Monday, 12 October 2026

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदार यादीत नाव शोधणे

पदवीधरसाठी ४७ तर शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात



पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अनुक्रमे आता ४७ आणि तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूरअसे पाच जिल्हयांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, ९ ऑक्टोबरपर्यंत होती. पदवीधर मतदारसंघात ७५ उमेदवारांनी ८७ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६९ उमेदवारांचे ८१ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २२ उमेदवारांनी माघार घेतली. आता पदवीधर मतदारसंघात ४७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण मतदान तीन लाख ८८ हजार ०१९ इतेक आहे. एकूण ७४१ मतदान केंद्रावर मतदानाची सोय करण्यात आलेली आहे. 

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात ४९ उमेदवारांनी ६७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४८ उमेदवारांचे ६५ अर्ज वैध ठरले. १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिक्षक मतदारसंघात एकूण तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

शिक्षक मतदारसंघातील एकूण मतदार ६२ हजार आहेत. ३१० मतदान केंद्रे आहेत. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान करता येणार आहे. 

पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक मतदार कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या एक लाख १४ हजार ५६२ इतकी आहे. त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८८,२०२ इतकी आहे. सांगली जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंख्या ८८,०७० आहे. सोलापूर जिल्ह्यात ४९,७२२ तर सातारा जिल्ह्यात ४७४६३ मतदार आहेत. 

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण शिक्षक मतदारांची संख्या ६२ हजार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १६,८८२ इतके सर्वाधिक मतदार आहेत. सोलापूर जिल्ह्यात १५,३०३ मतदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १२,२९९ मतदार आहेत. सांगली जिल्ह्यातील मतदारसंख्या ९४५४ इतकी आहे.तर सातारा जिल्ह्यातील शिक्षक मतदार संख्या ८०६२ आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक -

प्रमुख लढत - डॉ स्मिता जाधव (भाजप) विरुद्ध हर्षदा देशमुख-जाधव (महाविकास आघाडी)
अर्ज दाखल केलेले उमेदवार- ६९
अर्ज माघारी घेतलेले उमेदवार- २२
निवडणूक लढवणारे एकूण उमेदवार- ४७
मतदान केंद्राची संख्या- ७८१
एकूण मतदार- ३ लाख ८८ हजार १९ 

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक -

प्रमुख लढत - कौस्तुभ गावडे (भाजप) विरुद्ध जयंत आसगावकर (काँग्रेस).विरुद्ध सचिन सानप (अपक्ष)
अर्ज दाखल केलेले उमेदवार- ४८
अर्ज माघारी घेतलेले उमेदवार- १८
निवडणूक लढवणारे एकूण उमेदवार- ३०
मतदान केंद्राची संख्या- ३१०
एकूण मतदार- ६२ हजार 

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदार यादीत नाव शोधणे

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदार यादीत नाव शोधणे


खालील लिंकवर नाव शोधा 

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदार यादी पहा 

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदार यादी पहा 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक मतदार यादीत नाव कसे शोधावे?

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.