Wednesday, 13 April 2022

Kolhapur By Election Exit Poll : कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुक मतदानोत्तर चाचणी अंदाज

महाविकास आघाडीकडेच मतदारांचा कल!

   
    कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मतदानाचा कोल्हापूर उत्तर विधानसभेचा निकाल आगामी राजकारणावर परिणामकारक ठरेल त्यामुळे 16 एप्रिलच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. यामध्येच पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुक मतदानोत्तर चाचणी घेण्यात आली यामध्ये महाविकास आघाडीकडेच मतदारांचा कल असल्याचे दिसून आले. भाजपकडून महाविकास आघाडीवर मात करण्याचा प्रयत्न या निवडणूक प्रचारातून करण्यात आला. या निवडणुकीत भाजपकडून प्रचारातील कोणतीही कसर ठेवण्यात आलेली नव्हती. प्रचारातील नियोजन आणि मतदार संघाबाहेरील प्रचारक नेते यांच्या मुळे चुरशीच्या या निवडणुकीत आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर व्यक्तीगत स्वरूपाच्या संबंधातून मतदान करण्याचा आग्रह मतदारांना केला जात असल्यामुळे पक्षीय राजकारणाला काही प्रमाणात अलिप्त राखले जात होते त्याचा परिणाम निकालातून दिसून येईल. पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे केलेल्या मतदानोत्तर चाचणीत मतदारांच्या कलानुसार महाविकास आघाडी आणि भाजप या प्रमुख पक्षातील उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाल्याचे दिसून आले.  कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुकीत एकूण मतदारसंख्या 2 लाख 91 हजार 798 इतकी होती. यामधील सरासरी 60.90 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 1 लाख 77 हजार 705 मतदारांनी मतदानात सक्रीय सहभाग नोंदवला आहे. प्राब संस्थेने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत मतदारांचे कल जाणून घेतले यामध्ये भाजपच्या उमेदवाराला दिलेल्या पसंतीचे प्रमाण 46.21 टक्के इतके असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 48.59 टक्के तर अन्य उमेदवारांना 5.20 टक्के दर्शवलेले आहे. मतदानोत्तर चाचणीत मतदारांनी दर्शवलेल्या पसंती प्रमाणात झालेल्या मतदानानुसार भाजप उमेदवाराला 82 हजार 117 इतके मतदान होईल असा चाचणीतील निष्कर्षातून अंदाज आहे तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 86 हजार 347 इतके मतदान होईल असा अंदाज चाचणीतून व्यक्त होत आहे. नोटासह अन्य उमेदवारांना एकूण 9 हजार 241 इतकी मते मिळतील. विजयी उमेदवाराचे मताधिक्य 4 हजार 230 इतके राहील असा अंदाज प्राब संस्थेच्या मतदानोत्तर चाचणी सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलेला आहे. 
      कोल्हापूर उत्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2009 मध्ये एकूण मतदार संख्या 2 लाख 65 हजार 893 इतकी होती तर झालेले मतदान 1 लाख 52 हजार 483 इतके होते. झालेल्या मतदानाचे प्रमाण 57.41 एवढे होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवाराला 26.37% इतके मतदान झाले होते तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवाराला 24.99% मतदान झालेले होते.
    कोल्हापूर उत्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2014 मध्ये एकूण मतदार संख्या 2 लाख 84 हजार 785 इतकी होती तर झालेले मतदान 1 लाख 75 हजार 644 इतके होते. झालेल्या मतदानाचे प्रमाण 61.68 टक्के एवढे होते. या निवडणुकीत युती व आघाडी झालेली नसल्याने प्रथमच प्रमुख चारही पक्ष एकमेकांसोबत उभे ठाकले होते या निवडणुकीत प्रत्येक पक्षाची खरा जनाधार किती आहे हे सिद्ध झालेले होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवाराला 39.72% इतके मतदान झाले होते तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवाराला 26.95% मतदान झालेले होते. तर भाजप उमेदवाराला 22.84 टक्के मते प्राप्त झालेली होती तर राष्ट्रवादीला अवघी 5.63% मते मिळाली होती. अन्य उमेदवारांना 10.44% मते प्राप्त झालेली होती. 
     कोल्हापूर उत्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2019 मध्ये एकूण मतदार संख्या 2 लाख 86 हजार 265 इतकी होती तर झालेले मतदान 1 लाख 75 हजार 207 इतके होते. झालेल्या मतदानाचे प्रमाण 61.20 एवढे होते. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या विजयी उमेदवाराला 51.97% इतके मतदान झाले होते तर प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवाराला 43.29% मतदान झालेले होते. 
        दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुकीत एकूण मतदारसंख्या 2 लाख 91 हजार 798 इतकी होती. यामधील सरासरी 60.90 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा या मतदार संघात एकूण मतदारसंख्येमध्ये 1 लाख 45 हजार 626 पुरुष मतदार, 1 लाख 45 हजार 901 स्त्री मतदार, 95 सैनिक मतदार तर 12 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यासाठी 357 केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून 311 मुख्य केंद्रे तर 46 सहाय्यकारी केंद्रांचा समावेश होता. 2 हजार 392 मतदान कर्मचारी या निवडणूक प्रक्रीयेत सहभागी झालेले आहेत. या निवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी वेळ संपेपर्यंत 60.90 टक्के मतदान झाले. एकूण 1 लाख 61 हजार 289 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 84 हजार 566 पुरुष तर, 76 हजार 721 महिला मतदारांनी मतदान केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे दिवंगत काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे २ डिसेंबर २०२१ ला कोरोनामुळे निधन झालेने रिक्त जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झालेली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे तसे मूळ भाजप पक्षाचे होते. कोल्हापूर महापालिकेत त्यांच्या पत्नी व विद्यमान महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि बंधू संभाजी हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले. पण, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून ते निवडूनही आले होते. 2004 आणि 2019 चा अपवाद वगळता 1990 पासून या जागेवर कायम शिवसेना निवडून आलेली आहे. 2014 मध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. त्याच राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत कै. चंद्रकांत जाधव यांनी ही जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली होती. महाविकास आघाडीच्या समझोत्यानुसार विद्यमान जागा त्या-त्या पक्षाने लढवण्याचे ठरल्याने शिवसेनेने उमेदवार दिलेला नव्हता. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपापल्या उमेदवारांच्या विजयाचा दावा केला आहे. या निकालाचा 'प्राब' संस्थेचा एक्झिट पोलनुसार ही जागा काँग्रेसच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपकडून महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित कदम यांना उमेदवारी दिलेली होती. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 16 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. या मतमोजणीतून अधिकृतपणे मतदारांचा कल व निवडणूक निकाल स्पष्ट होईल. 

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक-2022 ('प्राब' संस्थेचे 'मतदानोत्तर चाचणी' सर्वेक्षण)
एकूण मतदार संख्या- 291798
मतदानाची टक्केवारी- 60.90
एकूण झालेले मतदान- 177705
'प्राब' च्या 'मतदानोत्तर चाचणी' सर्वेक्षणानुसार पक्षनिहाय झालेल्या मतदानाचे संभाव्य प्रमाण-
काँग्रेस- 48.59%
भाजप- 46.21% 
इतर- 5.20% 
'प्राब' च्या 'मतदानोत्तर चाचणी' सर्वेक्षणानुसार पक्षनिहाय संभाव्य मतदान-
काँग्रेस- 86347
भाजप- 82117
इतर- 9241
संभाव्य विजयी मताधिक्य- 4230

निवडणूक रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे- 

1) जाधव जयश्री चंद्रकांत (इंडियन नॅशनल काँग्रेस)
2) सत्यजीत (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी)
3) यशवंत कृष्णा शेळके, नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)
4) विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी)
5) शाहीद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी)
6) आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष)
7) देसाई सुभाष वैजू (अपक्ष)
8) बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष)
9) भोसले भारत संभाजी (अपक्ष)
10) मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष)
11) माने अरविंद भिवा (अपक्ष)
12) मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष)
13) मुंडे करुणा धनंजय (अपक्ष)
14) राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष)
15) राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष)
16) संजय भिकाजी मागाडे (अपक्ष)
17) संतोष गणपती बिसुरे (अपक्ष)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

   

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.