कोरोना काळातील जगातील सर्वात मोठी निवडणूक!
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदान करु शकतील असं सुनील अरोरा यांनी यावेळी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व काळजी घेण्यात आली आहे. “सात लाख सॅनिटायजर्स, सहा लाख पीपीई किट, साडे सहा लाख फेस शिल्ड, २३ लाख हॅण्ड ग्लोव्ह्ज आणि ४७ लाख मास्कची व्यवस्था करण्यात आली,” असल्याची माहिती सुनील अरोरा यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर रोजी 71 जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. यात 16 जिल्हे, 31 हजार मतदान केंद्रे असतील. दुसर्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला 94 जागांवर मतदान होणार आहे. यात 17 जिल्हे, 42 हजार मतदान केंद्रे असतील. तिसर्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी 78 जागांवर मतदान होईल. यात 15 जिल्हे, 33.5 हजार मतदान केंद्रे असतील. 10 नोव्हेंबर रोजी निकाल लागतील. देशांनी निवडणुका तहकूब केल्या, परंतु दिवस जसजसे वाढत गेले न्यू नॉर्मल होत गेले कारण कोरोना लवकर संपण्याची चिन्हे नव्हती. आम्हाला लोकांचा लोकशाही हक्क कायम राखायचा होता. आम्हाला त्याच्या तब्येतीचीही चिंता करायची होती. आज आम्ही येथे बिहार निवडणुका घोषित करण्यासाठी आलो आहोत. कोरोना काळातील ही देशातीलच नव्हे तर जगातील पहिली सर्वात मोठी निवडणूक होणार आहे. गेल्या महिन्यात कोरोनामुळे बिहार निवडणुका तहकूब करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. कोरोनामुळे राज्यातील निवडणुक पुढे ढकलता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. न्यायालय निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकत नाही. मागील वेळी निवडणुका 5 टप्प्यात घेण्यात आल्या. यावेळी कोरोनामुळे 2 ते 3 टप्प्यात निवडणुका होणार आहे. दरम्यान 2015 च्या निवडणुकीत राजद जदयू आणि कॉंग्रेसने एकत्रितपणे महायुती तयार केली. युतीने 178 जागा जिंकल्या. पण, दीड वर्षानंतर नितीश महागठबंधन सोडले आणि एनडीएमध्ये गेले. या निवडणुकीत एनडीएमध्ये भाजप, लोजपा आणि हम (सेक्युलर) यांच्यासमवेत जदयूही आहे. तर मागील निवडणुकीत एनडीएचा भाग असलेली रालोसपा महायुतीच्या सोबत आहे. दरम्यान 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहारच्या 40 मधील 39 जागा एनडीएला मिळाल्या होत्या. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. लोकसभाच्या निकालांचा विधानसभा मतदारसंघांसोबतचा हिशोब पाहिला तर एनडीएला 223 सीटवर बढती मिळाली होती. यामधून 96 जागांवर भाजपाला तर 92 जागांवर जदयू आघाडीवर होती. लोजपा 35 सीटांवर पुढे होती. एस सीट जिंकणारी महायुती विधानसभेच्या हिशोबाने 17 जागांवर पुढे होती. यामधील 9 सीटवर राजद, 5 वर काँग्रेस, दोनवर हम (सेक्युलर) जे आता एनडीएचा भाग आहे. आणि एका सीटवर रालोसपाला बढती मिळाली होती. इतर दोन विधानसभा मतदार संघात एआयएमआयएम आणि एकावर सीपीआय एमएल पुढे होते. दरम्यान कोविड १९ मुळे ७० हून अधिक देशांनी आपल्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत मात्र भारतात लोकशाही प्रक्रिया काळजी घेऊन निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणारा असणारा भारत अग्रेसर देश मानला जाणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूक २०१५ चा निकाल
पक्ष - जागा - मते
राजद - ८० जागा - १८.८ टक्के मते
जदयू - ७१ जागा - टक्के मते
भाजपा - ५३ जागा - २५ टक्के मते
काँग्रेस - २७ जागा - ६.८ टक्के मते
अपक्ष - ४ जागा - ९.६ टक्के मते
इतर - ८ जागा - २२.५ टक्के मते
एकूण जागा - २४३
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांची प्रतीक्षाच!
बिहार विधानसभा तसेच विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त सहा जागांच्या निवडणुकांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यातील पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर तर पुणे व अमरावती शिक्षक आणि धुळे-नंदुरबार स्थानीय स्वराज्य अशा सहा मतदारसंघांतील जागा रिक्त आहेत. धुळे-नंदुरबारची पोटनिवडणूक मार्चच्या अखेरीस होणार होती. परंतु टाळेबंदी लागू झाल्याने ही पोटनिवडणूक लांबणीर पडली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील जागा या जून महिन्यात रिक्त झाल्या. कोरोना संकटामुळे या निवडणुका अद्यापही झालेल्या नाहीत. मध्य प्रदेशसह देशातील ६४ विधानसभेच्या जागा रिक्त आहेत. पोटनिवडणुकांबाबत येत्या मंगळवारी निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. कोरोनामुळे पोटनिवडणुका लांबणीवर टाकण्याची विनंती काही राज्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक घेण्याबाबत आयोगाने माहिती घेतली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.