Friday 3 December 2021

पुणे जिल्हा बँक निवडणुक जिंकण्यासाठी उमेदवाराकडून तब्बल एकावन्न उमेदवारी अर्ज भरण्याची अक्कलहुशारी!

सहकारी संस्थांच्या सुधारित निवडणुक नियमांच्या त्रुटींचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून अफलातून शक्कल!  



सहकारी संस्थांच्या सुधारित निवडणुक नियमांच्या त्रुटींची पोलखोल काही उमेदवारांकडून होत असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदाची निवडणूक जिंकण्यासाठी अफलातून शक्कल लढवली जात असल्याचे समोर आले आहे. एका इच्छूक उमेदवाराकडून तब्बल एकावन्न उमेदवारी अर्ज भरण्याची अक्कलहुशारी केली जात असून किती अर्ज भरावे यासाठी मर्यादा नसल्याचा गैरफायदा या उमेदवाराकडून घेतला जात असून त्यासाठी तब्बल एकावन्न उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. विविध कार्यकारी सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून प्रत्येक तालुक्यात एक जागा आहे. या गटामध्ये तालुक्यात मतदारांची संख्या 23 ते 110 च्या दरम्यान आहे. 50 च्या मतदारसंख्या असलेले 2 तालुके आहेत तर 3 तालुके 100 संख्या मतदार असलेले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून प्रस्थापित उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळतील अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून सूचक म्हणून स्वतःच्या उमेदवारी अर्जावर सह्या घेत आहेत. दोन उमेदवारांना एकानेच सूचक म्हणून सही दिल्यास त्यांचे उमेदवारी अर्ज बाद होतात. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरून सूचक अडकवून ठेवण्याचा प्रकार सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. नवीन सहकार कायद्याचा गैरफायदा घेत बहुतेक दिग्गज संचालकांनी अफलातून राजकारण सुरू केले आहे. सुधारित नियमानुसार एका उमेदवाराने किती अर्ज दाखल करावेत याचे बंधन नसल्याने प्रस्थापित उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून यासाठी जास्तीत जास्त अर्ज दाखल करण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. यामुळे एकाच उमेदवाराने चक्क एकावन्न उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज भरता येतात; परंतु सहकारी संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. त्याचा गैरवापर उमेदवार करू लागले आहेत. मतदान फिक्स करण्यासाठी देखील सही घेऊन मते मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग असल्याच्या समजातून हे कृत्य केले जात आहे. वास्तविकपणे जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे मात्र पक्षांतर्गत गट-तटाचे राजकारण चुरशीचे आहे. पालकमंत्री अजितदादा यांचा शब्द अंतिम असला तरी मतदारांशी असलेला संबंध व जिंकण्याची खात्री दर्शवून देण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे यामधूनच काही उमेदवार अफलातून शक्कल आजमावत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष भाजप या निवडणुकीमध्ये निष्क्रिय आहे कारण प्रमुख पदाधिकारी जिल्हा बँक निवडणुकीसाठी निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत एकूण 21 संचालक पदासाठी निवडणूक होत आहे. अ. गट तालुका प्रतिनिधी, विकास सोसायटी या मतदारसंघातून १३ जागा तर ब. गट कृषी, पणन, प्रक्रिया संस्था प्रतिनिधी या मतदारसंघातून 1 जागा, क. गट नागरी सेवा व पतसंस्था या मतदारसंघातून 1 जागा,ड. गट पाणीपुरवठा, ग्राहक व इतर संस्था या मतदारसंघातून 1 जागा,अनु. जाती, जमाती, वि.जा., भ.ज. वि.मा. प्रवर्ग व इतर मागासवर्ग प्रतिनिधीसाठी प्रत्येकी 1 जागा प्रमाणे निवडणूक होत आहे. एकूण मतदारांचे 4 प्रमुख गट असून 1 व्यक्ती सभासद म्हणून गट आहे. पुणे जिल्हा बँक निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 8670 इतकी आहे. यामध्ये ड वर्ग व्यक्ती सभासद मतदारसंख्या - 1665 इतकी असून अ,ब,क,ड, गटातील मतदारसंख्या 7005 इतकी आहे. मतदार यादीत गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातील देखील मतदारांचा समावेश आहे. तर मतदार यादीत जिल्ह्याबाहेरील सभासद संस्थेमध्ये विशेषतः महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ मर्या. या संस्थेचा देखील मतदार म्हणून यादीत समावेश आहे. 
विद्यमान मंत्र्यांसह आजी-माजी आमदार जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीच्या रिंगणात!
गेल्या तीन दिवसांत जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व माजी उपाध्यक्ष संजय काळे यांनी सात उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्येकी चार अर्ज दाखल केले. पीडीसीसीच्या संचालक मंडळातील २१ जागांकरिता दोन जानेवारीला मतदान होणार आहे. तर, ता. ४ जानेवारीला मतमोजणी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. त्याची मुदत ६ डिसेंबरपर्यंत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ७ तारखेला होऊन दोन जानेवारीला मतदान होणार आहे, त्यासाठी बुधवार (ता. १ डिसेंबर) २५ उमेदवारी अर्ज आले होते. तर 2 डिसेंबर पर्यंत १३२ जणांनी ४३२ उमेदवारी अर्ज नेले होते. गेल्या चार दिवसांत आतापर्यंत ३४ जणांनी ६० अर्ज दाखल केले आहेत. पहिला अर्ज विद्यमान अध्यक्ष रमेशअप्पा थोरात यांनी दाखल केला. त्यांनीच काल तीन अर्ज सादर केले. तर, आज आणखी तीन अर्ज दाखल केले आहे, त्यामुळे त्यांच्या एकट्याची उमेदवारी अर्जसंख्या ही सात झाली आहे. त्यांनी ते सर्व अर्ज हे दौंड अ वर्ग मतदारसंघातून सादर केले आहेत. महिला प्रतिनिधी वैशाली नागवडे (दौंड) यांनी दोन आणि वंदना काळभोर (लोणी काळभोर, ता. हवेली), सरोजिनी मोकाशी (शिरूर), जयश्री खेडेकर यांनी उमेदवारी दाखल केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग, बारामती तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. २ डिसेंबर) दाखल केले आहेत. तसेच आमदार अशोक पवार (शिरूर), सुनील चांदेरे (मुळशी), रणजित निंबाळकर (इंदापूर), रवींद्र काळे (शिरूर), भाऊसाहेब सपकळ (इंदापूर), दिलीप काळभोर, विकास दांगट, प्रकाश जगताप (हवेली), स्वप्नील गायकवाड (शिरूर) यांनी अ वर्गातून उमेदवारी अर्ज दिले आहेत. सतीश खोमणे, रामभाऊ टुले (वि.जा./भ.ज../वि.मा.प्र.), भालचंद्र जगताप, दादासाहेब फराटे (ड वर्ग), राजेंद्र कांचन (क वर्ग) हे आज उमेदवारी दाखल केलेले इतर उमेदवार आहेत. वीरधवल जगदाळे यांनी अ, क, ड अशा तीन वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केलेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा डिसेंबर आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात (तिसरा मजला, पीडीसीसी बॅंक रोड, पुणे) शासकीय सुट्ट्या वगळून अर्ज दाखल करता येईल.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील गट निहाय मतदारसंख्या-

अ वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 1305 जागा-13
1.आंबेगाव अ.क्र. 1 ते 59 (मतदारसंख्या-59)
2.बारामती अ.क्र. 59 ते 254 (मतदारसंख्या-171)
3.भोर- अ.क्र. 255 ते ३२९ (मतदारसंख्या-74)
4.दौंड- अ.क्र. ३३० ते ४४५ (मतदारसंख्या-115)
5.हवेली- अ.क्र. 456 ते ५८८ (मतदारसंख्या-132)
6.इंदापूर- अ.क्र. ५८९ ते ७७३ (मतदारसंख्या-184)
7.जुन्नर- अ.क्र. ७७४ ते ८५० (मतदारसंख्या-76)
8.खेड- अ.क्र. ८५१ ते ९५३ (मतदारसंख्या-102)
9.मावळ- अ.क्र. ९५४ ते १००८ (मतदारसंख्या-54)
10.मुळशी- अ.क्र. १००९ ते 1054 (मतदारसंख्या-45)
11.पुरंदर- अ.क्र. १०५५ ते ११४९ (मतदारसंख्या-94)
12.शिरूर- अ.क्र. ११५० ते १२८१ (मतदारसंख्या-131)
13.वेल्हा- अ.क्र. १२८२ ते १३०५  (मतदारसंख्या-23)
ब वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १३०६ ते १४१२)- 106
क वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १४१३ ते ३०१९) - 1606
ड वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 3985
ड वर्ग व्यक्ती सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. 1 ते १६६५) - 1665
एकूण 7005 + 1665 = 8670  मतदार आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुक सन २०२०-२०२५ अंतिम मतदार यादी-

मतदार संघ - 'अ ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ब ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'क ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - व्यक्ती सभासद यादी

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत २१ पैकी सहा बिनविरोध

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी सहा जण बिनविरोध झाले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांसह, दोन आमदार आणि अन्य दोघा जणांचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेवर बिनविरोध झालेले दोन्ही मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर, दोन्ही आमदार कॉंग्रेसचे आहेत. भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांचा बिनविरोध झालेल्या दोन आमदारांमध्ये समावेश आहे. वेल्हे तालुक्यातील रेवणनाथ दारवटकर आणि मावळ तालुक्यातील माऊली दाभाडे हे अन्य दोघे जण बिनविरोध झाले आहेत. या निवडीमुळे दारवटकर हे सलग सातव्यांदा जिल्हा बॅंकेचे संचालक झाले आहेत. हे सर्वजण तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून जिल्हा बॅंकेवर निवडले गेले आहेत. जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. यापैकी प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक, याप्रमाणे १३ तालुक्यात मिळून तेरा जागा आहेत. याशिवाय ब, क आणि ड मतदारसंघातून प्रत्येकी एक, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एक, इतर मागास प्रवर्गातून एक, भटक्या जाती-जमाती प्रवर्गातून एक आणि महिला प्रवर्गातून दोन जागा आहेत. यासाठी सध्या १५९ जण निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना येत्या २२ डिसेंबरपर्यंत माघारी घेता येणार आहे. या संचालक मंडळाच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये बांधकाम राज्यमंत्री आणि विद्यमान संचालक दत्तात्रेय भरणे, बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात, खेडचे आमदार दिलीप मोहिते, शिरूरचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, सविता दगडे, सतीश खोमणे, विश्‍वास देवकाते, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, शरद बुट्टे पाटील आदींचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल निश्चित करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. तर भाजपकडून उमेदवारांचे पॅनल ठरवण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन पॅनमध्ये लढत होणार आहे. बँकेवर सोसायटी अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार तर काँग्रेसचे दोन संचालक आतापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या आणि चुरस लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व गटांमध्ये उमेदवारांचे पॅनेल जाहीर केले आहे. भाजपकडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यात आली. सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नसले तरी पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूकीतून निवृत्ती गवारी यांची माघार
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ वर्ग मतदार संघातून (तालुका प्रतिनिधी-विकास सोसायटी) शिरुरमधून बँकेचे विद्यमान संचालक निवृत्ती गवारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच निवृत्ती गवारे यांच्यासह एकूण १३ उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस आय पुरस्कृत सहकार पॅनेलमध्ये आमदार अशोक पवार यांचे नाव शिरुरमधून अधिकृत उमेदवार म्हणून दोन दिवसांपुर्वी जाहिर केले आहे. त्यामुळे निवृत्ती गवारी यांच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, निवृत्ती गवारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आमदार पवार यांच्या निवडणुकीचा पक्षांतर्गत मार्ग सुकर झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल

अ वर्ग मतदार संघ
बारामती - अजित पवार (बिनविरोध)
आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील (बिनविरोध)
भोर - संग्राम थोपटे (काँग्रेस- बिनविरोध)
पुरंदर- संजय जगताप (काँग्रेस-बिनविरोध)
वेल्हा - रेवणनाथ दारवटकर (बिनविरोध)
मावळ - ज्ञानोबा दाभाडे (बिनविरोध)
खेड - दिलीप मोहिते-पाटील
शिरूर- अशोक पवार
दौंड- रमेश थोरात 
जुन्नर- संजय काळे
मुळशी - सुनिल चांदेरे
इंदापूर- रणजित निंबाळकर
हवेली - मैत्रीपूर्ण लढत (ज्येष्ठ संचालक प्रकाश म्हस्के व विकास दांगट रिंगणात)
ब वर्ग मतदार संघ  : दत्तात्रय भरणे (इंदापूर)
क वर्ग मतदार संघ : सुलेश घुले (हवेली)
ड वर्ग मतदार संघ : दिगंबर दुर्गाडे (पुरंदर)
अनुसूचित जाती -जमाती: प्रविण शिंदे (हवेली) 
इतर मागासवर्गीय मतदार संघ  : संभाजी होळकर (बारामती)
विभक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघ  : दत्तात्रय येळे (बारामती)
महिला प्रतिनिधी-
1) पुजा बुट्टेपाटील (जुन्नर)
2) निर्मला जागडे (वेल्हा)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.