Saturday, 15 January 2022

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडिसीसी) अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे बिनविरोध

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे बिनविरोध

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडिसीसी) अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे (पुरंदर) तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे (मुळशी) यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक बँकेच्या सभागृहात शनिवारी दुपारी एक वाजता झाली. त्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दुर्गाडे आणि चांदेरे यांचा एकमेव अर्ज आला, त्यामुळे पदाधिका-यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झालेले प्रा. दुर्गाडे यांनी बँकेवर अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. बँकेच्या पूर्वीच्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांची निवड अपेक्षित मानली जात होती. दिगंबर दुर्गाडे यांनी 'ड' वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांना पराभूत केले आहे. फराटे यांना अनुभवी दुर्गाडे यांच्याकडून तब्बल ६८४ मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे. तर चांदोरे यांनी मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे  यांना धक्का देत विजय मिळवला आहे. चांदोरे यांना २८ मत मिळाली होती, तर कलाटे यांना १७ मत मिळाली होती. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करूनही त्याच्या निवडीवर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे. तर चांदेरे यांची निवड करून तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, संचालकांच्या पहिल्या बैठकीस बँकेचे संचालक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यासह संचालक उपस्थित होते. जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, काँग्रेसचे २ आणि भाजपचे २ मिळून एकूण २१ संचालकांचे पक्षीय बलाबल आहे. पुणे जिल्हा बॅंकेच्या २०२१-२०२६ या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी २ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक झाली होती. ४ जानेवारीला मतमोजणी होऊन, निकाल जाहीर करण्यात आले. संचालक मंडळाच्या २१ पैकी १६ जागा जिंकत, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा बॅंकेवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Monday, 3 January 2022

PDCC Bank Election: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आत्माराम कलाटे, प्रकाश म्हस्के, सुरेश घुले यांचा पराभव; प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीला धक्का

 PDCC Bank Election: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आत्माराम कलाटे, प्रकाश म्हस्के, सुरेश घुले यांचा पराभव; प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीला धक्का

राष्ट्रवादीचे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचा 684 मतांनी विजय

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार (शिरुर), सुनील चांदेरे (मुळशी) आणि अपक्ष विकास दांगट (हवेली), प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी यश मिळवले आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे. राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचा 684 मतांनी विजय मिळवला आहे. 'ड' वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक  प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्याविरुद्ध शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी निवडणुकीत भाग घेतला होता. मात्र त्यांना प्रा. दुर्गाडे यांच्याकडून तब्बल ६८४ मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे. हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास नाना दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत विकास नाना दांगट यांनी विजय मिळवला आहे. म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दांगट यांना ७३ तर, प्रकाश अप्पा म्हस्के यांना ५८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला आहे. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याच आवाहन केले होते. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी सात जागांची मतमोजणी आज होत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार (शिरुर), सुनील चांदेरे (मुळशी) आणि अपक्ष विकास दांगट (हवेली) यांनी यश मिळवले आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे. हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास नाना दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत विकास नाना दांगट यांनी विजय मिळवला आहे. म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दांगट यांना ७३ तर, प्रकाश अप्पा म्हस्के यांना ५८ मते मिळाली आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या, तर 7 जागासाठी आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मुळशी तालुका मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे 28 मते घेत विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी कलाटे यांना 17 मते मिळाली.  हवेलीमधून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्केंना पराभवाची धूळ चारत विकास दांगट विजयी झाले आहेत. तब्बल २० वर्ष संचालक असलेल्या म्हस्के यांचा १3 मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केली होती. जो निवडून येईल तो उमेदवार आपला हे सूत्र राष्ट्रवादीने याठिकाणी लागू केले होते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील गट निहाय मतदारसंख्या-

अ वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 1305 जागा-13
1.आंबेगाव अ.क्र. 1 ते 59 (मतदारसंख्या-59)
2.बारामती अ.क्र. 59 ते 254 (मतदारसंख्या-171)
3.भोर- अ.क्र. 255 ते ३२९ (मतदारसंख्या-74)
4.दौंड- अ.क्र. ३३० ते ४४५ (मतदारसंख्या-115)
5.हवेली- अ.क्र. 456 ते ५८८ (मतदारसंख्या-132)
6.इंदापूर- अ.क्र. ५८९ ते ७७३ (मतदारसंख्या-184)
7.जुन्नर- अ.क्र. ७७४ ते ८५० (मतदारसंख्या-76)
8.खेड- अ.क्र. ८५१ ते ९५३ (मतदारसंख्या-102)
9.मावळ- अ.क्र. ९५४ ते १००८ (मतदारसंख्या-54)
10.मुळशी- अ.क्र. १००९ ते 1054 (मतदारसंख्या-45)
11.पुरंदर- अ.क्र. १०५५ ते ११४९ (मतदारसंख्या-94)
12.शिरूर- अ.क्र. ११५० ते १२८१ (मतदारसंख्या-131)
13.वेल्हा- अ.क्र. १२८२ ते १३०५  (मतदारसंख्या-23)
ब वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १३०६ ते १४१२)- 106
क वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १४१३ ते ३०१९) - 1606
ड वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 3985
ड वर्ग व्यक्ती सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. 1 ते १६६५) - 1665
एकूण 7005 + 1665 = 8670  मतदार आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुक सन २०२०-२०२५ अंतिम मतदार यादी-

मतदार संघ - 'अ ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ब ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'क ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - व्यक्ती सभासद यादी

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================