आमदार अशोक पवार, प्रा.दिगंबर दुर्गाडे, पूजा बुट्टे पाटील, सुरेश अण्णा घुले, प्रकाश अप्पा म्हस्के यांचे पारडे जड
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Pune District Central Cooperative Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीत तीन मंत्र्यांसह १४ जणांची बिनविरोध निवड झालेली असून अधिकृत जाहीर होणे बाकी आहे. या तीन मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित सात जागांसाठी १४ जण निवडणूक रिंगणात असून हवेली मध्ये चुरशीची लढत होणार आहे. भाजपला केवळ तीन जागांवर उमेदवार देण्यात यश आले आहे. या सात जागांसाठी येत्या २ जानेवारीला निवडणूक होणार असून, ४ जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील हवेली, मुळशी आणि शिरूर या तीन तालुक्यातील अ वर्ग मतदारसंघात आणि ड वर्ग मतदारसंघात दुहेरी लढत होत आहे. याशिवाय क वर्ग व महिला राखीव मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. निवडणूक रिंगणात आमदार अशोक पवार (शिरूर), पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (हवेली), जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रकाश म्हस्के (हवेली), आत्माराम कलाटे (मुळशी), दिगंबर दुर्गाडे (पुरंदर), जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या आशा बुचके आदी प्रमुख उमेदवार उरले आहेत. दरम्यान उर्वरित सात जागांसाठी १४ जण निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये संबंधित गटातील मतदारांमध्ये आमदार अशोक पवार, दिगंबर दुर्गाडे, पूजा बुट्टे पाटील, सुरेश घुले, प्रकाश म्हस्के यांचा प्रभाव असल्याने या निवडणुकीत त्यांचे पारडे जड मानले जात आहे. सर्वाधिक चुरस हवेली तालुक्यातील अ गटातील मानली जात आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास नाना दांगट यांच्यात पक्षांतर्गत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी दोघांपैकी एकाची उमेदवारी निवड निश्चीत करणे टाळले होते. विकास नाना दांगट यांनी मिळालेली संधी मानून यश प्राप्त करून नेत्यांचा विश्वासास पात्र ठरण्याचा चंग बांधला आहे तर प्रकाश म्हस्के यांनि आपणच सर्वाधिक मतांनी विजयी होऊ असा आत्मविश्वास मतदारांना दर्शवत आहेत. तर पुरंदर मधून प्रा.दिगंबर दुर्गाडे सर यांची निवड देखील निश्चीत मानली जात आहे. या गटातील मतदारांमध्ये त्यांचा व पक्षाचा प्रभाव आहे. आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुरेश अण्णा घुले यांचा देखील विजय निश्चित मानला जात आहे. महिला गटातून पूजा बुट्टे पाटील यांचे पारडे जड असून त्यांना मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचाही विजय निश्चीत समजला जात आहे. जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. या जागांसाठी १६० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सात डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यानंतर ८ डिसेंबरपासून अर्ज माघारी घेण्यास सुरवात झाली होती. बुधवारी (ता.२२) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. आज दिवसभरात ३४ जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. बिनविरोध निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी तडजोडी झाल्या. इंदापूर तालुक्यातून भाजप पुरस्कृत आप्पासाहेब जगदाळे हेदेखील बिनविरोध निवडून आले. जुन्नर मध्ये अखेरच्या क्षणी रघुनाथ लेंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संजय काळे यांचा मार्ग मोकळा झाला. मावळमध्ये भोईरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन अर्ज अवैध ठरला होता परंतु अखेरच्या क्षणी त्यांनी देखील माघार घेतल्यामुळे मावळमधून ज्ञानोबा दाभाडे हे बिनविरोध निवडून आले.सलग आठव्यांदा रमेश थोरात बिनविरोध
जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात हे अ गटातून बिनविरोध निवडून येत सलग आठव्यांदा संचालक म्हणून निवडून आले आहेत. आज निर्धारित वेळेमध्ये भाजपचे अभिमन्यू गिरिमकर व राष्ट्रवादीचे अशोक खळदकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने थोरात यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले. थोरात हे १९८५ पासून म्हणजेच गेली ३७ वर्ष सतत या बँकेच्या संचालक पदावर थोरात कार्यरत आहे. गेली सलग पाच वर्ष बँकेचे अध्यक्ष आहेत.
जिल्हा बँकेवर अप्पासाहेब जगदाळे बिनविरोध
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2021 -26 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रतिष्ठेच्या इंदापूर ' अ ' मतदार संघ तालुका प्रतिनिधी या मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे यांची चौथ्यांदा संचालकपदी बिनविरोध निवड झाली. आप्पासाहेब जगदाळे हे सुमारे वीस वर्ष इंदापूर तालुका सोसायटी अ मतदारसंघातून बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अप्पासाहेब जगदाळे यांचाच एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची पुन्हा संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
उपमुख्यमंत्री अजित पवार- बारामती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - आंबेगाव, आमदार संग्राम थोपटे -भोर, रमेश थोरात -दौंड, अप्पासाहेब जगदाळे -इंदापूर ,संजय काळे -जुन्नर, आमदार दिलीप मोहिते- खेड, ज्ञानोबा (माऊली) दाभाडे- मावळ ,आमदार संजय जगताप -पुरंदर, रेवणनाथ दारवटकर- वेल्हे ब वर्ग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर, अनुसूचीत जाती जमाती प्रवीण शिंदे हवेली, इतर मागास प्रवर्ग संभाजी होळकर बारामती, भटक्या विमुक्त जाती जमाती दत्तात्रय येळे, बारामती यांचा समावेश आहे
अशी होणार लढत- हवेली तालुका- प्रकाश म्हस्के विकास दांगट मुळशी तालुका- आत्माराम कलाटे ,सुनील चांदेरे शिरूर तालुका- आमदार अशोक पवार, आबासाहेब गव्हाणे क वर्ग बँका पतसंस्था- प्रदिप विद्याधर कंद ,सुरेश घुले, दिलीप मुरकुटे. ड वर्ग- दादासाहेब फराटे दिगंबर दुर्गाडे. महिला- (दोन जागा) आशाताई बुचके, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील गट निहाय मतदारसंख्या-
अ वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 1305 जागा-13
1.आंबेगाव अ.क्र. 1 ते 59 (मतदारसंख्या-59)
2.बारामती अ.क्र. 59 ते 254 (मतदारसंख्या-171)
3.भोर- अ.क्र. 255 ते ३२९ (मतदारसंख्या-74)
4.दौंड- अ.क्र. ३३० ते ४४५ (मतदारसंख्या-115)
5.हवेली- अ.क्र. 456 ते ५८८ (मतदारसंख्या-132)
6.इंदापूर- अ.क्र. ५८९ ते ७७३ (मतदारसंख्या-184)
7.जुन्नर- अ.क्र. ७७४ ते ८५० (मतदारसंख्या-76)
8.खेड- अ.क्र. ८५१ ते ९५३ (मतदारसंख्या-102)
9.मावळ- अ.क्र. ९५४ ते १००८ (मतदारसंख्या-54)
10.मुळशी- अ.क्र. १००९ ते 1054 (मतदारसंख्या-45)
11.पुरंदर- अ.क्र. १०५५ ते ११४९ (मतदारसंख्या-94)
12.शिरूर- अ.क्र. ११५० ते १२८१ (मतदारसंख्या-131)
13.वेल्हा- अ.क्र. १२८२ ते १३०५ (मतदारसंख्या-23)
ब वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १३०६ ते १४१२)- 106
क वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १४१३ ते ३०१९) - 1606
ड वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 3985
ड वर्ग व्यक्ती सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. 1 ते १६६५) - 1665
एकूण 7005 + 1665 = 8670 मतदार आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुक सन २०२०-२०२५ अंतिम मतदार यादी-
मतदार संघ - 'अ ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ब ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'क ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - व्यक्ती सभासद यादी
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.