Friday, 3 June 2022

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक-2022; गट आणि गण प्रारूप रचना जाहीर

हवेली तालुक्याचे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत

 

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे वर्चस्व 

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक-2022; गट आणि गण प्रारूप रचना जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये हवेली तालुक्याचे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत निघाले असून शिरूर लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रामध्ये सर्वाधिक गट व गण निर्माण झाल्याने महत्व वाढणार आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांसाठी नव्याने गट आणि गण प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली यानुसार जिल्हा परिषदेसाठी ८२ आणि पंचायत समित्यांसाठी १६४ गण निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे नवीन ७ गट आणि पंचायत समित्यांचे नवीन १४ गण वाढले आहेत. नव्याने झालेल्या या गट आणि गण पुनर्रचनेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात बदल होणार आहे. हवेली तालुक्याचे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत निघाले आहे. २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा फटका हवेली तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील तब्बल ७ गट आणि १४ गण संपुष्टात आले आहेत. नवीन रचनेत हवेली तालुक्यात आता केवळ ६ गट आणि १२ गण निश्‍चित झाले आहेत. नव्या गट रचनेचा १० तालुक्यांना फायदा झाला आहे. यात जुन्नर, खेड, दौंड आणि इंदापूर या ४ तालुक्यांमधील प्रत्येकी २ गट आणि ४ गण वाढले आहेत. तर शिरूर, मावळ, मुळशी, पुरंदर, भोर आणि बारामती या ६ तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ गट आणि २ गण नव्याने निर्माण झाले आहेत. 2011च्या जनगणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 33 लाख 48 हजार 495 आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी 82 गट तर पंचायत समित्यांसाठी 13 तालुके मिळून 164 गण आहेत. 2017 च्या तुलनेत जिल्हा परिषदेसाठी सदस्यांची संख्या सात ने तर पंचायत समित्यांच्या सदस्यांच्या संख्येत 14ने वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील नवीन गट रचनेत आंबेगाव आणि वेल्हे या दोन तालुक्‍यातील पूर्वीचीच गट आणि गणांची संख्या कायम राहिली आहे. या नव्या गट रचनेचा 10 तालुक्‍यांना फायदा झाला आहे. फायदा झालेल्या दहापैकी जुन्नर, खेड, दौंड आणि इंदापूर या चार तालुक्‍यात प्रत्येकी दोन गट आणि प्रत्येकी चार गण वाढले आहेत. सहा तालुक्‍यात प्रत्येकी एक गट आणि प्रत्येकी दोन गण नव्याने निर्माण झाले आहेत. दरम्यान राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीसह जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील पाचपेक्षा अधिक आजी-माजी आमदारांच्या मुलांचे आणि पुतण्याचे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एन्ट्री होणार आहे. संबंधित आमदारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तसेच गट रचना तयार करताना आपल्या मुलांना सोयीचे व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.सध्या महापालिका नंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणाची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी पुणे जिल्ह्यातील आमदार पुत्रांच्या आगमनाची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा मुलगा राजवर्धन हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तसेच शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋशीराज पवार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय एन्ट्री करणार आहे. या सोबतच दौंड तालुक्यातील माजी आमदार रमेश थोरात यांचा मुलगा गणेश थोरात यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी पुतण्या मयुर मोहिते-पाटील यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेमुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्याची राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात झालेली आहे. आरक्षण सोडतीनंतर राजकीय घडामोडींना खरा वेग येणार आहे. ओबीसींच्या आरक्षणावर देखील अनेकांची राजकारणातील मदार अवलंबून आहे.पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे वर्चस्व असून मागि निवडणुकीत एकूण ७५ जागापैकी ४४ जागांवर विजय मिळवला होता तर शिवसेना-१३, कॉग्रेस-०७, भाजप- ०७, इतर-०४ अशी राजकीय स्थिती होती. 

पुणे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण खालीलप्रमाणे-:

गट संख्या

तालुका निहाय गट व गण

जुन्नर

1

1- डिंगोरे - उदापूर

2

2- ओतूर - उंब्रज नं.१

3

3- आळे - पिंपळवंडी

4

4- राजुरी - बेल्हे

5

5- बोरी बु. - खोडद

6

6- धालेवाडी त. हवेली-सावरगाव

7

7- पाडळी - येणेरे

8

8- खामगाव - तांबे

9

9- नारायणगाव वारूळवाडी

आंबेगाव

1

10- शिनोली - बोरघर

2

11- घोडेगाव - पेठ

3

12- कळंब - चांडोली बु.

4

13- पारगाव तर्फे अवसरी बु. जारकरवाडी

5

14- अवसरी बु. - पिंपळगाव तर्फे महाळुंगे

शिरूर

1

15- टाकळी हाजी - कवठे येमाई

2

16- शिरूर ग्रामीण - निमोणे

3

17- कारेगाव - रांजणगाव गणपती

4

18- पाबळ - केंदूर

5

19- सणसवाडी - कोरेगाव भीमा

6

20- तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर

7

21- न्हावरा - निमगाव म्हाळुंगी

8

22- वडगाव रसाई - मांडणगाव फराटा

खेड

1

23- नायफड - आवदर

2

24- वाडा - सातकरस्थळ

3

25- रेटवडी - कनेरसर

4

26- पिंपळगाव तर्फे खेड - काळूस

5

27- कडूस - शिरोली

6

28- पाईट - पिंपरी बु.

7

29- म्हाळुंगे - आंबेठाण

8

30- नाणेकरवाडी - मेदनकरवाडी

9

31- कुरुळी - मरकळ

मावळ

1

32- टाकावे बु.- नाणे

2

33- खडकाळे - वराळे

3

34- कुरवंडे - कार्ला

4

35- कुसगाव बु. - सोमाटणे

5

36- चांदखेड - काले

6

37- इंदुरी - तळेगाव दाभाडे ग्रामीण

मुळशी

1

38- कोळवण - माले

2

39- हिंजवडी - कासारसाई

3

40- माण - कासारअंबोली

4

41- पिरंगुट - भुगाव

हवेली

1

42- पेरणे - लोणीकंद

2

43- वाडेबोल्हाई - कोरेगावमुळ

3

44- उरुळी कांचन - सोरतापवाडी

4

45- कदमवाकवस्ती - थेऊर

5

46- लोणीकाळभोर - कुंजीरवाडी

6

47- खेडशिवापूर - खानापूर

दौंड

1

48- खामगाव - राहू

2

49- पिंपळगाव - पारगाव

3

50- कानगाव - गोपाळवाडी

4

51- लिंगाळी - देऊळगावराजे

5

52- राजेगाव - खडकी

6

53- कुरकुंभ - पाटस

7

54- वरवंड - बोरीपार्धी

8

55- यवत - कासुर्डी

पुरंदर

1

56- गराडे - दिवे

2

57- पिसर्वे - माळशिरस

3

58- कोळविहरे - बेलसर

4

59- परिंचे - मांडकी

5

60- वाल्हे - निरा शिवतक्रार

वेल्हे

1

61- विंझर - पानशेत

2

62- वेल्हे बु. वांगणी

भोर

1

63- वेळू - नसरापूर

2

64- भोंगवली - कामथडी

3

65- भोलावडे - शिंद

4

66- कारी - उत्रौली

बारामती

1

67- सुपा - कऱ्हाटी

2

68- सिर्सुफळ - काटेवाडी

3

69- गुणवडी - पणदरे

4

70- मूढाले - मोरगाव

5

71- वाघळवाडी - निंबुत

6

72- वडगाव निंबाळकर - सांगवी

7

73- निरावागज - डोर्लेवाडी

इंदापूर

1

74- भिगवण - शेटफळगढे

2

75- अंथुर्णे - बोरी

3

76- पळसदेव - बिजवडी

4

77- वडापुरी - माळवाडी

5

78- निमगाव केतकी - शेळगाव

6

79- सणसर - बेलवाडी

7

80- लासुर्णे - वालचंदनगर

8

81- काटी - वरखुटे खुर्द

9

82- बावडा - लुमेवाडी

मावळ पंचायत समितीमध्ये आता 12 सदस्य; गट व गणांची रचना पुढीलप्रमाणे-

टाकवे बुद्रुक नाणे जिल्हा परिषद गट : 

टाकवे बुद्रुक पंचायत समिती गण : सावळा, माळेगाव बु, माळेगाव खु, पिंपरी अमा, इंगळुन, कुणे, अनसुटे, कशाळ, किवळे, भोयरे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, आंबळे, शिरे, मंगरूळ, टाकवे बु, फळणे, बेळज, कोंडीवडे अमा.
नाणे पंचायत समिती गण : खांड, कुसुर, साई, पारवडी, नाणोली नामा, घोणशेत, वाउंड, कचरेवाडी, डाहुली, वहाणगाव, कांब्रे अमा, बोरवली, कुसवली, नागाथली, वडेश्वर, माऊ, करंजगाव, ब्राम्हणवाडी, पाले नामा, मोरमारेवाडी, उकसान, शिरदे, सोमवडी, थोराण, राकसवाडी, जांभवली, गोवित्री, भाजगाव, वळवंती, वडवली, कांब्रे नामा, कोंडीवडे नामा, नाणे.

खडकाळे-वराळे गट : 

वराळे पंचायत समिती गण : नाणोली तर्फे चाकण, आंबी, राजपुरी, आकुर्डी, वराळे, जांभूळ, सांगवी, कान्हे, नायगाव. खडकाळे पंचायत समिती गण : खडकाळे, खामशेत, कुसगाव खु, चिखलसे, अहिरवडे, साते, ब्राम्हणवाडी, मोहितेवाडी.
कुरवंडे-कार्ला गट : कुरवंडे पंचायत समिती गण : कुरवंडे, उदेवादी, कुणे नामा, वरसोली, पांगळोली, वाकसई, देवघर, करंडोली, वेहेरगाव, दहिवली, शिलाटने, टाकवे खु, सांगिसे, वेल्हेवळी, बुधवडी, खांडशी, नसावे. कार्ला पंचायत समिती गण : डोंगरगाव, औंढे खु, औंढोली, देवले, मळवली, सदापुर, पाटण, बोरज, भाजे, कार्ला, ताजे, पिंपळोली, पाथरगाव, मुंढावरे, वडीवळे, वळक.

कुसगाव बु-सोमाटणे गट : 

कुसगाव बु पंचायत समिती गण : कुसगाव बु, आपटी, गेव्हंडे आपटी, दुधीवरे, आतवण, लोहगड, महागाव, धालेवाडी, मालेवाडी, सावंतवाडी, प्रभाचीवाडी, आंबेगाव, माजगाव, शिंदगाव, पानसोली, पाले पमा. 
सोमाटणे पंचायत समिती गण : कडधे, करूंज, बेडसे, बौर, ब्राम्हणवाडी, शिवणे, सडवली, ओझर्डे, उर्स, आढे, परंदवडी, सोमाटणे.

चांदखेड-काले गट : 

काले पंचायत समिती गण : थुगाव, आर्डव, कोथुर्णे, मळवंडी ठुले, येलघोल, धनगव्हाण, मळवंडी पमा, काले, येळसे, केवरे, चावसर, तुंग, मोरवे, शेवती, कोळेचाफेसर, शिलिंब, वाघेश्वर, कादव, अजीवली, जवण, ठाकुरसाई, गेव्हंडे खडक, तिकोना, वारू, ब्राम्हनोली, शिवली, भडवली. 
चांदखेड पंचायत समिती गण : डोणे, आढले बु, आढले खु, ओवळे, दिवड, पुसाणे, पाचाणे, चांदखेड, कुसगाव पमा, बेबडओहोळ, पिंपळखूटे. इंदुरी-तळेगाव ग्रामीण गट : इंदुरी पंचायत समिती गण : सुदुंबरे, सुदवडी, इंदुरी, जांबवडे, नवलाख उंबरे, जाधववाडी, बधलवाडी, मिंडेवाडी. तळेगाव ग्रामीण पंचायत समिती गण : माळवाडी, तळेगाव ग्रामीण, गहूंजे, शिरगाव, गोडुंब्रे, धामणे, साळुंब्रे, दारूंब्रे, सांगावडे. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

Wednesday, 1 June 2022

राज्यसभा निवडणूक-2022; निवडणूक लढविण्याचा छंद जोपासणाऱ्या अपक्षांचे अर्ज बाद

78 वयाच्या पुणेकर आजोबांनी लढवल्या लोकसभा निवडणुका आता राज्यसभेसाठी लगबग

महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणाऱ्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अक्षय सानप (मुंबई) व शामराव कदम (पुणे) यांनी दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले यामुळे उमेदवारांची संख्या ९ झाली होती. उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली यामध्ये अपूर्ण व त्रुटीयुक्त नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने निवडणूक लढविण्याचा छंद जोपासणाऱ्या अपक्षांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. राज्यसभेच्या सहा जागांमध्ये सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झालेली असताना घोडेबाजाराची चर्चा झडत असताना अशा स्थितीत बेताची व जेमतेम आर्थिक असलेल्या छंदीक उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्य सूचक व अनुमोदक यांची सही असणे अनिवार्य असताना मोघमपणे या निवडणूक लढविण्याचा छंद जोपासणाऱ्या अपक्षांनी अर्ज दाखल केले होते. 75 वय वर्षाच्या वरील व्यक्तींना आगामी लोकसभा निवडणूक उमेदवारी न देण्याचा खल भाजप पक्षामध्ये सुरु असतानाच 78 वयाच्या आजोबांनी राज्यसभा निवडणूक लढविण्यासाठी लगबग सुरु केली आणि भले बाद का होईना पण अर्ज दाखल केला होता. निवडणूक लढविण्याचा छंद जोपासणाऱ्या पुणेकर आजोबा श्री. शामराव पिराजी कदम (वय-78) यांनी यापूर्वी 2 लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडणूक देखील लढवलेली आहे. श्री. शामराव पिराजी कदम हे प्राधिकरण निगडी येथे राहत आहेत. सन 1969 साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. सिव्हील पदवी प्राप्त केलेल्या श्री.कदम यांनी सन 1998 मधील लोकसभा निवडणूक लढवली होती. अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या त्यावेळी पंढरपूर मतदारसंघातून अखिल भारतीय हिंदू महासभाचे उमेदवार म्हणून श्री. शामराव पिराजी कदम यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांना 2984 इतकी मते मिळाली होती. तर सन 2009 मधील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक व तदनंतर सार्वत्रिक विधानसभा निवडणूक देखील अपक्ष म्हणून लढवली होती. सन 2009 मध्ये 44-सांगली लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन विजयी उमेदवार प्रतिक पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत श्री.कदम यांना 3926 मते मिळाली होती तर सन 2009 मध्ये 281-मिरज या राखीव विधानसभा मतदारसंघातून श्री.कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना केवळ 258 मते मिळाली होती. राज्यसभेसाठी मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरला असला तरी पुणेकर आजोबांना मात्र निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचा आनंद अधिक वाटतो. 
           दरम्यान, घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा शिवसेनेने आरोप केला असून भाजपने मात्र आपल्याकडे संख्याबळ पुरेसे असल्याचा दावा केला आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (मुंबई), माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (मोर्शी, अमरावती) आणि सहाव्या जागेसाठी साखर कारखानदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी भाजपतर्फे उमेदवारी दाखल केली. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल (भंडारा) यांचा अर्ज भरला. संजय राऊत (मुंबई) आणि संजय पवार (कोल्हापूर) यांचे अर्ज शिवसेनेने यापूर्वीच दाखल केले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. तर अर्ज मागे घेण्यासाठी ३ जून शेवटचा दिवस आहे. राज्यसभा निवडणुकीचे पसंतीक्रमाचे मतदान असते. पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे एक क्रमांक टाकायचा व दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावापुढे दोन व तीन क्रमांक टाकायचे अशा पद्धतीने आमदारांना मतदान करावे लागते. मतदानासाठी निवडणूक आयोगाने पुरवलेला जांभळ्या शाईचा स्केचपेन वापरावा लागतो. अन्य पेनने केलेले मतदान हे बाद ठरते. भाजपकडे स्वत:चे १०६, अपक्ष ५ आणि मनसे १ व जनसुराज्य १ असे ११३ संख्याबळ आहे. मविआकडे स्वत:चे १५२, अपक्ष ८ आणि छोटे पक्ष ११ असे १७१ संख्याबळ आहे. एमआयएम, सीपीआय असे ३ सदस्य तटस्थ राहू शकतात. भाजपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या १३ मतांची गरज आहे. आघाडीकडे तिसरा उमेदवार निवडून देऊन पहिल्या पसंतीची २६ मते शिल्लक आहेत. दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते प्राप्त करून तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांना जिंकून आणण्याची भाजपची रणनीती आहे. महाडिक आणि पवार दोघेही कोल्हापूरचे आहेत. माजी खासदार महाडिक हे साखर कारखानदार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार सामान्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळे महाडिक हे अपक्ष व छोट्या पक्षांना कसे गळाला लावू शकतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, ३ जून रोजी सायंकाळी निवडणूक होणार की बिनविरोध याविषयी चित्र स्पष्ट होईल. 
विधानसभा पक्षीय बलाबल- काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५३, शिवसेना ५५, भाजप १०६, अपक्ष १३, छोटे पक्ष - १६ (बविआ ३, सपा २, एमआयएम २, प्रहार २, मनसे १, सीपीआय १, स्वाभिमानी १, आरएसपी १, जनसुराज्य १, शेकाप १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १ )= एकूण - २८७
अपक्ष कुणाकडे ?- मविआ : मंजुळा गावीत (साक्री), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), आशिष जयस्वाल (नागपूर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), गीता जैन (मीरा- भाईंदर), राजेंद्र यड्रावकर (शिरोळ), संजय शिंदे (करमाळा).
भाजप : रवी राणा (बडनेरा), राजा राऊत (बार्शी), विनोद अग्रवाल (चंद्रपूर), प्रकाश आवाडे (इचलकरंजी).
छोटे पक्ष कुणाकडे ? महाआघाडी : बविआ (०३), समाजवादी (०२), प्रहार (०२), स्वाभिमानी (०२), आरएसपी (०१), शेकाप (०१), क्रांतिकारी शेतकरी पक्ष (०१)
भाजप : मनसे (०१), जनसुराज्य (०१).
तटस्थ : एमआयएम (०२), सीपीआय (०१).
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)