Monday, 19 October 2026

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला धक्का; अनेक दिग्गजांचा पराभव; सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला १६ तर महायुतीला ९ जागा

महायुतीच्या उमेदवार शौमिका महाडिक यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी; क्रॉस व्होटिंग झाल्याचे मतांवरुन स्पष्ट



कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची लढाई असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठा फेरबदल झाल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले असून अवघ्या ९ जागा मिळून महायुतीला धक्का बसला आहे यामध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला १६ जागा मिळवून बहुमत मिळाल्याने सतेज पाटील यांनी एकहाती कडवी झुंज दिल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ पिछाडीवर पडले होते. सर्वसाधारण गटात महायुतीचे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील पिछाडीवरच होते. दोघेही महायुतीकडून रिंगणात उभे होते. महिला प्रतिनिधी गटात महायुतीच्या उमेदवार शौमिका महाडिक यांना देखील निवडणुकीत धक्का बसला असून फेरमतमोजणीची मागणी त्यांनी केलेली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील आदी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणूक निकालावरुन जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात आगामी काळात बदल होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे गोकुळ निवडणुकीत गठ्ठा मतदान न होता क्रॉस व्होटिंग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ हजार ४१८ पात्र मतदारांपैकी ५ हजार ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानात विक्रमी ९९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

गोकुळचे कार्यक्षेत्र संपूर्ण कोल्हापूर जिल्हा असून मतदानासाठी एकच मतदान केंद्र असते. गोकुळची वार्षिक उलाढाल (२०२५-२६) ₹४,१८५ कोटी इतकी असून सरासरी दररोज दूध संकलन (२०२५-२६) १६.२४ लाख लिटर इतके होते तर दूध उत्पादक सुमारे ४.९१ लाख असून गावपातळीवरील दूध संस्था ८,४६१ इतक्या आहेत. गोकुळ दूध संघाची निवडणूक केवळ सहकारी संस्थेपुरती मर्यादित राहिली नव्हती. या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारांच्या राजकीय ताकदीच्या जोरावर महायुतीने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित ताकद लावूनही समविचारी आघाडीने १६ जागांवर विजय मिळविल्याने कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. ठराव धारक मतदारांनी समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमताचा कौल देत महायुतीला मोठा धक्का दिला. समविचारी आघाडीने १६ जागांवर विजय मिळविला, तर महायुतीला नऊ जागांवर समाधान मानावे लागले.   

उमेदवारांची यादी

सर्वसाधारण गट 

१. अभिजित प्रभाकर तायशेटे 
२. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर
३. राहुल पांडुरंग पाटील
४. चेतन अरुण नर
५. अजित शशिकांत नरके
६. किसन बापूसो चौगले
७. अंबरीषसिंह संजय घाटगे
८. बाबासाहेब श्रीपती चौगले
९. राहुल बजरंग देसाई
१०. विद्याधर बाबुराव गुरबे
११. विरेंद्र संजय मंडलिक
१२. मदन बाबुराव देसाई
१३. बाबासाहेब विष्णू देवकर
१४. राजेश नरसिंगराव पाटील
१५. रणजितसिंह दिलीपराव पाटील
१६. रणजितसिंह कृष्णराव पाटील
१७. अजित पांडुरंग पाटील
१८. सचिन दौलतराव घोरपडे
१९. विश्वजीत दिनकरराव जाधव
२०. युवराज दत्ताजीराव पाटील.


महिला राखीव गट

१. अंजना केदारी रेडेकर
२. भाग्यश्री धीरज डोंगळे


इतर मागासवर्गीय गट

१. शशिकांत शामराव खोत


अनुसूचित जाती गट

१. राजू बाबा आवळे


भटक्या-विमुक्त जमाती गट

१. बयाजी शेळके.


गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादक शेतकरी हे प्रत्यक्ष मतदान करत नाहीत. ते ज्या दूध संस्था किंवा डेअरीला दूध देतात त्या डेअरीचा एक ठराव दिला जातो. म्हणजे त्या दूध डेअरीतील सर्व संचालकांच्या एकमताने एका संचालकाच्या नावे तो ठराव दिला जातो. तो संचालक हा गोकुळसाठी मतदान करतो. तसेच प्रत्येक डेअरीला ठराव देण्याचा अधिकार नसतो. ज्या डेअरीमधून नियमित ५० लिटरपेक्षा जास्त दूध संकलन होतं, त्याचे लेखापरीक्षण (ऑडिट) नियमित केलं जातं, तसचे त्या डेअरीची निवडणूक नियमानुसार पार पडते अशाच डेअरी गोकुळच्या मतदानासाठी पात्र ठरतात. 

प्रतिनिधी निवड प्रक्रिया- गोकुळ दूध संघ पात्र संस्थांची यादी दुग्ध निबंधक प्रशासनाकडे पाठवतो. त्यानंतर प्रत्येक पात्र संस्था आपल्या एका प्रतिनिधीचे नाव ठराव करून पाठवते.  या प्रतिनिधींच्या आधारे 'प्रारूप मतदार यादी' तयार केली जाते.  थकबाकी किंवा पात्रतेबाबतच्या हरकतींची छाननी झाल्यानंतर पात्र प्रतिनिधींची अंतिम मतदार यादी जाहीर केली जाते.  संचालक मंडळाच्या जागा व आरक्षण कसं असतं? गोकुळच्या संचालक मंडळात एकूण 25 निर्वाचित संचालकांच्या जागा असतात. 

उमेदवारासाठी पात्रता - उमेदवार हा सक्रिय सभासद आणि संस्थेचा ठरावधारक प्रतिनिधी असणे आवश्यक असते. संस्थेच्या उपविधीनुसार आवश्यक सेवांचा वापर केलेला असावा व निर्धारित कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेला  उपस्थिती असावी. उमेदवाराच्या संस्थेकडे कोणत्याही प्रकारचे मासिक शुल्क, कर्ज किंवा इतर देणी थकलेली नसलेले प्रमाणपत्र जोडावे लागते. आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना संबंधित जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. 

निवडणुकीचा कार्यक्रम असा होता- 


उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन) दाखल करणे= 15 ते 22 सप्टेंबर 2026

नामनिर्देशन पत्रांची छाननी= 23 सप्टेंबर 2026  

वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणे= 24 सप्टेंबर 2026

उमेदवारी अर्ज मागे घेणे= 24 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2026 

अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप= 9 ऑक्टोबर 2026 

मतदानाचा दिवस= 18 ऑक्टोबर 2026 

मतमोजणी व निकाल= 19 ऑक्टोबर 2026 


Chandrakant bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.