पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत निवडणूक
राज्यातील पाच शिक्षक,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. 23 ऑक्टोबर 2026 ला मतदान होणार आहे. 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. त्यानुसार अमरावती, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात निवडणूक पार पडणार आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत निवडणूक होणार असून संभाव्य इछुक उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु केलेली होती परंतु राजकीय पक्षाच्या उमेदवारी निश्चितीवर येथील विजयाचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदारांच्या कार्यकाळाची मुदत संपत आल्याने रिकाम्या होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर २७ ऑक्टोबर मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. निवडणूक आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले. याकरिता उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्जांची छाननी ही 7 ऑक्टोबर 2026 रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026 आहे. मतमोजणी आणि निकाल 27 ऑक्टोबर 2026 रोजी आहे. आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अमरावती शिक्षक मतदार संघात भाजपकडून शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत काळमेघ, खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे आणि शेखर भोयर यांचे नाव चर्चेत आहे तर काँग्रेसकडून ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांची सून आदिती पोहरे यांचं नाव चर्चेत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे राजकारण सध्या तापत आहे. अशातच वेळ पडल्यास भाजप म्हणून निवडणूक लढू. असे विधान करून जयकुमार गोरे यांनी पुणे मतदारसंघातील राजकारणात नव्या राजकीय समीकरणाबद्दल भाष्य केले. 2020 मध्ये निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 1,16,638 मते तर भाजपाचे शिरीष बोराळकर 58,743 मते यांचा 57,895 मताधिक्याने पराभव झाला. सतीश चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय होता. पण आता 2020 चा विचार केला असता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आता मतदार संघात एम. के. देशमुख आणि किरण पाटील यांचेही नाते चर्चेत आहे. भाजपाने यंदा या निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली. भाजपा या निवडणुकीत तयारीने उतरत आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. याबाबत लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल.
कोणत्या मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक?
१) पुणे पदवीधर मतदारसंघ२) नागपूर पदवीधर मतदारसंघ
३) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ
४) अमरावती शिक्षक मतदारसंघ
५) पुणे शिक्षक मतदारसंघ
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना जारी: 29 सप्टेंबर 2026उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 6 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी : 7 ऑक्टोबर 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 ऑक्टोबर 2026
मतदानाची तारीख व वेळ: 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी व निकाल: 27 ऑक्टोबर 2026
रिक्त झालेल्या जागा
1. औरंगाबाद पदवीधर: सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)2. पुणे पदवीधर: अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)
3. नागपूर पदवीधर: अभिजीत गोविंदराव वंजारी (काँग्रेस)
4. अमरावती शिक्षक: किरण रामराव सरनाईक (शिवसेना - शिंदे गट)
5 पुणे शिक्षक: जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)
औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात 2020 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी 1,16,638 मते मिळवून भाजपचे शिरीष बोराळकर (58,743 मते) यांचा 57,895 मताधिक्याने पराभव केला होता. सतीश चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय होता. 2020 च्या तुलनेत यंदा राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. यावेळी या मतदारसंघात सुमारे 2 लाख 92 हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. भाजपने यंदा पूर्ण ताकदीने तयारी सुरू केली असून एम. के. देशमुख आणि किरण पाटील यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघ मध्ये तब्बल 58 वर्षे जनसंघ आणि भाजपचा बालेकिल्ला राहणाऱ्या आणि गंगाधरराव फडणवीस तसेच नितीन गडकरी यांसारख्या मातब्बर नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात 2020 मध्ये काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांचा 18,910 मतांनी पराभव करून इतिहास रचला होता. आपला गमावलेला गड परत मिळवण्यासाठी भाजपने जोरदार मतदार नोंदणी मोहीम राबवली आहे. भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे आणि माजी आमदार अनिल सोले हे दोघेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत, तर 'शिक्षक भारती'ने इंजिनिअर अतुल देशमुख यांची उमेदवारी महिनाभरापूर्वीच जाहीर करून तयारी केली आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
================================================
"महाराष्ट्रातील राजकारण"
"महाराष्ट्रातील राजकारण"
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
==================================================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.