Wednesday 2 February 2022

पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक - 2022; प्रारूप प्रभाग रचना जाहीर

पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक - 2022; प्रारूप प्रभाग रचना जाहीर

पुणे महापालिका निवडणुकीसाठीचा अधिकृत प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आला. आराखडय़ानुसार निवडणुकीसाठी एकूण ५८ प्रभाग निश्चित करण्यात आले असून त्यापैकी बाणेर-सूस (प्रभाग क्रमांक १३) हा एकमेव प्रभाग द्वीसदस्यीय पद्धतीचा ( दोन नगरसेवकांचा एक प्रभाग) असेल. उर्वरित ५७ प्रभाग त्रिसदस्यीय (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) पद्धतीचे आहेत. दरम्यान, प्रारूप प्रभाग रचना आराखडय़ावर हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येतील. सन २०११ च्या जनगणेनुसार प्रभागांची रचना करण्यात आली आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने येरवडा (प्रभाग क्रमांक ९) सर्वात मोठा तर धानोरी-विश्रांतवाडी (प्रभाग क्रमांक १) हा सर्वात लहान प्रभाग ठरला आहे. धानोरी-विश्रांतवाडी प्रभागातील दोन जागा अनुसूचित जातीसाठी तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. बाणेर-सूस या दोन गावांचा स्वतंत्र प्रभाग करण्यात आला आहे.  महापालिका हद्दीत गावांचा समावेश झाल्याने या समाविष्ट गावांचे प्रभागही करण्यात आले आहेत.महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली. तेथील १.५० लाख लोकसंख्येच्या आधारावर दोन नगरसेवकांचा समावेश महापालिकेत झाला. तर जून २०२१ मध्ये २३ गावे महापालिकेत समाविष्ट झाली असता तेथील लोकसंख्या १. ९० लाख असल्याने आणखी दोन नगरसेवकांची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाली. राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी निर्णय घेतल्याने पुण्यातील नगरसेवक संख्या १६४ वरून १७३ इतकी झाली. आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत लोहगाव-विमाननगर, वाघोली इआॅन पार्क, बाणेर सुस म्हाळुंगे , मांजरी शेवाळवाडी, साडेसतरानळी-आकाशवाणी, हडपसर- सातववाडी, वारजे कोंढवे धावडे, रामनगर- उत्तमनगर शिवणे, फुरसुंगी, मोहम्मदवाडी-उरुळी देवाची, नांदेड सिटी सनसिटी, खडकवासला नऱ्हे, धायरी आंबेगाव गावांचा समावेश आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने १३ प्रभागातून ३९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला समाविष्ट गावांचा समावेश असलेल्या प्रभागांवर भर द्यावा लागणार आहे. ओबीसी आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडत काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे शहरात १७३ जागापैकी २३ जागा अनुसूचित जाती, तर २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत असतील. तर महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने ८७ जागा महिला लढवणार आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी १२ व अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी १ जागा आरक्षीत आहे. तीनचा प्रभाग असल्याने आरक्षणे पडताना काही प्रभागात दोन महिला व एक पुरुष उमेदवार अशी स्थिती असणार आहे. त्यातही पुरुषांच्या जागेवर एसटी किंवा एसटीचे आरक्षण पडल्यास खुल्या गटातील इच्छुकाला दुसरा प्रभाग शोधण्याची नामुष्की येणार आहे. तर काहींना आपल्या पतीला किंवा पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात आणावे लागणार आहे. दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा निकाली निघाल्यास त्याचा मोठा परिणाम निवडणुकीवर व प्रभागांच्या रचनेवर होणार आहे.

पुणे महापालिका निवडणूक 2022 प्रारूप प्रभाग रचना खालीलप्रमाणे

प्रभाग क्र. व प्रभागाचे नाव

लोकसंख्या

समाविष्ट भाग

1. धानोरी विश्रांतवाडी

५५४८८

शांतिकुंज व्हिला, सिद्धार्थनगर, माधवनगर, साईराम सोसायटी, कुसमाडे कॉलनी, धानोरी गावठाण, भीमनगर वसाहत, आरएनडीई कॉलनी, मुंजाबा वस्ती पार्ट, लोकप्रिय नगरी, ब्रह्मा स्काय सिटी इ.

2. टिंगरेनगरसंजय पार्क

५६९६९

येरवडा कारागृह, कस्तुरबा हौ. सोसायटी, सिद्धेश्‍वर नगर सोसायटी, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, विद्यानगर, विमानतळ, कोनार्क कॅम्पस, देवकर वस्ती, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, ज्योतीजीवन हॉस्पिटल इ.

3. लोहगाव - विमान नगर

६१८३६

लोहगाव, खेसे पार्क, वायुसेनानगर, लोहगाव बसस्टॉप, माथाडे वस्ती, निंबाळकरनगर, खंडोबा माळ, मंत्री पार्क, वडगाव-शिंदे रोड, संतनगर, फिनिक्स मॉल, साकोरे नगर पार्ट, तुळजाभवानीनगर इ.

4. वाघोली इऑन आयटी पार्क

५८९१२

चंदननगर, खुलेवाडी, हडपसर बायपास बसथांबा, पठारे-ठुबेनगर-खराडी, अशोकनगर, कवडेवस्ती, वाघेश्‍वर मंदिरालगत, भैरवनाथ तलाव, भारतीय जैन वसतिगृह, त्रिमूर्ती विहार, विट्ठलवाडी इ.

5. खराडी चंदननगर

६७३६७

सोमनाथनगर, वडगाव शेरी, तुकारामनगर, साईनाथनगर, राघोबा पाटीलनगर, गिरिधर ओएसिस सोसायटी, थिटेनगर, चंदननगर, झेन्सॉर टेक्नॉलॉजी परिसर, खराडी गाव, सुनीतानगर, यशवंतनगर इ.

6. वडगावशेरी

६०११०

पंतनगर, न्यू कल्याणीनगर, नूरानी कब्रस्तान, रविवाज एरियाना, सत्यम शिवम सोसायटी, वृंदावननगर, रामवाडी, कारगिल विजयनगर सोसायटी, सैनिकवाडी, कल्याणीनगर पार्ट, प्रसादनगर इ.

7. कल्याणीनगर नागपूर चाळ

६७७३९

कल्याणीनगर, आगाखान पॅलेस, पंचशील वॉटर फ्रंट, सलीम अली पक्षी अभयारण्य, जनतानगर, नवी खडकी, शास्त्रीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, संजय पार्क, एअरफोर्स एरिया, त्रिदलनगर सोसायटी इ.

8. कळस फुलेनगर

६२२७३

कळस, फुलेनगर, गंगा कुंज सोसायटी, विशाल परिसर, धापटे चाळ, लक्ष्मी टाऊनशिप, मधुबन सोसायटी, येरवडा महिला कारागृह, प्रतीकनगर, भीमाशंकर सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी इ.

9. येरवडा

७१३९०

अण्णा भाऊ साठे रंगमंदिर, मदर टेरेसानगर, जनतानगर, येरवडा भाजी मार्केट, सुरक्षानगर, डेक्कन कॉलेज, रामनगर, केंद्रीय विद्यालय, बी.ई.जी., धारीवाल व्हिला, संगमवाडी मोझे पार्किंग, लहुजी साळवे समाधी इ.

10. शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी

६२४८१

शिवाजीनगर, गावठाण, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, कामगार पुतळा, तोफखाना, श्रीनाथ प्लाझा, कोहिनूर इस्टेट, साखर संकुल, मुळा रोड, पुणे म.न.पा. भवन, कमलनयन बजाज उद्याल, मॉडेल कॉलनी पार्ट इ.

11. बोपोडी पुणे विद्यापीठ

५७८६१

बोपोडी गावठाण, प्रगतीनगर, चेतक सोसायटी, नाईक चाळ, भोसलेनगर, पुणे विद्यापीठ, कर्मवीर सोसायटी, मिथिलानगरी, भीमज्योतनगर, यशवंत सोसायटी, मॉडेल कॉलनी, लक्ष्मीनगर सोसायटी इ.

12. औंध बालेवाडी

६२०५०

औंध, बालेवाडी, विजडम पार्क, प्रायमाडोमस बिल्डिंग, गगन क्लोरा, मिटकॉन स्कूल, लक्ष्मणनगर, चाकणकर मळा, औंधगाव, सिंध सोसायटी, साधू वासवाणीनगर, सकाळनगर, एनसीएल, आनंदपार्क इ.

13. बाणेर सुस म्हाळुंगे

३७५८९

सूस, नानपुडे वस्ती, वर्षा पार्क सोसायटी, अमर एटर्निटी, गणेश बाग, मुरकुटे वस्ती, सम्राट अशोक सोसायटी, युथिका अपार्टमेंट, मेट्रो जाझ, म्हाळुंगे ग्रामपंचायत, बालेवाडी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स इ.

14. पाषाण बावधन बुद्रुक

५८५१५

पाषाण, बावधन बुद्रुक, पद्मावती टेकडी, सुतारवाडी, शिवनगर, सोमेश्‍वरवाडी, नेकलेस गार्डन, भारत इलेक्ट्रॉन लिमिटेड, पाषाण लेक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, उत्सव होम्स, गंगा लिजंड इ.

15. पंचवटी गोखलेनगर

६७८२१

गोखलेनगर, पंचवटी, वेताळ टेकडी, जनवाडी, वैदुवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, शेती महामंडळ, भांबुर्डा वनविहार, चतु-शृंगी मंदिर, मॉडर्न कॉलेज, स्क्वेअर यार्ड, सेंट जोसेफ हायस्कूल, सीआयडी इ.

16. फर्ग्युसन कॉलेज एरंडवणे

६७१०३

डेक्कन जिमखाना, वकीलनगर, कर्वेनगर, स्वप्नशिल्प सोसायटी, अनुरेखा सोसायटी, नवसह्याद्री सोसायटी, भांडारकर इन्स्टिट्यूट विधी महाविद्यालय, हनुमान टेकडी, संभाजी उद्यान, कमला नेहरू उद्यान इ.

17. शनिवार पेठ राजेंद्रनगर

६७९५१

राजेंद्रनगर, नाना-नानी गार्डन, रमणबाग शाळा, सदाशिव पेठ, पेरूगेट, लोकमान्यनगर, हुजूरपागा शाळा, दगडूशेठ मंदिर, नाना वाडा, नारायण पेठ, नागनाथ पार, गांजवे चौक, गोकुळ सोसायटी इ.

18. शनिवार वाडा कसबा पेठ

६७७०१

लालमहल, कागदीपुरा, बुधवार पेठ, रविवार पेठ, रामेश्‍वर चौक, जुना बाजार वसाहत, पुणे सिटी पोस्ट ऑफिस, बोहरी आळी, नाना पेठ पार्ट, न्यू नाना पेठ, दारूवाला पूल, नाना पेठ फिश मार्केट, तांबोळी मशीद इ.

19. रास्तापेठ के.ई.एम. हॉस्पिटल

५८९९४

सोमवार पेठ, मंगळवार पेठ पार्ट, ससून हॉस्पिटल कॉर्टर्स, सोमवार पेठ पोलिस वसाहत, समर्थ पोलिस ठाणे, कमला नेहरू रुग्णालय, सहजानंदनगर, सिंचन भवन, बाबूराव सणस शाळा, साई पार्क, रास्ता पेठ पार्ट इ.

20. पुणे स्टेशन ताडीवाला रोड

६७१२९

बंडगार्डन, लुम्बिनीनगर, आरटीओ, ताडीवाला रोड, ससून हॉस्पिटल, जनरल पोस्ट ऑफिस, रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद विद्यालय, सेंट व्हिन्सेंट स्कूल, रूबी हॉल, आगरकरनगर, पूना क्लब, जिल्हाधिकारी कार्यालय इ.

21. मुंढवा घोरपडी

६७५७४

मुंढवा, कोरेगाव पार्क, पासपोर्ट सेवा केंद्र, जाधवनगर, राहुल सोसायटी, कवडेवाडी, वाडिया कॉलेज, जहांगीर हॉस्पिटल, कॅनॉट प्लेस, भैरोबा पंपिंग स्टेशन, सिटाडेल सोसायटी, मदर टेरेसा पार्क, श्रीनाथनगर इ.

22. मांजरी शेवाळवाडी

६१८७८

मांजरी, केशवनगर, लोणकरनगर, गोडबोले वस्ती, श्रीकृष्ण सोसायटी, शरदनगर, गोदरेज सोसायटी, मुंढवा जॅकवेल, इंद्रप्रस्थ लॉन्स, साईनाथ कॉलनी, रिव्हर पार्क सोसायटी, कामठे मळा, हरपळे लॉॉन्स इ.

23. साडेसतरानळी आकाशवाणी

५५६५९

साडेसतरानळी, कोदरेनगर, तुपणी वस्ती, सुकून व्हिलेज, सिरम इन्स्टिट्यूट हेलिपॅड, सुभाषनगर, महादेवनगर, लक्ष्मी पार्क कॉलनी, केशवनगर, कल्पतरू सेरेनिटी, मांजरी ग्रामपंचायत, हडपसर, मगरपट्टा पार्ट इ.

24. मगरपट्टासाधना विद्यालय

५६४४६

मगरपट्टा, मुंढवा इंडस्ट्रियल एरिया, भोसलेनगर, शिंदेवस्ती, भगीरथीनगर, सिझन मॉल, सोमनाथनगर, सायबर सिटी, टिळेकर वस्ती, सुभाषनगर, पवार एन्क्लेव्ह सोसायटी, एंथम सोसायटी इ.

25. हडपसर गावठाण सातववाडी

५५७८२

हडपसर गावठाण, गाडीतळ, गोंधळेनगर, बनकर हायस्कूल, सातववाडी, उत्कर्षनगर, नवनाथ कॉलनी, ससाणेनगर, मनपा प्रभाग कार्यालय, गंगा रेसिडेन्सी, रामोशी आळी, सावित्रीबाई फुले क्रीडांगण इ.

26. भीमनगर रामटेकडी

६७७२१

भीमनगर, वैदुवाडी, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, शिवरकर उद्यान, फातिमानगर, जांभुळकर मळा, कवडे मळा, घोरपडी, गणेशनगर, दळवीनगर, सूर्यलोकनगरी हडपसर, विद्याभवन कॉलेज, एसआरपीएफ इ.

27. कासेवाडीहरकानगर

६८५०१

कासेवाडी, अग्रवाल कॉलनी, सदरबाजार, न्यू नाना पेठ, भवानी पेठ, ससाणेवाडा, पूरग्रस्त कॉलनी, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, गुरुनानकनगर, चित्रगुप्त कॉलनी, पीएमसी कॉलनी, अशोकनगर, कासेवाडी झोपटपट्टी इ.

28. महात्मा फुले स्मारक टिंबर मार्केट

५७४६३

टिंबर मार्केट, बापूसाहेब पाटोळे उद्यान, घोरपडी पेठ - स्वारगेट, गंजपेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई, रामेश्‍वर चौक, फडगेट पोलिस चौकी, कापडगंज रविवार पेठ, बोरा हॉस्पिटल, न्यू नाना पेठ, गणेश पेठ इ.

29. खडकमाळ आळी महात्मा फुले मंडई

६७५९२

खडकमाळ आळी, महात्मा फुले मंडई, संत मदर टेरेसा चर्च, मामलेदार कचेरी, राजा दिनकर केळकर संग्रहालय, घोरपडे उद्यान, सुभाषनगर, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, गंज पेठ इ.

30. जयभवानी नगर केळेवाडी

६०२३७

एआरएआय हिल, वेताळ टेकडी, रामबाग कॉलनी, एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, एफटीआयआय, रेसिडेन्शियल कॉलनी, हनुमाननगर इ.

31. कोथरूड गावठाण शिवतीर्थ नगर

६१११५

आझादनगर, गणेशकृपा सोसा., शिवतीर्थनगर, म्हातोबानगर, शिक्षकनगर, लोकमान्य कॉलनी, माधवबाग सोसा., अलकापुरी सोसा., शास्त्रीनगर, मौर्य विहार, गणेशनगर इ.

32. भुसारी कॉलनी सुतारदरा

६७१२७

दत्तनगर, सुतारदरानगर, मातोबानगर, पं. भीमसेन जोशी उद्यान, डावी भुसारी कॉलनी, वेदविहार सोसा. नं. २, जिजाईनगर, महात्मा सोसा., वृंदावन सोसा., इंदिरा शंकरनगरी, नवभूमी इ.

33. बावधन खुर्द महात्मा सोसायटी

६६२१६

विज्ञाननगर, चांदणीनगर, आदित्य शगुन सोसा., ग्लोरिया अपार्ट., जेएसपीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कमिन्स इंडिया लि., अलंकार सोसा., एसएम टॉवर, रोहन मधुबन इ.

34. वारजे कोंढवे धावडे

६४९१९

अतुलनगर, खडकवासला, आदित्य गार्डन सिटी, न्यू कोपरे, रेणुकानगर, माई मंगेशकर रुग्णालय, वारजे पार्क, सिद्धिविनायक कॉलनी, भैरवनाथनगर, नक्षत्र सोसा., शिवणे इ.

35. रामनगर उत्तमनगर शिवणे

६७४२२

राजयोग सोसा., श्रीराम सोसा., चैतन्यनगरी, राजहंस कॉलनी, हिंगणे होम कॉलनी, नादब्रह्म सोसा., इंदिरा कॉलनी, क्षितिजा रेसिडेन्सी, देशमुखनगर, साईगणेश रेसिडेन्सी इ.

36. कर्वेनगर

६७२६०

स्टेट बँकनगर, हिंगणे होम कॉलनी, इंगळेनगर, कमिन्स कॉलेज, अमृतकलश सोसा., चंद्रलोकनगरी, डहाणूकर कॉलनी, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, हिंगणे बु।।, आनंदनगर इ.

37. जनता वसाहत दत्तवाडी

६७३३२

रक्षालेखा सोसा., गणेशमळा, पु. ल. देशपांडे उद्यान, लडकतवाडी, जयभवानीनगर, चंद्रनील सोसा., दांडेकर पूल वसाहत, सीताबाग कॉलनी, गुरूकुल सोसा., सरितानगरी इ.

38. शिवदर्शन - पद्मावती

६६५६१

सारसबाग, स्वारगेट बसस्टँड, नेहरू स्टेडियम, पर्वतीगाव, एलआयसी कॉलनी, सहकारनगर, पद्मावती, अरण्येश्‍वर, कामगार कल्याण भवन, वीर बाजीप्रभू सोसा. इ.

39. मार्केटयार्ड महर्षी नगर

५९५८०

महर्षिनगर, डीएसके, चंद्रदीप, पीएमव्ही कॉलनी, स्वारगेट एसटी स्टँड, आयकर कार्यालय, मुकुंदनगर, गुलटेकडी, इंदिरानगर, ऋतुराज सोसा., प्रेमनगर, हमालनगर इ.

40. गंगाधाम सॅलीसबरी पार्क

५९८८२

पी ॲन्ड टी कॉलनी, सिंहगड कॉलेज, मंत्री इस्टेट, रायसोनी रेसिडेन्सी, बिबवेवाडी, पितळेनगर, लुल्लानगर पार्ट., डिफेन्स कॉलनी, रम्यनगरी, पार्श्वनाथनगर, विद्यासागर कॉलनी इ.

41. कोंढवा खुर्द - मिठानगर

५५८२५

बाधननगर, मिठानगर, कोंढवा, विश्‍वकर्मा विद्यापीठ, राजगुरू रेसिडेन्सी, शांतिनगर, शांतिनगर हौ. सोसा., पद्मगुरू कॉलनी, कपिलनगर, यशोधन सोसा., निर्माणपुरम इ.

42. सय्यदनगरलुल्लानगर

५४०२६

रामटेकडी मंदिर, पठाणशाह बाबा दर्गा, रामटेकडी, सय्यदनगर, साई कॉलनी, महंमदवाडी, ज्ञानहिल सोसा., एनआयबीएम, कृष्णकेवलनगर, कुबेर पार्क, यश श्रीधम इ.

43. वानवडी कौसरबाग

५९४१४

एसआरपीएफ-२, रुबी हॉल, कुबेर गार्डन, मेपर टॉवर, महादजी शिंदे छत्री परिवार, वानवडी गाव, नेताजीनगर सोसा., कमेला वस्ती, कुबेरा गार्डन, साळुंखे विहार सोसा., केदारीनगर इ.

44. काळेपडळ ससाणेनगर

५५२८७

प्रफुल्ल कॉलनी, सय्यदनगर पार्क, वेताळनगर, ओम दिशा टॉऊनशिप, काळेबोराटेनगर, ओमकार कॉलनी, तुकाईनगर, भेकराईनगर, गुलमोहर कॉलनी, साईविहार, संतोषीमातानगर इ.

45. फुरसुंगी

५५९५७

तुकाईदर्शन, एसपी इन्फोसिटी, भेकराईनगर, गंगानगर, सातववाडी, आयटी पार्क, त्रिमूर्तीविहार, शिक्षक कॉलनी, ढमाळवाडी, पापडे वस्ती, सुरेशनगर, हरपळे पार्क इ.

46. मोहम्मदवाडी उरुळी देवाची

५६०४७

औताडेवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, वडकी, न्यू इंग्लिश स्कूल, वाडकर मळा, कोंढवा, डॉ. आंबेडकरनगर, उंड्री, वॉटर रिज सोसा., पाटीलनगर दंगार वस्ती, देवाची उरुळी इ.

47. कोंढवा बुद्रुक येवलेवाडी

५५६६२

मिठानगर, महिन पॅरेडाइज, वेताळनगर, अशोक म्युज., मदनी मशीद, नूर मशीद, गौतम बुद्ध सोसा., पिसोळी, बालाजी पद्मावतीनगर, एआरव्ही न्यू टाऊन, विद्या शिल्प पब्लिक स्कूल इ.

48. अप्पर सुपर इंदिरानगर

५६८८४

रम्यनगरी, विघ्नहर्ता रुग्णालय, महेश सोसा., बिबवेवाडी, विद्यानिकेतन, गंगाधाम, साईबाबानगर, राजीव गांधीनगर, कोंढवा बु।। पार्क, त्रिमूर्ती प्रसन्न सोसा., चिंतामणीनगर इं.

49. बालाजीनगरके के मार्केट

५८०२७

महर्षिनगर, वसंतबाग सोसा., लीला चेंबर्स, कांचनगंगा सोसा., पद्मावतीनगर, बिबवेवाडी पार्ट, मांगवाडी, लोअर इंदिरानगर, बालाजीनगर, विवेकनगर, कात्रज पार्ट इ.

50. सहकारनगरतळजाई

६२३९८

लक्ष्मीनगर, पर्वती पायथा, तुळशीबागवाले कॉलनी, सहजीवन सोसा., चिंतामणीनगर, महात्मा गांधी सोसा., धनकवडी पार्ट, पंचवटी सोसा., तळजाई पठार, मेघदूत सोसा. इ.

51. वडगाव पाचगाव पर्वती

६७२८९

सिंहगड कॉलेज, आनंदविहार, तळजाई टेकडी पार्ट, हिंगणे खुर्द, अरविंद सोसा., महालक्ष्मी सोसा., सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, आनंदनगर, महादेवनगर, घुलेनगर, गोसावी मळा इ.

52. नांदेडसिटी सनसिटी

६६६२६

सरितावैभव सोसा., दत्तवाडी, क्यूएसटी सुविधा सेंटर, नानानानी पार्क, आनंदनगर, नऱ्हे, नांदेड फाटा, पूर्वासृष्टी, वडगाव खुर्द, सावित्रीबाई पार्क, रोहन कृतिका, कांचन हाइट्‌स इ.

53. खडकवासला -नऱ्हे

६३५२५

किरकटवाडी, नांदेड गावठाण, मानाजीनगर पार्ट, ग्रीनलँड कौंटी, आदित्य संस्कृती, आसावरी सोसा., सीडब्ल्यूपीआरएस, डीएसके मेघमल्हार सोसा., सणस विद्यालय, मधुवंती सोसा. इ.

54. धायरी आंबेगाव

५८४४७

डीएसके विश्‍व पार्ट, बेनकरनगर, मोकरवाडी, नऱ्हे, आंबेगाव बुद्रुक पार्ट, भूमकरनगर, विंडसर कौंटी, महादेवनगर, शंकर महाराज मठ, तुकारामनगर, स्वामी नारायण मंदिर इ.

55. धनकवडी आंबेगाव पठार

५७७१९

नवले मेडिकल कॉलेज, वृंदावन सृष्टी सोसा., कृष्णकुणाल रेसिडेन्सी, खेडेकरनगर, सनयुनिव्हर्स सोसा., सिंहगड कॉलेज, शांतियोग सोसा., दत्तनगर, कुदळे बाग इ.

56. चैतन्यनगरभारती विद्यापीठ

५६३२७

धनकवडी, ऊर्मिला सोसा., श्रीयश सोसा., कात्रज पार्ट, चंद्रभागानगर, कुंदननगर, गुलाबनगर, कलानगर, अक्षयनगर, नारायणी धाम, राजमुद्रा सोसा., कात्रज डेअरी, आदिशक्ती सोसा. इ.

57. सुखसागर नगर राजीव गांधी नगर

५५९७१

ग्रीनएकर रेसिडेन्सी, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, ओम अलंकार सोसा., मनमोहन पार्श्वनाथ सोसा., शांतिनिवास, स्वामी विवेकानंद विद्यालय, साईनगर, कात्रज पार्ट, वाघजाई मंदिर इ.

58. कात्रज गोकुळनगर

५७८४७

आंबेगाव बुद्रुक, साई कॉलनी, संतोषनगर, मांगडेवाडी, खिलारेवाडी, भिलारेवाडी, येवलेवाडी पार्ट, चैतन्यशिला आश्रम परिसर, खोपडेनगर, कात्रजनगर, शिवशंभोनगर, कात्रज वसाहत इ.

एकूण -58

3556824

 

 

महापालिकेच्या हद्दीती लोकसंख्या

3556824

नगरसेवकांची संख्या : १७३

173

प्रभागांची संख्या

58

तीन सदस्यीय प्रभाग

57

दोन सदस्यीय प्रभाग

1

अनुसूचित जाती

23

अनुसूचित जमाती

2

ओबीसी आरक्षण

47

ओबीसी महिला आरक्षण

24

सर्वसाधारण (अराखीव)

51


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

   




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.