Monday 9 March 2020

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी लंडनमधील २६ वर्षीय तरुणीकडून जाहीर

बिहार निवडणुकांमध्ये नितीश कुमारांना टक्कर देणार!

बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात एका नव्या चेहऱ्याचा उदय झाला आहे. लंडनमध्ये शिकलेल्या प्रिया चौधरी यांनी स्वत:ला मुख्यमंत्री पदाची उमेदवार घोषित केले आहे. यामुळे जेडीयू नेता नितीश कुमार, आरजेडी नेता तेजस्वी यादव बिहारच्या आणि आता प्रिया चौधरी असे एकूण तिघे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत.  प्रिया जनता दल युनायटेडचे नेते विनोद चौधरी यांची कन्या असून त्या सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी लंडनमध्ये स्कुल ऑफ इकोनॉमिक्‍स अँड पोलिटिकल सायन्स येथून लोक प्रशासनामध्ये एम.ए. केले आहे. याशिवाय डेव्हलपमेंट स्टडीमध्येही एम.ए. पूर्ण केले आहे. वृत्तपत्रांमध्ये आगामी  बिहारमधील विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे प्रिया यांनी जाहिरातीद्वारे घोषित केले आहे. या जाहिरातीनुसार, प्रिया चौधरी यांनी प्युरल्स नावाचा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाचे ‘एव्हीवन गव्हर्न्स’ असे घोषवाक्य आहे. बिहारवर प्रेम आहे पण राजकारणाचा द्वेष करता? तर शामिल व्हा सर्वात पुढारलेल्या विचारांच्या पक्षामध्ये, अशी ओळ पक्षाच्या नावाखाली लिहिण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये प्रिया यांनी म्हंटले कि, बिहारला आणखीन चांगलं मिळणं अपेक्षित आहे आणि ते शक्य आहे. तुम्ही शिड्या चढा आणि आम्ही सापांशी संघर्ष करु. तसेच मी मुख्यमंत्री झाल्यास २०२५ पर्यंत बिहार हे देशातील सर्वात प्रगत राज्य असेल. तसेच २०३० पर्यंत युरोपातील राज्यांप्रमाणे बिहारमधील कारभार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये प्रिया चौधरी या नावाची जोरदार चर्चा रविवारपासून सुरु झाली आहे. प्रिया चौधरी यांनी स्वत:ला “मुख्यमंत्री पदाची उमेदवार” घोषित केले आहे. जनता दल युनायटेडचे नेते विनोद चौधरी यांची कन्या असणाऱ्या प्रिया सध्या लंडनमध्ये आहेत. मात्र त्यांनी बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहिरातीद्वारे घोषित केले आहे. २६ वर्षीय प्रिया या मूळच्या दरभंगा येथील असून त्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र त्यांनी रविवारी बिहारमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये स्वत:चा मोठा फोटो असणारी पानभर जाहिरात दिली आहे. अनेक हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात छापून आली आहे. या जाहिरातीमध्ये त्यांनी स्वत:ला ‘मुख्यमंत्री पदाचा उमेदवार’ असे घोषित केले आहे. सध्या बिहारमध्ये भाजपा-जदयू आणि एलपीजीचे संयुक्त सरकार असून नितिश कुमार मुख्यमंत्री आहेत. काय आहे जाहिरातीमध्ये- बिहारमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या या जाहिरातीमध्ये प्रिया यांनी आपल्या प्युरल्स या पक्षाची घोषणा केली आहे. “बिहारला आणखीन चांगलं मिळणं अपेक्षित आहे आणि ते शक्य आहे,” असं प्रिया यांनी या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. ‘प्युरल्स’ या पक्षाचे ‘एव्हीवन गव्हर्न्स’ असे घोष वाक्य आहे. “बिहारवर प्रेम आहे पण राजकारणाचा द्वेष करता? तर शामिल व्हा सर्वात पुढारलेल्या विचारांच्या पक्षामध्ये,” अशी ओळ पक्षाच्या नावाखाली लिहिण्यात आली आहे. पूर्ण काळ्या रंगाच्या बॅकग्राऊण्डवर छापण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये “तुम्ही शिड्या चढा आणि आम्ही सापांशी संघर्ष करु,” असं प्रिया यांनी जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. तसेच या जाहिरातीमध्ये त्यांनी स्वत:ला ‘२०२० निवडणुकीमध्ये बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार’ असंही म्हटलं आहे. “मी मुख्यमंत्री झाल्यास २०२५ पर्यंत बिहार हे देशातील सर्वात प्रगत राज्य असेल. तसेच २०३० पर्यंत युरोपातील राज्यांप्रमाणे बिहारमधील कारभार होईल,” असा विश्वास प्रिया यांनी या जाहिरातीमध्ये लिहिलेल्या खुल्या पत्रामध्ये व्यक्त केले आहे. सध्या बिहारच्या निवडणुकांची कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र प्रिया यांच्या या जाहिरातीमुळे राज्यात निवडणुकांच्या चर्चांना उधाण आले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

HTTPS://IMOJO.IN/1GDBY2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-BOOK मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
ONLINE E-BOOK DOWNLOAD करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

HTTPS://IMOJO.IN/COOPEBOOK
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-BOOK मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
ONLINE 200/- रुपये भरा आणि E-BOOK DOWNLOAD करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

HTTPS://IMOJO.IN/PRABINDIAEBOOK
====================================
 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.