संत तुकाराम कारखान्यातील एका गटासाठी अखेर निवडणूक;हिंजवडी-ताथवडे या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात
मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर भागातील शेतकरी वर्गांसाठी एकमेव सुरू असलेला अत्याधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाची पूर्णत्वाची कडी (को-जन इथेनॉल) लागलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखाच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. संत तुकाराम कारखान्यातील एका गटासाठी अखेर निवडणूक होणार असून हिंजवडी-ताथवडे या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. बिनविरोध निवडणुकीच्या सर्वपक्षीय प्रमुखांसह सभासदांच्या आशा अखेर मावळल्या.
२१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र ऊस उत्पादक गट क्र. १ हिंजवडी-ताथवडे या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने येथे मतदान होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष विदुरा उर्फे नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. हिंजवडी-ताथवडे गटामधून बाळू भिंताडे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी दोन दिवस नेत्यांनी अतोनात प्रयत्न केले. पण, यश आले नाही. कारखान्याच्या गट क्रमांक १ ताथवडे-हिंजवडी या गटातील तीन जागेसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर चार अर्ज शिल्लक राहिले होते. या गटातील चार उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे.मतदारसंघाकरिता दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ५ या कालावधीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर या तालुक्यातील ५७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. कारखान्याचे एकूण २२,२५८ मतदार आहेत. मतमोजणी दि. ६ एप्रिलला सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी सांगितले.
कासारसाई-दारुंब्रे (ता. मुळशी) येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली. अर्ज माघारीच्या दोन दिवसांनंतर यादी जाहीर केली. निवडणुकीसाठी २१ जागांसाठी २२६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी २६ दुबार, तर ५ नामंजूर करण्यात आली. त्यामुळे अंतिम टप्प्यात १९५ पत्रे वैध ठरली. ते मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, संचालक मंडळातील जागांपेक्षा एक अर्ज जास्त राहिल्याने मतदान प्रक्रिया राबविणे भाग पडणार आहे.२१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली. मात्र, ऊस उत्पादक गट क्र. १ (हिंजवडी-ताथवडे) या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने येथे मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, कारखान्याचे अध्यक्ष विदुरा तथा नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
उमेदवारांची अंतिम यादी
ऊस उत्पादक गट क्र. १ (हिंजवडी-ताथवडे) : ३ जागा
विदुरा नवले (ताथवडे)
चेतन भुजबळ (पुनावळे)
दत्तात्रय जाधव (नेरे, पो. जांबे)
बाळू भिंताडे (कासारसाई).
ऊस उत्पादक गट क्र. २ (पौड-पिरंगुट) – ३ जागा
धैर्यशील ढमाले (बेलावडे)
यशवंत गायकवाड (नाणेगाव, पो. कुळे)
दत्तात्रय उभे (कोळावडे).
ऊस उत्पादक गट क्र. ३ (तळेगाव-वडगाव) : ३ जागा
ज्ञानेश्वर दाभाडे (माळवाडी, पो. इंदोरी)
बापूसाहेब भेगडे (तळेगाव दाभाडे)
संदीप काशिद (इंदोरी).
ऊस उत्पादक गट क्र. ४ (सोमाटणे-पवनानगर) : ३ जागा
छबुराव कडू (पाचाणे, पो. चांदखेड)
भरत लिम्हण (सांगवडे, पो. साळुंब्रे)
उमेश बोडके (गहुंजे, पो. देहूरोड).
ऊस उत्पादक गट क्र. ५ (खेड-शिरूर-हवेली) : ४ जागा
अनिल लोखंडे (मरकळ)
धोंडिबा भोंडवे (शिंदे वस्ती, रावेत)
विलास कोतोरे (चिंबळी)
अतुल काळजे (काळजेवाडी, चऱ्होली बु.).
महिला राखीव – २ जागा
ज्योती अरगडे (काळुस)
शोभा वाघोले (दारुंब्रे).
अनुसूचित जाती-जमाती : १ जागा
लक्ष्मण भालेराव (काले पो. पवनानगर).
इतर मागासवर्ग : १ जागा
राजेंद्र कुदळे (सुभाषनगर, शुक्रवार पेठ, पुणे).
विमुक्त जाती/भटक्या जमाती – १ जागा
शिवाजी कोळेकर (कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड).
मतदान आणि मतमोजणी कार्यक्रम असा असेल हिंजवडी-ताथवडे मतदारसंघासाठी ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. कारखाना कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली-शिरूर या तालुक्यांतील ५७ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया होणार आहे. एकूण २२,२५८ जण मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सुरू होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.
तब्बल २२ हजार मतदारसंख्या असून यामध्ये मावळ तालुक्यात तळेगाव-वडगाव मतदार संघ २ हजार २१५, सोमाटणे-पवनानगर मतदार संघात ३ हजार २१ असे एकूण ५ हजार २३६ मतदार आहेत. पौड-पिरंगुट ३ हजार ५४६, हिंजवडी-ताथवडे ३ हजार ३०८ असे एकूण ६ हजार ८५४ मतदार आहेत व अन्य असे एकूण २२ हजार ९१७ सभासद आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकार्याने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई आदींनी वेळोवेळी कारखान्याच्या वाटचालीमध्ये मदत केली आहे. कारखान्याच्या उभारणीसाठी विदुरा नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार स्व.दिगंबर भेगडे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप, विलास लांडे, दिवंगत खासदार गिरीश बापट, माजी आमदार रुपलेखा ढोरे, आमदार शंकर मांडेकर, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार सुनील शेळके, सुरेश गोरे यांनी योगदान दिले आहे. नवले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूकही सर्वपक्षीय सहमतीने आणि एकमताने पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूरचा अंतर्भाव आहे. मावळमध्ये आमदार सुनील शेळके, मुळशीमध्ये शंकर मांडेकर तर; शिरूरमध्ये माऊली कटके असे तीन आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहेत. चिंचवडमध्ये शंकर जगताप हे भाजपचे; तर खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबासाहेब काळे आहेत. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वर्चस्व असल्याने स्वतः अजित पवार यांनी या निवडणुकीत गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, तीनही आमदारांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन आमदार नियमात बसत नसल्याने त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल केले होते.
कारखान्याच्या निवडणूकीसाठी 226 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील 26 अर्ज दुबार भरलेले होते. मुळशी तालुक्यातील पौड-पिरंगुट आणि हिंजवडी-ताथवडे गटात प्रत्येकी 17 अर्ज वैध झाले आहेत. मावळ तालुक्यातील तळेगांव-वडगाव गटात 23 आणि सोमाटणे पवनानगर गटात 37 अर्ज वैध राहिले होते. खेड-हवेली-शिरूर मतदार संघात 30 अर्ज वैध झाले होते. महिला राखीव गटात 20, अनुसुचित जाती/जमाती गटात 8, इतर मागासवर्गीय गटात 35 तर विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात 8 जणांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी बहुतांश उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.