प्रचारासाठी लागणाऱ्या परवानग्या व कागदपत्राची यादी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने परवानगीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. निवडणूक विषयक मार्गदर्शन व सेवेसाठी पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे उपलब्ध आहे. आचारसंहिता नियम व कायदे याबाबत ई-बुक मार्गदर्शक पुस्तिका देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे.
"पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस" असे बनावट नाव धारण करणाऱ्या फर्म चा "प्राब" संस्थेशी कोणताही संबंध नाही. "प्राब" संस्थेच्या नावात साधर्म्य नाव धारण करून बनावट नावे राजकीय पक्ष व उमेदवारांची फसगत काही तथाकथित फर्म करीत आहेत अशा गैरप्रवृत्तीला थारा देऊ नये सत्यता पडताळणी करूनच संवाद साधावा असे आवाहन प्राब संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभा
उमेदवारांना घ्यावयाच्या जाहीर सभा, चौकसभा, तसेच सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराचा परवानगी साठीचा अर्ज, सभेसाठी जागेची परवानगी देताना जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास त्यांच्याकडील ना हरकत दाखला, भाडे पावती, शिक्षण संस्था किंवा अन्य खासगी संस्था यांच्या मालकीची जागा/मैदान असल्यास संबंधित संस्थेचे संमतीपत्र उपविभागीय अधिकारी यांचा ना हरकत दाखला, स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग असणे आवश्यक, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाने छाननी करून अशा प्रस्तावास मान्यता द्यावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सदर सभेसाठी प्रपत्र संबंधितांकडून घ्यावे, तसेच सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
पोस्टर्स झेंडे, कापडी बॅनर
सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झेंडे कापडी बॅनर लावण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा असल्यास ही परवाना फी जाहिरात फी ची पावती आवश्यक आहे.
खासगी जागेवर जाहिरात फलक प्रचार साहित्य लावणे
खासगी जागेवर उमेदवाराला जाहिरात फलक प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यायची असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज खासगी जागा असल्यास जागा मालकाचे संमती पत्र,स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.
प्रचार वाहन परवानगी
प्रचार वाहनाची परवानगी घ्यावयाची असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते त्यासाठी उमेदवाराचा अर्ज, वाहनाचे आरसी बुक, वाहनाचा विमा, कर भरल्याची पावती, पियूसी प्रमाणपत्र, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा ना हरकत दाखला, वाहनाचा चारही बाजूंचा फोटो, पोलिसांचा ना हरकत दाखला, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा वाहन चालवणे बाबतचा परवाना आवश्यक आहे.
उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय
उमेदवाराला तात्पुरते प्रचार कार्यालय उघडायचे असल्यास संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी गरजेची असते. त्यासाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मागलकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.
हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी
संबंधित उमेदवाराला हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी घ्यायची असल्यास अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असते त्यासाठी संबंधित उमेदवाराचा त्याबाबतचा अर्ज, पोलीस अधीक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, रुग्णवाहिकेच्या उपलब्धते बाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
ध्वनीक्षेपकाची परवानगी
प्रचार सभा किंवा प्रचार फेरीसाठी ध्वनिक्षेपक लावायचे असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची परवानगी लागते. त्याबाबतच्या परवानगीसाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, वाहनांसाठी आरटीओ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परवानगी व पोलीस ठाण्याचे प्रभावी अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.
शाळेच्या मैदानावरील सभा
संबंधित उमेदवाराला शाळेच्या मैदानावर प्रचार सभा आयोजित करावयाची असल्यास त्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी उमेदवाराने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे स्वतःचा अर्ज, व त्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती
उमेदवाराला सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, किंवा प्रिंट मीडियावर (शेवटचे 48 तास) जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची परवानगी गरजेची आहे. परवानगीसाठी संबंधित उमेदवाराने प्रसिद्ध करावयाची जाहिरात एम.सी.एम.सी कमिटी कडून प्रमाणीत करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीचा फॉर्म मीडिया सेंटर येथे उपलब्ध होईल.
फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग्स, बॅनर व पोस्टर
संबंधित उमेदवाराला फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावायचे असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी इमारतीवर झेंडे, पोस्टर, बॅनर लावण्यासाठी संबंधित जागा मालकाचे संमती पत्र, ठरलेल्या भाड्याचा रकमेचा तपशील, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटते अशी अन्य कागदपत्रे व वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पोस्टर प्रदर्शित करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
मिरवणूक, पदयात्रा, रॅली, प्रचार फेरी, रोडशो
उमेदवाराला मिरवणूक पदयात्रा रॅली प्रचार फेरी किंवा रोड शो करावयाचा असल्यास त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची किंवा प्रभावी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज पदयात्रा व रॅलीच्या मार्गाचा आराखडा वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र पदयात्रेसाठी रॅलीच्या मार्गाच्या आराखड्यास वाहतूक पोलिसांची परवानगी तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी सर्व कागदपत्रे आवश्यक राहतील.
लोकसभा/विधानसभा निवडणुक-2024 प्रचारासाठी विविध परवाने अर्जांचे नमुने format download करा
प्रचारासाठी विविध परवान्यांचे अर्जांचे नमुने एकत्रित उपलब्ध
लोकसभा/विधानसभा निवडणुक- प्रचारासाठी विविध परवाने आवश्यक असतात अशा सर्व परवाने प्रकार व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. परवाने कोठे मिळतात व त्यासाठी विविध अर्जांचे नमुने पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहेत.
विविध अर्जांचे नमुने format download
मिरवणुक/रॅली/पदयात्रा आयोजित करण्यासाठी अर्ज (प्रपत्र-अ) (अर्जाचा नमुना)
मिरवणुक/रॅली/पदयात्रासाठी पोलीस स्टेशनचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
मिरवणुक/रॅली/पदयात्रासाठी वाहतूक नियंत्रण विभागाचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
तात्पुरत्या प्रचार कार्यालय /पक्ष कार्यालयाच्या बांधकामासाठी अर्ज (प्रपत्र 1) (अर्जाचा नमुना)
प्रचार कार्यालय /पक्ष कार्यालयाकरीता जागा मालकाचे संमतीपत्र (प्रपत्र 2) (अर्जाचा नमुना)
प्रचार कार्यालय /पक्ष कार्यालयाच्या तात्पुरत्या बांधकामासाठी पोलिस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (प्रपत्र 3) (अर्जाचा नमुना)
निवडणूक प्रचारासाठी वापरावयाच्या वाहनांच्या परवाना करिता अर्ज (प्रपत्र-W) (अर्जाचा नमुना)
परिवहन वाहनांवर जाहिरात लावण्याची परवानगी मिळण्यासाठी/परवानगीच्या नुतनीकरणासाठी अर्ज (नमुना पी. डी.ए.ए.)(अर्जाचा नमुना)
सभेसाठी उंच व्यासपीठ /बॅरिकेड बांधण्याचा अर्ज (प्रपत्र - G1) (अर्जाचा नमुना)
सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठीचा अर्ज (प्रपत्र – अ) (अर्जाचा नमुना)
सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठी पोलिस स्टेशनचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठी वाहतूक विभागाचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठी जागा मालकाचे संमतीपत्र (अर्जाचा नमुना)
हेलिपॅड चे बांधकाम करण्यासाठी अर्ज (प्रपत्र A) (अर्जाचा नमुना)
हेलिपॅड / Fixed Wing Aircraft चे बांधकाम करण्यासाठी अर्ज (प्रपत्र B) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर उतरविण्याच्या खाजगी ठिकाण/जागा मालकाचे संमतीपत्र (प्रपत्र C) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर उतरविण्याच्या ठिकाण/शैक्षणिक संस्थेच्या मुख्य अधिकाऱ्याचे संमतीपत्र (प्रपत्र D) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर/हेलिपॅड उतरविण्याच्या ठिकाण/ पोलीस स्टेशनचे संमतीपत्र (प्रपत्र E) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर/हेलिपॅड करिता अग्निशमन कार्यालयाचे ना हरकत पत्र (प्रपत्र F) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर/हेलिपॅड करिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत पत्र (प्रपत्र G) (अर्जाचा नमुना)
प्रचारासाठी विविध परवाने स्वरूप व कार्य क्षेत्र, वितरीत करणारे अधिकारी स्तर आणि ना हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग व संबंधित परवान्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची माहिती दर्शवणारा तक्ता- प्रचारासाठी विविध परवाने स्वरूप- 1. वाहन परवाना, 2. तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे 3. कोपरा सभा/प्रचार सभेसाठी मैदान परवाना, लाउडस्पीकर परवाना, 4. रॅली/मिरवणुक/रोडशो/पदयात्रा, लाउडस्पीकर, 5. स्टेज/बॅरीकेटस/रोस्टम, 6. हेलिकॉप्टर लँडीग परवाना.
निवडणूक विषयक सल्ला व मार्गदर्शन - चंद्रकांत भुजबळ - ९४२२३२३५३३ पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) Political Research and Analysis Bureau (PRAB)
लोकसभा/विधानसभा निवडणुक-2024 प्रचारासाठी विविध परवाने अर्जांचे नमुने format download करा- https://bhujbalchandrakant.stores.instamojo.com/?ref=profile_bar
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book