नगराध्यक्षांना तीन नवे अधिकार
नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेत सर्वाधिक 57 नगराध्यक्ष निवडून आणले. त्यानंतर आता सरकारने नगराध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ केली आहे. नगराध्यक्षांना आता तीन नवे अधिकार देण्यात आले आहेत.
या नव्या निर्णयामुळे जिथं भाजपचं संख्याबळ कमी आहे, अशा ठिकाणी भाजपला सत्तेचा गाडा हाकणं सोपं जाणार आहे.
नगराध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ केल्याची घोषणा आज नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली.
यंदा थेट जनतेमधून नगराध्यक्षांची निवड झाली. त्यामुळे नगराध्यक्षांना हे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
नगराध्यक्षांचे नवे अधिकार
1) पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार (यापूर्वी हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होता )
2) नामनिर्देशीत सदस्यांची नावं जाहीर करण्याचा अधिकार (म्हणजे नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत नामनिर्देशीत सदस्य कोण असणार हे ठरवण्याचा अधिकार नगराध्यक्षांना)
3) पीठासीन अधिकारी म्हणून काम बघण्याचा अधिकार
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.