamp)

34

यशोमती चंद्रकांत ठाकूर

EP/524/2025(stamp)

35

वसंत चिंधुजी पुरके

EP/539/2025(stamp)

36

शेखर प्रमोद शेंडे

EP/521/2025(stamp)

37

स्वाती संदीप वाकेकर

EP/549/2025(stamp)

38

चरण सोविंदा वाघमारे

EP/408/2025(stamp)

39

प्रीतम हरिलाल खांदते

EP/150/2025(stamp)

40

मोहम्मद इम्रान मोहम्मद हारुन कुरेशी

EP/147/2025(stamp)

41

वसंत चिंधुजी पुरके

EP/539/2025(stamp)

42

नारायण दिनबाजी जांभुळे

EP/384/2025(stamp)

43

वीरेंद्र वाल्मिकराव जगताप

EP/421/2025(stamp)

44

स्वाती संदीप वाकेकर

EP/549/2025(stamp)

45

चरण सोविंदा वाघमारे

EP/408/2025(stamp)

46

दुनेश्वर सूर्यभान पेठे

EP/420/2025(stamp)

47

हिरालाल विठोभा नागपुरे

WP/178/2025

48

गणेश वसंता आडे

WP/174/2025


निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागते. मात्र, ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते. याची कारणेही स्पष्ट करावी लागतात. तेसुद्धा केले नाही. एवढेच नव्हे तर ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा निवडणूक आयोगाने काढले नसल्याचे याचिकाकर्ते गुडधे यांनी सांगितले. दरम्यान, यावर आता उच्च न्यायालय आता याबाबत काय निर्णय घेते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महाविकास आघाडीमधील पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रशांत जगताप, अजित गव्हाणे, महेश कोठे, नरेश मणेरा, सुनील भुसारा, मनोहर मढवी, राहुल कलाटे, वसंत गीते, संदीप नाईक, रमेश बागवे यांनी उच्च न्यायालयामध्ये निवडणूक निकाल विरोधामध्ये धाव घेतली आहे, ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या व बोगस मतदानाच्या आरोपामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले. मात्र, आयोगाने आक्षेप फेटाळल्याने या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केल्या आहेत. यात मविआबरोबरच महायुतीच्या पराभूत उमेदवारांचाही समावेश आहे.

पराभूत उमेदवारांनी अनेक याचिका दाखल केल्या आहेत. त्यामध्ये कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्याविरोधात याचिका केली. सर्जेराव मोरे यांनी रमेश कराड यांच्याविरोधात, मेहबूब शेख यांनी सुरेश धस यांच्या विरोधात, राजेश टोपे यांनी हिकमत उढाण यांच्याविरोधात, राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्याविरोधात, राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात, बाळासाहेब थोरात यांनी अमोल खताळ यांच्याविरोधात याचिका दाखल केल्या..मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली आहे. मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा व इतर आरोप त्यांनी केले आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे विजयी उमेदवार साजिद खान पठाण गैरमार्गाने निवडून आल्याने त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका भाजपचे उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही उमेदवारांनी निवडणूक निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कळवण-सुरगाणा मतदारसंघातील माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्यासह मालेगाव बाह्य मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बंडुकाका बच्छाव, मालेगाव मध्यचे शेख आसिफ शेख रशीद यांनी न्यायालयामध्ये याचिकेतून निवडणूक निकालाला आव्हान दिले.

या निवडणुकीत मतदार याद्यांमधील घोळ, निवडणुकीबाबतची कागदपत्रे व सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाचा नकार, या माध्यमातून गैरव्यवहार दडपून मुद्दामहून केलेली अपारदर्शकता, निवडणुकीत धर्माच्या नावाने प्रचार करून मिळवलेली मते, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी व त्यांना आमिष दाखवून केलेले पैसेवाटप, निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैसेवाटप करून मते मागितल्याचे व्हिडीओ, ईव्हीएम मशिन्सचा ठरवून गैरवापर केल्याचे दाखले व पुरावे अशा विविध बाबींच्या मुद्द्यावर ॲड. असीम सरोदे व ॲड. श्रीया आवले यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येते असल्याने आदर्श निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वालाच धक्का बसला आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करावी. तसेच नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश आयोगाला द्यावेत, अशी विनंती या याचिकांतून करण्यात आली आहे. .विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या १०३ उमेदवारांनी या आठवड्यात निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. या उमेदवारांमध्ये प्रशांत जगताप हडपसर पुणे, महेश कोठे - सोलापूर शहर उत्तर, अजित गव्हाणे भोसरी पुणे, नरेश मणेरा ओवळा मज्जीवाडा, सुनील भुसारा विक्रमगड, पालघर, मनोहर मढवी ऐरोली ठाणे, राहुल कलाटे- पिंपरी-चिंचवड, वसंत गीते-नाशिक, संग्राम थोपटे, संदीप नाईक-विलेपार्ले, रमेश बागवे- भवानी पेठ पुणे यांचा समावेश असून चिपळूण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी देखील आव्हान दिलेले असून विविध बाबींच्या मुद्द्यावर ॲड. सुजय गांगल यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे.

ॲड असीम सरोदे व ॲड श्रीया आवले यांच्या मार्फत महाविकास आघाडीतील सर्वाधिक उमेदवारांच्या याचिका दाखल

महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या सर्वाधिक याचिका नामवंत वकील ॲड असीम सरोदे व ॲड श्रीया आवले यांच्या मार्फत दाखल करण्यात आलेल्या आहेत.  मतदार याद्यांमधील खोलवरील घोटाळे, निवडणुकीबाबतची कागदपत्रे व सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार व त्यातून मुद्दाम अपारदर्शकता, मते मागण्यासाठी धर्माचा वापर, पैसे वाटप करून मते मागण्याचे व्हिडिओ, ईव्हीएम मशिन्स चा ठरवून गैरवापर केल्याचे दाखले व पुरावे अशा आधारे निवडणूक याचिका दाखल. शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसच्या पुढील उमेदवारांच्या याचिका दाखल केल्या यामध्ये १.प्रशांत जगताप - हडपसर पुणे, 2.महेश कोठे - सोलापूर शहर उत्तर, 3.अजित गव्हाणे - भोसरी पुणे, 4.नरेश मणेरा - ओवळा मज्जीवाडा, 5.सुनील भुसारा - विक्रमगड, ता मोखड पालघर, 6.मनोहर मढवी- ऐरोली ठाणे, याव्यतिरिक्त 7. राहुल कलाटे, पिंपरी चिंचवड, 8. वसंत गिते, नाशिक, ९. संग्राम थोपटे, भोर, 10. संदीप उर्फ राजू नाईक, विलेपार्ले, 11. रमेश बागवे, भवानी पेठ पुणे, १२. पृथ्वीराज चव्हाण, कराड आदि उमेदवारांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने निवडणूक याचिका प्रथमच दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया व विधानसभा निवडणुकांचे निकाल या विरुद्ध पारदर्शकतेची मागणी करणारे आंदोलन आता न्यायालयात पोहोचले आहे असे अनेक पराभूत अमेद्वारांच्या तर्फे निवडणूक याचिका दाखल करणारे ॲड असीम सरोदे म्हणाले. पुढील 10 दिवस या निवडणूक याचिकांवर सुनावणी सुरु होईल असेही त्यांनी म्हंटले आहे. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.