Saturday, 5 April 2025

Housing Society Election 2025; आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

गोडबोले, अढारी,  कंग्राळकर यांची प्रथमच निवड तर समितीवर इतर पुनश्च


पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर गाडीतळ परिसरातील नामांकित गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखली जाणारी आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्थेने व्यवस्थापन समितीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा 28 वर्षानंतरही कायम राखली आहे. आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्था मर्या. हडपसर, पुणे २८ या सहकारी संस्थेची सर्वसाधारण मतदार संधातील सन २०२४ - २०२५ ते सन २०२९ २०३० या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध जाहीर झाल्याचे प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी श्री अतुल रमेश महाजन यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ चे नियम ३२ ला अनुसरून अविरोध समिति सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये काहींची नव्याने प्रथमच निवड झालेली असून त्यामध्ये मीरा श्रीकांत गोडबोले, श्री.विवेक चंद्रकांत कंग्राळकर, श्री. सुरेश निवृत्ती अढारी यांचा समावेश आहे. तर व्यवस्थापन समितिच्या कार्याचा अनुभव असलेले श्री.अविनाश राधाकिसन लवंगरे, श्री. बाळासाहेब मल्हारी पारखे, श्री. सुहास माणिकचंद शहा, श्री.सोपान विठोबा बारावकर, श्री.विनोद मोहनीराज जोशी, श्री.हेमंत बाळकृष्ण आठल्ये, श्री संपत दादू माने यांचा समावेश आहे. तसेच महिला राखीव संघातून अलका रामनाथ आवारी यांची बिनविरोध निवड झालेली आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सोसायटीतील सर्व सभासद व कुटुंबीयांनी त्यांचे अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत.

आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्था मर्या. हडपसर या संस्थेची स्थापना 21/12/1996 रोजी झालेली असून प्रारंभापासून निवृत्त अधिकारी श्री.सोपान विठोबा बारावकर आणि  श्री. सुहास माणिकचंद शहा यांनी व्यवस्थापन समितीवर आपले योगदान दिलेले आहे. त्यांचे समितीवरील अस्तित्व विश्वासहार्यता दर्शवते त्यामुळे बहुतांश सभासद सार्वजनिक सेवा प्रती निश्चिंत असतात. काटेकोर नियोजन, उत्तम समन्वय आणि शिस्त, स्वच्छता तसेच पारदर्शक कारभाराची आखणी करुन दिल्याने सोसायटीचे कामकाज व्यवस्थित पार पडले जाते. सोसायटीने अनेक उपक्रम राबविलेले आहेत यामध्ये स्वयंपूर्तीने पारंपरिक ऊर्जा सोलर प्रकल्प (वीज निर्मिती) आणि ओला कचरा विघटन प्रकल्प राबविणारी 'आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था' एकमेव आदर्श सोसायटी आहे. 

सोसायटी म्हटले की वाद-विवाद होतातच मात्र या सोसायटीत सभासदांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, सर्वसाधारण पार्किंग व सदनिकांमधील लिकेज या दोन प्रमुख समस्या उद्धभवतात मात्र आपापसात सामंज्यस्याने समस्यांचे निरकरण केले जाते. निखळ विश्वासहार्य वातावरण आणि समन्वय यामधून दैनंदिन कारभार व बहुतांश उपक्रम राबविले जातात या मुळे सोसायटीने बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली आहे. नवनवीन सभासदांनी व्यवस्थापन समितीत कार्य करण्यासाठी पुढे यावे यासाठी आवाहन केले जाते मात्र सामाजिक योगदानास बहुतांश सभासद पुढे येत नाहीत त्यामुळे काही जुन्या सभासदांना पुन्हा सर्व धुरा सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी लागते अशी खंत देखील व्यक्त केली जाते. 
 
महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) (प्रथम सुधारणा) नियम २०१९ याच्या नियम ७६ जी प्रमाणे आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित सहकारी संस्थेचा सन २०२४ - २०२५ ते सन २०२९ २०३० या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणच्या अनुमतीने मा. उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (4) पुणे यांच्या आदेशाने प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी श्री अतुल रमेश महाजन यांना नियुक्त केले होते. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आलेला होता यामध्ये निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्याचा दिनांक २७.०१.२०२५ होता तर नामनिर्देशान पत्रे वाटप व स्विकृत करण्यासाठी तारीख दि.२८.०१.२०२५ दि. ०१.०२.२०२५ स. १० ते १ तर छाननीसाठी तारीख, वेळ व स्थळ दिनांक ०३.०२.२०१५ संस्था कार्यालय आणि नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची तारीख वेळ दिनांक ०५.०२.२०२५ ते दि.१९.०२.२०१५ या कालावधीत संस्था कार्यालय तर मतदान व मतमोजणी दिनाक ०१.०१.२००५ संस्था कार्यालय असा कार्यक्रम होता मात्र मतदारसंघ निहाय त्या जागांसाठी एका पेक्षा अनेक अर्ज दाखल झाले नसल्याने सर्व प्रवर्ग मधील जागेसाठी मतदान घेण्याचा प्रश्नच उध्दभवत नाही त्यामुळे सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी श्री अतुल रमेश महाजन यांनि जाहीर करुन निवडीची नमुना ई ९ नियम ३२ अन्वये यादी प्रसिद्ध केली.

आदित्यनगर सहकारी गृहरचना संस्था मर्या. या सहकारी संस्थेची सर्वसाधारण मतदार संधातील सन २०२४ - २०२५ ते सन २०२९ २०३० या कालावधीसाठी निवडणूक महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियमानुसार प्रक्रिया पार पाडली. व्यवस्थापन समितीच्या सर्व साधारण मतदार संघ मधून अनुक्रमे श्री.विनोद मोहनीराज जोशी, श्री.सुहास माणिकचंद शहा, श्री.हेमंत बाळकृष्ण आठल्ये, श्री.अविनाश राधाकिसन लवंगरे, श्री. बाळासाहेब मल्हारी पारखे, श्री.विवेक चंद्रकांत कंग्राळकर यांची तर महिला राखीव मतदार संघ मधून अलका रामनाथ आवारी, मीरा श्रीकांत गोडबोले यांची बिनविरोध निवड झालेली असून अनू. जाती जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या वि. वि. प्रवर्ग या राखीव मतदार संघ मधून अनुक्रमे श्री. सुरेश निवृत्ती आढारी, श्री.सोपान विठोबा बारावकर, श्री संपत दादू माने यांची अविरोध निवड झालेली आहे. 

सोसायटीच्या स्वच्छतेचे महत्व, कार्य व आदर्श उपक्रमांचे कौतुक शासनाच्या सहकार विभाग व पुणे महानगरपालिका तर्फे वेळोवेळी केले आहे. आगळेवेगळे अभिनव उपक्रम सातत्याने राबविणारी सहकारी संस्था म्हणून नावाजलेली ही आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था आहे

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

=============================




Wednesday, 2 April 2025

change the name female candidate in elections; निवडणुकीत महिला उमेदवाराच्या नावात बदल आता शक्य; नाव विवाहापूर्वीचे की विवाहानंतरचे निवडणूक आयोगाकडून संभ्रम निकाली काढणारे परिपत्रक जारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विवाहित महिला उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्र व मतपत्रिकेवरील नावाबाबत आदेश


स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविणाऱ्या विवाहित महिलांबाबत मतदार यादीत असलेल्या नावानेच उमेदवारी अर्ज करावा लागत असे. आता मात्र महिलांना उमेदवारी अर्जावर विवाहापूर्वीचे की विवाहानंतरचे नाव असावे, याबाबतचा संभ्रम दूर झाला. यासाठी संबंधित महिलेला उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत आवश्यक पुराव्यासह विनंती अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करता येईल.  मतदार यादीमधील नावाशिवाय  महिलांना लग्नानंतरचे किंवा लग्नापूर्वीचे नाव आता मतपत्रिकेवर लावता येणार आहे. त्यासाठी माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मात्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनाच देण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ही सुविधा १३ मार्चच्या आदेशाने उपलब्ध केल्याने महिला उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित मतदार यादीत असणे आवश्यक अर्हता आहे. त्यामुळे महिला उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदार यादीत असलेल्या नावानेच उमेदवारी अर्ज दाखल करावा लागत होता. आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विवाहित महिला उमेदवारांना मतदार यादीत व उमेदवारी अर्जात नमूद नावाखेरीज त्यांना मतपत्रिकेवर इतर नावाचा उल्लेख करण्याची इच्छा असेल तर तो बदल आता करता येणार आहे. मात्र यासाठी आवश्यक पुरावे विनंती अर्जासोबत जोडावे लागतील. त्यानंतर वैध उमेदवारांच्या अंतिम यादीत व मतपत्रिका तयार करताना या सुधारित नावाचा समावेश करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेतील. यामध्ये यादीतील नावापुढे विवाहानंतरचे / पूर्वीचे नाव कंसात छापण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये ईव्हीएमवर नाव मुद्रित करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा व विहीत फॉडचा वापर होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण ठेवण्यात आल्यामुळे राजकारणातील महिलांचा सहभाग वाढत आहे. महापालिका, जिल्हा परिषद नगरपालिका किंवा ग्रामपंचायत असो सर्व ठिकाणी सभागृहामध्ये निम्म्या महिला दिसत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या निवडणुकीसाठी दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला वाटत असते आपला मतदारसंघ सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राहावा म्हणून; परंतु तसे होत नाही. महिलांसाठी प्रभाग आरक्षित झाला तर तयारी करणारे कार्यकर्ते शक्यतो आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवत असल्याचे दिसते. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना मतदार यादीत जे नाव असेल त्याच नावाने उमेदवारी अर्ज भरावा लागतो. मतदार यादीत लग्नानंतरचे नाव लावण्यात येते. उमेदवारी अर्जासोबत जोडावी लागणार्‍या कागदपत्रावर मात्र लग्नापूर्वीचे नाव असते. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणार्‍या विवाहित महिलांनी नामनिर्देशन पत्रांवर विवाहापूर्वीचे नाव किंवा विवाहानंतरच्या नावांपैकी नेमके कोणते नाव नमूद करावे, याबाबत संभ्रम असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्यामुळे यासंदर्भात नवीन आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.

अर्जासोबत हे पुरावे आवश्यकज्या नावाचा उल्लेख निवडणूक लढविण्यासाठी करावयाचा आहे, त्याच्या पुष्ठ्यर्थ विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्रात प्रसिद्ध विवाहानंतरचे नाव आदी सादर करणे अनिवार्य आहे. सदर राजपत्र उपलब्ध नसल्यास मतदाराने मतदान करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये १७ पुराव्यांपैकी महिला उमेदवारास हव्या असलेल्या नावासहित छायाचित्र असलेला कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. यावर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book