Wednesday 24 January 2018

६८७१ रिक्तपदांसह राज्यातील ३१७ ग्रामपंचायतीसाठी २५ फेब्रुवारीला मतदान; पुणे जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका

राज्यातील ३१७ ग्रामपंचायतीसाठी २५ फेब्रुवारी २०१८ ला मतदान
६८७१ रिक्तपदांकरिता देखील निवडणुक कार्यक्रम जाहीर 

माहे मार्च 2018 ते मे 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंचपदासह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यभरातील ३१७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २५ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहेत. ३१७ ग्रामपंचायतीमध्ये कोकण विभागातील ४२, नाशिक विभागातील ७५, पुणे विभागातील १३२, औरंगाबाद विभागातील ३५, अमरावती विभागातील ११, नागपूर विभागातील २२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.तसेच राज्यभरातील रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या ४१०१ असून त्यामधील ६८७१ रिक्तपदांकरिता देखील निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक जाहीर झालेल्या गावांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.



===================

पुणे जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका

पुणे जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. याव्यतिरिक्त रिक्त पदे असलेल्या २७४ ग्रामपंचायतीमधील ५७६ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दिनांक ५ फेब्रुवारी २०१८ ते १० फेब्रुवारी २०१८ पर्यंत दाखल करता येणार आहेत तर 12 फेब्रुवारी- उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. 15 फेब्रुवारी- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून २५ फेब्रुवारी २०१८ रोजी मतदान घेण्यात येणार असून २६ फेब्रुवारी २०१८ रोजी मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे-1, मावळ-६, भोर-९, जुन्नर-1 मुळशी-७ खेड-६ आंबेगाव- ७ या ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.


============================

वडगाव मावळ तालुक्‍यातील वडगावसह 6 ग्रामपंचायतींची निवडणूक

मावळ तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या वडगाव ग्रामपंचायतीसह भाजे, लोहगड, वाकसई, सांगिसे व मुंढावरे या सहा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे तसेच इतर सोळा ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येत्या मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यात मावळ तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीसह भाजे, लोहगड, वाकसई, सांगिसे व मुंढावरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पुसाणे, शिलाटणे, ओझर्डे, आपटी, मळवली, आंबी, येलघोळ, टाकवे बुद्रुक, खांड, साते, खडकाळा, थुगाव, परंदवडी, आंबेगाव, माळवाडी व वराळे येथील रिक्त असलेल्या काही जागांची पोटनिवडणूक होणार आहेत.
====================

कोल्हापूर जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींची निवडणूक

कोल्हापूर जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 427 ग्रामपंचायतींच्या 804 रिक्‍त जागांसाठीही पोट निवडणूक होणार आहे.मार्च ते मे महिन्यादरम्यान मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ही निवडणुकीत थेट सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसाठी तसेच रिक्‍त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची नोटीस संबंधित तहसीलदार दि. 25 रोजी काढणार आहेत. जिल्ह्यात 217 ग्रामपंचायतींची दोन महिन्यांपूर्वीच सार्वत्रिक निवडणूक झाली होती. निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. सातारा तालुक्यातील वडगाव, धावडशी, कारी, लुमणेखोल; कोरेगाव तालुक्यातील मुगाव, शिरढोण, भाटमवाडी; जावली तालुक्यातील सांगवी तर्फे मेढा, आगलावेवाडी, आसणी, बिभवी, गांजे, गोंदेमाळ, ओखवडी, पानस तळोशी, वाळंजवाडी, ऐकीव, भोगवली तर्फ मेढा, कावडी, कोळघर, तेटली, भाटघर, केळघर तर्फ सोळशी, वाघदरे; कराड तालुक्यातील बानुगडेवाडी, भोसलेवाडी, गोसावेवाडी, हेळगाव, कांबीरवाडी, पिंपरी, रेठरे बु॥, सयापूर, शेळकेवाडी (येवती), टेंभू, येणपे, यशवंतनगर, येवती; पाटण तालुक्यातील कुसरुंड, बेलवडे खुर्द, शितपवडी, चौगुलेवाडी, गावडेवाडी, उधवणे, रुवले, जिंती, गमेवाडी, गुंजाळी, किल्‍लेमोरगिरी; वाई तालुक्यातील कोंढावळे, विठ्ठलवाडी, खडकी, वडोली, चिंधवली, ओहळी; महाबळेश्‍वर तालुक्यातील पर्वत तर्फ वाघावळे, देवळी, मांघर, अवकज्ञाळी, पारुट, गुरेघर, रेणोशी, निवळी, आरव, लामज, मोरणी, सालोशी, वलवण, आचली, उचाट; खटाव तालुक्यातील फडतरवाडी (बुध), पांगारखेळ, उंबरमळे, बुध, काटेवाडी तर माण तालुक्यातील बिंजवडी या गावांचा समावेश आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)
 पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.