पुणे जिल्ह्यात ४९०४ जागांसाठी, ११००७ उमेदवार रिंगणात
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. ४ हजार ९०४ जागांसाठी ११ हजार ७ उमेदवार रिंगणात आहेत. ८१ जागा बिनविरोध झाल्या असून ६५० जागांसाठी चुरशीच्या लढती होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीचा ज्वर वाढणार आहे. ४ तारखेला अर्ज माघारीच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या 746 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम निवडणूक जाहीर केला होता. जवळपास २१ हजार ३५८ उमेदवारांनी २१ हजार ७७१ अर्ज दाखल केले होते. यातील ८ हजार ७७८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे 650 ग्रामपंचायतीच्या निवडणूक 15 तारखेला होणार आहे. यात 2 हजार 31 प्रभागात 4 हजार 904 जागांसाठी 11 हजार 7 उमेदवार रिगणात उभे आहेत. 21,771 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत 296 उमेदवारांचे 443 अर्ज बाद झाले. तर 21,374 उमेदवारांचे 21,623 अर्ज वैध ठरले होते. माळेगाव ग्रामपंचायत येत्या काही दिवसात नगरपालिका होणार असल्याने सर्व उमेदवारांनी एकत्र येत निवडणूक खर्च टाळण्यासाठी अर्ज मागे घेतल्याने येथील निवडणूक होणार नाही. 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे. प्रचारासाठी आता केवळ 9 दिवस उरले आहे. यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होणार आहे. अनेक ग्रामपंचायतीत गटातटाच्या राजकारनामुळे चुरस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याने गाव कारभाऱ्याचा निवडीचा फड यंदा चांगलाच रंगणार आहे. ग्रामपंचायतीतही यंदा हायटेक प्रचारावर उमेदवाराचा भर दिसून येत आहे. फेसबुक, व्हाट्स अँप, इन्स्टाग्राम या सारख्या समाजमाध्यमांवर यापूर्वीपासूमच उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. या सोबतच आपली कामे मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी आधुनिक माध्यमाचा वापरही केला जात आहे. शिरूर तालुक्यात 1148, दौंड तालुक्यात 1172, बारामती 1013, खेड मध्ये 1111तर इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 1355 उमेदवार निवडणूक रिगणात आहेत. दरम्यान पुरंदरमधील पिंगोरीचा निवडणुकीवर बहिष्कार- गावात विकासकामे होत नसल्याच्या कारणावरून बिनविरोधाच्या वाटचालीवर असलेल्या पिंगोरी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या निवडणुकीत बहिष्कार घालणारी एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. गावातील दोन महत्त्वाच्या रस्त्याची कामे आमदार खासदारांनी आश्वासने देऊनही पूर्ण केली नाहीत. तसेच गाव अनेक सुविधांपासून वंचित असल्याने ग्रामस्थांनी अर्ज माघारीच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे. तर शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. पुणे महापालिकेत गाव समावेशामुळे शेवाळेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या निर्णयाचे स्वागत होत असताना आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी एका वॉर्डातील एका जागेसाठी निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. 11 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 10 जागेसाठी एकही अर्ज आलेला नाही, केवळ एकाच जागेसाठी आता चुरशीची निवडणूक होणार अशी स्थिती यातून निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत उमेदवारांना अपात्र ठरवणारी याचिका फेटाळली; याचिकाकर्त्यांनाच झाला दंड
वेळू ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक दोनमधून वेळूचे माजी उपसरपंच ईश्वर पांगारे, तर वॉर्ड क्रमांक चारमधून बाळासाहेब रामचंद्र वाडकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, काही वर्षांपूर्वी पांगारे आणि वाडकर यांच्यावर ३९ (१) प्रमाणे कारवाई झाली होती. त्यानुसार ते दोघेजण ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे सांगून त्यांच्या उमेदवारी अर्जावर वाडकर आणि गोसावी यांनी हरकत घेतली होती. ती फेटाळून लावत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पांगारे आणि वाडकर यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात शिवाजी वाडकर आणि किरण गोसावी यांनी २ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर ४ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत वेळू ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवत न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या. तसेच, याचिकाकर्त्यांना न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पांगारे आणि वाडकर यांच्या वतीने राजीव पाटील आणि प्रशांत मोहन पाटील यांनी काम पाहिले. मूळ ग्रामपंचायत अधिनियमामध्ये सदस्य, उपसरपंच किंवा सरपंचाने आपले कर्तव्य पार पाडताना गैरवर्तन व गैरकारभार केल्यास मूळ ग्रामपंचायत अधिनियम ३१(१) मध्ये संबंधित सदस्य पाच वर्षे निवडणूक लढविण्यासाठी अपात्र राहील, अशी शिक्षेची तरतूद होती. यामध्ये सन २०१७ मध्ये दुरुस्ती होऊन त्यात निवडणूक लढविण्यासाठी अपात्रतेचा कालावधी सहा वर्षे केला. वेळूचे माजी उपसरपंच ईश्वर पांगारे आणि सदस्य बाळासाहेब वाडकर यांच्यावर सन २०१५ मध्ये कारवाई झाली होती. त्यामुळे नवीन दुरुस्तीचा नियम त्यांना लागू होणार नाही, असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या आहेत.
पिसे ग्रामपंचायतमध्ये प्रथमच बिनविरोध निवडणूक
पिसे ग्रामपंचायत सन 1962 मध्ये स्थापन झाली. साठ वर्ष जे झाले नाही ते यंदा घडले आहे. पिसे ग्रामपंचायतमध्ये प्रथमच बिनविरोध निवडणूक झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक वेळा ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. अनेक वेळा प्रयत्न करून बिनविरोध न झालेली ग्रामपंचायत पिसे गावातील जेष्ठ, तरुण, युवक, महिलांनी एकत्र येत पुढाकार घेऊन बिनविरोध केली. ग्रामस्थांचे श्रीनाथ, म्हस्कोबा व पीरबाबा देवस्थांवरती श्रद्धा असल्याने सर्वांनी एक मताने आपले उमेदवार निश्चित केले. त्यामुळे निश्चित केलेले सात अर्ज ठेऊन बिनविरोध ग्रामपंचायत करण्यात यश आले. यावेळी सर्व नवीन सदस्यांनी सांगितले की अत्यंत विश्वासाने आम्हा सर्वाना संधी दिली असून विकासासाठी सर्वांनाबरोबर घेऊन सर्व तो परी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. वॉर्ड क्र १ मधून 1) रोहन नारायण मुळीक 2) सीमा संतोष मुळीक 3) द्वारकाबाई पांडुरंग मुळीक, वॉर्ड क्र २ मधून 1) गणेश बाळासो सांगळे 2) शोभा नंदकुमार कुटे, वॉर्ड क्र ३ मधून 1) पंडित गुलाबराव मुळीक ,2) दिलशाद सल्लाउद्दीन सय्यद याना संधी दिली आहे.
दौंडच्या थोरातांची तिसरी पिढी राजकारणात; बोरीपार्धीमधून अभिषेक आनंद थोरात हे बिनविरोध
दौंड तालुक्यातील माजी आमदार काकासाहेब थोरात यांच्या तिस-या पिढीने आज राजकारणात प्रवेश केला. त्यांचे नातू अभिषेक आनंद थोरात यांची ग्रामपंचायत बोरीपार्धीच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली. बोरीपार्धी ग्रामपंचायत निवडणूक असून यामध्ये काकासाहेब यांचा नातू अभिषेक याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र इतरांनी माघार घेत त्यास बिनविरोध निवडून दिले.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.