Wednesday, 18 February 2026

देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर

राज्यसभेच्या 37 जागांवर 16 मार्च रोजी निवडणूक


निवडणूक आयोगाने बुधवारी 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक घेतली जाईल. रिक्त होणाऱ्या जागांपैकी 12 जागा एनडीएच्या ताब्यात आहेत, तर 25 जागांवर विरोधकांचे वर्चस्व आहे. 

सर्वाधिक महाराष्ट्रातील 7, तामिळनाडूतील 6 आणि पश्चिम बंगाल-बिहारमधील प्रत्येकी 5 जागांवर निवडणूक घेतली जाईल. शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. 

16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाईल. राज्यसभेच्या या ३७ जागा येत्या एप्रिल महिन्यात रिक्त होणारा आहेत. महाराष्ट्र (७), ओडिशा (४), तमिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), आसाम (३), बिहार (५), छत्तीसगड (२), हरियाणा (२), हिमाचल प्रदेश (१) आणि तेलंगणा (२) अशी या जागांची संख्या आहे. 

या जागांसाठी २०२० मध्ये द्विवार्षिक निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी आसाम, बिहार, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठे यश मिळवले होते. महाराष्ट्रात या जागा भाजपा, दोन्ही गट एकत्र असलेली शिवसेना, दोन्ही गट एकत्र असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात विभागलेल्या होत्या. तमिळनाडूमध्ये डीएमकेच्या नेतृ्त्वाखालील युतीने बहुतांश जागा जिंकल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आणि ओडिशामध्ये बिजू जनता दल यांचा दबदबा दिसून आला होता.

कसे असेल वेळापत्रक?

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, या निवडणुकींचे नोटिफिकेशन २६ फेब्रुवारी रोजी जारी केले जाईल. तर अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ही ५ मार्च असणार आहे. अर्जाची छाननी आणि ही ६ मार्च रोजी केली जाईल आणि अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख ९ मार्च असणार आहे. तर १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ पर्यंत मतदान होईल आणि त्यानंतर ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. निवडणुकीची प्रक्रिया ही २० मार्चपर्यंत पूर्ण केली जाईल.

अशी होते राज्यसभा निवडणूक

राज्यसभा खासदारांसाठी निवडणुकीची प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा खूप वेगळी आहे. राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात, म्हणजे जनता नाही तर आमदार त्यांना निवडतात. निवडणुका दर दोन वर्षांनी होतात, कारण राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे आणि त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभा जागांची एकूण संख्या 245 आहे. यापैकी 233 जागांवर अप्रत्यक्षपणे निवडणुका होतात आणि 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी किती मतांची आवश्यकता असते, हे आधीच ठरलेले असते. मतांच्या संख्येची गणना एकूण आमदारांची संख्या आणि राज्यसभा जागांच्या संख्येच्या आधारावर होते. यात एका आमदाराच्या मताचे मूल्य 100 असते.

बॅलेट पेपरवर खास पेनाने मतदान होणार

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, मतदान करताना केवळ रिटर्निंग ऑफिसरने दिलेल्या निश्चित मानकाचा व्हायलेट रंगाचा स्केच पेनच वापरला जाईल. इतर कोणत्याही पेनाचा वापर वैध मानला जाणार नाही. आयोगाने म्हटले आहे की, निवडणुका शांततापूर्ण आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी निरीक्षक नियुक्त केले जातील. निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये EVM आणि VVPAT बाबत जनजागृती मोहीम देखील सुरू केली आहे. आयोगाच्या मते, 5 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 1.20 लाखांहून अधिक लोकांनी डेमो कॅम्पमध्ये भाग घेतला. 1.16 लाखांहून अधिक लोकांनी मॉक मतदान केले. 10 फेब्रुवारीपर्यंत 29 हजारांहून अधिक मतदान केंद्रांची ठिकाणे मोबाइल डेमो व्हॅनद्वारे कव्हर केली गेली आहेत. ही मोहीम EVM डेमो सेंटर आणि मोबाइल व्हॅनद्वारे राबवली जात आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


रोहित पवार यांच्या नजरेतून घातपाताचा दृष्टीकोन; विलिनीकरणाचे गुपित; मार्गदर्शक कागदपत्रांचा गुलदस्त्यातील अर्थ; राजकीय सल्लागार कंपनीवरील आकस

विमान अपघात दुर्घटनेवरील संशयकल्लोळ 



पुणे- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेला विमान अपघात की घातपात याबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे नवनवीन दावे-प्रतिदावे, शंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेषतः कर्जत जमखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सातत्याने या विषयी चौकशी कशी करावी, चौकशीची व्याप्ती कशी असावी, त्यामध्ये कोणत्या व्यक्तींचा सहभाग असावा वगेरे याबाबत मागणी करीत आहेत याबरोबरच त्यांचा आरोपांचा थेट रोख दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे राहिलेला दिसून येत आहे. तसेच सरकारवर थेट आरोप करण्याचे टाळून यंत्रणामधील दोष दर्शवून चौकशी बाबत शंका उपस्थित करताना दिसून येत आहे. 

१३ व्या दिवसापासून विमान अपघात की घातपात याबाबत पत्रकार परिषदांचा धडाका आमदार रोहित पवार यांनी लावला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या घटनेबाबत दादांचे चाहते व सामान्य नागरिकांच्या मनात संशयाचे काहूर माजले आहे. खंर तर अशा संवेदनशील विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त करताना अनेक मात्तबर कच खाताना देखील दिसून येत आहे. संशयाचे भूत महाराष्ट्राच्या किती दिवस मानगुटीवर राहणार आहे हे येणाऱ्या काळातील यंत्रणांच्या चौकशी अहवाल जाहीर होईल तो पर्यन्त तरी अशीच स्थिती राहण्याची शक्यता वाटते. 

घटनाक्रम आणि घटना पाहता या संशयकल्लोळ मध्ये राजकीय पतंगबाजी होताना देखील दिसून यंते आहे. गंभीर विषयावरील पत्रकारपरिषदेत राजकीय आरोपांनी लक्ष्य केले जात असल्याचे देखील आढळून येत असल्याने घटनेच्या चौकशीची व्याप्ती पुढील काळात व्यापक होईल अशी शक्यता निर्माण होऊ पाहत आहे. विमान अपघात की घातपात प्रकरणी तांत्रिक प्रश्न वगळता राजकीय आरोप व वक्तव्य करुन चौकशीची दिशा पुढील काळात भरकटत जाणार तर नाहीना अशी शंका वाटणे स्वाभाविक आहे.

रोहित पवार यांच्या नजरेतून घातपाताचा एक दृष्टीकोन समजून घ्या. 

त्यांच्या मते विलिनीकरणाची जी चर्चा सुरु होती, ती दादा आणि आम्हालाच माहिती आहे. एक चर्चा अशी होती की, एनडीए बरोबर आम्ही सत्तेत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नसावी. दुसरा दुष्टीकोन असा आहे की, दादाचं एनडीएमध्ये राहणार नाहीत. दादाचं बाहेर निघून रस्त्यावरची सामान्य लोकांची लढाई आमच्या सोबत लढतील हा दृष्टीकोन एक गटाला आवडला नसावा. यात राजकारण, यात घातपात असं म्हणायचं असेल तर दोन दृष्टीकोनांपैकी एक दृष्टीकोन कुठलातरी असावा, त्या दृष्टीकोनाला पाठिंबा देणारा एक गट असू शकतो असं रोहित पवार म्हणाले.

आता दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार याबाबत अजित दादांबरोबर चर्चा काय झाली हे दादा आणि आम्हालाच माहिती आहे असे रोहित पवार यांचे म्हणणे आहे मग रोहित पवार यांना काय चर्चा झाली माहीत असताना ते सत्य उघड का करीत नाहीत असा प्रश्न सामान्यांना पडतो आहे. त्यांनी विलिनीकरणाचे दोन कारणांची शक्यता वर्तविली एक एनडीए बरोबर आम्ही सत्तेत जाणार आणि दादाचं एनडीएमध्ये राहणार नाहीत बाहेर निघून रस्त्यावरची सामान्य लोकांची लढाई आमच्या सोबत लढतील असा जर तर वरील अंदाज व्यक्त केला हे कशासाठी करीत आहेत. चौकशीच्या विषयात विलीनीकरण विषय घुसडून राजकीय आरोप करणे आणि दुसऱ्या गटाला दोषी धरुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करणे कुठतरी खटकत आहे. 

मार्गदर्शक कागदपत्रांच्या माध्यमातून 200 पट ताकद लावली जाणार होती पण 50 पटच ताकद लावली! 

मार्गदर्शक कागदपत्रांचा अर्थ मात्र गुलदस्त्यात 

मार्गदर्शक कागदपत्रांच्या माध्यमातून 200 पट ताकद लावली जाणार होती पण 50 पटच ताकद लावली गेली आणि 150 पट ताकद का लावली नाही? असा सवाल रोहित पवार यांनी विमान दुर्घटना विषयी चौकशी मध्ये प्रश्न उपस्थित केला. आता याची चौकशी कोणती यंत्रणा करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मार्गदर्शक कागदपत्रांचा अर्थ मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. पण कदाचित जे जिल्हा परिषदेतले अजितदादांच्या पक्षातले जे कोणी उमेदवार असतील, त्यांना हा मुद्दा कळेल असाही त्यांनी संदर्भ दिला. 

मार्गदर्शक कागदपत्रांचा अर्थ निवडणुकीतील आर्थिक रोकड पुरवठा!

रोहित पवार यांचा सरळ राष्ट्रवादीच्या गटातील प्रमुख नेत्यांवर आरोप आहे कि, अजित दादा जिल्हा परिषद, पंचायत समिति निवडणुक 200 पट ताकद लावली जाणार होती पण 50 पटच ताकद लावली गेली आणि 150 पट ताकद का लावली नाही? म्हणजे २०० पट आर्थिक रोकड पुरवठा केला जाणार होता त्यामध्ये कपात करुन केवळ 50 पटच प्रत्यक्षात वाटप केले उर्वरित 150 पट आर्थिक रोकड पुरवठा केला नाही तो गेला कोठे असा भ्रष्टाचार, गफला बाबत थेट आरोप आहे. 

रोहित पवार यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आणि राजकीय सल्लागार कंपनी 

विमान अपघात दुर्घटनेवर शंका कुशंका आणि त्या संशयाच्या वादळात राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आणि राजकीय सल्लागार कंपनी निगडीत आरोपांचे काहूर यामुळे चौकशीला दिशा देण्याचा प्रयत्न होतो आहे का अशी शंका आता व्यक्त होताना दिसून येत आहे. पहिल्या पत्रकार परिषदेत दादांना उशीर झाला आणि ते रोडने एवजी विमान प्रवासाला त्यांना भाग पाडले असावे अशी पहिली शंका उपस्थित केली. मग पूर्व विदर्भातील एका नेत्याने फाईल वर आजच सही झाली पाहिजे त्याकरिता वेळ गेला कि घालविला ही एक शंका घेतली मग ती कोणती फाईल, नेता कोणता, वगेरे-वगेरे, दुसरी शक्यता वर्तविली कि त्या दिवशी राजकीय सल्लागार कंपनीचे कंत्राट कायम ठेवण्यास विरोध होता त्यावरच चर्चा झाली कि काय मग विरोध होता म्हणून विपरीत घडवले ही एक शंका घेऊन नुकतेच त्या कंपनीने २ विमाने खरेदी केलेली आहेत वगेरे-वगेरे आरोप केले. उघड उघड टार्गेटवर राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आणि राजकीय सल्लागार कंपनी आहे हे सर्वसामान्यांना जाणवले. तांत्रिक कारणांवरुन तातडीने घेतलेला शपथविधी व अन्य राजकीय निर्णय खलबते आणि राजकीय सल्लागार कंपनीचा सहभाग कुठ तरी खटकत असावा अशी देखील शंका सर्वसामान्यांना जाणवते. 

सरकारवर थेट आरोप करणे का टाळत आहे 

विमान अपघात दुर्घटनेवर शंका कुशंका व्यक्त करताना रोहित पवार सरकारवर थेट आरोप करणे का टाळत आहे असाही काहींना प्रश्न पडतो. एकीकडे सरकारच्या चौकशीवर अविश्वास व्यक्त करताना दिसून येत आहे, स्वतः खासगी गुप्तचर संस्थेकडून तपास करुन घेत आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या ट्रोलर वर बरस्ताना दिसून आले. किंबविना राज्यात राजकीय भूकंप होणार अशी पोस्ट केल्याचा दावा करुन सदर ती पोस्ट हटवली याबाबत गंभीर आरोप देखील केला. पेड ट्रोलर आहेत मी घाबरत नाही असेही वक्तव्य केली. यावरून  सत्ताधारी पक्षावर रोष आहे परंतु थेट टीका करणे टाळत आहेत मग याचे कारण काय असावे याबाबतही सर्वसामान्यांनामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसून येत आहे. रोहित पवार यांच्या राजकीय आरोपांना भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे परंतु दादांच्या विमान अपघात चौकशीचा फोकस अन्यत्र वळविणे ही बाब खूप धक्कादायक आणि चाहत्यांना वेदनादायक वाटते आहे. 

रोहित पवार यांच्या आरोपांचा व घडामोडींचा घटनाक्रम

दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुर्दैवी दुर्घटना अपघात; उपमुख्यमंत्री अजित दादांचे अपघाती निधन


दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडून अपघात नव्हे घातपात असा आरोप 


दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जी यांच्या आरोपांचे खंडन अपघातच असून राजकारण नको तर जयंत पाटील यांच्याकडून विलीनीकरण बाबत भाष्य 


दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे अंत्यसंस्कार


दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी उर्वरित विधी संपन्न


दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजीच उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्रा पवार शपथ घेणार वृत्त, तर खासदार सुप्रिया सुळे अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना


दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथविधी बाबत कल्पना नाही असे वक्तव्य, पार्थ पवार भेटीला, नंतर रोहितसह भेटीचा फोटो व्हायरल, खलबत झाल्याचा बोलका फोटो  


दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली


दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी पवार कुटुंबीय मधून रोहित पवार यांचे ट्विट मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..! अशा भावना व्यक्त 


दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वरळी (मुंबई) येथील घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्याचे फोटोसह रोहित पवार यांचे ट्विट 


दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी निष्ठावान कार्यकर्ते सुदाम बोडके (रा. ढिकाबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनाही धक्का बसला आणि यातच त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याने त्यांच्या घरी सांत्वनपर भेट घेतल्याचे फोटोसह रोहित पवार यांचे ट्विट 


दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट पुढच्या काळात चौकशी होईलही आणि आम्हीही त्यासाठी पाठपुरावा करु 


दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झालीत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आलीय.


दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुण सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्याचे रोहित पवार यांचे ट्विट


दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले. ही बाब अत्यंत संतापजनक, याबाबत चौकशी करून सरकारने संबंधितांवर कारवाई करावी.  


दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय... छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!


दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरील चौथऱ्यावर जाऊन आज पुन्हा एकदा दादांना श्रद्धांजली अर्पण केली…


दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट या दुःखद घटनेमुळं नियोजन करुनही पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाता आलं नाही, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. हीच_ती_योग्य_वेळ आणि मा. अजितदादांचे विचार पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी #श्रद्धांजली आहे!


दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पिंपळी (बारामती) इथं सहकुटुंब मतदानाचा पवित्र हक्क बजावून मा. अजितदादांच्या विचारांना श्रद्धांजली अर्पण केली. 


दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट आदरणीय पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित असून त्यांना ॲडमिट करण्यात आलं नाही तर ते डॉक्टरांच्या निगराणीखाली एका रुममध्ये आहेत. जेष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल


दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार


दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची पहिली पत्रकार परिषद विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशन, विविध शंका उपस्थित व चौकशी कक्षा वाढवविण्याची मागणी,  सर्व शंकांचं निरसन झालं पाहिजे, तोपर्यंत आम्ही याबाबत पाठपुरावा करत राहू, 


दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय हा आमच्यासाठी महत्त्वाचा असून तो योग्य दिशेने जाण्यासाठी माझ्या काही बैठका सुरु आहेत. त्यामुळं १२ फेब्रुवारी रोजी राजकीय विषयावर घेण्यात येणारी पत्रकार परिषद पुढे ढकलावी लागतेय...


दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची दुसरी दिल्ली येथे पत्रकार परिषद, मुंबईतील प्रेझेंटेशन पुनरप्रसारण, गृहमंत्री यांच्यासह अनेकांना भेटण्याची वेळ मागणी परंतु वेळ दिली नसल्याचे स्पष्ट 


दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजीच उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार व नेते गृहमंत्री यांच्यासह पंतप्रधान यांच्याशी भेटी गाठी मात्र रोहित पवार यांचा वेगळा अजेंडा 


दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष #तपास_झालाच_पाहिजे.


दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSRकंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.


दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट गृहमंत्री अमित शाह साहेब, नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू जी तसेच DGCA ची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट होऊ शकली नाही. त्यामुळं प्रेझेंटेशनसह आमच्या सर्व शंका गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCAयांना ई-मेल पाठवून या अपघाताबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती 


दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत.


दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट दुर्दैवी अपघातानंतर २० दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही. केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना? की कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.  आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे त्यावरून मी ५ दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे. असो, आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! (दोन दिवसात पुन्हा पत्रकार परिषदेत भेटू)


दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट न्यायालयीन कामासाठी मुंबईत न्यायालयात गेलो असताना तिथं काही वकील मंडळी भेटली आणि अजितदादांच्या अपघाताचा विषय तडीस नेऊन सत्य जनतेपुढं आणण्याची विनंती त्यांनी केली.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची तिसरी पत्रकार परिषद  दुसऱ्यांदा सविस्तर प्रेझेंटेशनसह पत्रकार परिषद घेऊन हा तपास निष्पक्ष होण्यासाठी देशाबाहेरील दोन एजन्सीची मदत घेण्याची आणि देशाचे व या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते, कुटुंबातील आणि पक्षातील प्रतिनिधी आणि काही तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी केली. कंपनीची संशयास्पद भूमिका, कंपनीच्या मालकाचे राजकीय लागेबांधे, विमान कंडीशन, पायलटची मनःस्थिती, ब्लॅक बॉक्समधील डेटाबाबत निर्माण झालेल्या शंका,


राजकीय आरो

दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची पहिली पत्रकार परिषद विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशन यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप 

दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची पत्रकार परिषद अपघाताबाबत प्रेझेंटेशन यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप 

राष्ट्रवादी विलीनीकरण बाबत वक्तव्य 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, अंकुश काकडे, शशिकांत शिंदे यांच्याकडून दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण ठरले होते व त्याची तारीख १२ होती असे वक्तव्य 

राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांकडून विलीनीकरण बाबत ठरल्याचे माहिती नाही हे स्पष्ट. 

विलीनीकरण बाबत मुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया त्यावर आक्षेप घेऊन संबंध काय अशी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून उलट प्रतिक्रिया

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरण बाबत विषय संपला असल्याचे स्पष्ट करुन कोणीही याबाबत बोलू नये असे वक्तव्य 

रोहित पवार यांच्याकडून मात्र याबाबत विषय सातत्याने चर्चिला जाणे. इडि कारवाई बाबतही भाष्य, 

दुर्घटनेच्या चौकशीच्या मागणी पत्रकार परिषदेत दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांच्याकडून पुन्हा वक्तव्य


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-