Tuesday 8 September 2020

डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी  डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची निवड 

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी  डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीला विरोधी पक्ष भाजपने आक्षेप घेतला होता. उच्च न्यायालयात उपसभापती पदाच्या निवडणूक विरोधात याचिका दाखल केली आहे, पुढील सुनावणी गुरुवारी आहे, तेव्हा निवडणूक घेऊ नये असे विधानपरिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी मागणी केली होती. सभापती रामराजे निंबाळकर यांनी उपसभापती पदाची निवडणूक पुकारली. त्यानंतर विरोधी पक्ष भाजपने सभात्याग केला. त्यामुळे उपसभपती पदी  डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची एकमताने निवड झाली. उपसभापती पदी नीलम गोऱ्हे यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.  डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा पायगुण चांगला असल्यानेच शिवसेनेची राज्यात सत्ता आली. उपसभापतीपदी निवड ही योग्यच असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचे अभिनंदन केले. 'हायकोर्टाने मला बोलावलेलं नाही. निवडणूक बोलावण्याचा अधिकार माझा आहे. इंटर्नल प्रोसिडिंगमध्ये हायकोर्टाला ज्यूरिडिक्शन नाही. त्यामुळे माझ्या अधिकारात निवडणूक घेण्याचा निर्णय कायम आहे.' असे सभापती यांनी म्हटले. बहुमताच्या जोरावर सभापतींनी उपसभापतीची निवडणूक घोषित केली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी डॉ. नीलमताई गोऱ्हें यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला त्याला शेकाप जयंत पाटील यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी डॉ. नीलमताई गोऱ्हें यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र याच काळात विरोधकांनी सभात्याग केल्याने डॉ. नीलमताई गोऱ्हेंची बिनविरोध निवड झाली. डॉ. नीलमताई गोऱ्हें यांच्या बिनविरोध निवडीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तर डॉ. नीलमताई गोऱ्हें यांना साहित्याची जाण असून त्या मानवी हक्क आणि स्त्रियांच्या प्रश्नावर नेहमीच धावून जातात. त्यांची उपसभापतीपदी निवड ही योग्यच असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. नीलमताई गोऱ्हें यांचं अभिनंदन केलं. तसेच डॉ. नीलमताई गोऱ्हें यांचा पायगुण चांगला असल्यानेच शिवसेनेची राज्यात सत्ता आल्याचंही त्यांनी सांगितले. आमदार म्हणून डॉ. नीलमताई गोऱ्हें यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला फायदाच होईल, असेही ते म्हणाले.

शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर; मुख्य प्रवक्तेपदी संजय राऊत, यांच्यासह 11 जणांची निवड

शिवसेनेच्या प्रवक्तयांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात महाविकास आघाडी स्थापन करताना भाजपला सडेतोड उत्तर देणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्य प्रवक्ते असणार आहेत. यांच्यासह दहा जणांची यादी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर ही नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यत आली. शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यादीत आहेत या अकरा जणांची नावे

संजय राऊत : राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते

अरविंद सावंत : खासदार

धैर्यशील माने : खासदार

प्रियंका चतुर्वेदी : राज्यसभा खासदार

डॉ. नीलम गोऱ्हे : विधानपरिषद आमदार

गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा मंत्री

अ‍ॅड. अनिल परब : परिवहन मंत्री

उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

सुनील प्रभू : आमदार

प्रताप सरनाईक : आमदार

किशोरी पेडणेकर : महापौर

ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील गदारोळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर झाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला होता. यामुळे सभागृहात घमासान पाहायला मिळाले. ग्रामपंचायत विधेयक मंजूर होताच विरोधकांनी बहिष्कार टाकत सभागृहाचा त्याग केला. नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणीबाणी, प्रशासकीय अडचणी, महामारी, इत्यादीमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, पंचायतींच्या निवडणुका घेता आल्या नाही तर, राज्य सरकार, पंचायतींचा प्रशासक म्हणून, योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम कलम 151 मध्ये 25/06/2020 रोजी महाराष्ट्र अध्यादेशाद्वारे दुरुस्ती करण्यात आली आहे. राज्यातील 19 जिल्ह्यामधील 1566 ग्राम पंचायतींची मुदत एप्रिल 2020 ते जून 2020 दरम्यान, तर 12 हजार 668 ग्राम पंचायतीची मुदत जुलै, 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान संपत आहे. देशातील, तसेच महाराष्ट्रातील सध्याचा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव, तसेच केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी लॉकडाऊन घोषित केल्याने, या निवडणुका रखडल्या. राज्य निवडणूक आयोगाकडून या ग्राम पंचायतींच्या निवडणुका केव्हा घेण्यात येतील, याबाबत अनिश्चितता आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.