Sunday, 4 October 2020

बिहार निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाणाशिवाय लढावे लागणार

 बिहार निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाणाशिवाय लढावे लागणार

शिवसेना बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवणार आहे. परंतु ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढता येणार नाही. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल (जेडीयू) हा पक्ष सत्तेत आहे. बाण हे जेडीयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर नितीश कुमार यांच्या जेडीयूचा आक्षेप होता. त्यामुळे शिवसेना बिहारमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढू शकत नाही. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होतो. आमची मते शिवसेनेला जातात. असा दावा जेडीयूने केला आहे. तसेच शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक प्रसिद्ध किंवा ओळखीचे राजकीय पक्ष नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाण ही निशाणी देण्यात येऊ नये, अशी मागणी जेडीयूने केली होती. दरम्यान बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. महाआघाडीने शुक्रवारी सहयोगी पक्षांमध्ये जागांच्या वाटपाबाबत अंतिम शिक्कामोर्तब केला तर एनडीएतही तडकाफडकी जागावाटपाचा निर्णय झाला आहे. जदयू आणि भाजप 50-50 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. विधानसभेच्या 243 जागांपैकी जदयू आणि भाजप 119-119 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित पाच जागा जीतनराम मांझींच्या हमसाठी सोडल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत भाजप आणि जदयूने या फॉर्म्युल्यावर सहमती दर्शवली असून लोजपाला मात्र यातून बाहेर ठेवले आहे. तर महाआघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. विधानसभेच्या 243 जागांपैकी राजद 145 जागांवर आपला उमेदवार उभा करेल. आतापर्यंत कमीत कमी 70 जागेंची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या खात्यात 62 जागा आल्या आहेत. 2015 मध्ये राजदने 100 आणि काँग्रेसने 43 जागांवर निवडणूक लढवली होती. यात राजदने 80 आणि काँग्रेसने 27 ठिकाणी विजय मिळवला होता. जागा वाटपात होत असलेला उशीर आणि कमी जागा मिळण्याच्या भीतीने भाकपा मालेने याआधीच 30 उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतू, आता म्हटले जात आहे की, मालेदेखील महाआघाडीत येऊ शकते. मालेसोबतच भाकपा आणि माकपादेखील महाआघाडीचा भाग असतील. भाकपा आणि माकपाला 5-5 जागा मिळू शकत्यात. तर, मागच्या वेळेस तीन जागा जिंकणाऱ्या आणि 21 जागांवर तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या मालेला 15 जागा मिळू शकतात. झामुमो आणि वीआयपीदेखील सोबत असतील, सपाला राजदच्या कोट्यातून जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर  मुकेश सहनी यांच्या वीआयपी पक्षाला 9 जागा मिळू शकतात. तर, झारखंड मुक्ती मोर्चाला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.