अखेर एकनाथ खडसे यांचा शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे स्पष्ट झाल्यावर माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कथित मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर लागला. त्यांनी फोन करून आज भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसने ते आपल्या पक्षात येत असल्याची घोषणा केली. एकनाथ खडसे 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. एकनाथ खडसे दसऱ्याच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच आज खडसेंनी भाजपला राम राम करत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात भाजप पक्षाचा विस्तार करणाऱ्या खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का यावी, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडण्याची घोषणा केली आहे. पक्ष सोडत असताना एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे. फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करत असताना खडसे यांना भरून आले. 'माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता. पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते , असा धक्कादायक खुलासा खडसेंनी केला.जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी मुंबईत केली. यानतंर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून खडसे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. खडसे राष्ट्रवादीत येत असल्याने भविष्यात भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याचा दावा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे अनेक मुहूर्त हुकल्यानंतर आता शुक्रवारी (दि.२३) ते आपली कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे निश्चित झाले आहे. खडसे राष्ट्रवादीत येत असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी आज मुंबईत केली. या घोषणेनतंर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर जिल्हा व महानगर पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून जल्लोष केला. यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान खडसे @EknathGKhadse हे ट्विटर अकाऊंट वापरत असून त्यांनी आपण राजीनामा दिल्याची अधिकृत पोस्ट केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे ट्विट रिट्विटदेखील केले आहे. एकनाथ खडसे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे”. खडसे यांनी ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील यांना टॅग केले आहे. आज बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून दोन दिवसांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनी पत्रकारांसमोर ही बाब जाहीर केली आहे. मात्र, त्यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि स्नुषा रक्षा खडसे हे कोणत्या पक्षात राहणार याबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार रक्षा खडसे या भाजपामध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खडसे म्हणाले, “रोहिणीताई या जिल्हा बँकेच्या चेअरमन आहेत. तर रक्षाताई भाजपाच्या खासदार. त्यामुळे रक्षाताईंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, रक्षाताईंनी मला सांगितलंय की मी भाजपा सोडणार नाही. “राजकारणातील असे अनेक प्रसंग आपल्याकडे आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, माधवराव शिंदे तसेच विखे पाटलांचंही आपल्याकडे उदाहरण आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या पत्नी काँग्रेसच्या सदस्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. तर राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे भाजपाचे सदस्य आहेत, अशी शेकडो उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळे रक्षा खडसे यांची जी इच्छा होईल तसं. पण माझा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे. मी कोणत्या पक्षाच्या किंवा कोणत्या चिन्हावर निवडून आलेलो नाही,” असं एकनाथ खडसे यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले. तर भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या या घोषणेनंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीदेखील भाजप सोडून राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते आहे.
एकनाथ खडसेंचा 40 वर्षांचा राजकीय प्रवास
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोठाडी गावात दोन सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसे यांचा जन्म झाला. खडसे यांचे वडील हे शेतकरी होते. त्यांचे शिक्षण कोठाळी गावातील शाळेमध्ये झाले. दरम्यान त्यांना सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड होती.1980 साली भाजपामधून खडसेंनी सक्रीय राजकारण सुरु केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ओबीसी नेते म्हणून त्यांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीपासून झाली. ग्राम पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर 1987 साली ते कोठाडी गावचे सरपंच झाले. एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात सरपंचपदापासून झाली. यानंतर 1989 मध्ये ते पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून लढले. पहिल्यांदाच लढवलेली आमदारकीची निवडणूक ते जिंकले देखील. यानंतर सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्षे मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.1995 ते 1999 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. यावेळी एकनाथ खडसेंकडे अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी होती. यानंतर एकनाथ खडसे यांनी नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2014 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. प्रभावी वकृत्व आणि मुद्देसूद विषय मांडण्याची कला त्यांच्यात आहे. एकनाथ खडसे हे भाजपमधील राज्यातील प्रमुख नेते मानले जात होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी होते. मात्र शेवटी त्यांच्यापेक्षा ज्यूनिअर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धूरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून 3 जून 2016 रोजी एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ खडसे यांच्या राजकारणाला ग्रहण लागले. यानंतर पासून ते पक्षावर नाराज आहेत .2019 मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी 1987 मतांनी त्यांचा पराभव झाला.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================