Saturday 1 June 2024

Maharashtra Loksabha Election Exit Poll Results 2024 : पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा एक्झिट पोल अंदाज पहा

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळणार

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल)चे निष्कर्ष


लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात झालेल्या पाच टप्यातील मतदानानंतर पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने मतदारांचे मत आजमावून घेतले. या  यामध्ये मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल) चे निष्कर्ष आलेले आहेत त्यानुसार संभाव्य विजयी राजकीय पक्ष व उमेदवार यांचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.   

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानोत्तर सर्वेक्षण चाचणी (एक्झिट पोल) नुसार राज्यात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असून महायुतीचाच प्रभाव या निवडणुकीत राहणार आहे असा अंदाज निष्कर्षातून व्यक्त होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण भाजप-29.74% तर कॉंग्रेस-16.34% आणि शिवसेना-16.43% तर शिवसेना (उबाटा)-9.37% आणि राष्ट्रवादी-8.31% आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)-7.54% तसेच अन्य राजकीय पक्ष, अपक्ष व नोटासह 12.27% असे संभाव्य मतांचे प्रमाण राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये संभाव्य विजयी राजकीय पक्षांमध्ये भाजप-23, शिवसेना (उबाठा)-11, शिवसेना -6, कॉंग्रेस-8, राष्ट्रवादी-2, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)-2, अपक्ष/एमआयएम-1 या प्रमाणे संख्याबळ राहू शकते. राज्यातील प्रमुख युती व आघाडी नुसार यश मिळेल तर महाविकास आघाडीला 21 जागांवर संभाव्य यश मिळू शकते तर अन्य एका जागी इतर पक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता मतदानोत्तर सर्वेक्षण चाचणी (एक्झिट पोल) नुसार व्यक्त होत आहे.   

2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राज्यातील सर्व 48 लोकसभा जागांवर 1121 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये 625 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. एकूण 1 हजार 121 उमेदवारांपैकी पुरुष उमेदवारांची संख्या सर्वाधिक 1 हजार 009 इतकी होती तर महीला उमेदवारांची संख्या तुलनेने कमी असून ती 111 इतकी होती. तर एकमेव तृतीयपंथी हिंगोली मतदारसंघात निवडणूक रिंगणात होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत 254उमेदवार या निवडणुकीत अधिक आहेत. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 48 लोकसभा जागांवर 1 हजार 332 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होता. त्यात 1211 पुरुष होते तर 79 महिला उमेदवार रिंगणात होत्या. यापैकी 192 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरली होती. तर 273 जणांनी माघार घेतली होती. त्यामुळे 2019च्या निवडणूक रिंगणात 867 उमेदवार होते. अन्य राजकीय पक्षांचे उमदेवार निवडणूक रिंगणात 1121 उमेदवार होते. 

महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणूक 19 एप्रिल ते 20 मे या पाच टप्प्यांत मतदान झाले आहे. राज्यात प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झाले त्याप्रमाणे प्रमुख लढती झाल्या आहेत यामध्ये काही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा दिलेला होता तर काही मतदारसंघात ऐनवेळी उमदेवारी माघार घेणे अथवा बदल करणे अशा घटना घडलेल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी व्यतिरिक्त अन्य राजकीय पक्षांमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्या 2019 मध्ये समाविष्ट असलेल्या एमआयएम पक्षाने फारकत घेऊन या लोकसभा निवडणुकीत 5 लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये औरंगाबाद, पुणे, भिवंडी, मुंबई उत्तर मध्य, उस्मानाबाद या मतदारसंघांचा समावेश आहे. पुणे वगळता उर्वरित राज्यात सर्वाधिक 47 लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीने उमेदवार दिलेले होते. त्याखालोखाल वंचित बहुजन आघाडीने 38 लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिलेले होते. 10 मतदारसंघात उमेदवार नव्हते त्यामध्ये धुळे, अमरावती, नागपूर, यवतमाळ वाशिम, भिवंडी, मुंबई उत्तर, बारामती, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. अन्य पक्षांमध्ये बळीराजा पार्टी-7, भीम सेना-14, महाराष्ट्र विकास आघाडी-10 या राजकीय पक्षांनी निवडणुकीत उमेदवार उतरवलेले होते. 
 
राज्यात प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रमुख लढती झाल्या असून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत सर्वाधिक जागांवर भाजप लढत आहे. भाजपने 28 मतदारसंघात उमेदवार दिलेले आहेत तर त्याखालोखाल युतीमध्ये शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षाला 15 जागांवर उमेदवार दिलेले असून उर्वरित 5 जागा राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षाला वाटप केल्याचे सूत्र असून त्यामधील एक जागा रासप ला देण्यात आलेली आहे. 

निवडणुकीतील सामना पाहिल्यास भाजप 28 पैकी 15 लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारांशी लढत झालेली असून 8 मतदारसंघात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) या पक्षाशी लढत झाली असून 5 लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) या पक्षाशी प्रामुख्याने लढत झालेली आहे. आणि शिवसेना (शिंदे) या पक्षाच्या एकूण 15 पैकी 13 जागांवर थेट शिवसेना (उबाठा) पक्षाशी लढती पहावयास मिळाल्या आहेत यामध्ये निकालांनंतर खरी शिवसेना कोणाची हे स्पष्ट होणार आहे. तर उर्वरित अन्य 2 जागांवर कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांशी लढत झालेली आहे. तसेच राष्ट्रवादी (अजित दादा) पक्षांच्या 5 पैकी 2 जागांवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाशी थेट लढती झाल्या यामध्ये बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर अन्य 2 जागांवर शिवसेना (उबाठा) पक्षाशी लढती झालेल्या असून उर्वरित रासपला सोडलेल्या जागेवर देखील शिवसेना (उबाठा) पक्षाशी लढती झालेली आहे. 

महाविकास आघाडीचा विचार केल्यास राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जागा शिवसेना (उबाठा) पक्ष 21 जागांवर लढत दिली असून त्याखालोखाल कॉंग्रेसने 17 जागांवर तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने 10 जागांवर लढत दिली आहे. यामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाच्या 21 जागांपैकी शिवसेना (शिंदे) गटाशी 13 जागांवर थेट लढत तर भाजप बरोबर 5 जागांवर आणि राष्ट्रवादी (अजित) पक्षाशी 2 जागांवर आणि रासप बरोबर लढत दिलेली आहे. कॉंग्रेसने 17 जागांपैकी 15 जागांवर भाजपशी तर शिवसेना (शिंदे) गटाशी 2 जागांवर थेट लढत दिलेली आहे. तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) या पक्षाने 10 पैकी 8 जागांवर भाजपच्या उमेदवारांशी सामना झाला असून 2 जागांवर राष्ट्रवादी (अजित) पक्षाशी थेट लढत दिली आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रीत झालेले आहे.

सूचना- पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानोत्तर सर्वेक्षण चाचणी (एक्झिट पोल) अहवालामधील केवळ थोडक्यात सारांश देण्यात आलेला असून तपशीलवार रिपोर्ट सशुल्क उपलब्ध करून दिला जाईल याकरिता प्राब संस्थेशी संवाद साधावा.  

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.