PDCC Bank Election: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आत्माराम कलाटे, प्रकाश म्हस्के, सुरेश घुले यांचा पराभव; प्रदीप कंद विजयी, राष्ट्रवादीला धक्का
राष्ट्रवादीचे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचा 684 मतांनी विजय
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार (शिरुर), सुनील चांदेरे (मुळशी) आणि अपक्ष विकास दांगट (हवेली), प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी यश मिळवले आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे. राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचा 684 मतांनी विजय मिळवला आहे. 'ड' वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्याविरुद्ध शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी निवडणुकीत भाग घेतला होता. मात्र त्यांना प्रा. दुर्गाडे यांच्याकडून तब्बल ६८४ मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे. हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास नाना दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत विकास नाना दांगट यांनी विजय मिळवला आहे. म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दांगट यांना ७३ तर, प्रकाश अप्पा म्हस्के यांना ५८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला आहे. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याच आवाहन केले होते. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी सात जागांची मतमोजणी आज होत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार (शिरुर), सुनील चांदेरे (मुळशी) आणि अपक्ष विकास दांगट (हवेली) यांनी यश मिळवले आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे. हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास नाना दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत विकास नाना दांगट यांनी विजय मिळवला आहे. म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दांगट यांना ७३ तर, प्रकाश अप्पा म्हस्के यांना ५८ मते मिळाली आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या, तर 7 जागासाठी आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मुळशी तालुका मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे 28 मते घेत विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी कलाटे यांना 17 मते मिळाली. हवेलीमधून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्केंना पराभवाची धूळ चारत विकास दांगट विजयी झाले आहेत. तब्बल २० वर्ष संचालक असलेल्या म्हस्के यांचा १3 मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केली होती. जो निवडून येईल तो उमेदवार आपला हे सूत्र राष्ट्रवादीने याठिकाणी लागू केले होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील गट निहाय मतदारसंख्या-
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुक सन २०२०-२०२५ अंतिम मतदार यादी-
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.