Wednesday, 28 September 2022

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण‘ चिन्ह गोठवण्याची शक्यता; शिंदे गटाचा ‘सिंह’, ‘वाघ’ चिन्हावर डोळा!

सत्तासंघर्षात धनुष्यबाणानंतर वाघ, सिंहाचा पर्याय!  


शिवसेनेतील बंडाळीमुळे निवडणूक आयोग प्राप्त परिस्थितीनुसार ‘धनुष्यबाण‘ चिन्ह गोठवण्याची शक्यता असल्याने शिंदेगटाकडून अन्य निवडणूक चिन्हाची चाचपणी करीत असून विशेषतः ‘सिंह’, ‘वाघ’ चिन्ह घेण्याचा कल व आग्रह निवडणूक आयोगाकडे धरणार आहे. मात्र अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांना सदरील चिन्ह वाटप केले असलेतरी महाराष्ट्रात ‘सिंह’, ‘वाघ’ चिन्ह मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. सद्यस्थितीत निवडणुक आयोगाकडून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (गोवा) आणि हिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (मेघालय) या पक्षांचे चिन्ह ‘सिंह’ आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (पश्चिम बंगाल) पक्षाचे चिन्ह ‘वाघ’ असे यापूर्वीच वाटप केलेले आहे. तरीही सदरील चिन्ह मिळू शकते कारण शिवसेनेचे देखील ‘धनुष्यबाण‘ चिन्ह झारखंड मुक्ती मोर्चाचे देखील चिन्ह धनुष्यबाण हेच आहे. शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे त्यामुळे नुकत्याच बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ‘धनुष्यबाण‘ चिन्ह वापरण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला होता. या निवडणुकीत शिवसेनेला निवडणूक आयोगने 'बिस्कीट' हे निवडणूक चिन्ह दिले आहे. परंतु शिवसेनेचा या चिन्हाला प्रारंभी विरोध होता. शिवसेनेला 'बिस्कीट' दिले अशी राजकीय हेटाळणी देखील त्यावेळी विरोधकांनी केली होती. देशभरात अनेक राजकीय पक्षांमध्ये राजकीय वर्चस्व व वारस कोण या वादातून फुट पडल्या आहेत त्यांचे वादविवादही निवडणूक आयोगाने गटांना मान्यता देऊन चिन्ह गोठवण्याची बहुतांश उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट स्वतःला फुटीर, गद्दार, बंडखोर या शब्दांना तीव्र विरोध करीत आहेत ते उठाव शब्दाचे समर्थन करीत आहेत कारण मूळ शिवसेना पक्ष आमचाच असा दावा केला जात आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणतीही स्थगिती नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पुढील कार्यवाही सुरू करू शकणार आहे. शिवाय शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय आता निवडणूक आयोग घेऊ शकणार आहे. आजपर्यंतच्या अशास्वरूपाच्या वादविवाद मध्ये पक्षाचे नाव तेच ठेवून गट वेगवेगळे अशी पक्ष नोंदणीला मान्यता दिली आहे. शिंदे गटाला देखील पक्षाचे नाव शिवसेना पाहिजे कारण पुढील राजकीय कारकीर्द वाटचालीस उपयुक्त आहे.   पसंतीने अन्य चिन्ह मिळाले तरी चालेल अशी धारणा शिंदे गटाची आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी मित्र पक्ष भाजप यासाठी सर्व मुत्सद्देगिरीची रसदपुरवठा करीत आहे. 
       निवडणुका आणि पक्ष चिन्ह, पक्ष चिन्हाचा मतदानावरील प्रभाव, नवखे चिन्ह आणि आगामी निवडणुकांमधील वाटचाल, पक्ष फुटीरता, बंडखोरी आणि यापूर्वीचे वादविवाद, चिन्ह वाटप कायदा नियम, राजकीय पक्ष नोंदणी व मान्यता, नियम आदी विस्तृतपणे मंथन करण्याचे स्वतंत्र विषय आहेत. महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक चर्चिला जाणारा एकमेव विषय तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची? शिंदे गट ‘धनुष्यबाण‘  चिन्ह मिळवणार कि नाही असे प्रश्न चर्चिले जात आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा पोट निवडणूक होणार आहे यामध्ये शिंदे गटाला निवडणूक चिन्ह घ्यावे लागेल त्यामुळे कमी कालावधीत निवडणूक आयोगाला सुनावणी घेऊन निर्णय प्रक्रिया राबविणे क्रमप्राप्त झाले आहे. दोन्ही बाजूने पक्षावर प्रतिनिधी समसमान अथवा 50 टक्केच्या आसपास बहुमत कागदोपत्री दर्शवले तरी ‘धनुष्यबाण‘ चिन्ह गोठवणेची कार्यवाही निवडणूक आयोग करेल अशी शक्यता मागील काही निर्णयांवरून वर्तवली जात आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवले तर नवीन चिन्हासह आगामी निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. वादविवाद न करता सामंजस्य दाखवावे, नवीन पक्ष काढावा, वेगळी वाट धरावी असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी शिंदे गटाला केले याचा अर्थ पुढील काळातील घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज येतो. महाराष्ट्रातील राजकारणावर शिवसेनेचा पक्षांतर्गत वादाचा विपरीत दूरगामी परिणाम होणार आहे. सत्ता हस्तगत करणे आणि शिवसेना राजकीय पक्ष देखील बळकावणे ही कृती मतदारांना कितपत पचनी पडेल तसेच याचा शिंदे गटाला आगामी काळात कितपत लाभ होतो हे मतदानातून दिसून येईलच मात्र या वादाचा खरा लाभ कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार हे देखील आगामी काळातील निवडणुकांमधील निकालावरून दिसून येईल. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा असून उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेसाठी झटका आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. त्यानंतर निवडणूक आयोग त्यांच्या प्रक्रियेप्रमाणे हे ठरवेल की, चिन्ह कोणाला जाईल आणि पक्ष कोणाचा आहे. निवडणूक आयोग आणि घटनेतील १०वी सूची याचा काहीही संबंध नाही. निवडणूक आयोग हे राजकीय पक्षाबाबत निर्णय देणारी स्वायत्त संस्था आहे. तर घटनेतील १० वी सूची ही केवळ पक्ष सदस्यापुरती आहे. त्यामुळे पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोग पुढे जाऊन आपली कारवाई करु शकते.
निवडणूक चिन्ह हा राजकीय पक्षाचा आत्मा आहे. मतदार पक्षाचे चिन्ह बघून मतदान करतो. भारतात पहिली अधिकृत निवडणूक 1952 साली लढवली गेली आणि तेव्हापासून निवडणूक चिन्हे अस्तित्वात आहेत. ती बहुसंख्य अशिक्षित असलेल्या भारतीय मतदारांना राजकीय पक्ष ओळखणे सोपे जावे म्हणून तेव्हापासून निवडणूक चिन्हे अस्तित्वात आली. मात्र निवडणूक चिन्हांबाबतचा अधिकृत कायदा (Election Symbol) 1968 साली अस्तित्वात आला. त्यानंतरही निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगानी वेळोवेळी अनेक निर्णय घेतले. निवडणूक चिन्ह म्हणून पशुपक्षी किंवा माणूस चिन्ह म्हणून वापरण्यावर सध्या प्रतिबंध आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या चिन्हाचा देखील इतिहास मनोरंजक असा आहे. कॉंग्रेस, भाजप व अन्य पक्षांना वेगवेगळी चिन्ह मिळाली होती त्यामुळे शिवसेनेवर दुसरे चिन्ह घेण्याची वेळ आली तरी सदर असामान्य क्रिया नाही. काँग्रेस हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बैलजोडी हे निवडणूक चिन्ह स्वीकारले होते. त्यानंतर काँग्रेसने हे चिन्ह बदलून इंदिरा कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात गाय-वासरू हे चिन्ह घेतले. त्यानंतर 1980 मध्ये काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यावर गाय-वासरू हे चिन्ह काढल्याने इंदिरा काँग्रेसने ‘हाताचा पंजा’ हे निवडणूक चिन्ह स्वीकारले. चिन्हे त्या राजकीय पक्षांची बोध चिन्हे होतात. अशा राखीव चिन्हांचा फायदा राजकीय पक्षाला आणि त्यांच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मिळतो. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये स्थापित केलेले भारतीय जनसंघ हेच वर्तमानाचे भाजप आहे. त्या वेळी भारतीय जनसंघाचे निवडणूक चिन्ह 'दिवा' पणती असे होते. 1977 मध्ये भारतीय जनसंघाला जनता पक्ष असे म्हटले गेले आणि त्यांचे निवडणूक चिन्ह 'हलधर शेतकरी' झाले. 1980 मध्ये पक्षाचा स्वरूप भाजप बनला, आणि याचे निवडणूक चिन्ह कमळ हे निश्चित केले गेले. तर निवडणूक आयोगाने स्वीकारलेले, डाव्या बाजूला पाहणारा हत्ती बसपाचा प्रतीक आहे. पक्ष, आसाम आणि सिक्कीम व्यतिरिक्त संपूर्ण देशात या निवडणूक चिन्हाने निवडणूक लढते. तरी सध्या या दोन राज्यांमध्ये बसपाचा कोणताही हस्तक्षेप नाही. त्यामुळे आसाम आणि सिक्कीमसाठी पक्षाचे निवडणूक चिन्ह आतापर्यंत निश्चित केले गेले नाही. बाली-कोयता - सीपीआयचे निवडणूक चिन्ह बाली-कोयता 1952 पासून वर्तमानापर्यंत तेच आहे. तथापि या पक्षात देखील तूट पडली आणि एक नवीन गट मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तयार झाले, जे 1967 पासून निवडणुकीत सहभागी होत आहे. एआयएडीएमकेचा निवडणूक चिन्ह 'दोन पाने' आहे. या चिन्हाचा एक विशेष इतिहास आहे. 1987 मध्ये एमजी रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर जानकी रामचंद्रन आणि जयललिता यांच्यात एआयएडीएमकेबद्दल गोंधळ झाला. म्हणून, निवडणूक आयोगाने एमजीआर उत्तराधिकारी म्हणून दोघांनाच पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास अयोग्य ठरवले. परिणामस्वरूप दोघांना वेगळे-वेगळे निवडणूक चिन्ह देण्यात आले. जानकी रामचंद्रन यांना 'दोन कबूतर' आणि जयललिता ग्रुपला 'आरवत असलेला कोंबडा' हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. तथापि, द्रमुकच्या उदयानंतर हा मुद्दा सोडला गेला आणि 1989 मध्ये जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षाला 'दोन पानांचे' निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. पक्ष चिन्हासाठीही देशात अनेक वाद झालेले आहेत. अलिकडील काळात झालेला वाद 2021 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतला आहे. रामविलास पासवान यांनी स्थापन केलेल्या लोकजनशक्ती पार्टीत बंडाळी माजली. पासवान यांचा मुलगा चिराग पासवान आणि प्रतिस्पर्धी गट पशुपती पारस यांच्यात भांडण सुरू झाले. चिन्हाचा वाद जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेला तेव्हा त्यांनी काढलेला तोडगा असा होता, पक्षाचे झोपडी हे अधिकृत चिन्ह कुणालाच न देता त्यांनी पासवान गटाला हेलिकॉप्टर आणि पशुपती गटाला शिवणयंत्र हे चिन्ह दिले. राजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्हे देखील मिळतात. पेचप्रसंगावेळी निवडणूक चिन्ह नियम, १९६८ नुसार उतारा १२ मधील तरतुदी अंतर्गत ज्या पक्षाला निवडणूक चिन्ह नाकारण्यात आले आहे त्यांना स्वतंत्र निवडणूक चिन्हांच्या यादीमधील एखादे चिन्ह निवडणूक आयोगामार्फत देण्यात येईल. समाजवादी पार्टी आणि तेलगु देसम पार्टीचे निवडणूक चिन्ह सायकल आहे तसेच जम्मू आणि काश्मीर मधील नॅशनल पँथर्स पार्टीचे देखील निवडणूक चिन्ह सायकल आहे. तर मणिपूर मधील मणिपूर पीपल्स पार्टी आणि केरळमधील केरळ कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह देखील सायकल होते. परंतु आता दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या सक्रीय नाहीत.एवढेच नाही तर भारतातील अजून ६ राजकीय पक्ष विविध राज्यात ३ समान निवडणूक चिन्हांसह अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि झारखंड मधील शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही पक्षांचे चिन्ह धनुष्यबाण आहे. मायावतींची बहुजन समाज पार्टी आणि आसाम मधील असोम गाना परिषद या दोन्ही पक्षांचे चिन्ह हत्ती आहे. केरळ मधील केरळ कॉंग्रेस एम (प्रादेशिक पक्ष) आणि दिवंगत नेत्या जयललिता यांचा ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्रा काझागम (एआयएडीएमके) या दोन्ही पक्षांचे चिन्ह झाडाची दोन पाने आहेत. एकापेक्षा जास्त राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह समान असणे ही गोष्ट तशी सामान्य आहे. बिहार विधानसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत लोकजनशक्ती पक्षातील गटांमधील वादावर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने चिराग पासवान व पशुपती कुमार पारस यांच्या गटांना ‘बंगला’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह वापरण्यास बंदी घातली आहे. निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाला देण्यात आलेले प्रमाणित चिन्ह आहे. निवडणूक नियम १९६१ नुसार, निवडणूक आयोग राजकीय पक्षांची नोंदणी करून त्यांना राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष अशी मान्यता देतो; व इतर पक्ष केवळ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले पक्ष म्हणून घोषित केले जातात. या मान्यतेमुळे अशा पक्षांना चिन्ह मिळते, राष्ट्रीय दूरचित्रवाणी आणि नभोवाणीवर राजकीय प्रक्षेपण व मतदार याद्या मिळणे यांसारखे अधिकार प्राप्त होतात. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) (सुधारणा) आदेश, २०१७ नुसार निवडणूक चिन्हांचे २ प्रकारांत वर्गीकरण केले जाते. अ) राखीव चिन्हे- भारतातील ८ राष्ट्रीय पक्ष व ६४ राज्य पक्षांना ही राखीव चिन्हे देण्यात आली आहेत. ब) मुक्त चिन्हे- देशात २५३८ अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष असून या पक्षांच्या उमेदवारांसाठी ही चिन्हे असतात. आदेशाच्या परिच्छेद १५ नुसार,मान्यताप्राप्त राजकीय पक्षात फूट पडल्यास व दोन्ही प्रतिस्पर्धी गटांनी एकाच चिन्हावर दावा केल्यास यासंबंधीच्या विवादावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगास देण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगास संबंधित पक्षाचे चिन्ह गोठविता येते अन्यथा फुटीरगटाला दुसरे चिन्ह देण्याचे अथवा कोणते चिन्ह द्यायचे यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आयोगाचा निर्णय अशा सर्व राष्ट्रीय आणि राज्य पक्षांमधील विवादांना बंधनकारक असतो. १९७१ च्या सादिक अली आणि इतर विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने याचे समर्थन केले आहे. पक्षातील फूट आणि विलीनीकरण यासंबंधीच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे निवडणूक आयोग एकमेव प्राधिकरण आहे. नोंदणीकृत परंतु अमान्यप्राप्त पक्षांच्या विभाजनासाठी निवडणूक आयोग प्रतिस्पर्धी गटांना त्यांचे मतभेद आंतरिक पद्धतीने सोडविण्याचे किंवा न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जातो.
      एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी अधिकृतपणे पक्षात फूट पडल्याचे मान्य केले तर चिन्हाचा वाद निर्माण होऊ शकेल. आणि तेव्हा निर्णय निवडणूक आयोगच घेईल. अनेकदा निवडणूक आयोग दोन्ही पक्षांना दोन वेगळी चिन्ह नेमून देऊ शकते. शिवसेना या पक्षात प्रतिनिधी सभा हा एक सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. या सभेत पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आमदार आणि सर्व खासदार यांचा समावेश होतो. ही सभा शिवसेनाप्रमुख, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या १९ सभासदांपैकी १४ सदस्य, २१ उपनेत्यांपैकी १९ उपनेते यांची नेमणूक करते. प्रतिनिधी सभेच्या सर्व बैठकींच्या अध्यक्षस्थानी शिवसेनाप्रमुख असतात. म्हणजे ज्याच्या हाती प्रतिनिधी सभा त्याच्या हातात पक्ष अशी स्थिती ही घटना निर्माण करते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिनिधी सभा शिवसेनाप्रमुखांची नेमणूक करते; पण त्यांना काढून टाकण्याचा अधिकार घटनेने या सभेला दिलेला आहे, असे दिसत नाही. शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेनाप्रमुख हे या पक्षातील सर्वोच्च व सर्वशक्तिमान पद आहे. इतर पक्षांशी बोलणी करण्याचा सर्वाधिकार घटनेने शिवसेनाप्रमुखाला दिलेला आहे. त्याचप्रमाणे शिस्तभंगविषयक कार्यवाहीचे अंतिम अधिकारही शिवसेनाप्रमुखाला असतात. नियुक्त पदाधिकाऱ्याला पक्षातून काढून टाकणे व शिस्तभंगाच्या कार्यवाहीद्वारे कोणत्याही पदाधिकाऱ्याचे सदस्यत्व निलंबित करण्याचे अधिकार शिवसेनाप्रमुखाला आहेत. सध्यापर्यंत तरी बहुतेक पदाधिकारी, फुटीर आमदार वगळता, शिवसेनाप्रमुखांसोबतच असल्याचे दिसून येते. तसेच सर्वांत महत्त्वपूर्ण घटक असलेली प्रतिनिधी सभा हीदेखील शिवसेनाप्रमुखांसोबत असल्याचे मानले जात आहे. जे पदाधिकारी फुटिरांसोबत जातील त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करून त्यांना निलंबित केले जाऊ शकते. आता तर शिंदे गटाने पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीच बरखास्त केलेली आहे. पक्षाची घटना लक्षात घेतली तर शिंदे गटाची ही कार्यवाही अनधिकृत म्हणूनच हास्यास्पद आहे. कारण कार्यकारिणी बरखास्तीचा अधिकार घटनेप्रमाणे कोणालाही नसल्याचे दिसून येते. उलट कार्यकारिणीवरील १९ सदस्यांपैकी ५ सदस्य नेमण्याचे अधिकार शिवसेनाप्रमुखांना असतात. उर्वरित सदस्य हे प्रतिनिधी सभा निवडते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीची बरखास्ती आणि नव्याने निवड या बाबी विवादास्पद आहेत. शिवसेनेचे पक्ष चिन्ह मिळविण्यासाठी शिंदे यांना आमदारांव्यतिरिक्त पक्षाचे नेते, उपनेते, सचिव, प्रवक्ते, लोकसभा खासदार, राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर यांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. याशिवाय युवासेना, महिला आघाडी, भारतीय कामगार सेना या पक्षीय आघाड्यांचाही पाठिंबा मिळवावा लागणार आहे. पक्षाचे चिन्ह मिळविण्यासाठी शिंदे यांना संघटना आणि विधानमंडळातील अर्ध्याहून अधिक लोकांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. सध्या शिवसेना संघटनेत सेना अध्यक्ष, युवा सेना अध्यक्ष, नेत्यांची संख्या-19, उपनेत्यांची संख्या-32, सचिव-5, प्रवक्ते-11, लोकसभा खासदार-19, राज्यसभा खासदार-3, विधानसभा सदस्य-55, विधानपरिषद सदस्य-14, महापौर-5 आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी यांच्या संख्याबळ तुलनेत निम्याहून जास्त पाठींबा मिळवणे अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण पक्षावर ताबा नाही मिळवला तरी पन्नास टक्क्यांपर्यंत फुट झाल्याचे शिंदे गट सहज सिद्ध करू पाहत आहे कारण पक्षाचे साम्य नाव प्राप्त करून गद्दार ऐवजी उठाव शब्द मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी राजकीय धडपड आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 


Wednesday, 21 September 2022

राज्यात सर्वाधिक जागा भाजपकडे तर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

राज्यात सर्वाधिक जागा भाजपकडे तर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व


राज्यातील 16 जिल्ह्यांतील 608 पैकी 547 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. राज्यातील एकूण 608 पैकी 61 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. 259 हून अधिक ठिकाणी भाजपने विजय मिळवल्याचा दावा भाजपने केला आहे. पुणे जिल्ह्यात आज ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या ६१ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर ५५ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. या निकालात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनेच वर्चस्व राखले असल्याचे स्पष्ट झाले. एकूण ६१ पैकी ६ बिनविरोध- एकूण ५५ ग्रामपंचायत निकालमध्ये शिवसेना - ०३, शिंदे गट - ०३, भाजपा - ०३, राष्ट्रवादी काँग्रेस - ३०, अपक्ष - १६ असे बलाबल आहे.  जिल्ह्यात शिंदे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे पहायला मिळत आहे. भोर तालुक्यात 2 ग्रामपंचायत निवडणूक निकालात दोन्ही निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागलेत. खेड तालुक्यात 5 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 1 बिनविरोध झाली, तर 4 ठिकाणी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादीला 1, शिवसेनेकडे 1 आणि अपक्षांकडे 2 ग्रामपंचायतीची सत्ता आली. येथे भाजपला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. कोयाळी - अपक्ष, रोहकल - शिवसेना, चिखलगाव - राष्ट्रवादी, खरपुड - अपक्ष, दरकवाडी - अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. दरकवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले असून, जनतेतून सरपंच निवडीत एकमताने सीमा प्रभू पाचंगे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी अरविंद बाळासाहेब पानमंद, अलका किसन मोहन, सुनंदा रामचंद्र सुपे, केतन विठ्ठल लगड, भाग्यश्री दिनेश पानमंद, कृष्णा सावळेराम वाजे व सुभद्रा दत्तात्रेय पोखरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. आंबेगाव तालुक्यात झालेल्या १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस, ३ शिंदे गट तर १ भाजपाच्या ताब्यात असल्याचा दावा संबंधित पक्षांनी केला आहे. १८ पैकी १४ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायतींमध्ये आंबेगाव गावठाण, थोरांदळे, गंगापुर बुद्रुक, पिंपळगाव तर्फे घोडा, राजपूर, माळीण, शिनोली, आसाणे, कोंढवळ, ढाकाळे, पोखरी, जांभोरी, तिरपाड, फदालेवाडी / उगलेवाडी यांचा समावेश आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील पुरस्कृत शिंदे गटाकडे वडगाव काशिंबेग, पंचाळे बुद्रूक, वाळुंजवाडी यांचा समावेश आहे तर भाजपाकडे राजेवाडी ग्रामपंचायत असल्याचा दावा संबंधित पक्षांनी केला आहे. ग्रामपंचायतीत वर्चस्वाची लढाई असलेल्या आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे, तर भाजप आणि शिंदे गटासह शिवसेनेलाही आंबेगाव तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. शिंदे गटाला केवळ तीन ग्रामपंचायतींवर यश मिळाले आहे तर भाजपला केवळ एका ग्रामपंचायतीवर यश मिळवता आले असून शिवसेना आणि काँग्रेसला आंबेगाव तालुक्यात खातेही उघडता न आल्याने शिवसेनेला आणि काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला असून या निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्या गटाचे वर्चस्व आहे. तर भाजप, शिंदे गट आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेला २ तर भाजपला २ ग्रामपंचायतीवर यश मिळाले असून स्थानिक आघाडीला ११ ठिकाणी यश मिळाले आहे तर अपक्षांना ३ ठिकाणी यश मिळाले असून ठिकाणी काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. 
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींचे नाव, निवडणूक आलेल्या सरपंचाचे नाव व सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे-
शिनोली : सरपंच मंगेश सखाराम पारधी, सदस्यपदी मीरा तुकाराम काळे, सुवर्णा अरुण सरोदे, संतोष बबन बो-हाडे, नीता गंगाराम काळे, केशव लक्ष्मण कडाळे, सुजाता लहू बोऱ्हाडे, रवींद्र बच्चू पवार, आशा गणेश सोमवंशी, शकुंतला सुदाम काळे, सुनील सोमा काळे, गणेश चंद्रकांत बोऱ्हाडे.
पिंपळगाव तर्फे घोडा : सरपंच सायली ज्ञानेश्वर लाडके, सदस्यपदी मनीषा संजय लोहकरे, दिलीप सावळेराम काळे, अश्विनी संतोष पोखरकर, निशा विष्णू बोऱ्हाडे, प्रसाद विठ्ठल जोशी, सायली ज्ञानेश्वर लाडके, अश्विनी प्रफुल्ल लाडके, लक्ष्मण पांडुरंग वागदरे, प्रवीण बाळासाहेब ढमढेरे.
पंचाळे बुद्रुक : सरपंच संगीता सुरेश किर्वे, सदस्यपदी समीर मच्छिंद्र गारे, पूजा राजू गोनटे, दीपाली राजेंद्र भालेराव, सविता तानाजी जढर, सुरेश नामदेव किर्वे, रामचंद्र दगडू तारडे तर एक जागा रिक्त राहिली.
राजपूर : सरपंच चंद्रकांत दगडू लोहकरे, सदस्यपदी प्रकाश राहू लोहकरे, कमल ज्ञानेश्वर लोहकरे, ठकुबाई रघुनाथ शेळके, गोरक्षनाथ भीमा वायाळ, प्रवीण लक्ष्मण उंडे, मोनिका गोटिराम लोहकरे तर एक जागा रिक्त
ढाकाळे : सरपंच धोंडिबा दारकू लांघी, सदस्यपदी अक्षय शांताराम जंगले, ज्योती सागर काळे, विजय विठ्ठल अंकुश, भारती ईश्वर डामसे, सविता जगन काळे, एकनाथ नंदाराम सुपे तर एक जागा रिक्त राहिली.
तिरपाड : सरपंच सोमा भीमा दाते, सदस्यपदी सारिका शंकर पारधी, देवकाबाई देवराम हिल, नामदेव गिरजू दाते, सीताराम देवजी गवारी, दीपक बाबू मेमाने, विमल रामचंद्र गवारी, शैला धोंडू आंबवणे, दत्तू सखाराम आंबवणे तर एक जागा रिक्त राहिली.
गंगापुर बुद्रुक : सरपंच मंगल चिंतामण केदारी, सदस्यपदी सारिका राजेंद्र केदारी, संतोष महादेव भवारी, शोभा गणेश लोहोट, कविता राहुल केदारी, कोमल धनंजय येवले, संदीप प्रभाकर येवले, निलम दत्तात्रय लोहोट, लक्ष्मण आबाजी कोंढावळे, बाळू दत्तात्रय आवटी.
पोखरी : सरपंच हनुमंत सोमाजी बॅढारी, सदस्यपदी दीपक बबन भागित, आदिनाथ चिंधू भेंडारी, पार्वता बाळू बेंढारी तर एकूण चार जागा रिक्त राहिल्या.
माळीण : सरपंच रघुनाथ दगडू झांजरे, सदस्यपदी नामदेव पुनाजी असवले, रेवुबाई चंद्रकांत असवले, प्रमिला मच्छिंद्र लेंभे, भामाबाई हरिश्चंद्र झांजरे, शिवाजी विठ्ठल लेंभे, हेमा नामदेव भालचिम, कविता चंद्रकांत मोहांडुळे.
कोंढवळ : सरपंच सविता काळू कोकाटे, सदस्यपदी लक्ष्मी दत्तात्रय लोहकरे, सुरेखा विनायक लोहरके, नितीन दुंदा लोहकरे, सविता रमेश दाते, इंदुबाई नामदेव कवटे, नामदेव पांडुरंग कोंढवळे, यशोदा बाळू कोंढवळे, शंकर दारकु केदारी, सागर ज्ञानेश्वर कोकाटे.
जांभोरी : सरपंच सुनंदा विठ्ठल पारधी सदस्यपदी मनीषा अंकुश केंगले, श्वेता किसन गिरमे, बबन किसन केंगले, नानुबाई चंद्रकांत साबळे, लता शांताराम केंगले, सुनील बबन पारधी, भोराबाई मारुती केंगले, शिवराम नामदेव केंगले, दुंदा लक्ष्मण कोकोटे.
उगलेवाडी/फदालेवाडी : सरपंच विनोद वसंत उगले, सदस्य विलास गेणभाव उगले, सुरेखा सुनील फदाले, उज्ज्वला बाळासाहेब तातळे, भरत मारुती फदाले, स्वाती लक्ष्मण भवारी, सचिन ज्ञानेश्वर उगले, मंगल सुभाष शिंगाडे.
आंबेगाव गावठाण : सरपंच प्रमिला गणेश घोलप, सदस्य युवराज बबन तारडे, अनिता सचिन विरणक, विजय गेणभाव घोलप, विनोद सुनील काठे, परविन राजू पानसरे, पूनम कुमार घोलप, मिलिंद रमशे भांगरे
वाळूजवाडी : सरपंच नवनाथ चिंतामण वाकुंज, सदस्य रक्मिणी पुनाजी खंडागळे, सुवर्णा संतोष चौगुले, कांताराम सोमा कडाळे, यशोदा मारुती वाळुंज, मयूर जिजाबा गायकवाड, संदीप सुदाम पवार, सोनाली सुनील वाळुंज.
वडगाव काशिंबेग : सरपंच सौरभ संभाजी पोखरकर, सदस्य सुजाता विजय भूते, आशा नामदेव वाळुंज, योगेश विजय पिंगळे, कल्पना राजू कडधेकर, सुप्रिया बाळासाहेब पिंगळे, गणेश लक्ष्मण खिरड, भाऊ दत्तात्रय डोके, रेश्मा संदीप दैने, सुजाता संजय वायकर.
थोरांदळे ग्रामपंचायत सर्व बिनविरोध झाली. यामध्ये सरपंचपदी जिजाभाऊ ज्ञानेश्वर टेमगिरे, सदस्यपदी संजय वसंत टेमगिरे, रोहिणी योगेश टेमगिरे, नितीन नारायण फुटाणे, चंद्रकला दत्तात्रय बारवकर, यमुना धनंजय टेमगिरे, संदीप विलास टेमगिरे, अलका मधुकर विश्वासराव, मनीषा संजय मिंढे, विक्रम विठ्ठल टेमगिरे निवड झाली.
राजेवाडी ग्रामपंचायत सर्व बिनविरोध झाली. यामध्ये सरपंचपदी शुभांगी नीलेश साबळे, सदस्यपदी दत्तात्रय यशवंत शिंदे, मंदा सुनील गभाले, सुनील सखाराम उंडे, गणेश काशिनाथ म्हसळे हे बिनविरोध तर तीन जागा रिक्त राहिल्या.
जुन्नर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी मतदान घेण्यात आले. तालुक्यातील खानगाव, तेजूर व माणिकडोह या तीन ग्रामपंचायती आणि सुराळे, तेजूर, माणिकडोह व खानगाव या चार ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे सरपंचपदाच्या ३२ जागांसाठी १२७ उमेदवार; तर ३३ ग्रामपंचायतीच्या १०० प्रभागातील १०९ सदस्यांसाठी २९१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मढ, घाटघर, आपटाळे, उंडेखडक, हडसर, भिवाडे बुद्रुक, इंगळूण, मंगरूळ, चिल्हेवाडी दातखिळवाडी व आपटाळे या ११ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी सरळ लढत झाली. सरपंचपदासाठी सर्वाधिक उमेदवार खुबी- १०, तळेरान- ९, अंजनावळे- ८, जळवंडी व उच्छिल- ७ व आंबोली- ६ या गावात होते. निवडणुका झालेल्या बहुतेक ग्रामपंचायती आदिवासी भागातील आहेत. तालुक्यातील मढ, खुबी, कोपरे, तळेरान, सितेवाडी, घाटघर, अजनावळे, जळवंडी, उंडेखडक, राजुर, पूर, अंबोली, आपटाळे, खानगाव, घंगाळदरे, तांबे, मांडवे, पिंपळगावजोगा, पारगाव तर्फे मढ, देवळे, हडसर, गोद्रे,उच्छिल, तेजुर, इंगळून, भिवाडे बुद्रुक, सोनावळे, सुराळे, कोल्हेवाडी, चिल्हेवाडी, माणिकडोह, काळवाडी, दातखिळेवाडी, उंब्रज नंबर २, येणेरे, विठ्ठलवाडी, मंगरूळ, झापवाडी आणि यात नव्याने स्थापित झालेल्या झाप व विठ्ठलवाडी दोन ग्रामपंचायतीसाठी निवडणुका संपन्न झाल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील एकूण 36 ग्रामपंचायती पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर आदिवासी भागातील 33 ग्रामपंचायती पैकी 4 ग्रामपंचायतीमध्ये आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. एकुण ग्रामपंचायत-36, भाजप-4, एनसीपी आणि इतर- 32 असे बलाबल आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

Tuesday, 6 September 2022

APMC Election : राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

APMC Election : राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर


राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणूकीस पात्र 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम (APMC Election) जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया बुधवार 7 सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. ज
गदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. सरकारच्या बदलत्या धोरणानुसार यंदा सभापतींची निवड होणार असल्याने या निवडणूकांना मिनी विधानसभा निवडणूकांचे स्वरुप येणार असल्याचे चित्र आहे. तर कोर्टाच्या निर्देशानुसार राज्यातील 6 बाजार समित्यांची निवडणूक ही 18 व 19 डिसेंबरलाच होणार आहे.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. असे असले तरी 281 बाजार समित्यांची निवडणूक ही 17 जानेवारी रोजी तर उर्वरित 6 बाजार समित्यांची निवडणूक ही 18 व 19 डिसेंबरला होणार आहे. कोर्टाने तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये ज्याचे नावे सातबारा उतारा आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला सहभाग घेता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करणारा हा जनतेमधून निवडूण आलेला असणे गरजेचे असल्याचे म्हणत सरकराने थेट शेतकऱ्यांमधून सभापतीची निवड असा निर्णय घेतला होता. पण यावर एका शेतकऱ्याने याचिका दाखल केली होती. त्यानुसार आता बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून यावरच निवडणूका थेट शेतकऱ्यांमधून की सभासदांमधून हे स्पष्ट होणार आहे.
       प्राधिकरणाने 6 आणि 21 ऑक्टोबर 2021 रोजीच्या आदेशानुसार निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केल्या होत्या. मात्र, कृषी पत संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर 13 याचिका दाखल झाल्या होत्या. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणूकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका तातडीने पूर्ण करुन त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका पूर्ण करण्याबाबत 18 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश दिले. त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने आज निवडणूक कायक्रम जाहीर केला आहे. बाजार समितीच्या निवडणूकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची 27 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक,(APMC Election ) सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी 7 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झालेल्या (Election Program) असता उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत व धारुर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणूका 2 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशानुसार सुरु केलेल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे 18 डिसेंबर व 19 डिसेंबर 2022 रोजी होणार असल्याची माहितीही डॉ.पाटील यांनी दिली आहे.

मतदार यादी व निवडणू‍क कार्यक्रम

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सुची मागवणे- 27 सप्टेंबर 2022 पर्यंत, प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरीता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे- 3 ऑक्टोबर 2022, बाजार समिती सचिवाने नमुना 4 मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करणे- (APMC Election ) 3 ते 31 ऑक्टोबर 2022, बाजार समिती सचिवाने नमुना 4 मधील प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांच्याकडे सादर करणे- 1नोव्हेंबर 2022, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे- 14 नोव्हेंबर 2022, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप/ हरकती मागवणे- 14 ते 23 नोव्हेंबर, प्राप्त आक्षेप/हरकतींवर निर्णय घेणे- 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे- 7 डिसेंबर 2022

निवडणू‍क कार्यक्रम

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे- 23 डिसेंबर 2022, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी- 23 ते 29 डिसेंबर 2022, नामनिर्देशनपत्रांच्या छाननीचा दिनांक- 30 डिसेंबर 2022, छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीचा दिनांक- 2 जानेवारी 2023, उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी- 2 ते 16 जानेवारी 2023, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करण्याचा दिनांक- 17 जानेवारी 2023, मतदान- 29 जानेवारी रोजी आणि मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येतील, असे निवडणूक कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

Friday, 29 July 2022

पुणे महानगरपालिका निवडणुक-2022; ओबीसी प्रवर्गासाठी सोडत जाहीर; 29 प्रभागांमध्ये महीलाराज

34 लाख 54 हजार 662 मतदार ठरवणार 173 नगरसेवकांचे राजकीय भवितव्य

पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक-2022 करीता बहुप्रतीक्षित अंतिम मतदारयादी अखेर पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून 58 प्रभागांमधून एकूण जागा १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत यामध्ये महिला नागसेविकांची संख्या ८७ इतकी राहणार आहे. या 173 नगरसेवकांचे राजकीय भवितव्य 34 लाख 54 हजार 662 मतदार ठरवणार आहेत. सर्वात कमी मतदारसंख्या असलेला प्रभाग क्र. 24 मगरपट्टा - साधना विद्यालय हा प्रभाग असून यामध्ये एकूण मतदारांची संख्या केवळ 33 हजार 825 इतकी आहे. तर सर्वाधिक जास्त मतदारसंख्या असलेला प्रभाग क्र. 12 औंध - बालेवाडी हा प्रभाग असून यामध्ये एकूण मतदारांची संख्या केवळ 82 हजार 504 इतकी आहे. 3 प्रभागांमध्ये 20 हजारांच्या आत महीला मतदारांची संख्या आहे. सर्व प्रभागांमधील एकूण मतदारसंख्या 34 लाख 54 हजार 662 इतकी असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 18 लाख 05 हजार 556 इतकी तर महीला मतदारांची संख्या 16 लाख 48 हजार 862 इतकी आहे तसेच तृतीयपंथिय मतदारांची संख्या 244 इतकी आहे. 8 प्रभागांमध्ये तृतीयपंथिय मतदारांची संख्या शून्य असून 46 प्रभागांमध्ये 1 ते 10 इतकी अल्प संख्या असून 2 प्रभागात अनुक्रमे 43 व 28 अशी सर्वाधिक तृतीयपंथिय मतदारांची संख्या आहे. एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत पुरुष मतदारांपेक्षा केवळ 1 लाख 56 हजार 694 इतकी कमी महीला मतदारांची संख्या आहे. एकूण महीला मतदारांची संख्या 16 लाख 48 हजार 862 इतकी आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून निवडणूक पूर्व तयारी सुरू असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी ३५ हजार एवढे मनुष्यबळ लागणार आहे. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीवेळी शहरात ३ हजार ४०० मतदान केंद्रे होती. गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या हद्दीत आसपासच्या ३४ गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेची हद्दही वाढली आहे. तसेच मतदारसंख्याही वाढली आहे. शहरातील ३४ लाख ५४ हजार 662 मतदार निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. ही बाब लक्षात घेता चार हजार मतदान केंद्रांची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने ५८ प्रभागांची १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागणी करण्यात आली असून मतदान केंद्रांसाठी शाळा, शासकीय कार्यालये आणि अन्य जागांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही येत्या काही दिवसांत दिले जाणार आहे. 

पुणे महापालिका अंतिम यादीनुसार मतदारसंख्या

प्रभाग क्र.

पुरुष

महीला

इतर

एकूण

1

26302

24295

0

50597

2

23950

21882

4

45836

3

38943

34866

28

73837

4

37396

29765

1

67162

5

40957

35249

4

76210

6

26081

23270

2

49353

7

31372

30090

4

61466

8

24372

23439

5

47816

9

35094

33067

3

68164

10

30204

29093

5

59302

11

30718

29988

2

60708

12

43223

39278

3

82504

13

36653

28836

1

65490

14

35053

29727

1

64781

15

32407

32533

1

64941

16

32098

33390

0

65488

17

31570

32977

0

64547

18

33305

34450

1

67756

19

24700

24827

5

49532

20

27617

26941

1

54559

21

32875

28492

0

61367

22

34049

29723

9

63781

23

27711

25135

2

52848

24

17966

15859

0

33825

25

24972

23176

7

48155

26

30094

26850

14

56958

27

30323

28973

1

59297

28

29483

29032

1

58516

29

30618

30801

4

61423

30

37189

32933

1

70123

31

29193

28253

1

57447

32

24822

23325

1

48148

33

28734

28551

0

57285

34

34289

30219

2

64510

35

39107

34344

4

73455

36

32605

28834

5

61444

37

34662

31864

1

66527

38

34115

33906

7

68028

39

29609

27922

3

57534

40

25086

24443

13

49542

41

39424

35370

1

74795

42

25391

23064

0

48455

43

31586

29464

2

61052

44

24577

21950

1

46528

45

20918

17959

3

38880

46

42087

34913

6

77006

47

38273

31911

3

70187

48

23904

21499

43

45446

49

28980

26548

2

55530

50

30186

27944

7

58137

51

32173

28648

3

60824

52

30603

28872

4

59479

53

28640

25333

3

53976

54

40642

35044

8

75694

55

33073

27068

6

60147

56

25424

20971

2

46397

57

24811

21679

0

46490

58

35347

30027

3

65377

एकूण

1805556

1648862

244

3454662

51 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 जागा सर्वसाधारण; उमेदवारीवरच प्रस्थापितांचे भवितव्य अवलंबून 

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 173 जागांच्या ओबीसी प्रवर्गासाठी सोडत करण्यात आली. 173 पैकी 46 जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. 29 प्रभागांमध्ये प्रत्येकी 3 पैकी 2 जागा या महीलांसाठी राखीव झाल्याने या प्रभागांमध्ये महीलाराज असणार आहे तर 28 प्रभागांमध्ये प्रत्येकी 3 पैकी प्रत्येकी 1 जागा महीलांसाठी राखीव आहे. 51 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 जागा सर्वसाधारण असून उर्वरित 7 जागांवर सर्वसाधारण महीला असे आरक्षण सोडत असल्याने बहुतांश प्रभागात 1 जागा सर्वसाधारण आहे. या ठिकाणी केवळ राजकीय पक्षांच्या उमेदवारीवरच प्रस्थापितांचे आगामी काळातील राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. अंतिम आरक्षण सोडत जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांना निवडणुकीची पूर्व तयारी व रणनीतीची आखणी करणे सोयीचे झाले आहे. प्रभागात आरक्षणानुसार राजकीय पक्षांनुसार पॅनेल ठरवणे सोपे होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार ओबीसी ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. पूर्वी जाहीर केलेल्या महिला आरक्षणाची सोडत पुन्हा काढण्यात आली त्यामुळे बहुतांश आरक्षणात बदल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. पूर्वी जाहीर केलेल्या महिला आरक्षणाची सोडत पुन्हा काढण्यात आली त्यामुळे बहुतांश आरक्षणात बदल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसींच्या आरक्षण निर्णयानंतर आरक्षणाच्या लाभासाठी जातीच्या दाखल्यासाठी शेकडो अर्ज दाखल झाले असून बहुतांश मराठा-कुणबी दाखल्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयात इच्छुकांची रेलचेल सुरु आहे. मराठा-कुणबी दाखला मिळवण्यासाठी लाखोंची बेगमी केली जात आहे. मूळ ओबीसींना राजकीय पक्ष कितपत उमेदवारी देतात यावरच खऱ्या ओबीसींचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या १७३ जागांपैकी ओबीसी च्या ४६ जागांचे आरक्षण निश्चित करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने या आरक्षणात कोणताही बदल झालेला नाही. परंतु खुल्या गटातील महिला आरक्षण बदलले आहे. 58 पैकी सात प्रभागांमध्ये तिन्ही जागा आरक्षित असल्याने तेथे सर्वसाधारण खुला गटासाठी संधी नाही त्याचा फटका खुल्या गटात विशेषता पुरुष उमेदवारांना बसला आहे यामध्ये प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क मुंढवा प्रभाग क्रमांक तीन लोहगाव विमान नगर प्रभाग क्रमांक 37 जनता वसाहत दत्तवाडी प्रभाग क्रमांक 39 मार्केट यार्ड महर्षी नगर प्रभाग क्रमांक 42 रामटेकडी सय्यद नगर प्रभाग क्रमांक 46 मोहम्मद वाडी उरळी देवाची प्रभाग क्रमांक 47 कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या प्रभागांचा समावेश आहे. 

आरक्षित जागा तपशील खालीलप्रमाणे-
-अनुसूचित जाती जमाती एकूण जागा - २३ (महिलांसाठी राखीव १२)
-अनुसूचित जमाती एकूण जागा - ०२ (महिलांसाठी राखीव०१
-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) एकूण जागा - ४६ (महिलांसाठी राखीव २३)
-सर्वसाधारण (ओपन) एकूण जागा - १०२ (महिलांसाठी राखीव ५१)
-एकूण जागा - १७३ (महिलांसाठी राखीव  ८७)

प्रभागनिहाय आरक्षण 

प्रभाग क्र. १ - धानोरी - विश्रांतवाडी
अ - अनुसूचित जाती
ब - अनुसूचित जमाती महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. २ - टिंगरेनगर - संजय पार्क
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३ - लोहगाव - विमाननगर
अ -अनुसूचित जाती महिला
ब - ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४ - खराडी पूर्व-वाघोली
अ -अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५ - खराडी पश्‍चिम- वडगाव शेरी
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ६ - वडगाव शेरी - रामवाडी
अ -ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ७ - कल्याणी नगर - नागपूर चाळ
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८ - कळस - फुलेनगर
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ९ - येरवडा
अ -अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १० - शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी
अ -अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ११ - बोपोडी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १२ - औंध - बालेवाडी
अ -अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १३ - बाणेर - सुस - म्हाळुंगे
अ - ओबीसी महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्र. १४ - पाषाण - बावधन बुद्रूक
अ -अनुसूचित जमाती
ब - सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १५ - गोखलेनगर - वडारवाडी
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १६ - फर्ग्युसन महाविद्यालय - एरंडवणे
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १७ शनिवार पेठ - नवी पेठ
अ - ओबासी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १८ - शनिवारवाडा - कसबा पेठ
अ - ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. १९ - छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम - रास्ता पेठ
अ -अनुसूचित जाती
ब -ओबीसी महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २० - पुणे स्टेशन - मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता
अ - अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २१ - कोरेगाव पार्क - मुंढवा
अ -अनुसूचित जाती महिला
ब -ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. २२ - मांजरी बुद्रूक - शेवाळेवाडी
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २३ - साडेसतरा नळी - आकाशवाणी
अ - ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २४ - मगरपट्टा - साधना विद्यालय
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २५ - हडपसर गावठाण - सातववाडी
अ - ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २६ - वानवडी गावठाण - वैदूवाडी
अ -अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २७ - कासेवाडी - लोहियानगर
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. २८ - महात्मा फुले स्मारक - भवानी पेठ
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 29 - घोरपडे उद्यान - महात्मा फुले मंडई
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३० - जय भवानी नगर - केळेवाडी
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३१ - कोथरूड गावठाण - शिवतीर्थनगर
अ - ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३२ - भुसारी कॉलनी - बावधन खुर्द.
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३३ - आयडियल कॉलनी - महात्मा सोसायटी
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३४ - वारजे - कोंढवे धावडे
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३५ - रामनगर - उत्तमनगर
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३६- कर्वेनगर
अ - ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३७ - जनता वसाहत - दत्तवाडी
अ -अनुसूचित जाती
ब -ओबीसी महिला
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ३८ - शिवदर्शन - पद्मावती
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३९ - मार्केटयार्ड - महर्षी नगर
अ - अनुसूचित जाती महिला
ब - ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४० - बिबवेवाडी - गंगाधाम
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४१ - कोंढवा खुर्द - मिठानगर
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४२ - रामटेकडी - सय्यदनगर
अ -अनुसूचित जाती महिला
ब -ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४३ - वानवडी - कौसरबाग
अ - ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४४- काळे बोराटे नगर - ससाणे नगर
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४५ - फुरसुंगी
अ - ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४६ - मोहमंद वाडी - उरुळी देवाची
अ -अनुसूचित जाती महिला
ब - ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४७ - कोंढवा बुर्दूक - येवलेवाडी
अ -अनुसूचित जाती महिला
ब -ओबीसी
क -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४८ - अप्पर सुपर इंदिरानगर
अ -अनुसूचित जाती महिला
ब -ओबीसी
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४९- बालाजी नगर - शंकर महाराज मठ
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५० - सहकारनगर - तळजाई
अ -अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५१- वडगाव बुर्दूक- माणिकबाग
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५२ - नांदेड सिटी - सन सिटी
अ - ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५३ - खडकवासला - नऱ्हे
अ -ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५४- धायरी - आंबेगाव
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५५ - धनकवडी - आंबेगाव पठार
अ - ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५६- चैतन्यनगर - भारती विद्यापीठ
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५७ - सुखसागर नगर - राजीव गांधीनगर
अ -ओबीसी
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५८ - कात्रज - गोकुळनगर
अ - ओबीसी महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण

प्र.क्र.

प्रभागाचे नाव

अ जागा

ब जागा

क जागा

1

धानोरी - विश्रांतवाडी

SC

ST (W)

OPEN

2

टिंगरेनगर - संजय पार्क

OBC (w)

OPEN (W)

OPEN

3

लोहगाव - विमाननगर

SC (W)

OBC

OPEN (W)

4

खराडी पूर्व-वाघोली

SC (W)

OPEN (W)

OPEN

5

खराडी पश्‍चिम- वडगाव शेरी

OBC

OPEN (W)

OPEN

6

वडगाव शेरी - रामवाडी

OBC

OPEN (W)

OPEN

7

कल्याणी नगर - नागपूर चाळ

SC

OPEN (W)

OPEN

8

कळस - फुलेनगर

SC

OPEN (W)

OPEN

9

येरवडा

SC (W)

OPEN (W)

OPEN

10

शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी

SC (W)

OPEN (W)

OPEN

11

बोपोडी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

SC

OPEN (W)

OPEN

12

औंध - बालेवाडी

SC

OBC (w)

OPEN

13

बाणेर - सुस - म्हाळुंगे

OBC (w)

OPEN

 

14

पाषाण - बावधन बुद्रूक

ST

OPEN (W)

OPEN

15

गोखलेनगर - वडारवाडी

OBC

OPEN (W)

OPEN

16

फर्ग्युसन महाविद्यालय - एरंडवणे

OBC (w)

OPEN (W)

OPEN

17

शनिवार पेठ - नवी पेठ

OBC (w)

OPEN (W)

OPEN

18

शनिवारवाडा - कसबा पेठ

OBC (w)

OPEN (W)

OPEN

19

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम - रास्ता पेठ

SC

OBC (w)

OPEN

20

पुणे स्टेशन - मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता

SC (W)

OPEN (W)

OPEN

21

कोरेगाव पार्क - मुंढवा

SC (W)

OBC

OPEN (W)

22

मांजरी बुद्रूक - शेवाळेवाडी

SC

OPEN (W)

OPEN

23

साडेसतरा नळी - आकाशवाणी

OBC

OPEN (W)

OPEN

24

मगरपट्टा - साधना विद्यालय

OBC

OPEN (W)

OPEN

25

हडपसर गावठाण - सातववाडी

OBC (w)

OPEN (W)

OPEN

26

वानवडी गावठाण - वैदूवाडी

SC (W)

OPEN (W)

OPEN

27

कासेवाडी - लोहियानगर

SC

OPEN (W)

OPEN

28

महात्मा फुले स्मारक - भवानी पेठ

OBC (w)

OPEN (W)

OPEN

29

घोरपडे उद्यान - महात्मा फुले मंडई

OBC

OPEN (W)

OPEN

30

जय भवानी नगर - केळेवाडी

OBC

OPEN (W)

OPEN

31

कोथरूड गावठाण - शिवतीर्थनगर

OBC (w)

OPEN (W)

OPEN

32

भुसारी कॉलनी - बावधन खुर्द.

OBC

OPEN (W)

OPEN

33

आयडियल कॉलनी - महात्मा सोसायटी

OBC

OPEN (W)

OPEN

34

वारजे - कोंढवे धावडे

OBC (w)

OPEN (W)

OPEN

35

रामनगर - उत्तमनगर

OBC

OPEN (W)

OPEN

36

कर्वेनगर

OBC (w)

OPEN (W)

OPEN

37

जनता वसाहत - दत्तवाडी

SC

OBC (w)

OPEN (W)

38

शिवदर्शन - पद्मावती

SC

OPEN (W)

OPEN

39

मार्केटयार्ड - महर्षी नगर

SC (W)

OBC

OPEN (W)

40

बिबवेवाडी - गंगाधाम

OBC (w)

OPEN (W)

OPEN

41

कोंढवा खुर्द - मिठानगर

OBC

OPEN

OPEN

42

रामटेकडी - सय्यदनगर

SC (W)

OBC

OPEN (W)

43

वानवडी - कौसरबाग

OBC (w)

OPEN (W)

OPEN

44

काळे बोराटे नगर - ससाणे नगर

OBC (w)

OPEN (W)

OPEN

45

फुरसुंगी

OBC (w)

OPEN (W)

OPEN

46

मोहमंद वाडी - उरुळी देवाची

SC (W)

OBC

OPEN (W)

47

कोंढवा बुर्दूक - येवलेवाडी

SC (W)

OBC

OPEN (W)

48

अप्पर सुपर इंदिरानगर

SC (W)

OBC

OPEN

49

बालाजी नगर - शंकर महाराज मठ

OBC

OPEN (W)

OPEN

50

सहकारनगर - तळजाई

SC

OPEN (W)

OPEN

51

वडगाव बुर्दूक- माणिकबाग

OBC

OPEN (W)

OPEN

52

नांदेड सिटी - सन सिटी

OBC (w)

OPEN (W)

OPEN

53

खडकवासला - नऱ्हे

OBC (w)

OPEN (W)

OPEN

54

धायरी - आंबेगाव

OBC

OPEN (W)

OPEN

55

धनकवडी - आंबेगाव पठार

OBC (w)

OPEN (W)

OPEN

56

चैतन्यनगर - भारती विद्यापीठ

OBC

OPEN (W)

OPEN

57

सुखसागर नगर - राजीव गांधीनगर

OBC

OPEN (W)

OPEN

58

कात्रज - गोकुळनगर

OBC (w)

OPEN (W)

OPEN


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)