लोकसभा निवडणुकीत लाखोंचा खर्च करूनही संपत्ती जैसे थे!
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या यामध्ये अनेक गमतीदार घटना घडल्या त्यामध्ये बारामती बारामती मतदारसंघातील निवडणूक खर्चावरून मतदारांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरु असून बराच खल केला जात आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत तुसभर पण, एक रुपया देखील खर्च केला नसल्याचे बोधित होणारे शपथपत्र दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील जंगम मालमत्ता मध्ये हातातील रोख रक्कम व बँकेतील रक्कम आणि राज्यसभा निवडणुकीतील शपथपत्रात जंगम मालमत्ता मध्ये हातातील रोख रक्कम व बँकेतील रक्कम एकसारखीच असून दोन्हीही शपथपत्रात साम्य आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वतः केलेल्या खर्चाची माहिती राज्यसभा निवडणुकीतील शपथपत्रात दर्शवलेली नसून लपविली असल्याचे उघड झाल्याने त्याबाबत मतदारांमध्ये चर्चेचा खल सुरु आहे.
बारामती मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा शून्य खर्च झाल्याचे शपथपत्रातील माहिती वरून अधोरेखित होत आहे. नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला खर्च राज्यसभेतील निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्राद्वारे विवरणात दर्शवलेला नसून सदरील खर्च कोणी केला असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सुनेत्रा पवार यांनी (शॅडो रजिष्टर) नुसार निर्धारित खर्चाची मर्यादा ओलांडली!
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार व राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला खर्च निवडणूक आयोगाच्या दैनंदिन खर्च नोंद वहीत दर्शविल्याप्रमाणे सर्वाधिक खर्च केल्याचे समोर येत आहे. दि. ४ मे पर्यंत त्यांच्या प्रतिनिधींनी ४९ लाख ८९ हजार ५६१ इतका दर्शविलेला होता तर आयोगाच्या छायांकित खर्च नोंद वही (शॅडो रजिष्टर) नुसार १ कोटी १ लाख ९९ हजार ८४५ इतका आहे. उमेदवार व आयोगाच्या छायांकित खर्च नोंद वही (शॅडो रजिष्टर) नुसार ६१ लाख ६१ हजार ६१९ इतक्या खर्चामध्ये तफावत आलेली असून त्याबाबत आयोगाने खुलासा मागविलेला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्षांनी एका मतदारसंघात ९५ लाख रु. कमाल खर्चाची निर्धारित केलेली रक्कम आहे. त्यापेक्षा जास्त खर्च दर्शवलेला असेल तर संबंधित उमेदवाराला निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे अपात्र ठरवले जाते.
सुप्रिया सुळे यांचा खर्च देखील सर्वाधिक
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीत केलेला खर्च निवडणूक आयोगाच्या दैनंदिन खर्च नोंद वहीत दर्शविल्याप्रमाणे सर्वाधिक खर्च केल्याचे समोर येत आहे. दि. ४ मे पर्यंत त्यांच्या प्रतिनिधींनी ५६ लाख ९७ हजार ४७१ इतका दर्शविलेला होता तर आयोगाच्या छायांकित खर्च नोंद वही (शॅडो रजिष्टर) नुसार ८३ लाख ७० हजार ९४० इतका आहे. उमेदवार व आयोगाच्या छायांकित खर्च नोंद वही (शॅडो रजिष्टर) नुसार ३१ लाख २१ हजार ९७९ इतक्या खर्चामध्ये तफावत आलेली असून त्याबाबत आयोगाने खुलासा मागविलेला आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.