Wednesday, 28 December 2016

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार जागृती आणि 73व्या व 74व्या राज्यघटना दुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते या चित्ररथाच्या प्रतिकृतीचे आज (बुधवार) अनावरण करण्यात आले.
आयोगाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित
मल्लिक, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, अधिव्याख्याता विजय बोंदर आदी उपस्थित होते.
73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचीही स्थापना करण्यात आली. शिवाय आता बृहन्मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येत आहे.
चित्ररथाचे संकल्पना आणि निर्मिती चित्र सर ज.जी.कला महाविद्यालयाने केली आहे. चित्ररथाच्या प्रथम दर्शनी भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरून घेतलेले उडत्या श्वेत अश्वाचे शिल्प असेल. चित्ररथाच्या मध्यभागी महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या प्रातिनिधीक स्वरूपात इमारती दर्शविल्या जातील. तर, चित्ररथावर मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारा जिवंत देखावाही असेल. चित्ररथाच्या मागील बाजूस मोठा एलईडी पडदा असेल. त्यावर मतदार जागृती संदर्भातील घोषवाक्य, पोस्टर्स, चित्रे, ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार जागृती आणि 73व्या व 74व्या राज्यघटना दुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते या चित्ररथाच्या प्रतिकृतीचे आज (बुधवार) अनावरण करण्यात आले.







Friday, 16 December 2016

नगराध्यक्षांना तीन नवे अधिकार

नगराध्यक्षांना तीन नवे अधिकार






नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेत सर्वाधिक 57 नगराध्यक्ष निवडून आणले. त्यानंतर आता सरकारने  नगराध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ केली आहे. नगराध्यक्षांना आता तीन नवे अधिकार देण्यात आले आहेत.
या नव्या निर्णयामुळे जिथं भाजपचं संख्याबळ कमी आहे, अशा ठिकाणी भाजपला सत्तेचा गाडा हाकणं सोपं जाणार आहे.
नगराध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ केल्याची घोषणा आज नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली.
यंदा थेट जनतेमधून नगराध्यक्षांची निवड झाली. त्यामुळे नगराध्यक्षांना हे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
नगराध्यक्षांचे नवे अधिकार
1) पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार (यापूर्वी हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होता )
2) नामनिर्देशीत सदस्यांची नावं जाहीर करण्याचा अधिकार (म्हणजे नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत नामनिर्देशीत सदस्य कोण असणार हे ठरवण्याचा अधिकार नगराध्यक्षांना)
3) पीठासीन अधिकारी म्हणून काम बघण्याचा अधिकार