Wednesday, 27 January 2021

Voter ID: आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल

डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे?

केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डिजीटल मतदान ओळखपत्र (Digital Voter Card) जारी करणार आहे. डिजीटल वोटर कार्ड आज (25 जानेवारी) अधिकृतपणे जारी केले जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करु शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांच्यानंतर आता मतदान ओळखपत्रही डिजीटल स्वरुपात उपलब्ध होत आहे. पहिल्या टप्प्यात 25 ते 31 जानेवारी दरम्यान नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. या कालावधीमध्ये जे मतदार नव्याने नोंदणी करतील, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळेल. ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल, त्यांना 1 फेब्रुवारीपासून डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही, त्यांना तो निवडणूक आयोगाकडून पडताळणी करुन घ्यावा लागणार आहे. सर्व मतदारांना डिजीटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. मतदार आपले डिजीटल वोटर कार्ड डिजीलॉकर (Digilocker) मध्येही सेव्ह करुन ठेवू शकतात. दरम्यान येत्या काही महिन्यांमध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
डिजीटल वोटर कार्ड कसे डाऊनलोड कराल?
1. https://voterportal.eci.gov.in/ किंवा https://nvsp.in/Account/Login या वेबसाईटवर लॉगइन करा
2. वेबसाईटवर आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अकाऊंट तयार करा
3. वेबसाईटवर लॉग-ईन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्लिक करा. E-EPIC डाऊनलोड करा

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Wednesday, 20 January 2021

'नोटा'ला काल्पनिक उमेदवार ठरवणारया आदेशामुळे प्रशासनात संभ्रम!

कमी मतांचा उमेदवार ठरला विजयी; फेरनिवडणूकीची मागणी

'नोटा'ला काल्पनिक उमेदवार ठरवणारया राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे प्रशासनात संभ्रम निर्माण झाल्याने सर्वाधिक मते नोटाला मिळूनही अल्प मते मिळणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषीत करण्याची वेळ निवडणूक अधिकारी यांच्यावर आलेली आहे. प्रशासनिक चुकीचा लाभ उमेदवाराला मिळालेला असून या निर्णया विरोधात प्रतिस्पर्धी गटाने फेरनिवडणूक घेण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक मते 'नोटा' (यापैकी कोणीही नाही) ला मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवारांला अल्प मते मिळूनही राज्य निवडणूक आयोगाच्या संभ्रमीत आदेशामुळे विजयी घोषीत करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रभागात फेर निवडणूक घेण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराचे पॅनल निवडणूक रिंगणात उतरवलेले होते मात्र एका प्रभागातील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने उर्वरीत प्रतिस्पर्धी उमेदवारा ऐवजी 'नोटा' (यापैकी कोणीही नाही) हे बटन दाबून नकरात्मक मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केलेले होते त्याचा परिणाम ग्रामपंचायत निकालात दिसून आला सर्वाधिक मते 'नोटा' (यापैकी कोणीही नाही) ला मिळाली. नरखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग 5 सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होता. उमेश पाटील यांच्या गटाकडून वृषाली मनोजकुमार पाटील यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. उमेदवारी अर्ज संगणकीय चुकीमुळे बाद झाला होता. त्यांनी 2 अपत्य नमूद केली मात्र त्यांची व पतीची नावे व संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली नव्हती. आक्षेपामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आलेला होता. त्यामुळे या प्रभागातील मतदारांनी "नोटा'ला मतदान करावे, असे आवाहन उमेश पाटील यांनी केले. या प्रभागातून "नोटा'ला सर्वाधिक 434 मते मिळाली. उमेश पाटील यांच्या विरोधी गटाच्या उमेदवार दीपाली कोल्हाळ यांना 143 तर सविता खंदारे यांना 163 मते मिळाली. नरखेड ग्रामपंचायतीवर उमेश पाटील यांच्या पॅनेलने 13 पैकी 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. वास्तविकपणे दि.६/११/२०१८ रोजी राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेश काढून, नोटाला काल्पनिक उमेदवार घोषीत केले आहे. अशा परिस्थितीत सदर ठिकाणी नोटा ला सर्वाधिक मतदान झाल्यास, त्या ठिकाणी फेर निवडणूक घेण्याची तरतुद केली आहे. परंतु सदर आदेश २०१८ मधील नगरपालिका निवडणुकीच्या काळात काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सदर नियम लागू आहे किंवा नाही या बाबतीत प्रशासनात संभ्रम आहे. दि.६/११/२०१८ रोजीच्या या आदेशामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा उल्लेख नाही. या आदेशात तशी दुरुस्ती करावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाला विनंती केल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. सदर प्रभागामधून नोटाला विजयी घोषीत करावे, अशी मागणी देखील पाटील यांनी केली असून, राज्य निवडणूक आयोगाला तसे पत्र देखील सादर केलेले आहे. दरम्यान महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती अथवा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक अथवा पोटनिवडणुकीत एखाद्या प्रभागातील सर्वाधिक मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला तर तेथील निकाल संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाहीर करता येणार नाही. अशा ठिकाणी 'नोटा' हा काल्पनिक उमेदवार समजून फेरनिवडणूक घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केला होता. ९ डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि अहमदनगर महापालिकांच्या निवडणुकीस तो लागू असेल, असे राज्य निवडणूक आयोगाने दि.६/११/२०१८ रोजीच्या या आदेशामध्ये स्पष्ट केले होते. प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. त्याचवेळी मतदारांना आपल्या भागात कोणताही उमेदवार पसंद नसेल, तर मतदार यापैकी कोणीही नाही म्हणजेच 'नोटा' हा मतदानाचा अधिकार वापरू शकतो. लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता यावी आणि राजकीय पक्षांनासुद्धा चांगला उमेदवार निवडणुकीला देण्यास भाग पाडावे या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने 'नोटा' मताधिकार आणण्यास निवडणूक आयोगाला पाच वर्षांपूर्वी भाग पाडले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा वापर होऊनही त्याचा परिणाम दिसत नव्हता. कारण एखाद्या ठिकाणी 'नोटा'ला जास्त मते पडली तरी त्याखालोखाल मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित करण्यात येत होता. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २०१३ रोजी 'नोटा'संदर्भात दिलेल्या निकालाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ६ नोव्हेंबरला फेरनिवडणुकी बाबतचा आदेश जारी केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सुधारित आदेश जारी केला होता. सर्वाधित 'नोटा' मतानंतर झालेल्या फेरनिवडणुकीत पुन्हा 'नोटा' म्हणजे काल्पनिक उमेदवाराला जास्त मिळाली तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येईल. तसेच एखाद्या प्रकरणात 'नोटा' म्हणजे काल्पनिक उमेदवार आणि निवडणुकीतील उमेदवार यांच्यात दोघांचीही मते समसमान असतील तर त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची नावे नमूद करताना त्यामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख केलेला नव्हता यामुळे स्थानिक प्रशासन संभ्रमात पडले आहे. तांत्रिकदृष्ट्या आदेशाच्या आधारावर कमी मते मिळालेला उमेदवार विजयी ठरत असला तरी न्यायालयीन लढ्यात या प्रभागात फेर पोट निवडणूक घेणे राज्य निवडणूक आयोगाला क्रमप्राप्त ठरेल. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Monday, 18 January 2021

ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचा डंका! आदर्श गावांमध्ये सत्तांतर

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीची बाजी

राज्यात्तील 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान घेण्यात आले. यामध्ये सरासरी 79 टक्के मतदान झाले होते या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकांमध्ये 2 लाख 14 हजार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राज्यात एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला होता. 1 हजार 523 ग्रामपंचायतीची निवडणुका बिनविरोध पार पडली.तर 26 हजार 178 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. उर्वरित 46 हजार 921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडलेली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकाल हाती येत आहेत यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राखल्याचे स्पष्ट होत आहे. तर राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीकडे सर्वाधिक जागांचा कल हाती येत असून राजकीयदृष्ट्या गाव पातळीवरील गटांचे विश्लेषण सुरु आहे. दरम्यान काही आदर्श गावांमध्ये सत्तांतर झाले असून पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडीत झाली या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भास्करराव पेरे पाटील यांच्या विवाहित कन्या अनुराधा पेरे उर्फ अनुराधा जगदीश केरे यांनाही गावकऱ्यांनी नाकारले आहे. अनुराधा पेरे पाटील उर्फ अनुराधा जगदीश केरे यांना १८३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला २०८ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. पाटोदा ग्रामपंचायतील ८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित ३ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. राजकारणातील व्यक्तींना सत्तेचा मोह सोडवला जात नसल्याचे उत्तम उदाहरण या गावात घडले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी निवृत्तीचे कारण देत आपल्या नोकरी करीत असलेल्या विवाहित मुलीला निवडणूक रिंगणात उतरवले हे स्थानिकांना पचनी पडले नाही. गावकऱ्यांनी मतदानातून विरोध प्रकट केलेला आहे. तर  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावातील निवडणूक देखील चुरशीची झाली यामध्ये विद्यमांन सरपंच लाभेष औटी यांच्या पॅनेलनं सगळ्या 7 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे ते सत्ता राखण्यात यशस्वी ठरले आहेत. राळेगणसिद्धी या गावात 3 वॉर्ड असून 9 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 7 जागांसाठी निवडणूक झाली. तसेच आदर्श गाव म्हणून ओळखले जाते यामध्ये हिवरे बाजार गावात सरपंच पोपटराव पवार यांची पुन्हा एकहाती सत्ता, सर्व जागा जिंकल्या आहेत. पोपटराव पवार यांच्या वॉर्डातील विरोधी उमेदवाराला 44 मते तर पवारांचा 282 मते घेऊन विजय मिळवला आहे. हिवरे बाजारची ग्रामपंचायत तब्बल 30 वर्षं बिनविरोध झालेली होती मात्र यावेळी त्यांना विरोध होऊन निवडणूक पार पडली. हिवरे बाजार ग्रामपंचायत 7 जण सदस्यांची असून सर्व जागांसाठी निवडणूक झाली यामध्ये विद्यमान गटाने सत्ता राखलेली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेली अकलूज ग्रामपंचायत परत एकदा भाजपने काबीज केली आहे. भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाने 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायतीत 16 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. तर, एकजागा बिनविरोध झाली आहे. अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी थेट लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजप विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत. माळशिरस तालुक्यातही मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी हाती आलेल्या निकालानुसार, 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मूळ खानापूर गावात नऊपैकी सहा जागांवर शिवसेनेचा विजय मिळवलेला आहे तर नागपूरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वर्चस्व असून राष्ट्रवादीला 17 पैकी 16 ग्रामपंचायतीवर यश मिळाले आहे. काटोल तालुक्यातील भोरगड मध्ये ९ पैकी ९ ही उमेदवार, खंडाळा ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चेनकापूर-माळेगाव मध्ये ९ पैकी आठ जागांवर राष्ट्रवादी व शेकापचे उमेदवार विजयी झाले आहे. नरखेड तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने नरखेड तालुक्यातील सर्वात मोठया असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायत मध्ये १३ पैकी १० जागांवर, थडपवनी येथे ९ पैकी ९ जागांवर, महेंद्री येथे ७ पैकी ६, खैरगाव येथे १३ पैकी १०, सिंजर येथे ७ पैकी ५ , अंबाडा येथे ९ पैकी ७, सायवाडा येथे ९ पैकी ६ राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झाले. मदना येथे राष्ट्रवादी व शिवसेना सोबत मिळुन लढली होती. येथे एकहाती या आघाडीने सत्ता मिळवित ९ पैकी ९ ही जागेवर विजय प्राप्त केला आहे. उमठा येथे ७ पैकी ५, दातेवाडी मध्ये ९ पैकी ४, पेठ मुक्तापुर ९ पैकी ६, जामगाव खु. ९ पैकी ६ , देवग्राम ९ पैकी ८, माणीकवाडा ९ पैकी ६, येरला ७ पैकी ५, देवळी ७ पैकी ५ आणि खरबडी येथे ७ पैकी ४ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. तसेच नागपूर तालुक्यातील बाजारगाव सर्कलमधील पेठ ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व ९ ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले आहे.  परळीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. मंत्री धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपाचा मतदानावर परिणाम झालेला दिसून आला नाही. 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडेंच्या गटाचा दणदणीत विजय झालेला आहे. सिंधुदुर्ग येथे राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही 70 पैकी 55 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्याचा आमदार नितेश राणेंचा दावा केला आहे तर ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला आहे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागर यांना धक्का दिला असून वासनवाडी ग्रामपंचायतीवर जयदत्त क्षीरसागर यांचा विजय तर बीडच्या दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील हे माढा तालुक्यातील कुर्डु ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. ठाणे, बीड, बुलढाणा, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत मनसेने आपल्या ताब्यात घेतली आहे. याशिवाय रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खातं उघडलं आहे. तर उस्मानाबादमधील जळकोट ग्रामपंचायतीत जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा विजय झाला आहे. अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने हातमिळवणी केली होती. मनसेने या युतीच्या पॅनलचा पराभव करत वर्चस्व प्रस्थापित केलं. सात जागांच्या या निवडणुकीत मनसेने चार जागांवर विजय मिळवला. नरेश गायकर, सुरेखा गायकर, रेश्मा गायकर आणि जयश्री गायकर अशी या विजयी उमेदवारांची नावे आहेत. बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकावला आहे. या ग्रामपंचायतीमधील सात पैकी पाच जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटाने खाते उघडलले आहे. शिरसाठवाडी ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात गेली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागा मनसेच्या अविनाश पालवे पॅनेलने जिंकल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायतीमध्ये मनसेचा मोठा विजय झाला आहे. लक्ष वेधून घेणारी जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. नऊपैकी सात जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांचा हा मोठा विजय आहे. रत्नागिरीच्या दापोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खाते उघडले आहे. नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे. उस्मानाबादमध्ये मनसेचे तीन जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. त्यापैकी दोन जणांना ग्रामस्थांनी नाकारलं आहे. इंदापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, तांदुळवाडीतील आबासाहेब ढवळे यांचा पराभव झाला. तर जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा विजय झाला. लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुक परिवर्तन पँनला मिळाल यश मिळाले आहे. राहाता तालुक्यातील २५ पैकी २४ ग्रामपंचायती भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात आल्या आहेत. लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत राधाकृष्ण विखे-पाटलांच्या पॅनेलला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यापूर्वीच विखे-पाटलांच्या लोणी बुद्रूक गावाची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, शेजारीच असणाऱ्या लोणी खुर्द गावातील निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. त्यात विखे-पाटलांनी २० वर्षांपासूनची असलेली सत्ता गमवावी लागली. तर अहमदनगरमधील भाजपचे दुसरे नेते प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून धक्का बसलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राम शिंदेंवर यांनी रोहित पवारांनी विजय मिळवला होता. आताही राष्ट्रावादी काॅंग्रेसनं ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये भाजपच्या हातातील सत्ता घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील भादली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तृतीयपंथी अंजली पाटील यांनी विजय मिळवला आहे. त्या जळगाव जिल्ह्यातील त्या पहिल्या तृतीयपंथी विजयी उमेदवार ठरल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे नऊ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे या स्वीडनमधून पॉलिटिकल सायन्समधील पीएचडी प्राप्त उमेदवार होत्या. मतदारांनी प्रस्थापित पक्षांचे उमेदवार डावलून डॉ. चित्रा यांच्यासह त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले असून ८ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. आदिवासी समाजातील डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे हे दांपत्य ८ वर्षे विदेशात होते. त्यांनी स्वीडन, जपान आदी देशांमध्ये वास्तव केले आहे. डॉ. चित्रा ह्यांना पाच भाषा अवगत आहेत. भारतात परतल्यानंतर दाम्पत्य दिग्रसवाणी गावात सातत्याने सामाजिक कार्य केले. ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुरस्कर्त ग्राम विकास आघाडीतर्फे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ९ पैक्की ८ जागांवर ग्राम विकास पॅनलने विजय प्राप्त केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. पॅनेलच्या डॉ. चित्रा कुऱ्हे, सुभाष खंदारे, सुनीता खंदारे, मिना वसेकर, अनिता आढळकर, उज्वला नायकवाल, साळूबाई पाईकराव, हिम्मत खंदारे या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. 

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

पुणे जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींपैकी 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकल्याने उर्वरित 649 ग्रामपंचायतींमध्ये हाती आलेल्या निकालांमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्यातील 752 पैकी 518 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्याचा दावा केला जात आहे. बारामती तालुक्यात 51 पैकी 50, इंदापूरमध्ये 60 पैकी 37, शिरुरमध्ये 62 पैकी 45, आंबेगाव मध्ये 29 पैकी 16, भोर 69 पैकी 35, वेल्हा 31 पैकी 16, खेड 90 पैकी 75, दौंड 51 पैकी 30, मावळ 57 पैकी 40, मुळशी 45 पैकी 37, जुन्नर 64 पैकी 40, खडकवासला 22 पैकी 17, पुरंदर 68 पैकी 35, हवेली 52 पैकी 45 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या विचारांचे ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचेही उमेदवार काही ठिकाणी विजयी झाले आहेत. यात शिरुर, आंबेगाव, वेल्हा, खेड, मुळशी, जुन्नर, खडकवासला या तालुक्यांचा समावेश आहे.दरम्यान पुणे जिह्यातील भोर ग्रामपंचायतीच्या मतमोजणी दरम्यान तीन गावातील उमेदवारांना समान मते पडले. त्यामुळे काही वेळ सगळ्यांचेच लक्ष या दिवळे, वेळू, आणि जांभळी गावच्या निकालाकडे लागले. त्यामुळे उमेदवारांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. अखेर लहान मुलीच्या हस्ते चिठ्य्या काढून निकालाची घोषणा करण्यात आली. ज्यामुध्ये दिवळे गावातून निलेश पांगरे, वेळू गावातून सारिका जाधव आणि जांभळी गावातून शालिनी कदम हे उमेदवार विजयी ठरले. खेड शिवापूरची ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आलेली असून शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे यांनी राखला शिवसेनेचा गड राखला आहे. 11 जागांपैकी 9 जागा शिवसेनेला तर अवघ्या 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या संवेदनशील गावातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राखले असून  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवारांनी पुरस्कृत केलेल्या जयमल्हार पॅनलला 17 पैकी 11 जागा तर सहा जागा भाजप पुरस्कृत भैरवनाथ पॅनलला मिळाल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या ओतूर ग्रामपंचायतीवरील शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आले असून राष्ट्रवादी कॅांग्रेसला १७ पैकी ११ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेचे माजी सरपंच बाळासाहेब घुले पराभूत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि गजानान महाराज शिक्षण संस्थेचे सचिव वैभव तांबे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे यांच्याकडून पराभूत झाले आहेत. मावळ मध्ये 57 पैकी 45 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने विजय मिळवत सत्ता काबिज केली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मावळ मधील ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मावळ तालुक्यात भाजपला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी धक्का दिला आहे. एकूण 57 ग्रामपंचायती पैकी 45 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. सुनील शेळके हे राष्ट्रवादीचे आमदार झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले होते. मुळशी तालुका ग्रामपंचायत निवडणूकीत चाले (ता.मुळशी) ग्रामपंचायत निवडणुकीत दोघीना समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठी टाकण्यात आली. त्यात सीमा दहीभाते यांचे नशीब उजळले. या ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये रंजना अशोक दहीभाते आणि सीमा श्रीरंग दहीभाते या दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या.  त्यामुळे दोघीत कोण विजयी होणार याची ग्रामस्थांना उत्सुकता होती. तथापि मतमोजणीत दोघींनाही समसमान 176 मते मिळाली होती. तर दौंड तालुका ग्रामपंचायत निवडणूक मध्ये नानगाव ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाले असून भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलने बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत विकास व संदीप खळदकर या सख्ख्या भावांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवार- संदिप खळदकर,आशा गुंड, भाग्यश्री खळदकर, विमल खळदकर,विष्णू खराडे, चंद्रकांत खळदकर, शितल शिंदे, मीना काळे, सचिन शेलार,गणेश खराडे,विकास खळदकर, स्वप्नाली शेलार,स्वाती आढागळे. वरवंड ग्रामपंचायत 17 जागांसाठी  निवडणूकीत राष्ट्रवादीचे श्री.गोपीनाथ महाराज आदर्श ग्रामविकास पॅनेलचे 12 तर विरोधी श्री.गोपीनाथ महाराज जनसेवा पॅनेलचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. जुन्नर तालुका ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामपंचायत हिवरे तर्फे ना.गाव (ता.जुन्नर) ग्रामपंचायत विजयी उमेदवार :मनिष सुनील मोरडे ,योगीता दत्ता खोकराळे ,अर्चना गणपत भोर,दिगंबर राजेंद्र भोर, अनिता सुरेश थोरात,स्वाती विशाल खोकराळे, सोमेश्वर जालिंदर सोनवणे छाया शांताराम खोकराळे, दयानंद शंकर मुळे,अलका प्रदीप चक्कर पाटील असे आहेत. परिंचे ग्रामपंचायत १० जागांसाठी निवडणूक शिवसेना ७ राष्ट्रवादी ३ बिनविरोध १ माजी सभापती अर्चना जाधव यांच्या पॅनलचा ७ जागांवर विजय युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव यांच्या पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले. इंदापूर तालुका ग्रामपंचायत निवडणूकीत निमगाव केतकी ग्रामपंचायत प्रभाग 1 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी. प्रवीण दशरथ डोंगरे, अनुराधा संतोष जगताप, अजित भिवा मिसाळ तर पिंपरी बुद्रुक ( ता इंदापूर ) ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवार पूढील प्रमाणे - वार्ड क्रमांक १) ज्योती श्रीकांत बोडके, भाग्यश्री सुदर्शन बोडके, विद्यादेवी आबासाहेब बोडके, वार्ड क्रमांक २) पांडुरंग हंबिरराव बोडके, अनुराधा बाबासाहेब गायकवाड, सुनिता दत्तात्रय शेंडगे, वार्ड क्रमांक ३) संतोष हरिभाऊ सुतार, अनिल मशिकांत पाटील, हलीमा साहेबलाल शेख. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पिरसाहेब ग्रामविकास पॅनल सात तर भाजप पुरस्कृत पिरसाहेब विकास पॅनलला दोन जागावर समाधान मानावे लागले. भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतच्या क्रमांक एक व चार प्रभागात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत नसरापूर विकास पॅनलचा निर्विवाद जोरदार विजय झाला आहे. एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली आहे. शिरुर तालुका ग्रामपंचायत निवडणूकीत मिडगुलवाडी ग्रामपंचायत 7 सदस्यसंख्या असणाऱ्या यानिवडणूकीत दोन जागा बिनविरोध तर 5 जागेसाठी निवडणूक लागली होती. या निवडणूकीत सतीष इचके, प्रभावती मिडगुले, निता कोळेकर, संध्या मिडगुले, व राहूल मिडगुले विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलने हनुमान ग्रामविकास पॅनेलचा ८/१ ने, शिंगवे येथे राष्ट्रवादीच्या श्रीभैरवनाथ माता जोगेश्वरी ग्रामविकास पॅनेलने शिवसेनेच्या भैरवनाथ माता जोगेश्वरी परिवर्तन पॅनेलचा ६/४  ने पराभव केला तर खडकीच्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५/० असा विजय मिळवत बाजी मारली. जवळे( ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ९ जागेसाठी १८ उमेदवार रिंगणात होते यामध्ये स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलचे आठ उमेदवार निवडुन आले तर हनुमान ग्रामविकास पॅनेलचा एकमेव उमेदवार निवडुन आल्याने स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलने ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली. खेड तालुक्यातील वराळे ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्या भावजयीचा विजय, सरपंच बेबी बुट्टे-पाटील पराभूत झाल्या आहेत तर शरद बुट्टे-पाटील यांची सलग २५ वर्ष सत्ता कायम राखण्यात यश राखले आहे. ग्रामपंचायतीत सहा विरुद्ध एकने बाजी मारली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या शिवे ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी वर्चस्व मिळवले आहे. पाच विरुद्ध चार अशा फरकाने त्यांनी ग्रामपंचायतीत विजय मिळवला. कुडजे ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जागा निवडून आले आल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसच्या 3 उमेदवारांना यश आले आहे. माजी सरपंच समीर राष्ट्रवादीच्या चार जागा या पायगुडे यांच्या पॅनलच्या आहेत तर काँग्रेसचे हर्षल पायगुडे यांच्या पॅनलचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. डोणजे गावामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेच्या सभापती महिला बाल कल्याणच्या पूजा पारगे यांच्या गावात 11 पैकी 10 जागा बिनविरोध झाल्या होत्या. याठिकाणी एका जागेवर पूजा पारगे यांच्या पॅनेलच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. राहटवडे गावात 9 जागांपैकी 9 जागा बिनविरोध झाली 9 पैकी 8 जागेवर महिलांना संधी दिली आहे. एका जागेवर पुरुषाला संधी दिली आहे. तर नायगाव ग्रामपंचायतीमध्ये 11 जागांसाठी निवडणूक रंगली होती. यात राजेंद्र रतन चौधरी यांच्या  पॅनेलचे 7 उमेदवार विजयी झाले. यापूर्वीच याच पॅनलचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. विरोधी पॅनलने 3 जागांवरच यश मिळवता आले. आळंदी म्हतोबाची ग्रामपंचायत १३ जागांसाठी निवडणूक झाली यामध्ये दिलीप वाल्हेकर यांच्या श्रीनाथ म्हातोबा पॅनलच्या दहा उमेदवारांचा विजय झाला असून याच पॅनलमधील 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. आळंदीत विरोधी म्हतोबा जोगेश्वरी पॅनेलचा दारुण पराभव झाला. याठिकाणी पूर्वी दिलीप वाल्हेकर यांच्या श्रीनाथ म्हातोबा पॅनेलचीच सत्ता होती. त्यांना सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. शिंदवणे ग्रामपंचायत 13 जागांसाठी निवडणूक झाली यामध्ये विद्यमान सरपंच आण्णासाहेब महाडीक यांच्या संत यादवबाबा पॅनेलचे 9 उमेदवार विजयी. याच पॅनेलची एक उमेदवार बिनविरोध तर  विरोधी शिवछत्रपती पॅनेलला 1 जागा. 2 जागेवर  खेडेकर यांची जयमल्हार आघाडीवर आहेत. आण्णासाहेब महाडीक यांच्या संत यादवबाबा पॅनेलने सत्ता राखली आहे. तर सोरतापवडी ग्रामपंचायत 15 जागांसाठी निवडणूककीत विद्यमान सरपंच सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांच्या भाईकेडी चौधरी पॅनलचे 7 उमेदवार विजयी. तर विरोधी सोरतपेश्वर पॅनलला 8 जागा. भारतीय जनता पक्षाची पुर्व हवेलीतील एकमेव सोरतापवडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आली आहे. आणि कोरेगाव मूळ एकूण जागा 13 असून 10 जागांसाठी निवडणूकीत दिलीप शितोळे, विठ्ठल शितोळे व आप्पा कड, बापूसाहेब बोधे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलला 10पैकी 8 जागा तर  आघाडीच्या पॅनलच्या यापूर्वीच 3 जागा बिनविरोध मिळाल्या आहेत. विरोधी भैरवनाथ पॅनलला अवघ्या 2 जागेवरच समाधान मानावे लागले आहे. कुंजीरवाडी ग्रामपंचायत 17 जागांसाठी निवडणूकीत माजी सरपंच सचिन तुपे, संतोष कुंजीर व संदीप धुमाळ यांच्या नेतृवाखाली काळभैरवनाथ  पॅनलला 9 जागा. तर भरत निगडे यांच्या आघाडीला 3 जागा. व अपक्ष 2 जागा.  सचिन तुपे यांच्या काळभैरवनाथ पॅनलने सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. आणि लोणी काळभोर ग्रामपंचायत 17 जागांसाठी निवडणूक चुरशीची झाली यामध्ये परिवर्तन पॅनल 13  तर अष्टविनायक पॅनलने 4 जागा जिंकल्या आहेत.   यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर यांची ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता. तर शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांना मोठा धक्का. परिवर्तन पॅनलचे प्रभाग क्रमांक 4 चे योगेश काळभोर सर्वांधिक मताने विजयी तर त्याच पॅनलच्या प्रभाग क्रमांक 6 च्या संगीता काळभोर या सर्वात कमी म्हणजेच एका मतानी विजयी. माधव काळभोर यांनी प्रशांत काळभोर यांच्याकडून सत्ता खेचून घेतली आहे. केसनंद ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेनेचे वर्चस्व राखले असून सेनेच्या ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनेलने निर्वीवाद वर्चस्व मिळवले. तर सत्ताधारी भैरवनाथ पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या. सांगवी सांडसमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलची एकहाती सत्ता मिळवली आहे. सांगवी सांडस ग्रामपंचायतीत 7 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्व जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. तर विरोधी विष्णुकृपा ग्रामविकास पॅनेलला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण उर्फ तात्या काकडे यांचे नेतृत्वाखालील चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने 10 जागा जिंकून बाजी मारली. तर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब काकडे व माजी सरपंच नवनाथ काकडे यांच्या नेतृत्वाखाली महातारी आई माता ग्रामविकास पॅनेलला 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात शिवसेनेने आघाडी घेतली आहे. सेनेला स्वबळावर सर्वाधिक २० तर कॉंग्रेसला ८, राष्ट्रवादीला ७, भाजपला २ ग्रामपंचायती स्वबळावर मिळालेल्या आहेत. परस्परांशी युती करूनही या पक्षांनी काही ग्रामपंचायती मिळवलेल्या आहेत. पक्षीय आघाडी करून शिवसेनेने ५, राष्ट्रवादीने ५, कॉंग्रेसने ७ तर भाजपने ३ ग्रामपंचायतीत सत्तेत शिरकाव केला आहे. जवळपास ८ ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाड्यांना सत्ता मिळाली आहे. शिवसेनेने स्वबळावर सर्वाधिक ज्या २० ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली त्यामध्ये परिंचे, बेलसर, खळद, पिंपरी, कोडीत बुद्रुक, पिसर्वे, वाळूंज, काळदरी, टेकवडी, गुरोळी, केतकावळे, सोनोरी, सुपे खुर्द, निळूंज, धालेवाडी, मावडी क.प, सटलवाडी, हरगुडे, शिवरी, हरणी या गावांचा समावेश आहे तर कॉंग्रेसने ८ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली त्यामध्ये सोमुर्डी, रीसे, आंबोडी, पारगाव, नारायणपूर, पिसुर्टी, निरा, पोंढे या गावांचा समावेश आहे तर राष्ट्रवादीने ७ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली त्यामध्ये कुंभारवळण, तोंडल, पांडेश्वर, पिंपरे खुर्द, मावडी सुपे, वाघापूर, जवळार्जुन या गावांचा समावेश आहे तर भाजप २ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली त्यामध्ये झेंडेवाडी, थापे-वारवडी या गावांचा समावेश आहे. राजकीय पक्षीय युती/आघाडी होऊन सत्ता मिळाली आहे अशा आघाडी पक्ष व ग्रामपंचायत नावे पुढीलप्रमाणे- शिवसेना - राष्ट्रवादी : साकुर्डे, पिंपळे, शिवसेना - कॉंग्रेस : माहूर, राजेवाडी, कॉंग्रेस - राष्ट्रवादी : नाझरे क.प, दौंडज, राख, कॉंग्रेस – भाजप : दिवे, कोळविहीरे, शिवसेना – भाजप : गराडे यांचा समावेश आहे तसेच एकूण 8 ग्रामपंचायती मध्ये संमिश्र निकाल लागले असून त्यामध्ये आंबळे, हिवरे, बोराळवाडी, आस्करवाडी, मांडकी, कोडीत खुर्द, भिवडी, चांबळी या गावांचा समावेश आहे.  राजेवाडी ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे असून प्रभाग-1 दत्तात्रय सोपान जगताप, ताराबाई बबन राऊत, नंदा प्रल्हाद जगताप, प्रभाग-2 रामदास बाबुराव जगताप, आशा संतोष जगताप, प्रभाग-3 राजेंद्र ज्ञानोबा शिंदे, मंदा ज्ञानेश्वर जगताप. आस्करवाडी ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवार- संदीप दामोदर वाडकर, अनंता धोंडीबा मोरे, अश्विनी निलेश जगताप, ज्योती परशुराम वाडकर, निलम जालिंदर वाडकर. वाळूंज ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवार- कैलास महादेव म्हेत्रे, योगिता विलास इंगळे, अनिल विठ्ठल इंगळे, निता गणेश खोमणे, कैलास फकीर इंगळे, रेश्मा राहुल चौरे. कोळविहिरे ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवार- बापू तात्याबा भोर, निता सोमनाथ खोमणे, निर्मला बाळासाहेब पवार, विलास सुदाम घाटे, स्वाती प्रशांत जाधव, विमल विलास नाणेकर, धाकू भगवान सोनवणे, मिनाक्षी दिलिप झगडे, विशाल रामदास घोरपडे, महेश रामदास खैरे, कुसुम प्रताप गरुड. कुंभारवळण ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवार- अमोल दत्तात्रय कामठे, निलम संतोष कुंभारकर, नंदू धोंडिबा कामथे, अश्विनी सतिश खळदकर, संदीप अरुण कामठे, मंजुषा गोपाळ गायकवाड. काळदरी ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवार- अंकुश दिनकर परखंडे, शारदा पांडुरंग जाधव, दमयंती तुळशीराम पेटकर, देवदास गोकुळ यादव, अशोक लक्ष्मण भगत, अनिता तुषार कारकर, गणेश सोमनाथ जगताप, राणी राहुल थोपटे, अलका महादेव पिसाळ. सोमर्डी ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवार- मारुती केरबा बोराडे, मंदा शांताराम शेंडकर, सुनिल भैरु पवार, सुमन उत्तम भांडवलकर, धनाजी महादेव भांडवलकर, सुनीता तानाजी बोऱ्हाडे.यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. 

बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

बारामती तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली असल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व यंदाही कायम राहिले आहे.  सांगवीमध्ये चंद्रराव तावरे यांनी ताकद लावली होती मात्र तेथेही राष्ट्रवादीच्या दहा उमेदवारांचा तर तावरे यांच्या पाच उमेदवारांचा विजय झाला, माळेगाव कारखान्यापाठोपाठ सांगवी गावातही चंद्रराव तावरे यांना पराभव स्विकारावा लागला. अनिल तावरे, प्रकाश तावरे, महेश तावरे, किरण तावरे यांनी संयुक्त प्रयत्न करीत सांगवी येथे राष्ट्रवादीकडे सत्ता खेचून आणली. ही निवडणूक तालुक्यात प्रतिष्ठेची होती. कांबळेश्वर मध्ये माजी सभापती करण खलाटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या विरोधातील सुरेश खलाटे व गणपत खलाटे यांच्या पॅनेलला आठ जागा तर करण खलाटे यांच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. को-हाळे बुद्रुकमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या पॅनेलने एकहाती विजय मिळविला. खोमणे यांच्या पॅनेलला आठ जागा मिळाल्या.  सुनील भगत यांच्या पॅनेलला चार, लालासाहेब माळशिकारे यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या. वडगावनिंबाळकर मध्ये सुनील ढोले, धैर्यशिल राजेनिंबाळकर व अनिलकुमार शहा यांच्या पॅनेलला अकरा जागा मिळाल्या. संग्रामसिंह राजेनिंबाळकर यांच्या पॅनेलला पाच जागा मिळाल्या. होळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या पॅनेलला अकरापैकी दहा जागा मिळाल्या. त्यांनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. सोमेश्वरचे संचालक सिध्दार्थ गीते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला पराभव पत्करावा लागला.  निंबूत ग्रामपंचायतीत नऊ जागा प्रमोद काकडे व सतीश काकडे यांच्या पॅनेलला तर सहा जागा गौतम काकडे व महेश काकडे यांच्या पॅनेलला मिळाल्या. सतीश व प्रमोद काकडे यांनी सत्ता राखली असली तरी प्रथमच त्यांच्या विरोधात सहा जागा निवडून आल्या. झारगडवाडीमध्ये छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर व बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर यांच्या पॅनेलचा विजय झाला. 15 पैकी 11 जागांवर त्यांनी विजय मिळविला आहे.
बारामती तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीं गावनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- 
1 झारगडवाडी- प्रशांत बोरकर, कल्पना झारगड, निर्माण शेडगे, मालन टिंगरे, सोनाली चव्हाण, अजित बोरकर, वैष्णव बळी, पूनम आवटे, अजिनाथ बुरुंगले, संतोष नेवसे, अनिता जाधव, मोनाली राऊत, सोनाली करे, वैशाली मासाळ, पद्मनाभ निकम.
2 सांगवी- अनिल काळे, पौर्णिमा लोंढे, छाया तावरे, कमल गायकवाड, चंद्रकां तावरे, नीलीमा जगताप, विजय तावरे, विठाबाई एजगर, स्वाती वाघ, सिध्दार्थ जगताप, अनिल तावरे, अनिता तावरे, विलास आडके, प्रणव तावरे, स्वाती तावरे.
3 माळवाडी लोणी- अनिता दगडे, वैशाली यादव, दत्तात्रय लोणकर, मंजू लडकत, अनिल लडकत, गणेश बोरावके, निर्मला लोणकर.
4 पाहुणेवाडी- दादा जगताप, राधिका भंडलकर, उज्वला तावरे.
5 मोढवे- सुनील मोरे, अलका भगत, राजेंद्र मोरे, सुलोचना बनकर, वैभव मोरे, शीतल मोरे, तान्हूबाई माने, सुलोचना भोसले, सतीश शिंदे.
6 कारखेल- पूनम भोसले, रुपाली चव्हाण, वैशाली रणसिंग, सचिन कुचेकर.
7 सोनवडी सुपे- स्नेहल साळुंके, असिफ सय्यद, नजमा सय्यद, पूजा साळुंके.
8 ब-हाणपूर- बाळासाहेब चांदगुडे, सुप्रिया चांदगुडे, सुखदेव नाळे, प्रमोद चांदगुडे, नीलम चांदगुडे, राजेंद्र मोरे, सोनाली गवळी, माया आहेरकर.
9 ढेकळवाडी- सीमा भालेराव, सीमा ठोंबरे, राहुल कोळेकर, अजित घुले, अर्चना देवकाते, अमोल समिंदर.
10 मुर्टी- छाया मोरे, मंगल खोमणे, किरण जगदाळे, प्रियंका गदादे, सुप्रिया राजपुरे, किरण जगदाळे,
11 वडगावनिंबाळकर- राहुल आगम, मोहन बनकर, प्रमोद किर्वे, अजित भोसले, प्रेमलता रांगोळे, भानुदास दरेकर, सीमा राऊत, लता परांडे, संजय साळवे, मयुरी साळवे, राजश्री साळवे, धैर्यशिल राजेनिंबाळकर, अश्विनी खोमणे, संगीता शहा, सुनील ढोले, सारिका खोमणे, स्वाती हिरवे.
12 मेखळी- आनंदा देवकाते, उषा कोळेकर, अनिता चोपडे, रणजित देवकाते, दीपक भोसले, युवराज देवकाते. 
13 घाडगेवाडी- पूनम तुपे, संगीता चव्हाण, बाळू साबळे, वंदना महामुनी, रेश्मा शिंदे, राजकुमार शेडगे, विष्णू काटकर, ज्योती वाघ, शरद चव्हाण.
14 चोपडज- मंगल गायकवाड, पुष्पलता जगताप, विद्या कोळेकर, मनिषा भोसले, पांडुरंग कोळेकर, स्वाती यादव, तुकाराम भंडलकर, रुक्मिणी पवार, जयश्री गाडेकर, सागर गाडेकर, सुधीर गाडेकर.
15. मोराळवाडी- विलास बरकडे, सीमा माघाडे, किरण कारंडे, नीलेश मासाळ, सारिका नागरगोजे.
16 माळवाडी लाटे-  अजय बनकर, छाया भेलके, अशोक खलाटे, नंदा सोनावणे, उज्वला खलाटे, रामचंद्र दानवले.
17. निंबूत- सुवर्णा लकडे, आरती काकडे, शिरीष काकडे, निर्मला काळे, रवींद्र जमदाडे, विद्यादेवी काकडे, योगिता दगडे, अमर काकडे, नंदकुमार काकडे, निर्मला बनसोडे, प्रमोद बनसोडे, कुसुम काकडे, उषा पवार, सुरेश अत्तार, वैशाली काकडे.
18. कण्हेरी- भारती शेलार, संतोष काटे, तेजस्विनी शिंदे, मीराबाई मोहिते, देविदास देवकाते, सुरेखा शेलार, दत्तात्रय शेलार, सुनिता पवार. 
19.सोनगाव- शीतल भोसले, शैला गोफणे, योगेश बनकर, जयश्री थोरात, पप्पू सोलनकर, नितीन कांबळे, वर्षा जाधव, शुभांगी देवकाते, राजू ताटे, अस्लम मुलाणी, शीतल इंगवले, अंबिका माने.
20. खंडोबाची वाडी-  अजित लकडे, वर्षाली कटरे, भाग्यश्री गडदरे, श्रुती मदने, संतोष धायगुडे, मनीषा फरांदे, मंगल ठोंबरे.
21. वढाणे-  लक्ष्मी चौधरी, भानुदास चौधरी, रामदास चौधरी, विजय कौले, प्रगती चौधरी, शुभांगी चौधरी, गंगुबाई लकडे, सुनील चौधरी.
22. खराडेवाडी-  मंगल भोसले, रोहिणी भापकर, वैभव खराडे, सुनिता खराडे.
23. सावळ-  नितीन भिसे, सारिका आटोळे, ज्योती आवाळे, रोहिणी खोमणे, तृप्ती वीरकर, फक्कड बालगुडे, सुनिता आवाळे, अंजली आवाळे, चेतन आटोळे. 
24. शिरवली- अरविंद कांबळे, प्रणिता पोंदकुले, माधवी बागव, प्रदीपकुमार पोंदकुले, निशीकांत निकम, शुभांगी खारतुडे, संगीता माने, अमोल डांगे, मंगल घनवट, माधुरी मदने, अनिल राऊत.
25. मळद- विकास भोसले, युवराज शेंडे, सारिका पिसाळ, किरण गावडे, सुनिता सातव, आशा मोहिते, बजरंग पवार, जया चव्हाण, सुवर्णा जाधव, प्रफुल्लकुमार गावडे, योगेश बनसोडे, अपर्णा आटोळे, आशा लोंढे.
26. लाटे- संग्राम भोई, माधुरी खलाटे, प्रशांत खलाटे, उषा खोमणे, वंदना ताकवले, उमेश साळुंके, कुमार ननवरे, मनीषा खलाटे, शीतल खलाटे.
27. शिरष्णे- अजित काशिद, काजल पवार, योगेश खलाटे, लता पिंगळे, मोनिका खुटवड, सुधीर पिंगळे, जितोबा खरात, सविता पिंगळे, नंदा भेलके. 
28. होळ-  सूरज कांबळे, रुपाली होळकर, आशाबाई वायाळ, संतोष होळकर, उज्वला होळकर, सुजाता भिसे, छाया भंडलकर, दीपक वाघ, सुनंदा कर्चे, तानाजी वायाळ, रमेश वायाळ. 
29.सस्तेवाडी- भीमाबाई टकले, वैजंता टकले, किरण कदम, विद्या आवटे, बापूराव ठोंबरे, शोभा मोरे, पूजा साळुंके, प्रवीण कारंडे, योगेश सस्ते.
30. ढाकाळे- संदीप होले, पूजा खामगळ, राहुल खामगळ, पूजा जगताप, सुवर्णा जाधव, चंद्रसेन जगताप.
31. पिंपळी- राहुल बनकर, उमेश पिसाळ, मंगल केसकर, आबासाहेब देवकाते, अश्विनी बनसोडे, संतोष ढवाण, मंगल खिलारे, अजित थोरात, मीनाक्षी देवकाते, निर्मला यादव.
32. खांडज- रवींद्र आटोळे, पार्वती चव्हाण, रेखा वाघ, नर्मता आटोळे, सूर्यकांत बर्गे, अर्चना आटोळे, प्रदीप माने, शीतल कांबळे, सचिन घाडगे, बापट कांबळे, शेखर जाधव, मयूरी पवार.
33 को-हाळे बुद्रुक- अनिल शिंदे, कल्पना माळशिकारे, वैशाली माळशिकारे, हनुमंत जगदाळे, सुनीता खोमणे, लता नलवडे, आबा पडळकर, अश्विनी चव्हाण, दिव्याभारती खोमणे, राजेंद्र पवार, रवींद्र खोमणे, आशाबी सय्यद, मोहन भगत, अमर भगत, वनिता निकम. 
34. कांबळेश्वर- मंगल जायपत्रे, सीमा खलाटे, प्रवीण जगताप, मंदाकिनी कानडे, अनुजा खलाटे, गिरीश खलाटे, संगीता जगताप, प्रकाश खलाटे, किरण आगवणे, सचिन वाघमारे, मंगल कुंभार.
35. देऊळगाव रसाळ - सल्लाउद्दीन इनामदार, मनिषा वाबळे, वैशाली वाबळे, राहुल लोंढे, मीराबाई रसाळ, दत्तात्रय वाबळे, शीतल रसाळ, सुरेश रसाळ. 
36. सदोबाचीवाडी- मनीषा होळकर, परवीन शेख, लक्ष्मण होळकर, कोमल कारंडे, संगीता फराटे, अजित पिसाळ, बंडू कर्चे, कविता जाधव, ऋषीकेश धुमाळ. 
37. अंजनगाव - नीलम मोरे, सविता परकाळे, सत्पाल चव्हाण, शोभा वायसे, प्रतिभा परकाळे, छाया मोरे, सुभाष वायसे, वंदना परकाळे, नामदेव परकाळे. 
38. उंडवडी सुपे- गणेश माकर, अश्विनी मांढरे, गोरख गवळी, राणी नलवडे, अनिल गवळी, लता जगताप, रोहिणी गवळी, प्रकाश गवळी.
39. नीरावागज- विद्या भोसले, उज्वला देवकाते, हेमंत देवकाते, सुनिता कुंभार, संग्राम देवकाते, सुनिल देवकाते, शीतल धायगुडे, पल्लवी देवकाते, जगदीश देवकाते, सागर देवकाते, ललिता भोसले, पोपट उर्फ उदयसिंह देवकाते, तेजस्विनी देवकाते.
40. आंबी खुर्द-  लालभाई शेख, छाया कुतवळ, पुष्पा कुतवळ, संगीता गाढवे, किशोर कुतवळ, निर्मला कदम, गौरव गाढवे.
41. तरडोली-  अनिता पवार, संतोष चौधरी, नवनाथ जगदाळे, सागर जाधव, अश्विनी गाडे, विद्या भापकर, नबाबाई धायगुडे, स्वाती गायकवाड, महेंद्र तांबे. 
42. कटफळ- सीमा मदने, संध्याराणी झगडे, संग्रामसिंह मोकाशी, विजय कांबळे, संजय मोकाशी, सविता लोखंडे, पूनम कांबळे, तात्याराम रांघवन.
43. गोजुबावी- कुंदा कदम, कल्याण आटोळे, किशोर जाधव, हिराबाई जाधव, माधुरी कदम, सुनिता गावडे, माधुरी सावंत.
44. थोपटेवाडी- शिवाजी कोरडे, शुभांगी अडागळे, राणी पानसरे, संतोष खांडेकर, रेखा बनकर, कमल थोपटे, कल्याण गावडे, पृथ्वीराज नलावडे, सीमा थोपटे.
45. नारोळी- भारती ढमे, दत्तात्रय ढमे, प्रदीप गिरीगोसावी, मीना ढमे, कोमल सोनवणे, अक्षय़ कोंडे.
46. जोगवडी- सचिन सोनवणे, अर्चना जाधव, सारिका महानवर, प्रभु महानवर, रेखा भोसले.
47. बाबुर्डी- शारदा लडकत, दिपाली जगताप, दत्तात्रय ढोपरे, ज्ञानेश्वर पोमणे, अर्चना पोमणे, मंगल लव्हे.
48. जैनकवाडी- संदीप शेंडे, स्वाती पवार, रुपाली सूर्यवंशी, धनश्री लोखंडे, सतीश लोखंडे, बाळासाहेब माने.
49. जळगाव सुपे- समीर खोमणे, कौशल्या खोमणे, दिलीप खोमणे, स्वाती जगताप, सुन्नाबी मुजावर, कैलास जगताप, नयना जगताप, मनीषा खोमणे, दीपक येडे.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदान तपशील

तालुका

ग्रामपंचायत

मतदार संख्या

एकूण मतदान

टक्‍केवारी

वेल्हे

20

14802

12832

86.69

आंबेगाव

25

54045

41567

76.91

मुळशी

36

71310

54385

76.27

हवेली

45

130581

96599

73.98

दौंड

49

172370

136685

79.30

बारामती

49

119457

101110

84.64

मावळ

49

82519

67464

81.76

पुरंदर

55

105283

87332

82.95

इंदापूर

57

158599

129926

81.92

जुन्नर

59

119965

91829

76.55

शिरूर

62

167903

138975

82.77

भोर

63

66201

56621

85.53

खेड

80

125279

102779

82.04

एकूण

649

1388314

1118104

80.54


पुणे जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींपैकी 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकल्याने उर्वरित 649 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये 649 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी 21 हजार 359 उमेदवारांनी एकूण 21 हजार 771 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ हजार 778 जणांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या चार हजार 904 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. जिल्ह्यात मतदान 80.54 टक्‍के झालेले आहे. पुणे जिल्ह्यातील उर्वरित 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 4904 जागांसाठी 11 हजार सात उमेदवार रिंगणात उभे होते. या निवडणुकीत एकूण 13 लाख 88 हजार 314 मतदारांपैकी 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये 5 लाख 33 हजार 708 स्त्रियांचा समावेश आहे. तर 5 लाख 84 हजार 392 पुरुष मतदारांनी मतदान केले आहे. तर 4 इतरांचे मतदान झाले होते. एकूण मतदार 13 लाख 88 हजार 314 होते त्यामध्ये स्त्री मतदारांची संख्या 6 लाख 73 हजार 145 तर मतदारांची संख्या पुरुष- 7 लाख 15 हजार 148 होती त्यापैकी 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये 5 लाख 33 हजार 708 महिला मतदार तर 5 लाख 84 हजार 392 पुरुष मतदारांचा समावेश होता. 
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या-
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================