Wednesday, 24 January 2024

Lok Sabha Election 2024 इंडिया आघाडीच्या दबावाचा फुगा फुटला; तृणमूल काँग्रेस बाहेर

इंडिया आघाडीला खिंडार; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर लढणार


आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप आघाडीला पराभूत करण्याचा निर्धार केलेल्या कॉंग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या दबावाचा फुगा फुटला असून तृणमूल काँग्रेसने एकजुटीने लढण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केल्याने इंडिया आघाडीला मोठे खिंडार पडले आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहे. 
तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा लढवणार असल्याची घोषणा नुकतीच ममता बॅनर्जींनी केली आहे. ममतांच्या या घोषणेने विरोधी INDIA आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 28 विरोधी पक्ष इंडिया अलायन्सच्या माध्यमातून एका व्यासपीठावर एकत्र आले होते. विरोधकांनी एकजूट करून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव करून त्याला निवडणूक आव्हान देण्याची योजना आखली होती, मात्र आता बंगालमध्ये ममतांनी विरोधी आघाडीला मोठा धक्का दिला आहे. 
दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेस हा इंडिया आघाडीतील एक मजबूत खांब आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीचा आम्ही विचारच करु शकत नाही. उद्या आमची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत आहे. सध्या इंडिया आघाडीत जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली असून लवकर याची घोषणा होईल, त्यानंतर सर्वजण समाधानी झालेले असतील.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही. काँग्रेसने ३०० जागांवर निवडणूक लढवावी आणि प्रादेशिक पक्षांना त्यांच्या भागात भाजपशी स्पर्धा करू द्यावी, असे आम्ही आधीच सांगितले आहे, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. 
प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील, पण त्यांनी हस्तक्षेप केल्यास पुन्हा विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस आघाडीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. टीएमसीने काँग्रेसला दोन जागा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने 42 पैकी दोन जागा जिंकल्या होत्या. 
पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी, तेव्हा आम्ही दोन जागा जिंकल्या होत्या, आताही जिंकू शकतो, आम्हाला टीएमसीकडून कोणत्याही भिकेची गरज नाही, असे अधीर म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी 28 विरोधी पक्ष इंडिया अलायन्सच्या बॅनरखाली एका व्यासपीठावर एकत्र आले होते. विरोधकांनी एकजूट करून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पराभूत करून निवडणुकीचे आव्हान देण्याची योजना आखली होती, मात्र आता बंगालमध्ये ममतांनी विरोधी आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ठामपणे उभ्या राहणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे. देशातील अनेक राज्य भाजपने घेतली जात असताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा आपला गड टिकवून ठेवला होता. त्यामुळे इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी यांचा समावेश अत्यावश्यक मानला जात होता. परंतु, आता ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीपुरता इंडिया आघाडीशी फारकत घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात इंडिया आघाडी प्रत्यक्षात आकाराला येणार का आणि आल्यास ममता बॅनर्जी यांच्या समावेशाशिवाय ती कितपत परिमाणकारक ठरणार, याबाबत साशंका उपस्थित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांकडून ममता बॅनर्जी यांच्या मनधरणीचे प्रयत्न होणार का, हेदेखील पाहावे लागेल.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==============================


     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.