पराभवाच्या विक्रमासाठी काँग्रेसकडून उमेदवारी!
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक पार पडत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात होते. मात्र मविआमधून काँग्रेसने बारामतीची पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवारांना न्याय देण्याचा आमचा अट्टाहास आहे, असे आकाश मोरेंनी सांगितले.आता काँग्रेस थांबणार नाही, हा संदेश या माध्यमातून द्यायचा असल्याचेही मोरेंनी म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात प्रदेशाध्यक्ष सपकाळ गैरहजर राहून माघारीचे जणू संकेतच दिले आहेत. पराभवाच्या विक्रमासाठी काँग्रेसकडून उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झडत आहे. बारामती पोटनिवडणुक बिनविरोध होण्याच्या शक्यतेने लोभापोटी अपक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास झुंबड उडाल्याचे अखेरच्या दिवशी दिसून आले. 50 हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून अनेक अर्जामध्ये गंभीर त्रुटी राहिलेल्या दिसून येत आहेत. घाईघाईने दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज केवल बारामती नव्हे तर राज्याच्या विविध भागातून उमेदवार बारामतीत दाखल झालेले पाहावयास मिळाले. प्रत्येकी माघार घेण्यास लाखों रुपये मिळणार असल्याची अफवा पसरली असून त्या लोभापोटी अर्ज दाखल झाल्याची चर्चा पाहावयास मिळाली. अर्थात छाननी मध्ये किती अर्ज वैध ठरतात त्यावरूनच बिनविरोध निवडणूक होते का ते निष्पन्न होणार आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आक्रमक भूमिका मांडली. “बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवू नये. जर लढलीच तर त्यांचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा थेट इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत काँग्रेसला भावनिक साद घातली. “अजित दादांचा बहुतांश राजकीय काळ काँग्रेससोबत गेला आहे. त्यांचे संबंध, सहवास आणि कामाचा इतिहास काँग्रेसशी जोडलेला आहे. त्यामुळे काँग्रेसने काही राजकीय संस्कार जपायचे असतील, तर त्यांनी बारामतीत निवडणूक लढवू नये आणि सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहावं असे ते म्हणाले.
'माझ दुःख तळघरात कोंढलं', सुनेत्रा पवारांचा कंठ दाठला, शरद पवारांचे नाव घेत मोठं आवाहन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेजवारी अर्ज दाखल करण्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना बारामतीसह राज्यातील जनतेचीही काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांसह महायुतीचे अनेक दिग्गज नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
"दोन महिन्यांपूर्वी आपण आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर मी बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, बारामतीची पोटनिवडणूक होईल. अजूनही दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. मला हे मान्यही नाही. पण नियतीने हा काळ माझ्यावर आणि तुमच्यावर आणला आहे. दादांच्या जाण्याने फक्त माझ्या कुटुंबाचे नव्हेतर बारामती तालुक्याचे, संपूर्ण देशाचे नुकसान झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही," असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. तसेच "दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीमधील प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजे पांडुरंगांची सेवा हाच दादांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीच्या प्रत्येक झाडात, फुलात. पानात रस्त्यात इमारतीत दादांचा स्पर्श आहे असे बोलून सुनेत्रा पवार भावुक झाल्या.
उमेदवार देण्याचा काँग्रेसचा अधिकार; अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागते- पवार
अजित पवारांच्या अकाली निधनामुळे आम्हाला दुःख आहे, त्यामुळे पवार कुटुंबप्रमुख म्हणून बारामतीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. काँग्रेसने बारामतीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे असंही शरद पवार म्हणाले. तसेच काँग्रेस पक्षावर वक्तव्य करण्याइतपत परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही असेही शरद पवार म्हणाले.
बारामतीमध्ये उमेदवार देणं हा काँग्रेसचा अधिकार आहे, परिस्थिती पाहून काँग्रेसने निर्णय घेतला असेल असं शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून एकत्र असताना एखाद्या मतदारसंघात अशा काही अडचणी येतात, तो काही राष्ट्रीय विषय नाही. राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, राजकारणामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागते. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही.
सुनेत्रा पवारांचा निरोप, लक्ष्मण हाकेंची माघार, काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेली. दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या चर्चेनंतर लक्ष्मण हाकेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन भरणेंनी बारामतीत लक्ष्मण हाके यांची भेट घेतली.
दरम्यान निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे. मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.
बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारांची नावे, पक्ष, संपर्क यादी पहा-
बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया खालीलप्रमाणे पार पडेल
निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होणे: २७ मार्च २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख: ६ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी: ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: ९ एप्रिल २०२६
मतदान कधी: २३ एप्रिल २०२६
मतमोजणी आणि निकाल: ०४ मे २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख: ०६ मे २०२६
💫*प्राब संस्थेच्या सशुल्क मार्गदर्शनासाठी संपर्क-* 9422323533
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
================================================
"महाराष्ट्रातील राजकारण"
"महाराष्ट्रातील राजकारण"
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
==================================================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

