Wednesday, 13 January 2021

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; राजीनामा देण्याची शक्यता!

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ!


राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारींमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेली असून मंत्रीपद व आमदारकी देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडें यांच्या दुसऱ्या विवाहीत महिलेच्या बहिणने मुंबई पोलिसांकडे मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार देखील केली आहे. या तक्रारीनंतर त्यांनी दुसरे लग्न केल्याचे सार्वजनिकरित्या मान्य केले आहे. दुसऱ्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचेही त्यांनी कबुल केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची पत्नी, मुलांची व त्यांच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. राजकीय दबावामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर मुख्यमंत्री आता धनंजय मुंडेंवर अॅक्शन घेणार का? हा सवाल उपस्थित होत आहे. थेट महिलेने केलेले गंभीर आरोप, पोलिसांमध्ये दिलेली तक्रार असा नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांवर दबाव असू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणता पवित्रा घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान 
दुसऱ्या पत्नी सौ. करुणा धनंजय मुंडे (डीन क्र. 06774438) आणि त्यांचा भाऊ ब्रिजेश कुमार शर्मा यांची भागीदारीत एक कंपनी KDM TREXIM PRIVATE LIMITED असून त्याचा नोंदणी क्र. 32349 दि. 07 फेब्रुवारी 2014 असून सीआयएन क्र. CIN U74900MP2014PTC032349 असा आहे. या कंपनीने फँटम फिल्मसच्या मालकीची 3 कोटी कर्जरुपी गुंतवणूक केल्याची माहिती उजेडात आलेली आहे. सदर माहिती निवडणूक शपथपत्रात दुसरी पत्नी करुणा मुंडे आणि मुलाचे नाव जाहीर केले नाहीत तसेच त्यांनी केडीएम ट्रेक्सिम प्रायव्हेट लिमिटेडचा खुलासा केलेला नाही जेथे त्यांची दुसरी पत्नी कंपनीत संचालक आहेत. निवडणूक आयोगाला दाखल शपथपत्रात कौटुंबिक सदस्यांची माहिती व त्यांच्या संपत्तीची माहिती लपविल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे विरोधीपक्ष नेत्यांचे म्हणणे असून त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. निवडणूक आयोग काय व किती तत्परतेने कारवाई करेल हे येणारया काळातच सामान्य नागरिकांना समजून येईल. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतची थेट लेखी तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच अतिशय महत्वाचे मुद्दे नमूद करत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे सोमय्या यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचेही मान्य केले आहे. शिवाय यांच्या मुलांना आपले नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. पण ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंयज मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान बलात्कार प्रकरणाच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आज मंत्रालयात आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काय आहे प्रकरण?

रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले. त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा आरोप केला आहे.

धनंजय मुंडे काय खुलासा केला आहे ?

२०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात  करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

कायदा काय सांगतो?

2001 च्या अपत्याच्या कायद्यानुसार दोन अपत्यांमध्ये तिसऱ्या मुलाची भर पडल्यास तो कायद्याने गुन्हा आहे अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते हा नियम फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू आहे. विधानसभा सदस्यांना नियम लागू नसल्याने मुंडे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकत नाही. केवळ दुसऱ्या पत्नीची व मुलांची माहिती व त्यांच्या संपत्तीची माहिती लपविल्याचे स्पष्ट होत आहे. खोटे, अपूर्ण शपथपत्र दाखल केल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. हिंदू या व्याख्येत बसणाऱ्या पुरुषाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करता करता येत नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायदा 1946 नुसार एक लग्न झालेले असतांना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर ठरते. धनंजय मुंडे यांचे कायदेशीर लग्न झाले आणि त्यांची कायदेशीर पत्नी आहे. त्यांनी दुसरे लग्न केले नाही. ते 2006 पासून एका स्त्री सोबत विवाहासारख्या संबंधात राहतात पण ती त्यांची कायदेशीर बायको नाही. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागूच होत नाही. आणि एक बायको असतांना दुसऱ्या स्त्रीशी विवाहा-सारखे संबंध ठेवणे याविरोधात एक तर कायदेशीर पत्नी तक्रार करू शकते किंवा विवाहाशिवाय सहजीवनासरखे संबंध असलेली स्त्री तक्रार करू शकते. धनंजय मुंडेंच्या बाबतीत या दोन्ही स्त्रियांची काहीही तक्रार नाही. तसेच निवडणुकीच्या आधी उमेदवाराने जी माहिती माहिती द्यायची असते त्यामध्ये कायदेशीर बायकोची माहिती देणेच आवश्यक आहे. त्याअर्थाने धनंजय मुंडे यांनी बायको बद्दलची माहिती लपविली असेही एका अर्थाने म्हणता येत नाही. पण मुलांची माहिती त्यांनी लपविली आहे. असे खोटे व दिशाभूल करणारे प्रतीज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल करणे ही गंभीर कायदेशीर चूक आहे. पूर्वी विवाहाशिवायच्या संबंधातून झालेल्या मुलांना 'अनौरस', नाजायज असे म्हणायचे पण तसे म्हणणे चुकीचे आहे असे स्पष्ट करतांना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, स्त्री-पुरुषांचे संबंध कायदेशीर किंवा बेकायदेशीर असू शकतात पण कोणतेच मूल बेकायदेशीर नसते. धनंजय मुंडे यांनी मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी मुलांना स्वतःचे नाव वडील म्हणून दिले आहे. त्यामुळे त्यांनी प्रतीज्ञापत्रात त्या मुलांचा उल्लेख करणे आवश्यक होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.