Monday, 23 December 2024

maharashtra portfolio; अखेर राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विभागणी करून खात्यांचा कार्यभार; राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटप

राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपाची अधिसूचना जाहीर


हाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आले यामध्ये बहुतांश खात्यांचा कार्यभार विभागून देण्यात आलेला असल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळाची स्थिति निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २१ डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपाची अधिसूचना जाहीर करण्यात आली. इतिहासात प्रथमच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बिन खात्याचे मंत्री म्हणूनच कार्यपूर्ती केली गेली. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर  8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर 8 दिवसांपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार शपथविधी पार पडला तरीही खाते वाटप जाहीर झाले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालय स्वत:कडे ठेवले आहे. तसेच गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण आणि खातेवाटप न झालेली इतर खाती त्यांच्यकडे आहेत. एकनाथ शिंदे यांना नगरविकास खाते, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात आले आहे. अजित पवार यांना अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या 3, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. भाजपकडे महसूल, जलसंधारण,उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास, सांस्कृतिक, वन,राजशिष्टाचार,पर्यावरण ही खाती आहेत तर  राष्ट्रवादीकडे अर्थ, राज्य उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण,  महिला व बालकल्याण, अन्न नागरी पुरवठा, सहकार, मदत व पुनर्वस, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक, कृषी,अन्न व प्रशासन ही खाती दिलेली आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले असून 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला मात्र फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मविआत सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसनं केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. तर शिवसेनेला 20 जागा मिळाल्या. मनसेला तर एकही जागा जिंकता आली नाही.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली. विधानपरिषदेत प्रत्यक्षात 36 तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 6 तास झाले. या अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.76 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 79.30 टक्के इतकी होती. विधानपरिषदेत पुर्न:स्थापित 4 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 4 विधेयके संमत झाली. विधानसभेने परित करून विधानपरिषदेत आलेली विधेयके 9 आहेत. यामध्ये शिफारशी शिवाय विधानसभेला परत पाठवलेली विधेयके 4 आहेत. परिषदेत 4 शोक प्रस्ताव मांडण्यात आले. अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल सभापती प्रा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणींना मंत्रिपदाची संधी मिळणार असे सांगितले जात होते. त्यानुसार, आज 4 लाडक्या बहिणींना मंत्रिपदाची संधी मिळाली असून 2 नवे चेहरे मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये, पर्वती मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. तर, परभणी जिल्ह्याील जिंतूर मतदारसंघाती भाजप नेत्या मेघना बोर्डीकर याशिवाय, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी दोन्ही अनुभवी महिला नेत्यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये, आदिती तटकरे यांनी तिसऱ्यांदा  संधी देण्यात आली आहे. एकूण, 4 लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून भाजपकडून 3 आणि राष्ट्रवादीकडन 1 महिला नेत्यांना संधी मिळाली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून एकही महिला नेत्यांस संधी मिळाली नाही. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात यंदा तिन्ही पक्षांनी नव्या चेहऱ्यांना प्राधान्याने संधी दिली आहे. त्यामध्ये, भाजपने साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांना संधी दिली असून कणकवलीतून नारायण राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनाही संधी मिळाली आहे. तसेच, पहिल्यांदाच आमदार बनललेल्या योगेश कदम यांनाही शिवसेनेनं मंत्री करुन कोकणात आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. योगेश कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. यांसह अनेक नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळालं असून पुण्यातून माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर या लाडक्या बहिणींनाही मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.  

शिंदे सरकारमध्ये भाजपकडे असलेले गृहनिर्माण खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. शिंदेसेनेकडे पूर्वी असलेले उत्पादन शुल्क खाते हे अजित पवार यांच्याकडे गेले. आधी भाजपकडे असलेले पर्यटन खाते हे शिंदेसेनेकडे (शंभूराज देसाई) गेले. यांच्याकडे खाती कायमवैद्यकीय शिक्षण हे अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्याकडे तर उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कायम राहिले. अदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण खाते पुन्हा मिळाले. गुलाबराव पाटील यांच्याकडे पूर्वीचेच पाणीपुरवठा व स्वच्छता खाते तर संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण खाते कायम राहिले. मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही कौशल्य विकास खाते कायम आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते पुन्हा देताना पूर्वी दीपक केसरकर यांच्याकडे असलेले मराठी भाषा खातेही त्यांना देण्यात आले. 

गृहनिर्माण खाते भाजपने एकनाथ शिंदे यांना दिले. शिंदे सरकारमध्ये अतुल सावे यांच्याकडे हे खाते होते. आता सावे यांना पूर्वीचे ओबीसी कल्याण खाते देतानाच ऊर्जा (नवीनीकरणीय ऊर्जा), दुग्धविकास ही खाती देण्यात आली. शिंदे सरकारमध्ये महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते देताना ते विभागून देण्यात आले. त्यांची आधीची दोन्ही खाती गेली. त्यांच्याकडे गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार असेल. गिरीश महाजन हे या आधी ग्रामविकास व पर्यटन मंत्री होते पण ही दोन्ही खाती गेली. आता त्यांना जलसंपदा (विदर्भ व तापीखोरे) आणि आपत्ती व्यवस्थापन अशी खाती देण्यात आली. शिंदे सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा हे खाते धनंजय मुंडेंकडे गेले. मुंडे हे शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री होते, आता अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे नवे कृषी मंत्री असतील. 

मुंडे यांना आधीपेक्षा तुलनेने कमी महत्त्वाचे खाते मिळाले.जयकुमार रावल यांनाही पणन व राजशिष्टाचार ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाली. देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीच्या मंत्रिमंडळात महिला, बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांना यावेळी पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन अशी खाती देण्यात आली. भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, खारपाण पट्टा विकास या खात्यांवर समाधान मानावे लागले.

राज्य  मंत्रिमंडळाचे खातेवाटप २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खाते वाटप पुढीलप्रमाणे;

मंत्रिमंडळ खातेवाटप

देवेंद्र फडणवीस 

गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.

एकनाथ शिंदे

नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)

अजित पवार

वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.

चंद्रशेखर बावनकुळे

महसूल

राधाकृष्ण विखे पाटील

जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

हसन मुश्रीफ

वैद्यकीय शिक्षण

चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य

गिरीश महाजन 

जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.

गुलाबराव पाटील

पाणी पुरवठा व स्वच्छता.

१०

धनंजय मुंडे

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.

११

दादाजी भुसे

 शालेय शिक्षण

१२

गणेश नाईक

वने

१३

संजय राठोड

मृद व जलसंधारण.

१४

मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.

१५

उदय सामंत

उद्योग, मराठी भाषा

१६

जयकुमार रावल

पणन, राजशिष्टाचार.

१७

पंकजा मुंडे

पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.

१८

अतुल सावे

इतर मागास, बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा

१९

अशोक उईके

आदिवासी विकास

२०

शंभूराज देसाई

पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.

२१

आशिष शेलार

माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.

२२

दत्तात्रय भरणे

 क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.

२३

अदिती तटकरे

महिला व बालविकास

२४

शिवेंद्रराजे भोसले

सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).

२५

माणिकराव कोकाटे

कृषी

२६

नरहरी झिरवाळ

अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य.

२७

जयकुमार गोरे

ग्रामविकास व पंचायत राज.

२८

संजय शिरसाट

सामाजिक न्याय

२९

भरत गोगावले

रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास.

३०

नितेश राणे

मत्स्यव्यवसाय व बंदरे.

३१

प्रताप सरनाईक

परिवहन

३२

बाबासाहेब पाटील

सहकार

३३

मकरंद जाधव (पाटील)

मदत व पुनर्वसन

३४

प्रकाश आबिटकर

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.

३५

संजय सावकारे

वस्त्रोद्योग

३६

आकाश फुंडकर

कामगार

राज्यमंत्री

माधुरी मिसाळ

नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.

आशिष जयस्वाल

वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार,

इंद्रनील नाईक

उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण.

मेघना बोर्डीकर

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).

योगेश कदम

गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.

पंकज भोयर

गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटप

नव्या मंत्र्यांना आता मंत्रालयातील कार्यालयीन दालनांचेही वाटप करण्यात आले आहे ते खालीलप्रमाणे-

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book