पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे बिनविरोध
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडिसीसी) अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे (पुरंदर) तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे (मुळशी) यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक बँकेच्या सभागृहात शनिवारी दुपारी एक वाजता झाली. त्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दुर्गाडे आणि चांदेरे यांचा एकमेव अर्ज आला, त्यामुळे पदाधिका-यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झालेले प्रा. दुर्गाडे यांनी बँकेवर अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. बँकेच्या पूर्वीच्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांची निवड अपेक्षित मानली जात होती. दिगंबर दुर्गाडे यांनी 'ड' वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांना पराभूत केले आहे. फराटे यांना अनुभवी दुर्गाडे यांच्याकडून तब्बल ६८४ मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे. तर चांदोरे यांनी मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत विजय मिळवला आहे. चांदोरे यांना २८ मत मिळाली होती, तर कलाटे यांना १७ मत मिळाली होती. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करूनही त्याच्या निवडीवर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे. तर चांदेरे यांची निवड करून तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, संचालकांच्या पहिल्या बैठकीस बँकेचे संचालक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यासह संचालक उपस्थित होते. जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, काँग्रेसचे २ आणि भाजपचे २ मिळून एकूण २१ संचालकांचे पक्षीय बलाबल आहे. पुणे जिल्हा बॅंकेच्या २०२१-२०२६ या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी २ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक झाली होती. ४ जानेवारीला मतमोजणी होऊन, निकाल जाहीर करण्यात आले. संचालक मंडळाच्या २१ पैकी १६ जागा जिंकत, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा बॅंकेवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.