सरपंचपदासह दहिटणेवाडी ग्रामपंचायतीवर मोहन सुरवसे पॅनेलचा ताबा
अक्कलकोट- नामांकित लस निर्मिती करणाऱ्या सिरम कंपनीत गेली अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या श्री मोहन सुरवसे यांनी नोकरी सांभाळून मिळालेल्या सुट्टीच्या कालावधीत कार्यमग्न राहून मूळ गावचा विकास करण्याचा ध्यास घेतला. त्यांनी थेट ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि कार्याच्या जोरावर सरपंचपदासह दहिटणेवाडी ग्रामपंचायतीवर त्यांच्या पॅनेलनी ताबा मिळवला. सहकारी रोहित जाधव यांच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅनल उभे केले. त्यांनी प्रतिस्पर्धी बलभीम माने यांचे पॅनलला पराभूत केले. या ठिकाणी सात पैकी चार जागा जिंकत रोहित जाधव यांच्या पॅनलने सरपंच पदावर कब्जा मिळविला तर विरोधी माने गटाला दोन जागा मिळाल्या. यामध्ये सिरम कंपनीचे श्री मोहन सुरवसे यांना 154 मते मिळाली. तर जनतेतून थेट सरपंच पदाच्या झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदी स्वाती रोहित जाधव यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 8 मतांनी रुक्मिणी बलभीम माने यांचा पराभव केला. त्यांना एकूण 294 मते मिळाली. श्री मोहन सुरवसे यांच्या विजयाने सिरम कंपनीतील कामगारांनी जल्लोष व्यक्त केला आहे. आपल्यातील सहकारयाने निवडणुकीत विजय संपादन केल्याने त्यांच्यावर कंपनीतील कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. दहिटणेवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत स्वाती जाधव (सरपंच), मोहन सुरवसे, आरती सुरवसे, नागिणी शिंदे, शिवलिंगप्पा व्हनचेंजे, छबुबाई जाधव, गंगाराम कदम, नागाबाई व्हनचेंजे यांनी विजय मिळवला आहे. दहिटणेवाडी ग्रामपंचायतींसाठी 668 मतदारांपैकी 583 मतदारांनी मतदानात सहभाग नोंदवला या ठिकाणी 87 टक्के इतके मतदान झाले होते.सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव 27 जानेवारी 2021 रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली होती त्यामध्ये दहिटणेवाडीचे सरपंच पद सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाले होते. राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा जनतेतून थेट सरपंच पदाच्या निवडीचा निर्णय घेण्यात आल्याने पूर्वीचे आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात येईल असा कयास व्यक्त केला जात होता मात्र आरक्षण सोडत कायम ठेवून निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत जनतेतून थेट सरपंच पदाच्या झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदी स्वाती रोहित जाधव यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 8 मतांनी पराभव करून त्यांनी 294 मते प्राप्त केली. तर वार्ड क्र. १अ- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी सुरवसे आरती संतोष यांना एकूण 181 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 48 मतांनी मात केली. तसेच वार्ड क्र. १अ- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी शिंदे नागिनी केदारनाथ यांना एकूण १७२ मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ३९ मतांनी मात केली. वार्ड क्र. 1ब- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी सुरवसे मोहन परमेश्वर यांना एकूण 154 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 21 मतांनी मात केली. वार्ड क्र. 2अ- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी वांछनजे शिवलिंगप्पा नागप्पा यांना एकूण 103 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 36 मतांनी मात केली. वार्ड क्र. 2ब- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी जाधव छबुबाई दगडू यांना एकूण 100 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 33 मतांनी मात केली. वार्ड क्र. 3अ- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी वांचनजे नागबाई शिवलिंगप्पा यांना एकूण 107 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 66 मतांनी मात केली.वार्ड क्र. 3ब- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी कदम गंगाराम बाबू यांना एकूण 83 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 42 मतांनी मात केली.
सोलापुर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते त्याचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. थेट जनतेतून सरपंचपदासाठी १०६८, तर ग्रामपंचायत सदस्यांसाठी ५८७९ अर्ज दाखले झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींमधील ६४६ वॉर्डांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे झेडपी, पंचायत समिती निवडणुकीची लिट्मस टेस्ट समजली जात आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या दाव्यानुसार या निवडणुकीत भाजप - 75, शिंदे गट - 26, राष्ट्रवादी - 41, काँग्रेस - 12, ठाकरे गट - 12, इतर - 23 (एकूण 189) असे निकालाचे पक्षीय बलाबल आहे. अक्कलकोट तालुक्यात २० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये बहुतांश ठिकाणी परिवर्तन झाले आहे. या निवडणुकीत २० पैकी बारा गावात नवे कारभारी आले असून पाच गावात मात्र पुन्हा सत्ताधार्यांच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. या निवडणुकीत ७९.३० टक्के मतदान झाले होते.