कॉंग्रेसच्या सर्वाधिक मतांची फाटाफूट
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकालावरून महायुतीनेच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. यात भाजपच्या पंकजा मुंडेसह महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचाही विजय झाला आहे. शेवटच्या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाचा पाठिंबा असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांच्यात दुसऱ्या फेरीत चुरस होती. पण अखेर मिलिंद नार्वेकरांनी जयंत पाटलांना पराभूत करत विजय मिळवला. या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने 1 उमेदवार जास्त दिल्याने चुरस वाढली होती. महायुतीकडे असणारी मते पाहता त्यांची 8 उमेदवार सहज जिंकून येणार होते. पण त्यांनी 9 वा उमेदवार दिल्याने या निवडणुकीतली लढत अटीतटीची ठरली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी प्रत्येकी 1 उमेदवार दिला होता. महाविकास आघाडीच्या एकूण मतांचा विचार करता त्यांचे तीनही उमेदवार सहज जिंकून येऊ शकले असते. पण या निवडणुकीत महायुतीने मविआला धक्का दिला. महायुतीने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन दिवसांपासून मोठी तयारी केली होती. तीनही पक्षांनी आपापले आमदार मुंबईतल्या वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवली होती. या हॉटेलमध्ये निवडणुकीच्या आधीच्या दिवशी प्रचंड खलबंत झाली. अखेर महायुतीच्या घटकपक्षांचे हे प्रयत्न यशस्वी ठरताना दिसले. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. चार वाजता एकूण 274 आमदारांचे मतदान पूर्ण झाले. यानंतर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन साधारण पावणेसहाच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, भाजपचे योगेश टिळेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी आघाडी घेतल्याचे दिसले. यावेळी भाजपच्या अमित गोरखे यांच्या मतपत्रिकेवर इंग्रजी आकडा चुकीच्या पद्धतीने लिहल्यामुळे हे वाद निर्माण झाला. तर आणखी एका मतपत्रिकेवर दोन उमेदवारांना पहिल्याच पसंतीचे मत दिल्याने हे मत बाद ठरवण्यात आले. काँग्रेसचे एकूण 37 आमदार आहेत. त्यापैकी 25 आमदारांनी पहिल्या पसंतीची मते प्रज्ञा सातव यांना दिली. म्हणजे काँग्रेसची पहिल्या पसंतीची 12 मते शिल्लक राहिली. मविआच्या नार्वेकरांना पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली. त्यात ठाकरे गटाची 15 मते आहेत. उर्वरित सात मते काँग्रेसची गृहीत धरली तरी पाच मतांचा प्रश्न राहतो. शेकापचे जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची 12 मते मिळाली. त्यापैकी 11 मते शरद पवार गटाची आहेत. त्यांचे एक मत फुटले तर शेकापचे 1 मत होते ते त्यांना अशी 12 मते पाटील यांना मिळाली होती मात्र दुसऱ्या पसंतीची अपेक्षित मते कॉंग्रेस व शिवसेनेकडून मिळाली नाहीत. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदारांचं संख्याबळ होते. विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महायुतीची मते मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट टाळली. शिवाजीराव गर्जे डेंजर झोन मध्ये असल्याची चर्चा झडली होती मात्र अतिशय सावध पावित्रा घेतल्याने यश मिळविण्यात राष्ट्रवादीला अडचण आलेली नाही.
भाजपचे विजयी उमेदवार –
1) पंकजा मुंडे – 26 मते2) परिणय फुके – 23 मते
3) सदाभाऊ खोत – 26 मते
4) अमित गोरखे – 23 मते
5) योगेश टिळेकर – 23 मते
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार
1) शिवाजीराव गर्जे – 23 मते2) राजेश विटेकर – 24 मते
शिवसेना विजयी उमेदवार
1) कृपाल तुमाने – 25 मते
2) भावना गवळी – 24 मते
काँग्रेसच्या विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव – 25 मतेशिवसेना ठाकरे गट विजयी उमेदवार
1) मिलिंद नार्वेकर –
शरद पवार गट पुरस्कृत पराभूत उमेदवार
1) जयंत पाटील (शेकाप) – 12 मतेकोणत्या पक्षाचे किती आमदार?
भाजप- 103काँग्रेस- 37
शिवसेना (ठाकरे)- 15
शिवसेना (शिंदे)- ३८
राष्ट्रवादी (अजित पवार)- 40
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- 12
छोट्या पक्षांचे किती आमदार आहेत?
बहुजन विकास आघाडी- 3
समाजवादी पक्ष- 2
एमआयएम-2
प्रहार जनशक्ती पक्ष-2
मनसे-1
पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया- 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)-1
शेतकरी पक्ष- 1
जनसुराज्य शक्ती- 1
अपक्ष- 13
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.