प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांच्या पुढाकाराने विकासकामांना प्राधान्य, आदर्श गाव करण्याचा संकल्प
पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक गाव वाल्हे आणि पंचक्रोशीतील पाच वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या आडाचीवाडी व सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून राजकीय मतभेद विसरून विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांच्या पुढाकाराने आदर्श गाव करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. राजकीय मतभेद विसरून सामाजिक सलोखा राखण्यासाठी तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यात त्यांना यश आले आहे. वाल्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अतुल गायकवाड यांची तर आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णाताई बजरंग पवार आणि सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदेश पवार यांची बिनविरोध निवड झालेली आहे. या तिन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सदस्यांच्या देखील निवडी बिनविरोध झालेल्या असून नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांवर समस्त वाल्हे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ९ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी १ उमेदवारी अर्ज आल्याने उमेदवारी अर्ज माघार घेण्यापूर्वीच एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मान पटकावला होता. तर सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी २० अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले होते आणि वाल्हे ग्रामपंचायतीच्या १३ सदस्याच्या जागांसाठी ३८ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले होते. खासदार व आमदार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांच्या पुढाकाराने पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत.
पुरंदर तालुक्यात 15 ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद व सदस्यांच्या पदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली होती त्याप्रमाणे 25 ऑक्टोबरला अर्ज माघार घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये बहुतांश जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यावर ग्रामस्थांनी भर दिला. गावातील नागरिकांत एकोपा निर्माण व्हावा, टिकावा तसेच निवडणुकीवर होणाऱ्या खर्चामध्ये बचत व्हावी या उद्देशाने पुरंदर-हवेली मतदार संघातील बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना महाविकास आघाडीतील घटक असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या खासदार व आमदार फंडातून बिनविरोध निवडणूक करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी जाहीर केले होते. त्यांच्या आवाहनाला बहुतांश गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या काळात मुदत संपलेल्या 68 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांवेळीही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून देण्याबाबत खासदार सुळे आणि आमदार जगताप यांनी आवाहन केले होते. त्यावेळी पुरंदर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींनी यास प्रतिसाद देत या निवडणूका बिनविरोध केल्या होत्या.
गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत बिनविरोध केली. भविष्यकाळात विकास कामांच्या माध्यमातून आडाचीवाडी आदर्श व्हावे गावाच्या विकासकामासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक विक्रम पवार, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, सूर्यकांत पवार, बजरंग पवार आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले. आडाचीवाडी प्रभागनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे : सरपंचपदासाठी सुवर्णा बजरंग पवार तर सदस्यपदासाठी शकुंतला महादेव पवार, सुजाता विजय पवार, विद्या मच्छिंद्र पवार, लता बाळासाहेब पवार, प्रतिभा राहुल पवार, विकास अशोक पवार, अलका दिलीप पवार, मोहन निवृत्ती पवार, ज्ञानदेव भाऊसाहेब पवार अशी नवनिर्वाचित सदस्यांची नावे आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक अर्जांची छाननी सोमवारी २३ ऑक्टोबरला झाली. बुधवारी २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात आले. ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या नाहीत त्या ग्रामपंचायतीसाठी मतदान रविवारी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर सोमवार ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पुरंदर तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या 15 ग्रामपंचायतीमध्ये वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, माळशिरस, वीर, गुळूंचे, एखतपूर-मुंजवडी, राजुरी, कर्नलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, कोथळे, रानमळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अन्य ग्रामपंचायतीसाठी पुढीलप्रमाणे नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते यामध्ये गुळुंचे ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्याच्या जागांसाठी ३९ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ८ उमेदवारी अर्ज आले होते., कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या सात सदस्याच्या जागांसाठी ३३ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले होते.,
वागदरवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी २० अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले होते, वनपुरी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी २६ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज आले होते, उदाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज आले होते, कोथळे ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ३१ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ९ उमेदवारी अर्ज आले होते, रानमळा ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी २१ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले होते, भोसलेवाडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले होते, वीर ग्रामपंचायतीच्या १५ सदस्याच्या जागांसाठी ६० अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ११ उमेदवारी अर्ज आले होते, माळशिरस ग्रामपंचायतीच्या ११ सदस्याच्या जागांसाठी ४७ अर्ज आले होतेव सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज आले होते, राजुरी व एखतपुर-मुंजवडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी २ उमेदवारी अर्ज आले होते.
पाच गावच्या प्रत्येकी एक सदस्यांसाठी पोट निवडणूक होणार आहे. नायगाव व पानवडी येथे १ अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. पांढे व राख येथे ३ अर्ज आले आहेत. सुपे खुर्द येथील एका जागेसाठी एक ही अर्ज आलेला नाही. १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावेळी सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार आहे. सरपंच पदासाठी तब्बल ७३ अर्ज आल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती मात्र बहुतांश जागांवर निवडणूक बिनविरोध झालेल्या आहेत.
एखतपूर मुंजवडीच्या पाच जागा बिनविरोध तर सरपंचपदासाठी शीतल किरण टिळेकर व लक्ष्मी काळूराम धिवार यांच्यामध्ये निवडणूक होणार असून सदस्यांसाठी प्रभाग एक कोमल किरण गद्रे, रेश्मा बिलाल मुलाणी, सागर अशोक कुंभार, प्रभाग दोन सुदर्शन दत्तात्रेय भामे, विद्या हनुमंत झुरंगे, यांची बिनविरोध निवड झाली.राजुरी ग्रामपंचायतमध्ये शीतल सचिन भगत, संतोष पांडुरंग भगत, दत्तात्रय शांताराम भगत, यांची बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर नायगावच्या असणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये बारीकराव नामदेव खेसे यांची तर पानवडीत प्रियंका गणेश भिसे, राख स्मिता दत्तात्रय रणवरे, बिनविरोध निवड झाली आहे. पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या माळशिरस ग्रामपंचायतीची निवडणूक दुरंगी पद्धतीने होणार आहे. वागदरवाडीच्या सरपंचपदासाठी निवडणूक जाहीर झाली असून प्रभाग दोन छकुली अजित बर्गे, प्रभाग तीन संतोष मानसिंग पवार, सुनिता सचिन पवार, दिपाली अतुल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. भोसलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये तीन जागा बिनविरोध झाले असून प्रभाग दोन अहिल्या लक्ष्मण लवांडे, प्रभाग तीन शिवाजी महादेव भोसले, शीतल यशवंत भोसले, या तीन जागा बिनविरोध झाल्या असून सरपंच पदासाठी दुरंगी लढत होत आहे. कोथळे : मीना राजेंद्र जगताप, समीर दत्तात्रेय भांडवलकर, नेहा वैभव झगडे.
ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सरपंच व सदस्य खालीलप्रमाणे -:
वाल्हे :-अतुल सोमनाथ गायकवाड. प्रभाग एक : तेजस बाळासो दुर्गाडे, मयुरी संदीप भुजबळ. प्रभाग दोन : समृद्धी सचिन लंबाते, अनिल राजाराम भुजबळ. प्रभाग तीन : अमित धनंजय पवार, पूर्वा राजेंद्र राऊत, कविता सतीश पवार. प्रभाग चार : सागर मदनराव भुजबळ, प्रमिला नवनाथ पवार, हरी प्रल्हाद दुबळे. प्रभाग पाच : शीतल दादा मदने, वैशाली दादासो पवार, अमोल शंकर पवार.
आडाचीवाडी :- सुवर्णा बजरंग पवार. प्रभाग एक : शकुंतला महादेव पवार, सुजाता विजय पवार, विद्या मच्छिंद्र पवार. प्रभाग दोन : लता बाळू पवार, प्रतिभा राहुल पवार, विकास अशोक पवार. प्रभाग तीन : अलका दिलीप पवार, मोहन निवृत्ती पवार, ज्ञानदेव भाऊसो पवार.
सुकलवाडी :- सरपंच : संदेश दिलीप पवार. प्रभाग एक : प्रतीक्षा भाऊसाहेब चव्हाण, योगेश मारुती पवार, उर्मिला दिलीप पवार. प्रभाग दोन : नितीन महादेव गावडे, हर्षदा नितीन पवार, वैजयंता दत्तात्रेय दाते. प्रभाग तीन : अमोल अरुण पवार, दत्तात्रेय लक्ष्मण पवार, अश्विनी कुंडलिक चव्हाण.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
============================= "महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-
पुस्तक किंमत-1000/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-750/-रु.
=============================
निवडणुकांसाठी उपयुक्त नवीन पुस्तक
‘महाराष्ट्रातील रणसंग्राम’
पुस्तक मिळविण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा-
==========================
"महाराष्ट्रातील राजकारण"