Tuesday, 9 July 2024

Maharashtra Legislative Council Election 2024; विधान परिषद निवडणूकीतही अजित दादांना झटका देण्याची आघाडीची रणनीती! शिवाजीराव गर्जे टार्गेटवर

11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; 12 जुलैला फैसला


हाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2024 द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 12 जुलै रोजी होणाऱ्या राज्यातील 11 विधानपरिषद जागांसाठी 2 जुलै रोजी तब्बल 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून या विधान परिषद निवडणूकीतही अजित दादांना झटका देण्याची आघाडीची रणनीती असून राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीतील विशेषतः राष्ट्रवादी(एसपी) पक्षाकडून त्यांना टार्गेटवर ठेवले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर पराभवाच्या पारंपरिक अनुभवाच्या पद्धतीने कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत होऊ नये याबाबत काळजी या निवडणुकीत घेतली जात आहे तरीही जातीय समीकरणातून पराभव होऊ नये म्हणून पक्षांतर्गत रणनीतीवर भर दिला जात आहे.

द्वैवार्षिक महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांना निवडून येण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी केवळ 3 पहिल्या क्रमांकाच्या मतांची आवश्यकता आहे. मात्र महायुतीच्या 9 उमेदवारांना निवडून येण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या तब्बल 10 मतांची आवश्यकता आहे. महायुतीमध्ये भाजपला 5 उमेदवारांना केल्वाल 4 मते तर शिवसेनेकडे 1 मत अतिरिक्त आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांना 7 पहिल्या क्रमांकाच्या मतांची आवश्यकता आहे. त्याची जुळवाजुळव करणे जिकरीचे आहे.  

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या निवडणुकीत शेकाप उमेदवार जयंत पाटील यांना पाठींबा दिला आहे. त्यांच्या १३ आमदारांकडून पहिल्या क्रमांकाच्या मते शेकापला मिळणार आहेत. उर्वरित मते अतिरिक्त कॉंग्रेस व अन्य अपक्षांच्या मतांवर गणित अवलंबून आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा स्वगृही परतणाऱ्या अजित दादांच्या पक्षातील विद्यमान आमदारांना या विधान परिषद निवडणुकीत मतांमधून निष्ठा दर्शवावा असा संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात असल्याने विधान परिषद निवडणूकीतही अजित दादांना झटका देण्याची आघाडीची रणनीती असल्याचे मानले जात आहे.

२० जून २०२२ ला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती या निवडणुकीत पुन्हा राबविणार असल्याने एकूण विजयी मतांच्या प्रमाणित कोट्याशिवाय अतिरिक्त मते देऊन ती पुढील उमेदवाराला पहिली पसंत म्हणून गणतीने उमेदवार निवडून आणणार आहेत मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांची मते निर्धारित केल्याप्रमाणे होणे अपेक्षित आहे. तरीही अतिरिक्त मते कशी प्राप्त होणार यावर महायुतीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. विशेषतः राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांपैकी एकाचा पराभव अटळ असल्याची चर्चा आमदारांमध्ये आहे. 

द्वैवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने नऊ उमेदवार उभे केले असून विरोधी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. पाच उमेदवारांसह, भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत, त्यापाठोपाठ अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार दिले आहेत. आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांनी प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे, तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पाटील हे सध्याचे आमदार आहेत. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची निवड केली असून काँग्रेसने दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.

लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. या 2 आघाडींमधील कुणाचा उमेदवार पडणार? यावर बरच काही अवलंबून असणार आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व आले आहे. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे तर राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तृमाने, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढणार आहेत.

महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून 111 संख्या होते. भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. या संख्याबळाच्या जोरावर त्यांचे 2 उमेदवार विजयी होण्याची शक्यता मानली जातेय. महायुतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मताचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 7 आमदारांची गरज आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ आहे. काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होईल. त्यानंतरही काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतील. ही मत निर्णायक ठरू शकतात. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत. तर शेकापचा 1 आमदार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. त्यामुळे ठाकरेंना आणखी काही मतांची गरज लागणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने एक उमेदवार पडणार हे निश्चत आहे. आता तो कोणाचा पडतो? यावरुन चर्चा सुरू आहेत. दरम्यान मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चार जागांचे निकाल जाहीर झाले. 26 जून रोजी ही निवडणूक झाली. निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे) दोन, तर भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी एक जागा जिंकली होती.

उमेदवार

कोटा

एकूण गरज

उपलब्ध मते

पक्ष मते

मित्र पक्ष मते

कमतरता

गरज युती

पंकजा मुंडे (भाजप)

23

115

111

103

8

4

10

परिणय फुके (भाजप)

23

सदाभाऊ खोत (भाजप)

23

अमित गोरखे (भाजप)

23

योगेश टिळेकर (भाजप)

23

शिवाजीराव गर्जे (राष्ट्रवादी)

23

46

39

39

0

7

राजेश विटेकर (राष्ट्रवादी)

23

कृपाल तुमाने (शिवसेना)

23

46

47

38

9

1 जास्त

भावना गवळी (शिवसेना)

23

मिलिंद नार्वेकर (शिवसेना ठाकरे)

23

23

15

15

 

8

3

जयंत पाटील (शेकाप)

23

23

14

1

13

9

प्रज्ञा सातव (काँग्रेस)

23

23

37

37

 

14 जास्त

महाराष्ट्रातील 11 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना - 25 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 2 जुलै 2024
अर्जाची छाननी - 3 जुलै 2024
अर्ज मागे घेण्याची तारीख - 5 जुलै 2024
मतदानाची तारीख - 12 जुलै 2024 (सकाळी 9 ते संध्याकाळी 4)
मतमोजणी आणि निकाल - 12 जुलै 2024 (संध्याकाळी 5 वाजता)


खालीलप्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात-
भाजप -
पंकजा मुंडे
परिणय फुके
सदाभाऊ खोत
अमित गोरखे
योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) -
शिवाजीराव गर्जे
राजेश विटेकर
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) -
कृपाल तुमाने
भावना गवळी
शिवसेना (उद्ध ठाकरे गट) -
मिलिंद नार्वेकर
शेकाप (शरद पवार गटाचं समर्थन) 
जयंत पाटील
काँग्रेस -
प्रज्ञा सातव

विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ - 288
विधानसभेत विद्यमान आमदारांची संख्या - 274
आताच्या आमदारांच्या संख्याबळानुसार प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची गरज आहे.


भाजपचे आमदार 103
समर्थन असलेले अपक्ष आमदार - 7
शिवसेना (शिंदे गट) आमदार - 38
समर्थन असलेले आमदार - 10
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 40 आमदार
समर्थन असलेले अपक्ष आमदार - 2
महायुतीचे एकूण आमदार = 200
महायुतीचे एकूण उमेदवार - 9


महाविकास आघाडीत काँग्रेसचे आमदार - 37
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 12
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - 15
अपक्ष - 1
मविआचे एकूण संख्याबळ - 65
मविआचे विधानपरिषदेसाठीचे उमेदवार - 3


इतर पक्षांचे आमदार
बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पक्ष - 2
एमआयएम - 2
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1
शेतकरी कामगार पक्ष - 1
मनसे - 1

288 जागांपैकी, महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान संख्याबळ 274 आहे. हे 274 विधानसभेचे सदस्य (आमदार) 12 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेज तयार करतात. प्रत्येक उमेदवाराला वरच्या सभागृहात जागा निश्चित करण्यासाठी 23 मतांची आवश्यकता असेल. महायुतीमध्ये भाजपचे १०३, शिवसेनेचे ४० आणि राष्ट्रवादीचे ४० आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) १ आमदार, बहुजन विकास आघाडी २ आमदार असलेल्या मोठ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग आहे. प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीची संख्या 203 वर आहे. विरोधी आघाडीमध्ये काँग्रेस (37), शिवसेना-यूबीटी (16), राष्ट्रवादी-सपा (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे.

मागील दोन वर्षापूर्वी म्हणजेच २० जून २०२२ ला झालेल्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले होते. वास्तविक त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि निकालापूर्वीच १६ आमदारांसह सूरत गाठले होते. शिवसेनेतील फुटीमुळे पक्षाचा एक उमेदवार पराभूत होईल, असे चित्र होते. पण शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. हंडोरे यांना पक्षाच्या २८ मतांचा कोटा देण्यात आला होता. १५ अतिरिक्त मतांच्या आधारे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना अपक्ष किंवा अन्य मतांची जुळवाजुळव करण्याची सूचना करण्यात आली होती. पण जगताप यांनी पक्षाच्या मतांचे गणित जुळविले. परिणामी शेवटच्या फेरीत चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. शिंदे यांचे बंड आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने हंडोरे यांच्या पराभवाची फारशी चर्चा झाली नव्हती.

विधानपरिषद ही विधानसभेप्रमाणे पाच वर्षांनी विसर्जित होत नाही. तर सभागृहातील एकूण सदस्यसंख्येपैकी एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात. राज्यात विधानसभेत 288 सदस्य आहेत. तर विधान परिषदेतील सदस्य संख्या 78 इतकी आहे. संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यांतील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान 40 असावी. तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश इतकी असू शकते. याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 96 पर्यंत वाढवता येऊ शकते. महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. त्यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. तसंच 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निर्वाचित होत असतात. सध्या होत असलेली निवडणूक ही विधानसभा सदस्यांमार्फत निवडल्या जाणाऱ्या 30 जागांपैकी 10 जागांवर होत आहे. याशिवाय राज्यपालांमार्फत नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या 12 जागांचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवून दिला असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.