Saturday, 23 November 2024

maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणूक-२०२४; ‘प्राब’ या संस्थेच्या महायुती विजयाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब; मतदारांचा कल जाणण्यात यश

महायुतीचा दणदणीत विजय तर महाविकास आघाडीची  दाणादाण

‘प्राब’ या संस्थेच्या महायुती विजयाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो ‘प्राब’या संस्थेच्या ‘एक्सिट पोल’मधील मतदारांचा अचूक कल जाणण्यात यश मिळाल्याचे विधानसभा निवडणूक निकालांमधून स्पष्ट झालेले आहे.  ‘प्राब’या संस्थेने ‘एक्सिट पोल’मध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता. जो अंदाज वर्तविला त्याही पेक्षा जास्त जागांवर महायुतीच्या प्रमुख तिन्ही पक्षांना जास्त जागा मिळाल्या आहेत. मतदारांचा कल जाणण्यात प्राविण्य मिळविलेल्या ‘प्राब’या संस्थेच्या ‘एक्सिट पोल’बाबत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करून कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. सर्व हितचिंतक व प्राब चे सर्व सहकारी वर्गाचे आभार व्यक्त करीत आहोत. 

महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे.  अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. भाजपाला बहुमताची जादूई संख्या गाठण्यासाठी पक्षाला केवळ १३ आमदारच कमी पडत आहेत. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना जोरदार हादरा दिला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साफ पानिपत झाले असून प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 राज्यात भारतीय जनता पक्षानं १४९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यातील १३२ भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे जागा निवडून येण्याच्या बाबतीत आणि स्ट्राईक रेटच्या बाबतीतही भाजपा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या पक्षाने राज्यात ५७ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात ८५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी ५७ जागांवर शिंदेंचे शिलेदार जिंकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला महाविकास आघाडीमध्ये २८८ पैकी ८६ मतदारसंघ मिळाले होते. काही मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. तर ४० मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळाला. 

क्र.

पक्ष

विजयी आमदार

1

भारतीय जनता पार्टी भाजपा

१३२

2

शिवसेना

५७

3

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

४१

4

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२०

5

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

१६

6

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

१०

7

समाजवादी पक्ष सपा

8

जन सुराज्य शक्ती

9

राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष

10

राष्ट्रीय समाज पक्ष

11

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

12

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) सीपीआय(एम)

13

भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष

14

राजर्षी शाहू विकास आघाडी

15

अपक्ष


शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदेंना साथ देणारे 'हे' पाच आमदार पराभूत

माझ्या सोबत आलेल्या एकाही आमदाराचा पराभव झाला तर मी राजकारणातून निवृत्ती घेईल, असे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीला तब्बल 236 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 58 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेच्या फूटीवेळी एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्या  पाच विद्यमान आमदारांचा पराभव झाला. सांगोला मतदारसंघातून शहाजी पाटील, माहीममधून सदा सरवणकर, मेहकर मतदारसंघातून संजय रायमुलकर, उमरगा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले, भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव यांचा पराभव झाला. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेले शहाजी पाटील हे आपल्या 'काय झाडी काय डोंगार' या वक्तव्यामुळे प्रकाशझोतात आले होते. त्यांना सांगोला मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. शेकापचे बाबासाहेब देशमुख देशमुखांनी तेथे त्यांचा पराभव केला. बच्चू कडू, गीता जैनही पराभूत शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रहार पक्षाचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. तर, अपक्ष आमदार गीता जैन यादेखील एकनाथ शिंदेंसोबत होत्या. मात्र, त्यांचा देखील पराभव झाला.

नवनिर्वाचित महिला उमेदवारांची यादी

अ. क्र.

महिला उमेदवारांची नावे

विधानसभा मतदारसंघ

पक्ष

1

श्वेता महाले

चिखली

भाजपा

2

मेघना बोर्डीकार

जितूर

भाजपा

3

देवयानी फरांडे

नाशिक मध्य

भाजपा

4

सीमा हिरय

नाशिक पश्चिम

भाजपा

5

मंदा म्हात्रे

बेलापूर

भाजपा

6

मनीषा चौधरी

दहिसर

भाजपा

7

विद्या ठाकूर

गोरेगाव

भाजपा

8

माधुरी मिसळ

पार्वती

भाजपा

9

मोनिका राजाळे

शेवगाव

भाजपा

10

नमिता मुदंडा

कैज

भाजपा

11

श्रीजया चव्हाण

भोकरी

भाजपा

12

सुलभा गायकवाड

कल्याण पूर्व

भाजपा

13

स्नेहा पंडित

वसई

भाजपा

14

अनुराधा चव्हाण

फुलंबारी

भाजपा

15

मंजुळा गावित

साक्री

शिवसेना

16

संजना जाधव

कन्नड

शिवसेना

17

सुलभा खोदके

अमरावती

राष्ट्रवादी

18

सरोज आहीरे

देवळाली

राष्ट्रवादी

19

सना मलिक

अनुषक्तीनगर

राष्ट्रवादी

20

अदिती ताटकरे

श्रीवर्धन

राष्ट्रवादी

21

ज्योती गायकवाड

धावरी

काँग्रेस


 विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त 

महायुतीमधील तीन पक्षाने अनेक दिग्गजांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. यात विधानपरिषदेवर आमदार असलेल्या काही नेत्यांच्या नावांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांचा विजय झाला. त्यामुळे येत्या काळात विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त होणार आहेत. त्यामध्ये भाजपच्या चार जागा तर शिवसेना शिंदे गटाची एक तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक जागा रिक्त आहे. या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेतील भाजपच्या 4 आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली. सध्या विधानसभा निवडणुकीत विजय झालेले चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे विधानपरिषदेचे चार आमदार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत. शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांचीही विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधानपरिषदेत रिक्त झाली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हे देखील विधानपरिषदेवर आमदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत.  

पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघांपैकी १८ ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी विजय 

अ. क्र.

मतदारसंघ

विजयी उमेदवार व पक्ष

जुन्नर

शरद सोनावणे (अपक्ष)

आंबेगाव

दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)

खेड आळंदी

बाबाजी काळे (शिवसेना ठाकरे गट)

शिरूर

ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी)

दौंड

अ‍ॅड. राहुल कुल (भाजप)

इंदापूर

दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)

बारामती

अजित पवार (राष्ट्रवादी)

पुरंदर

विजय शिवतारे (शिवसेना शिंदे गट)

भोर

शंंकर मांडेकर (राष्ट्रवादी)

१०

मावळ

सुनील शेळके (राष्ट्रवादी)

११

चिंचवड

शंकर जगताप (भाजप)

१२

पिंपरी

आण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)

१३

भोसरी

महेश लांडगे (भाजप)

१४

वडगाव शेरी

बापु साहेब पठारे (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार)

१५

शिवाजीनगर

सिद्धार्थ शिरोळे (भाजप)

१६

कोथरूड

चंद्रकांत पाटील (भाजप)

१७

खडकवासला

भीमराव तापकीर (भाजप)

१८

पर्वती

माधुरी मिसाळ (भाजप)

१९

हडपसर

चेतन तुपे (राष्ट्रवादी)

२०

पुणे कॅन्टोन्मेंट

सुनील कांबळे (भाजप)

२१

कसबा पेठ

हेमंत नारायण रासने (भाजप)


पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघांत रंगदार लढती झाल्या. या २१ मतदारसंघांपैकी १८ ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. तर काही नव्या चेहऱ्यांनी विजय मिळवला. यात मिनी मंत्रालय असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांची आमदारपदी वर्णी लागली आहे. यात भोरमधून राष्ट्रवादी पक्षाचे शंकर मांडेकर व शिरुर हवेलीतून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, तर खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांनी विजय मिळवला आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड समला जातो. पुणे जिल्हा परिषदेवर देखील राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहेत. अजित पवार यांनी अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाची संधी दिली आहे. याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेकांनी या पूर्वी आमदारकी पर्यंत मजल मारली आहे. यात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे यांची नावे प्रामुख्याने घेतली जाते. सध्या निवडणूक आलेले तिन्ही आमदार हे २०१७ ते २२ या कालावधीत जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. अजित पवार यांनी माऊली कटके यांना शिरूर हवेली मतदार संघातून तर शंकर मांडेकर यांना भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खेड आळंदी मतदार संघातून बाबाजी काळे यांना उमेदवारी दिली होती. या तिन्ही उमेदवारांनी जिल्हा परिषदेचे सदस्य असतांना मोठी कामे केली आहेत. त्या बळावर त्यांनी विधानसभा निवडणुकीत देखील आपले नशीब आजमावले. हे तिन्ही सदस्य विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. माऊली कटके यांनी गेल्या दोन वेळा शिरूर हवेलीतून निवडून आलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा पराभव केला. तर शंभर मांडेकर यांनी कॉँग्रेसचे गेल्या तीन टर्म आमदार राहिलेले व मंत्री पदाच्या शर्यतीत असलेले संग्राम थोपटे यांचा पराभव केला आहे. तर बाबाजी काळे यांनी खेड आळंदी मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर कटके यांनी आमदार अशोक पवार यांचा तब्बल ७४ हजार ५५० इतक्या मताधिक्यांनी पराभव केला. तर बाबाजी काळे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा ५१ हजार हजार ७४३ इतक्या मताधिक्याने पराभव केला. तर शंकर मांडेकर यांनी भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांचा तब्बल १९ हजार ६३८ इतक्या मतांनी पराभव केला.

पुणे जिल्ह्यात 47,729 मतदारांनी स्वीकारला नोटा पर्याय

पुणे जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 विधानसभा निवडणुकीत नोटा  (नकाराधिकार) पर्यायाचा कमी मतदारांनी स्वीकारला आहे. 2019 मध्ये जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात एकूण 47 हजार 729 मतदारांनी नोटाचा पर्यायाला पसंती दिली होती. तर 2024 मध्ये यामध्ये घट झाली असून 42 हजार 919 मतदारांनी  नोटाचा पर्यायाला पसंती दिली आहे. यावरून मतदारांनी यंदा पक्ष आणि पक्षाच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे निकालावरून समोर आले आहे.निवडणूक आयोगाने रिंगणातील उमेदवाराची निवड करण्याबरोबरच त्यांना नाकारण्याच्या अधिकारही दिला आहे. त्यासाठी ईव्हीएम नोटाचे स्वतंत्र बटन देण्यात आले आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर नोटाच्या माध्यमातून ते निर्णय घेऊ शकतात. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील ४७ हजार ७२९ नागरिकांनी आपल्या या अधिकाराचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वडगाव शेरीतील नागरिकांनी त्याचा वापर केला आहे. येथे सर्वाधिक म्हणजे ४ हजार २५९ मतदारांनी नोटाला पर्यायाला पसंती दिली आहे. तर सर्वांत कमी म्हणजे ६३४ मतदारांनी इंदापूर मतदारसंघात नोटा बटन दाबून आपली नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी मतदारसंघात ४ हजार १३ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात ४ हजार ३१६ मते नोटाच्या माध्यमातून नोंदविली गेली आहे. तर, बारामती मतदार संघात ७७९ नोटाच्या मतांची नोंद झाली आहे. २१ मतदार संघांतील एकूण मतदानाच्या तुलनेत  नोटाचे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे. मतदारसंघ आणि नोटा मतदान- कोथरूड ३,१५२, खडकवासला- २,९००, पर्वती- २,४६१, कसबा पेठ-१,२१३, शिवाजीनगर-२,०४४, पुणे कॅन्टोमेंन्ट- १,८१५, हडपसर- २,९४६, वडगावशेरी - ४,२५९, आंबेगाव -; १,१५७, खेड-आळंदी - १,६९२, जुन्नर - १,३७६, शिरूर-; २,१५७, मावळ - २,७१५, पुरंदर - १,४८४, बारामती - ७,७९, दौंड -; १,२११, इंदापूर - ६३४, भोर  २,७२०, पिंपरी- ४,०१३, चिंचवड -; ४,३१६, भोसरी- २,६८५. 

कसब्यातून हेमंत रासने विजयी

भाजपने पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा या विधानसभा निवडणुकीत काढला आहे. याठिकाणी भाजपचे हेमंत रासने यांनी मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा हेमंत रासने यांनी पराभव केला आहे. गेल्या पंचवीस वर्ष हा मतदारसंघ भाजपकडे होता. आता पुन्हा हा मतदारसंघ भाजपकडे खेचण्यास हेमंत रासने यांना मोठे यश आले आहे. ९९५ ते २०१९ पर्यंत या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. मात्र २०२३ मध्ये भाजपच्या मुक्ता टिळत यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. आता विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यंदाही विधानसभेच्या रिंगणात होते मात्र आता समोर आलेल्या निकालानुसार कसब्यातून हेमंत रासने विजयी झाले आहेत तर रवींद्र धंगेकर यांचा पराभूत झाला आहे.

पिंपरीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक

शहरातील राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक झाली आहे. पहिल्या फेरीपासून बनसोडे आघाडीवर होते. त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांचा ३६,६९८ मतांनी पराभव केला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या परिसराचा समावेश असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव असलेल्या या मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. तेव्हापासून झालेल्या तीन निवडणुकांमध्ये दोनदा राष्ट्रवादी आणि एकदा शिवसेनेने बाजी मारली. २००९ आणि २०१९ मध्ये अण्णा बनसोडे तर २०१४ मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये केवळ पिंपरीची एकमेव जागा मिळाली होती. बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत पक्षाचेच शहराध्यक्ष योगेश बहल, महायुतीमधील घटक पक्षाच्या माजी नगरसेवकांनी त्यांना उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला होता. शिवसेनेचे (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनीही उमेदवार बदलला तर यश मिळेल असे सांगत अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. त्यानंतरही अजित पवार यांनी बनसोडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. बनसोडे यांनी अजित पवार यांचा विश्वास यशस्वी करून दाखविला आहे.

राष्ट्रवादीचे सुनील शेळके विजयी

मावळ विधानसभा मतदार संघात महायुतीतील नाराजांनी उदयास आणलेला मावळ ‘पॅटर्न’ फेल झाला आहे.पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत. त्यांना एक लाखाचे मताधिक्य मिळाले आहे.मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात झालेल्या लढतीमुळे मावळकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या मतदार संघात ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान वाढले आहे. या वाढीव मतदानाने मावळ ‘पॅटर्न’ला धक्का दिला आहे. आमदार सुनील शेळके पूर्वी भाजपमध्येच होते. २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना पराभूत केले. तेव्हापासून आमदार शेळके आणि मावळ भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. भाजपने मावळवर दावा केल्यानंतरही जागा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली. पवार यांनी शेळके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि महायुतीत फूट पडली. 

महाराष्ट्रातील आमदारांची संपूर्ण यादी 2024 (Maharashtra MLA List 2024) 

मतदारसंघ  - विजयी उमेदवार

नंदुरबार जिल्ह्यातील आमदार : 04   
1) अक्कलकुवा - आमश्या पाडवी (शिवसेना)
2) शहादा- राजेश पाडवी (भाजप)
3) नंदुरबार-विजयकुमार गावित (भाजप)
4) नवापूर- शिरिषकुमार नाईक (काँग्रेस) 
धुळे जिल्ह्यातील आमदार : 05 
5) साक्री मंजुळा गावित (शिवसेना)
6) धुळे ग्रामीण-राघवेंद्र पाटील (भाजप)
7) धुळे शहर- ओमप्रकाश अग्रवाल (भाजप)
8) सिंदखेडा- जयकुमार रावल (भाजप)
9) शिरपूर-काशिराम पावरा (भाजप)
जळगाव जिल्ह्यातील आमदार : 11
10) चोपडा-चंद्रकांत सोनवणे (शिवसेना)
11) रावेर- अमोल जावळे (भाजप)
12) भुसावळ - वामन सावकरे (भाजप)
13) जळगाव शहर - सुरेश भोळे (भाजप)
14) जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील (शिवसेना)
15) अमळनेर - अनिल पाटील (राष्ट्रवादी )
16) एरंडोल अमोल पाटील (शिवसेना)
17) चाळीसगाव - मंगेश चव्हाण (भाजप)
18) पाचोरा - किशोर पाटील (शिवसेना)
19) जामनेर - गिरीश महाजन (भाजप) 
20) - मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील (शिवसेना) 
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार : 07  
21) मलकापूर - चैनसुख संचेती (भाजप) 
22) बुलडाणा - संजय गायकवाड (शिवसेना) 
23) चिखली-  श्वेता महाले (भाजप)
24) सिंदखेडराजा - मनोज कायंदे (काँग्रेस)
25) मेहकर -  सिद्धार्थ खरात (ठाकरे गट)
26) खामगाव - आकाश फुंडकर (भाजप)
27) जळगाव (जामोद) - संजय कुटे (भाजप)
अकोला जिल्ह्यातील आमदार : 05 
28) अकोट - प्रकाश भारसाकळे (भाजप) 
29) बाळापूर -- नितीन देशमुख (ठाकरे गट)
30) अकोला पश्चिम -साजिद खान (काँग्रेस)
31) अकोला पूर्व - रणधीर सावकर (भाजप)
32) मूर्तिझापूर - हरिश पिंपळे (भाजप) 
वाशिम जिल्ह्यातील आमदार : 03 
33) रिसोड - अमित झनक (काँग्रेस)
34) वाशिम - श्याम खोडे (भाजप)
35) कारंजा - सई डहाके (भाजप)
अमरावती जिल्ह्यातील आमदार : 08  
36) धामणगाव रेल्वे - प्रताप अडसड (भाजप)
37) बडनेरा - रवी राणा (अपक्ष) 
38) मरावती - सुलभा खोडके (राष्ट्रवादी)
39) तिवसा - राजेश वानखेडे (भाजप)
40) दर्यापूर - गजानन लवाटे (ठाकरे गट)
41) मेळघाट - केवलराम काळे (भाजप)
42) अचलपूर- प्रवीण तायडे (भाजप)
43) मोर्शी  - उमेश यावलकर (भाजप)  
वर्धा जिल्ह्यातील आमदार : 04 
44) आर्वी  - सुमीत वानखेडे (भाजप)
45) देवळी - राजेश बकाणे (भाजप) 
46) हिंघणघाट - समीर कुनावर (भाजप)
47) वर्धा - पंकज भोयार (भाजप) 
नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12  
48) काटोल विधानसभा - चरणसिंग ठाकूर (भाजप)
49) सावनेर विधानसभा -  आशिष देशमुख (भाजप)
50) हिंगणा विधानसभा - समीर मेघे (भाजप)
51) उमरेड विधानसभा -  संजय मेश्राम (काँग्रेस)
52) नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा-  देवेंद्र फडणवीस (भाजप)
53) नागपूर दक्षिण विधानसभा - मोहन माटे (भाजप)
54) नागपूर पूर्व विधानसभा - कृष्णा खोपडे (भाजप)
55) नागपूर मध्य विधानसभा - प्रवीण दटके (भाजप)
56) नागपूर पश्चिम विधानसभा - विकास ठाकरे (काँग्रेस)
57) नागपूर उत्तर विधानसभा - नितीन राऊत (काँग्रेस)
58) कामठी विधानसभा - चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
59) रामटेक विधानसभा - आशिष जयस्वाल (अपक्ष)
भंडारा जिल्ह्यातील आमदार : 03  
60) तुमसर - राजू कारेमोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
61) भंडारा  - नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)
62) साकोली - नाना पटोले (काँग्रेस)
गोंदिया जिल्ह्यातील आमदार : 04 
63) अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले (राष्ट्रवादी)
64) तिरोरा - विजय रहांगडाले (भाजप)
65) गोंदिया  - विनोद अग्रवाल (भाजप)
66) आमगाव  - संजय पुरम (भाजप) 
गडचिरोली जिल्ह्यातील आमदार : 03  
67) आरमोरी - रामदास मेश्राम (काँग्रेस)  
68) गडचिरोली - मनोहर पोरेटी (काँग्रेस) 
69) अहेरी - धर्मराव आत्राम (राष्ट्रवादी) 
चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार : 06 
70) राजुरा- देवराव भोंगळे (भाजप)
71) चंद्रपूर  - किशोर जोरगेवार (भाजप)
72) बल्लारपूर  - सुधीर मुनगंटीवार (भाजप) 
73) ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
74) चिमुर - बंटी भांगडीया (भाजप) 
75) वरोरा - करण देवतळे (भाजप)  
यवतमाळ जिल्ह्यातील आमदार  : 07  
76) वणी -  संजय दरेकर (ठाकरे गट)
77) राळेगाव  - अशोक उइके (भाजप)
78) यवतमाळ - अनिल मंगळुरकर (काँग्रेस )
79) दिग्रस  - संजय राठोड (शिवसेना)
80) आर्णी  - राजू तोडसाम (भाजप)
81) पुसद  - इंद्रनिल नाईक (राष्ट्रवादी)
82) उमरखेड - किसन वानखेडे (भाजप)
नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09  
83) किनवट -  भिमराव केराम (भाजप) 
84) हदगाव  - बाबुराव कोहळीकर (शिवसेना)
85) भोकर  - श्रीजया चव्हाण (भाजप) 
86) नांदेड उत्तर  -  बालाजी कल्याणकर (भाजप)
87) नांदेड दक्षिण -  आनंद तिडके (शिवसेना)
88) लोहा - प्रतापराव चिखलीकर (राष्ट्रवादी) 
89) नायगाव  - राजेश पवार (भाजप)
90) देगलूर - जितेश अंतापूरकर (भाजप) 
91) मुखेड  - तुषार राठोड (भाजप)
हिंगोली जिल्ह्यातील आमदार : 03 
92) वसमत - राजू नवघरे (राष्ट्रवादी )
93) कळमनुरी - संतोष बांगर (शिवसेना) 
94) हिंगोली - तानाजी मुटकुळे (भाजप) 
परभणी जिल्ह्यातील आमदार : 04  
95) जिंतूर - मेघना बोर्डिकर (भाजप) 
96) परभणी  - राहुल पाटील (ठाकरे गट) 
97) गंगाखेड - रत्नाकर गुट्टे (रासप)
98) पाथरी  - राजेश विटेकर (राष्ट्रवादी )
जालना जिल्ह्यातील आमदार  : 05  
99) परतूर - बबनराव यादव (भाजप)  
100) घनसावंगी - हिकमत उधाण (शिवसेना) 
101) जालना - अर्जुन खोतकर (शिवसेना)
102) बदनापूर - नारायण कुचे (भाजप)
103) भोकरदण -   संतोष दानवे (भाजप) 
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमदार : 09
104) सिल्लोड विधानसभा -  अब्दुल सत्तार (शिवसेना - एकनाथ शिंदे)
105) कन्नड - संजना जाधव (शिवसेना)
106) फुलंब्री - अनुराधा चव्हाण (भाजप)
107) औरंगाबाद मध्य - प्रदीप जायस्वाल (शिवसेना)
108) औरंगाबाद पश्चिम  - संजय शिरसाट (शिवसेना) 
109) औरंगाबाद पूर्व  - अतुल सावे (भाजप)
110) पैठण - विलास भुमरे (शिवसेना)
111) गंगापूर  - प्रशांत बंब (भाजप)
112) वैजापूर - रमेश बोरनारे (शिवसेना)
नाशिक जिल्ह्यातील आमदार : 15  
113) नांदगाव - सुहास कांदे (शिवसेना)
114) मालेगाव मध्य - मोहम्मद इस्माईल मुफ्ती (एमआयएम)
115) मालेगाव बाह्य - दादा भुसे (शिवसेना)
116) बागलाण - दिलीप बोरसे (भाजप)
117) कळवण - नितीन पवार (राष्ट्रवादी )
118) चांदवड - पांडुरंग जगताप (भाजप)
119) येवला - छगन भुजबळ (राष्ट्रवादी )
120) सिन्नर - माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी )
121) निफाड - दिलीप बनकर (राष्ट्रवादी )
122) दिंडोरी - नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी )
123) नाशिक पूर्व - राहुल ढिकळे (भाजप)
124) नाशिक मध्य - देवयानी फरांदे (भाजप)
125) नाशिक पश्चिम - सीमा हिरे (भाजप)
126) देवळाली सरोज अहिरे (राष्ट्रवादी )
127) इगतपुरी हिरामण खोसकर (काँग्रेस)
पालघर जिल्ह्यातील आमदार: 06 
128) डहाणू - विनोद निकोले (कम्युनिस्ट पार्टी)
129) विक्रमगड - हरिशचंद्र भोये (भाजप)
130) पालघर - राजेंद्र गावित (भाजप)
131) बोईसर - विलास तरे (शिवसेना)
132) नालासोपारा - राजन नाईक (भाजप)
133) वसई - स्नेहा दुबे (भाजप) 
ठाणे जिल्ह्यातील आमदार : 18 
134) भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिवसेना)
135) शहापूर - दौलत दरोडा (राष्ट्रवादी )
136) भिवंडी पश्चिम - महेश चौगुले (भाजप)
137) भिवंडी पूर्व - रईस पाटील (समाजवादी पार्टी)
138) कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर (शिवसेना)
139) मुरबाड - किसन कथोरे (भाजप)
140) अंबरनाथ - बालाजी किणीकर (शिवसेना)
141) उल्हासनगर - कुमार आयलानी (भाजप)
 142 कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड (भाजप) 
143 डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप) 
144 कल्याण ग्रामीण - राजेश मोरे (शिवसेना) 
145 मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता (भाजप) 
146 ओवळा माजीवाडा -  प्रताप सरनाईक (शिवसेना) 
147 कोपरी पाचपाखडी - एकनाथ शिंदे (शिवसेना) 
148 ठाणे - संजय केळकर (भाजप) 
149 मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड (शरद पवार) 
150 ऐरोली - गणेश नाईक (भाजप) 
151 बेलापूर - मंदा म्हात्रे 
मुंबईतील आमदारांची संख्या : 36 
152 बोरिवली - संजय उपाध्याय (भाजप) 
153 दहिसर - मनिषा चौधरी (भाजप) 
154 मागाठाणे - प्रकाश सुर्वे (भाजप) 
155 मुलुंड - महिर कोटेचा (भाजप) 
156 विक्रोळी - सुनील राऊत (ठाकरे गट) 
157 भांडुप पश्चिम - अशोक पाटील (शिवसेना) 
158 जोगेश्वरी पूर्व - अनंत नर (ठाकरे गट) 
159 दिंडोशी - सुनील प्रभू (ठाकरे गट) 
160 कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (भाजप) 
161 चारकोप - योगेश सागर (भाजप) 
162 मालाड पश्चिम -अस्लम शेख (काँग्रेस) 
163 गोरेगाव - विद्या ठाकूर (भाजप) 
164 वर्सोवा - हारुन खान (ठाकरे गट) 
165 अंधेरी पश्चिम - अमित साटम (भाजप)  
166 अंधेरी पूर्व - मुरजी पटेल (शिवसेना) 
167 विर्लेपार्ले - पराग अळवणी (भाजप) 
168 चांदिवली - दिलीप लांडे (शिवसेना) 
169 घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप) 
170 घाटकोपर पूर्व - पराग शाह (भाजप) 
171 मानखुर्द - शिवाजी नगर - अबू आझमी (समाजवादी पार्टी) 
172 अणुशक्ती नगर - सना मलिक (राष्ट्रवादी ) 
173 चेंबूर - तुकाराम काते (शिवसेना) 
174 कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिवसेना) 
175 कलिना - संजय पोतणीस (ठाकरे गट) 
176 वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई (ठाकरे गट) 
177 वांद्रे पश्चिम - आशिष शेलार (भाजप) 
178 धारावी - ज्योती गायकवाड (काँग्रेस) 
179 सायन कोळीवाडा - कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप) 
180 वडाळा - कालिदास कोळंबकर (भाजप) 
181 माहीम - महेश सावंत (ठाकरे गट) 
182 वरळी - आदित्य ठाकरे (ठाकरे गट) 
183 शिवडी - अजय चौधरी (ठाकरे गट) 
184 भायखळा - मनोज जामसुतकर (ठाकरे गट) 
185 मलबार हिल - मंगलप्रभात लोढा (भाजप) 
186 मुंबादेवी - अमीन पटेल (काँग्रेस) 
187 कुलाबा - राहुल नार्वेकर (भाजप)  
रायगड जिल्ह्यातील आमदार : 07 
188 पनवेल - प्रशांत ठाकूर (भाजप) 
189 कर्जत - महेंद्र थोरवे (शिवसेना) 
190 उरण - महेश बालदी (भाजप) 
191 पेण - रवीशेठ पाटील (भाजप) 
192 अलिबाग - महेंद्र दळवी (शिवसेना) 
193 श्रीवर्धन - अदिती तटकरे (राष्ट्रवादी ) 
194 महाड - भरत गोगावले (शिवसेना) 
195 जुन्नर - शरद सोनावणे (अपक्ष) 
196 आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी ) 
197 खेड आळंदी - बालाजी काळे (ठाकरे गट) 
198 शिरूर - माऊली आबा कटके (राष्ट्रवादी ) 
199 दौंड - राहुल कुल (भाजप) 
200 इंदापूर - दत्ता भरणे (राष्ट्रवादी ) 
201 बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी ) 
202 पुरंदर - विजय शिवतारे (शिवसेना) 
203 भोर - शंकर माडेकर (राष्ट्रवादी ) 
204 मावळ - सुनील शेळके (राष्ट्रवादी ) 
205 चिंचवड - शंकर जगताप (भाजप) 
206 पिंपरी - अन्ना बनसोडे (राष्ट्रवादी ) 
207 भोसरी - महेश लांडगे (भाजप) 
208 वडगाव शेरी - बापू पठारे (राष्ट्रवादी  शरद पवार गट) 
209 शिवाजी नगर - सिद्धार्थ शिरोळे (भाजप) 
210 कोथरूड - चंद्रकांत पाटील (भाजप) 
211 खडकवासला - भीमराव तापकीर (राष्ट्रवादी ) 
212 पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप) 
213 हडपसर - चेतन तुपे (राष्ट्रवादी ) 
214 पुणे कँटोनमेंट - सुनील कांबळे (भाजप) 
215 कसबा पेठ - हेमंत रासने (भाजप)  
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार: 12 
216 अकोले - किरण लहामटे (राष्ट्रवादी ) 
217 संगमनेर - अमोल खताळ (शिवसेना) 
218 शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) 
219 कोपरगाव - आशुतोष काळे (राष्ट्रवादी ) 
220 श्रीरामपूर - हेमंत ओगले (भाजप) 
221 नेवासा - विठ्ठलराव लंघे (शिवसेना) 
222 शेवगाव - मोनिका राजळे (भाजप) 
223 राहुरी - शिवाजीराव कर्डीले (भाजप) 
224 पारनेर - काशिनाथ दाते (काँग्रेस) 
225 अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी) 
226 श्रीगोंदा - विक्रम पाचपुते (भाजप) 
227 कर्जत जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार गट)
बीड जिल्ह्यातील आमदार : 06  
228 गेवराई - विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी) 
229 माजलगाव - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी) 
230 बीड - संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) 
231 आष्टी - सुरेश धस (भाजप) 
232 केज - नमिता मुंदडा (भाजप) 
233 परळी - धनंजय मुंडे (राष्ट्रवादीP) 
लातूर जिल्ह्यातील आमदार  : 06 
234 लातूर ग्रामीण - रमेश कराड (भाजप) 
235 लातूर शहर - अमित देशमुख (काँग्रेस) 
236 अहमदपूर - बाबासाहेब पाटील (काँग्रेस) 
237 उदगीर - संजय बनसोड (राष्ट्रवादी) 
238 निलंगा - संभाजी निलंदेकर (भाजप) 
239 औसा - अभिमन्यू पवार (भाजप) 
उस्मानाबाद / धाराशिव जिल्ह्यातील आमदार : 04  
240 उमरगा - प्रवीण स्वामी (ठाकरे गट) 
241 तुळजापूर - राणा जगजितसिंह (भाजप) 
242 उस्मानाबाद- कळंब कैलास पाटील (ठाकरे गट) 
243 परांडा - तानाजी सावंत (शिवसेना) 
सोलापूर जिल्ह्यातील आमदार : 11  
244 करमाळा - नारायण पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
245 माढा - अभिजीत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
246 बार्शी - दिलीप सोपल (ठाकरे गट) 
247 मोहोळ - राजू खरे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
248 सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख (भाजप) 
249 सोलापूर शहर मध्य - देवेंद्र पोटे (भाजप) 
250 सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख (भाजप) 
251 अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी (भाजप) 
252 पंढरपूर - समाधान आवताडे (भाजप) 
253 सांगोले - बाबासाहेब देशमुख (शेकाप) 
254 माळशिरस - उत्तम जानकर (राष्ट्रवादी शरद पवार गट)  
सातारा जिल्ह्यातील आमदार : 08 
255 फलटण - सचिन पाटील (राष्ट्रवादी) 
256 वाई - मकरंद पाटील (राष्ट्रवादी) 
257 कोरेगाव - महेश शिंदे (राष्ट्रवादी) 
258 माण - जयकुमार गोरे (भाजप) 
259 कराड उत्तर - मनोज घोरपडे (भाजप) 
260 कराड दक्षिण - अतुल भोसले (भाजप) 
261 पाटण - शंभुराज देसाई (शिवसेना) 
262 सातारा -  शिवेंद्रराजे भोसले (भाजप) 
रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार : 05 
263 दापोली - योगेश कदम (शिवसेना) 
264 गुहागर - भास्कर जाधव (ठाकरे गट) 
265 चिपळूण  - शेखर निकम (राष्ट्रवादी) 
266 रत्नागिरी - उदय सामंत (शिवसेना) 
267 राजापूर -  किरण सामंत (शिवसेना) 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार : 03 
268 कणकवली - नितेश राणे (भाजप) 
269 कुडाळ - निलेश राणे (शिवसेना) 
270 सावंतवाडी - दीपक केसरकर (शिवसेना) 
कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार : 10 
271 चंदगड - शिवराज पाटील (अपक्ष) 
272 राधानगरी - आनंदराव आबिटकर (शिवसेना) 
273 कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) 
274 कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक (भाजप) 
275 करवीर - चंद्रदीप नरके (शिवसेना) 
276 कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिवसेना) 
277 शाहूवाडी - विनय कोरे (जन सुराज्य शक्ती) 
278 हातकणंगले - अशोक माने (जनसुराज्य शक्ती) 
279 इचलकरंजी - राहुल आवडे (भाजप) 
280 शिरोळ - राजेंद्र यड्रावकर (राजर्षी शाहू विकास आघाडी)  
सांगली जिल्ह्यातील आमदार : 08 
281 मिरज - सुरेश खाडे (भाजप) 
282 सांगली - सुधीर गाडगीळ (भाजप) 
283 इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
284 शिराळा - सत्यजित देशमुख (भाजप) 
285 पलूस कडेगाव - विश्वजित कदम (काँग्रेस) 
286 खानापूर - सुहास बाबर (शिवसेना) 
287 तासगाव – कवटे महांकाळ रोहित पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
288 जत - गोपीचंद पडळकर (भाजप) 


‘प्राब’या संस्थेच्या ‘एक्सिट पोल’मधील मतदारांचा कल जाणण्यात   

प्राब’ या संस्थेचा ‘एक्सिट पोल’ मध्ये महायुती 151 तर महाविकास आघाडी 121


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.