Thursday, 7 September 2017

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमात बदल ; 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबर ऐवजी २६ सप्टेंबरला मतदान

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमात बदल
114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबर ऐवजी २६ सप्टेंबरला मतदान


पुणे जिल्ह्यातील एकमेव बावधन बु ग्रामपंचायतीसाठी निवडणूक 3 दिवसांनी पुढे ढकलली असुन 23 सप्टेंबर ऐवजी २६ सप्टेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आले असून ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 13 जिल्ह्यांतील 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार होते मात्र आता सुधारित निवडणूक कार्यक्रमामुळे 2६ सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे

 सुधारित निवडणूक कार्यक्रम प्रमाणे या निवडणुकांसाठी 4 ते ११ सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 1४ सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 2६ सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी 2७ सप्टेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: पालघर- 8, नाशिक- 22, नंदुरबार- 1, अहमदनगर- 8, पुणे- 1, औरंगाबाद- 4, नांदेड- 4, उस्मानाबाद- 1, जालना- 40, हिंगोली- 13, यवतमाळ- 7, चंद्रपूर- 4 आणि गडचिरोली- 1. एकूण- 114. अशी आहे.

१४ ऑक्टोबर मतदानाच्या तारखेत बदल करण्याची देखील मागणी

राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. या टप्प्यातील होणाऱ्या निवडणूक  कार्यक्रमातील १४ ऑक्टोबर मतदानाच्या तारखेत बदल करण्याची देखील मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. १४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने नागपूरला धम्मभूमीवर अनेक समाजबांधव येत असतात यामुळे गावपातळीवरील निवडणुकीपासून वंचित राहतील असा युक्तिवाद करण्यात येत आहे.


Political Research and Analysis Bureau (PRAB)

Wednesday, 6 September 2017

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान ; पुणे महापालिकेच्या एका रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर; 11 ऑक्टोबरला मतदान

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदानबृहन्मुंबई, नागपूर, कोल्हापूर व पुण्यातील 5 रिक्तपदांसाठीदेखील मतदान


 नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच बृहन्मुंबई, पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 50 हजार 439 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 96 हजार 580 इतकी आहे. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 41 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ‘116’, पुण्यातील  प्रभाग क्र. ‘21अ’ नागपूरमधील प्रभाग क्र. ‘35-अ’ आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. ‘11’ व ‘77’ च्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे. या सर्व ठिकाणी 16 सप्टेंबर 2017 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरूवात होईल. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नांदेड- वाघाळा महानगरपालिका आणि पोट निवडणूक होत असलेल्या अन्य महानगरपालिकांच्या संबंधित प्रभागांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल

निवडणूक कार्यक्रम

·         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे-  16 ते 23 सप्टेंबर 2017
·         नामनिर्देशपत्रांची छाननी-      25 सप्टेंबर 2017
·         उमेदवारी मागे घेणे-                 27 सप्टेंबर 2017
·         निवडणूक चिन्ह वाटप-            28 सप्टेंबर 2017
·         मतदान-                                  11 ऑक्टोबर 2017
·         मतमोजणी-                             12 ऑक्टोबर 2017
·         निकालांची राजपत्रात प्रसिद्धी- 13 आक्टोबर 2017

Political Research and Analysis Bureau (PRAB)


पुणे महापालिकेच्या एका रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर; 11 ऑक्टोबरला मतदान
पुणे महापालिकेच्या एका रिक्त  प्रभाग क्र. ‘21अ’ जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून त्यासाठी
11 ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. नवनाथ कांबळे यांच्या निधनाने हि जागा रिक्त झाली होती. मुळचे रिपाइंचे असलेले कांबळे हे नुकत्याच झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडून विजयी झाले होते. भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पक्षाने त्यांना उपमहापौर पदाची संधी दिली होती. 
दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून कांबळे यांची कन्या हिमाली यांच्या नावाचा आग्रह आरपीआय(आठवले गट) पक्षात आहे.कांबळे हे प्रभाग क्रमांक 21 मधून निवडून आले होते. या प्रभागाचे त्यांनी यापूर्वी दोनवेळा प्रतिनिधीत्व केले होते. कांबळे यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिल्यास अन्य पक्षाचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील याची शक्‍यता नाही. तसेही रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याशी जवळचे संबंध असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीच्या चर्चेस्थानी असलेल्या हिमाली कांबळे या अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहेत. उच्चशिक्षीत असल्याने त्यांनाच उमेदवारीची संधी द्यावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी आहे.



Monday, 4 September 2017

जनतेतून थेटपणे निवड होणारे पुणे जिल्ह्यातील बावधनचे पहिले सरपंच ठरणार

पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान ; प्रथमच थेट पद्धतीने सरपंच निवड होणार

ग्रामपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान ; 14 ऑक्टोबर 2017 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल


जनतेतून थेटपणे निवड होणारे पुणे जिल्ह्यातील बावधनचे पहिले सरपंच ठरणार



====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook

=====================================================================

जनतेतून थेटपणे निवड होणारे जिल्ह्यातील बावधनचे पहिले सरपंच ठरणार आहेत.
बावधन ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान होणार असून आज ४ सप्टेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला. पुणे विभाग व पुणे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान होणार आहे. जनतेतून थेटपणे निवड होणारे जिल्ह्यातील पहिले सरपंच बावधनचे ठरणार आहेत.  या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.

सरपंच पदासाठी अर्जप्रक्रिया ऑफलाईनच!; 
सरपंच पदासाठी अर्जप्रक्रिया संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध केली नसून संगणकीय प्रणालीत यशस्वीपणे बदल झाले नसल्याने हस्तलिखित स्वरुपात नामनिर्देशनपत्र दाखल करावे लागणार आहे. तर सदस्य पदासाठी अर्जप्रक्रिया संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.



पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक
पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यातील २२१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्या ग्रामपंचायतींची निवडणूका होणार आहेत. 14 सप्टेंबर ते 17 ऑक्टोंबर या कालावधीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ - 9, आंबेगाव - 22, जुन्नर - 15, शिरूर - 4, इंदापूर - 26, बारामती - 13, दौंड - 8, वेल्हा - 28, खेड - 23, मुळशी - 11 आणि भोरमधील - 54 ग्रामपंचायतीचा समावेश आहे़ ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना, आरक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली असून प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या निवडणुकीमध्ये प्रथमच थेट पद्धतीने सरपंच निवड होईल.

फुरसुंगीचा पालिकेत समावेश तरीही निवडणूक
पुणे महापालिकेत प्राधान्याने समावेश होणार्या गावामध्ये फुरसुंगीचा समवेश आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्राधान्याने समावेश करण्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. फुरसुंगी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने निवडणूक लढविण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. त्यामध्ये शेवटचा सरपंच होण्यासाठी देखील चुरस निर्माण झाली आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

पुणे जिल्ह्यात  निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती- 

हवेली तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
पिंपरी सांडस, नांदोशी, फुरसुंगी, कदम वाकवस्ती, बुर्केगाव, पेरणे, अहिरे,आव्हाळवाडी, गोगलवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

मावळ तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-  
तालुक्यातील कुणे नामा, वरसोली, गोडुंब्रे, इंदुरी, सावळे, देवळे, भोयरे निगडे, शिरगाव.

आंबेगाव तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
फलोदे, डिंभे खु,चिखली, गोहे खु.,पारसगाव तर्फे खेड, चांडोली बु.तळेघर, रांजणी, निघोटवाडी, आंबेदरा, आहुपे, नागापुर, चिंचोडी, कळंब, मेंगडेवाडी, घेडेगाव, धामणी, आमोंडी, नारोेडी, भावडी व साल.

जुन्नर तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
काळवाडी, भिवाडे खु, हातवीज, सुलतानपुर, सोमतवाडी, सावरगाव, हिवरे तर्फे मिन्हेर, शिंदे, आणे, आंबे, काले, बोतार्डे, वानेवाडी,पारगाव तर्फे आळे व साकोरी तर्फे बेल्हे.

शिरूर तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
काठापूर खुर्द, सोनसांगवी, करंजावणे व मांडरगाव फराटा.

इंदापूर तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
मदनवाडी, बोरी, पिंपरी खु.शिरसोडी, न्हावी, गंगावळण, बेलवडी, लाखेवाडी, आजोती-सुगाव, झगडेवाडी, सराटी, थेरातवाडी, रेडणी, पडस्थळ, कुरवली, डाळज नं.1, डाळज नं.2, बिजवडी, डिकसळ, म्हसोबाचीवाडी, माळवाडी, जांब, हिंगणगाव, रणमोडवाडी, मानकरवाडी, डाळज नं.3, कळाशी.

बारामती तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
मुरूम, वाघळवाडी, लोणीभापकर, मासाळवाडी, वाणेवाडी,कार्‍हाटी, मोरगाव, पळशी, सोरटेवाडी, पणदरे, सोनकसवाडी, गडदरवाडी व कुरणेवाडी. दौंड : डाळीब, बोरीभडक, दहिटणे, पाटेठाण, दापोडी, नांदुर, देवकरवाडी व लोणारनाडी.

वेल्हे तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
शिरकोली, हारपूड, वेल्हे खु, दापोडे, बालवड, टेकपोळे, शेनवड, गिवशी, कोशीमघर, आंबेगाव खु. कोंडगांव, बोरावळे, चिरमोडी, लव्ही बु, वाजेघर बु, कोळंबी, गोडेखल, वडघर, गुंजवणे, सोंडे हिरोजी, मोसे बु, सोंडेसरपाले, सोंडे मथाना, जाधववाडी, धानेप, पाल बु, पाल बु, केळद व सोंडे कार्ला.

खेड तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
येेलवडी, आनावळ, साकुर्डी, शिरोली, मिरजेेवाडी, वाडा, देवोशी, पापळवाडी, कोरेगांव खु, चास, सिद्धेगव्हाण, येणीये खु, सुरकुंडी, बहिरवाडी,शेलगांव, आंभु, गारगोटवाडी, दौंडकरवाडी, आव्हाट, मांजरेवाडी, भांबोली, बहूळ व साबळेवाडी.

मुळशी तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
आडमाळ, पाथरशेत,मोसे खु, आसदे, तव, लवार्डे, कोंढूर, वाजंळे, माळेगाव, भोडे वेडे व दासवे.

भोर  तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे- 
कुरंगवाडी, डेहेण, हर्णस, तेलवडी, भिताडे,पसुरे, कासूर्डी गु.मा., म्हसकर बु., सांगवी हिमा, वाठार हिंगे, अगसुळ, भावेखल, म्हसर खु, सांगवी तर्फे भोर, आपटी, बसरापूर, करंजगाव, निगुडघर, विरवाडी, भबवडे, वेळवड, म्हकोशी, राजघर, येवली, कोळवडी, सोनवडी, दुगार्डी, कार्ले, कर्नावड, शिरवली तर्फे बोर, कंरदी खु, साळूगण, ब्राम्हणघर, कडकी, सांगवी बु, हरिश्‍चंद्र, कंरदी खे. बा., पारवडी, रावडी, मळे, सांगवी खु, गुहीणी, गुढे, कंरदी बु, बारे खु, कारी, बाघजवाडी, आंबेघर, कांब्रे खे. बा, वाढाणे, पांगारी, कुंबळे, वाटारा हिमा व हातनोशी या ग्रामपंचायतींसाठी निवडणुक होणार आहे.

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================


दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 05 ऑक्टोबर 2017 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 14 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.  या सर्व ठिकाणी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.



अधिक माहितीसाठी- चंद्रकांत भुजबळ Political Research and Analysis Bureau (PRAB)


Full list of new council of ministers पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री

कोणत्या राज्यातून किती मंत्री
22 राज्यांमधून 75 मंत्री, 7 राज्यांमधून एकही मंत्री नाही

Full list of new council of ministers



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================


CABINET MINISTERS

* Raj Nath Singh: Minister of Home Affairs.
* Sushma Swaraj: Minister of External Affairs.
* Arun Jaitley: Minister of Finance; and Minister of Corporate Affairs.
* Nitin Jairam Gadkari: Minister of Road Transport and Highways; Minister of Shipping Minister of Water Resources, River Development and Ganga Rejuvenation.
* Suresh Prabhu: Minister of Commerce and Industry.
* DV Sadananda Gowda: Minister of Statistics and Programme Implementation.
* Uma Bharati: Minister of Drinking Water and Sanitation.
* Ramvilas Paswan: Minister of Consumer Affairs, Food and Public Distribution.
* Maneka Sanjay Gandhi: Minister of Women and Child Development.
* Ananthkumar: Minister of Chemicals and Fertilizers; and Minister of Parliamentary Affairs.
* Ravi Shankar Prasad: Minister of Law and Justice & Minister of Electronics and Information Technology.
* Jagat Prakash Nadda: Minister of Health and Family Welfare.
* Ashok Gajapathi Raju Pusapati: Minister of Civil Aviation.
* Anant Geete: Minister of Heavy Industries and Public Enterprises.
* Smt. Harsimrat Kaur Badal: Minister of Food Processing Industries.
* Narendra Singh Tomar: Minister of Rural Development; Minister of Panchayati Raj; and Minister of Mines.
* Chaudhary Birender Singh: Minister of Steel.
* Jual Oram : Minister of Tribal Affairs.
* Radha Mohan Singh: Minister of Agriculture and Farmers Welfare.
* Thaawar Chand Gehlot: Minister of Social Justice and Empowerment.
* Smriti Zubin Irani: Minister of Textiles; and Minister of Information and Broadcasting.
* Dr. Harsh Vardhan: Minister of Science and Technology; Minister of Earth Sciences; and Minister of Environment, Forest and Climate Change.
* Prakash Javadekar: Minister of Human Resource Development.
* Dharmendra Pradhan: Minister of Petroleum and Natural Gas; and Minister of Skill Development and Entrepreneurship.
* Piyush Goyal: Minister of Railways; and Minister of Coal.
* Nirmala Sitharaman: Minister of Defence.
* Mukhtar Abbas Naqvi: Minister of Minority Affairs.
MINISTERS OF STATE (INDEPENDENT CHARGE)
* Rao Inderjit Singh: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Planning; and Minister of State in the Ministry of Chemicals and Fertilizers.
* Santosh Kumar Gangwar: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Labour and Employment.
* Shripad Yesso Naik: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy (AYUSH).
* Dr. Jitendra Singh: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Development of North Eastern Region; Minister of State in the Prime Minister's Office; Minister of State in the Ministry of Personnel, Public Grievances and Pensions; Minister of State in the Department of Atomic Energy; and Minister of State in the Department of Space.
* Dr. Mahesh Sharma: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Culture; and Minister of State in the Ministry of Environment, Forest and Climate Change.
* Giriraj Singh: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Micro, Small and Medium Enterprises.
* Manoj Sinha: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Communications; and Minister of State in the Ministry of Railways.
* Col. Rajyavardhan Singh Rathore: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Youth Affairs and Sports; and Minister of State in the Ministry of Information and Broadcasting.
* Raj Kumar Singh: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Power; and Minister of State (Independent Charge) of the Ministry of New and Renewable Energy.
* Hardeep Singh Puri: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Housing and Urban Affairs.
* Alphons Kannanthanam: Minister of State (Independent Charge) of the Ministry of Tourism; and Minister of State in the Ministry of Electronics and Information Technology.
MINISTERS OF STATE
* Vijay Goel: Minister of State in the Ministry of Parliamentary Affairs; and Minister of State in the Ministry of Statistics and Programme Implementation.
* Radhakrishnan P.: Minister of State in the Ministry of Finance; and Minister of State in the Ministry of Shipping.
* SS Ahluwalia: Minister of State in the Ministry of Drinking Water and Sanitation.
* Ramesh Chandappa Jigajinagi: Minister of State in the Ministry of Drinking Water and Sanitation.
* Ramdas Athawale: Minister of State in the Ministry of Social Justice and Empowerment.
* Vishnu Deo Sai: Minister of State in the Ministry of Steel.
* Ram Kripal Yadav: Minister of State in the Ministry of Rural Development.
* Hansraj Gangaram Ahir: Minister of State in the Ministry of Home Affairs.
* Haribhai Parthibhai Chaudhary: Minister of State in the Ministry of Mines; and Minister of State in the Ministry of Coal.
* Rajen Gohain: Minister of State in the Ministry of Railways.
* General (Retd.) V K Singh: Minister of State in the Ministry of External Affairs.
* Parshottam Rupala: Minister of State in the Ministry of Agriculture and Farmers Welfare; and Minister of State in the Ministry of Panchayati Raj.
* Krishan Pal: Minister of State in the Ministry of Social Justice and Empowerment.
* Jaswantsinh Sumanbhai Bhabhor: Minister of State in the Ministry of Tribal Affairs.
* Shiv Pratap Shukla: Minister of State in the Ministry of Finance.
* Ashwini Kumar Choubey: Minister of State in the Ministry of Health and Family Welfare.
* Sudarshan Bhagat: Minister of State in the Ministry of Tribal Affairs.
* Upendra Kushwaha: Minister of State in the Ministry of Human Resource Development.
* Kiren Rijiju: Minister of State in the Ministry of Home Affairs.
* Dr. Virendra Kumar: Minister of State in the Ministry of Women and Child Development; and Minister of State in the Ministry of Minority Affairs.
* Anantkumar Hegde: Minister of State in the Ministry of Skill Development and Entrepreneurship.
* MJ Akbar: Minister of State in the Ministry of External Affairs.
* Sadhvi Niranjan Jyoti: Minister of State in the Ministry of Food Processing Industries.
* YS Chowdary: Minister of State in the Ministry of Science and Technology; and Minister of State in the Ministry of Earth Sciences.
* Jayant Sinha: Minister of State in the Ministry of Civil Aviation.
* Babul Supriyo: Minister of State in the Ministry of Heavy Industries and Public Enterprises.
* Vijay Sampla: Minister of State in the Ministry of Social Justice and Empowerment.
* Arjun Ram Meghwal: Minister of State in the Ministry of Parliamentary Affairs; and Minister of State in the Ministry of Water Resources, River Development and Ganga Rejuvenation.
* Ajay Tamta: Minister of State in the Ministry of Textiles.
* Krishna Raj: Minister of State in the Ministry of Agriculture and Farmers Welfare.
* Mansukh L. Mandaviya: Minister of State in the Ministry of Road Transport and Highways; Minister of State in the Ministry of Shipping; and Minister of State in the Ministry of Chemicals and Fertilizers.
* Anupriya Patel: Minister of State in the Ministry of Health and Family Welfare.
* CR Chaudhary: Minister of State in the Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution; and Minister of State in the Ministry of Commerce and
Industry.
* PP Chaudhary: Minister of State in the Ministry of Law and Justice; and Minister of State in the Ministry of Corporate Affairs.

66 वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री काँग्रेसच्या मनमोहन सरकारच्या तुलनेत तरुण म्हटले पाहिजे. मोदी कॅबिनेटमधील तीन फेरबदलांवर नजर टाकली तर लक्षात येते की मंत्र्यांचे सरासरी वय 57 ते 60 आहे. तर, 76 पैकी 73 मंत्र्यांची एकूण संपत्ती 952 कोटी रुपये आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================
मनमोहन सरकारमधील मंत्र्यांचे वय?
- मोदींच्या 76 मंत्र्यांचे सरासरी वय 59.19 आहे. तर, मनमोहन सरकारच्या यूपीए-2 काळात 77 सदस्यांच्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय 65.3 होते. म्हणजेच मोदी कॅबिनेट मागील सरकारच्या तुलनेत 6.11 वर्षे तरुण आहे.
सर्वात उम्रदराज आहेत पासवान
- मोदी सरकारच्या 43 मंत्र्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. तर, मोदींच्या कॅबिनेटचे सरासरी वय 59.19 वर्षे आहे. तर दोन मंत्र्यांनी सत्तरी पार केली आहे. वीरेंद्र सिंह आणि रामविलास पासवान हे 71 वर्षांचे आहेत.
- याशिवाय 17 मंत्री 65 प्लस आहेत. 60 ते 65 वर्षांदरम्यानेच 24 मंत्री आहेत. 50 पेक्षा जास्त वयाचे 20 मंत्री आहेत.
- 50 पेक्षा कमी वयाचे 12 मंत्री मोदी कॅबिनेटमध्ये आहेत. त्यात सर्वात कमी वयाच्या उत्तर प्रदेशातील अनुप्रिया पटेल(36) आहेत.
मंत्रिमंडळात 76 मंत्री
- 27 कॅबिनेट मंत्री
- 11 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
- 37 राज्यमंत्री
- 57 मंत्री लोकसभा खासदार
- 18 मंत्री राज्यसभा खासदार
- 2 मंत्री निवडून आलेले नाही
दलित, ओबीसींवर लक्ष
- सामान्य 20%
- मुस्लिम 1%
- एसटी 1%
- एससी 2%
- ओबीसी 3%
कोणत्या राज्यातून किती मंत्री
22 राज्यांमधून 75 मंत्री, 7 राज्यांमधून एकही मंत्री नाही
- उत्तरप्रदेश 12,
- बिहार 9,
- मध्यप्रदेश 6,
- गुजरात 6,
- महाराष्ट्र 6,
- राजस्थान 5,
- कर्नाटक 5,
- झारखंड 3,
- हरियाणा 3,
- आंध्रप्रदेश 3,
- दिल्ली 3,
- पंजाब 2,
- प. बंगाल 2.
- 10 राज्यांमधून प्रत्येकी 1-1 मंत्री: गोवा, ओडिशा, उत्तराखंड, तमिळनाडू, छत्तीसगड, आसाम, केरळ, हिमाचल, अरुणाचल, जम्मू-कश्मीर.
या राज्यातून एकही मंत्री नाही
- मणिपुर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्किम, तेलंगणा, त्रिपुरा.
-----------------------------------------
मोदींच्या वयाचे मंत्रिमंडळात 7 मंत्री 
66 वर्षीय मोदींच्या मंत्रिमंडळात पन्नासहून कमी वयाचे 12 मंत्री, सरासरी वय 59.19 वर्षे
मोदी सरकारच्या निम्म्याहून अधिक मंत्र्यांचे वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. असे 43 मंत्री आहेत. मोदींसह मंत्र्यांचे सरासरी वय 59.19 वर्षे आहे. दोघांचे वय 70 हून जास्त आहे.
- चौधरी विरेंद्र सिंह आणि राम विलास पासवान यांचे वय 71 वर्षे आहे. 65 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे 17 मंत्री आहेत.
- 60 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे 24 मंत्री आहेत. 50 किंवा जास्त वयाचे 20 मंत्री आहेत.
- पन्नासहून कमी वयाचे केवळ 12 तर अनुप्रिया पटेल कमी वयाच्या 36 वर्षेीय मंत्री ठरतात.
- नरेंद्र मोदींचे वय 66 वर्षे आहे. त्याशिवाय मंत्रिमंडळात 66 वर्षे वय असलेले आणखी सात मंत्री आहेत.

कॅबिनेट मंत्री
सुरेश प्रभू – वाणिज्य
पियुष गोयल – रेल्वे
उमा भारती – पेयजल आणि स्वच्छता
धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि कौशल्यविकास
नितीन गडकरी – रस्ते वाहतूकसह गंगा स्वच्छता अभियानचा अतिरिक्त भार
स्मृती इराणी – माहिती प्रसारण आणि वस्त्रोद्योग
राज्यवर्धन राठोड – क्रीडामंत्री
राज्यमंत्री
सत्यपाल सिंग – शिक्षण राज्यमंत्री
गजेंद्र शेखावत – कृषी राज्यमंत्री
हरदीपसिंग पुरी – नगरविकास राज्यमंत्री
नरेंद्र तोमर – ग्रामविकास राज्यमंत्री
अल्फोन्स कन्ननाथनम् – पर्यटन राज्यमंत्री
महेश शर्मा – संस्कृती आणि पर्यावरण राज्यमंत्री
शिवप्रताप शुक्ल – अर्थ राज्यमंत्री
आर. के. सिंग – ऊर्जा (स्वतंत्र कारभार)

Friday, 1 September 2017

राज्यातील 7,576 ग्रामपंचायतींसाठी 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान

राज्यातील 7,576 ग्रामपंचायतींसाठी 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान


थेट सरपंचपदासाठीदेखील होणार मतदान


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================
राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांतील 3 हजार 884; तर दुसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे,

ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत राज्याभरातील सुमारे 8,500 ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. संविधानातील तरदुदीनुसार मुदत संपण्यापूर्वी त्यांच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. यापैकी ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 114 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या 689 आणि नव्याने स्थापित झालेल्या 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येईल.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

तीन ते चार मते देणे आवश्यक 
थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणावर मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल; तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीदेखील निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाईल. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही.

सरपंचपदासाठी फिकी निळी मतपत्रिका
पहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा; तर नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा असेल.

…तर 7 वी उत्तीर्ण आवश्यक
सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान 7 वी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना 7 वी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे आवश्यक राहील.

आचारसंहिता लागू
या सर्व ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यांत एकूण ग्रामपंचायतींपैकी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. त्याचप्रमाणे ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील; परंतु निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामांवर कोणतेही निर्बंध राहणार नाही. त्यांना फक्त निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाच्या दिवशी संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर करतील.

पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 27 सप्टेंबर 2017 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 07 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 9 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.

दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 05 ऑक्टोबर 2017 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 14 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी केवळ 3.00 वाजेपर्यंत असेल. या सर्व ठिकाणी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.

पहिल्या टप्यात 7 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: नाशिक- 170, धुळे- 108, जळगाव- 138, नंदुरबार- 51, अहमदनगर- 204, औरंगाबाद- 212, बीड- 703, नांदेड- 171, परभणी- 126, उस्मानाबाद- 165, जालना- 240, लातूर- 353, हिंगोली- 49, अमरावती- 262, अकोला- 272, यवतमाळ- 93, वाशीम- 287 आणि बुलडाणा- 280. एकूण- 3,884.

दुसऱ्या टप्यात 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग- 325, पुणे- 221, सोलापूर- 192, सातारा- 319, सांगली- 453, कोल्हापूर- 478, नागपूर- 238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26. एकूण- 3,692. 

Political Research and Analysis Bureau (PRAB)




मुक्त चिन्ह घेऊनच निवडणूक लढवावी लागणार

सदस्यांमधून सरपंच निवडण्याऐवजी थेट मतदारांतून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्या दृष्टीने कायदेशीर सुधारणा केल्या आहेत. मतदारांतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचाला मुक्त चिन्ह घेऊनच निवडणूक लढवावी लागणार आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यासह इतर राजकीय पक्षांसाठी राखीव असलेले चिन्ह घेता येणार नाही. त्यामुळे गावाच्या राजकारणात राजकीय पक्षांना नो एंट्री असणार आहे. ऑक्‍टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत महाराष्ट्रातील चार हजार 120 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. ऑक्‍टोबरमध्ये राज्यातील 13 जिल्ह्यांमधील 117 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांपासूनच जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वप्रथम सरपंचपदाच्या उमेदवारांना मुक्त चिन्हांच्या यादीतील चिन्हांचे वाटप होणार आहे. सरपंचपदाच्या उमेदवाराला वाटप करण्यात आलेली मुक्त चिन्ह गोठविण्यात येणार असून त्या गावातील प्रभागातील उमेदवारांना ते चिन्ह पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे आता गावात सरपंचाचे चिन्ह वेगळे आणि ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे चिन्ह वेगळे असणार आहे. सरपंचपदाच्या उमेदवारांना वाटप झालेल्या चिन्हानंतर शिल्लक राहिलेली चिन्हे ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवारांना वाटप केली जाणार आहेत.


भाजपशिवाय 2019 च्या निवडणुका लढविण्याची शिवसेनेवर पहिलीच वेळ

भाजपशिवाय 2019 च्या निवडणुका लढविण्याची शिवसेनेवर पहिलीच वेळ

भाजपशिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुका लढविण्याची पहिलीच वेळ येणार असल्याने शिवसेनेने भाजपकडील 28 लोकसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार निश्‍चित करण्यावर भर दिला आहे. पुढील वर्षभर या नेत्यांचा चेहरा लोकसभा मतदारसंघात पोचविताना त्यांना काम करण्यासाठीचा वेळ मिळावा असा हेतू यामागे असल्याचे सूत्रांचे मत आहे.
लोकसभा निवडणुकांत आतापर्यंत शिवसेना भाजप युतीचे 26/22 सूत्र ठरलेले होते. यात भाजपला सर्वाधिक 28 जागांवर निवडणूक लढविण्याची संधी मिळत आहे. तर शिवसेना युतीतून 20 जागांवर निवडणूक लढली आहे. या 28 मतदारसंघांत भाजपला 2014 मध्ये पहिल्यांदाच मोठे यश मिळाले होते, त्यांचे 23 खासदार आहेत. तर शिवसेनेचे 18 खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत शिवसेनेला आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. त्यामुळे आगामी 2019 मध्ये शिवसेनेशिवाय सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. सध्याची भाजप व शिवसेनेतील राजकीय स्पर्धा पाहता भाजप युती करणार नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांची खात्री आहे.त्यामुळे आतापर्यंत भाजपकडे असलेल्या 28 जागांवर शिवसेनेने कधीही उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला नसल्याने संपूर्ण लोकसभा मतदारसंघाला परिचित असणारे "निष्ठावंत' शिवसैनिकांनाच संधी देण्याची राजकीय खेळी शिवसेनेने आखली आहे. यात संबंधित लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आजी-माजी आमदार, आजी-माजी मंत्री व आजी-जिल्हाध्यक्ष यांच्या नावावर विचार सुरू केला आहे. यापैकी अनेक मतदारसंघांतील अशा निष्ठावंत शिवसैनिक नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये पुन्हा ‘कमळ’, नरेंद्र मोदी गड राखणार? काँग्रेसच्या जागा निम्म्याने घटतील-सर्वेक्षण

गुजरातमध्ये पुन्हा ‘कमळ’, नरेंद्र मोदी गड राखणार?
काँग्रेसच्या जागा निम्म्याने घटतील-सर्वेक्षण


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये पुन्हा कमळ उमलण्याची दाट शक्यता आहे. एका सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार भाजपला विधानसभा निवडणुकीत तब्बल १४४ ते १५२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला अवघ्या २६ ते ३२ जागा जिंकता येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. गुजरातमधील सर्वच भागांमध्ये भाजपला चांगले यश मिळेल असे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. एबीपी न्यूज, लोकनिती, सीएसडीएसकडून हे सर्वेक्षण करण्यात आले.
भाजपने २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ११५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला ६१, तर इतर पक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये २९ ते ३७ जागांची वाढ होण्याचा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या जागांमध्ये जवळपास निम्म्याने घट होण्याचा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. काँग्रेसच्या जागा ६१ वरुन २६ ते ३२ वर येऊ शकतात, असे सर्वेक्षणातील आकडे सांगतात.भाजपला गुजरातमधील सर्वच भागांमध्ये चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे. मध्य गुजरातमध्ये एकूण ४० जागांपैकी भाजपला ५६%, काँग्रेसला ३०%, तर इतर पक्षांना १४% जागा मिळतील, असे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. उत्तर गुजरातमधील ५३ जागांवरही भाजपला चांगले यश मिळेल, असे आकडेवारी सांगते. या भागात भाजपला ५९%, काँग्रेसला ३३% आणि अन्य पक्षांना ८% जागा मिळण्याचा अंदाज आहे. सौराष्ट्र-कच्छमधील ५४ जागांवर भाजप उत्तम कामगिरी करेल, असा अंदाज आहे. या भागात भाजपला ६५%, काँग्रेसला २६% आणि अन्य पक्षांना ९ टक्के जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण गुजरातमधील ३५ जागांवरही भाजप वरचढ ठरण्याची शक्यता आहे. या भागात भाजपला ५४%, काँग्रेसला २७% आणि अन्य पक्षांना १९ टक्के जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.
गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी विजय रुपाणी यांना सर्वाधिक पसंती मिळाली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २४% लोकांनी रुपानींच मुख्यमंत्रीपदी राहावे, असा कौल दिला. तर ७% लोकांनी नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये परत येऊन राज्याचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे मत ५% लोकांनी व्यक्त केले. एबीपी न्यूज, लोकनिती, सीएसडीएसने राज्यातील ५० विधानसभा क्षेत्रांमध्ये हे सर्वेक्षण केले. यामध्ये ४ हजार ९० लोकांनी त्यांचे मत नोंदवले. या सर्वेक्षणात नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर कायदा, पूर परिस्थितीतील सरकारची कामगिरी याबद्दलदेखील प्रश्न विचारण्यात आले. नोटाबंदीचा निर्णय चांगला होता, असे मत ५५% लोकांनी व्यक्त केले. तर हा निर्णय ठिक होता, असे मत २२% लोकांनी नोंदवले. नोटाबंदीचा निर्णय वाईट होता, असे मानणाऱ्यांचे प्रमाण १९% आहे. वस्तू आणि सेवा कर कायदा चांगला असल्याचे मत ३८% लोकांनी नोंदवले. तर हा कायदा बरा आहे, असे २२% लोकांनी म्हटले. हा कायदा वाईट असल्याचे २५% लोकांनी सांगितले. पूर परिस्थितीत सरकारने केलेल्या मदतीवर ५७% लोक समाधानी आहेत, असे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. तर सरकारकडून पुरेशी मदत करण्यात आली नाही, असे २०% लोकांचे मत आहे. तर २३ टक्के लोकांनी या प्रश्नावर मत मांडण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री म्हणून कोण हवं?
विजय रुपाणी- 24 टक्के
नरेंद्र मोदी – 7 टक्के
आनंदीबेन पटेल-  5 टक्के
भरत सिंह सोलंकी – 2 टक्के

कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप- 144-152
काँग्रेस- 26-32
इतर- 3-7

गुजरातच्या पूरस्थितीत सरकारचं काम कसं होतं?
चांगलं – 57 टक्के
खराब- 20 टक्के
माहित नाही – 23 टक्के

निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा काय?
महागाई – 13 टक्के
बेरोजगारी- 10 टक्के
गरीबी- 9 टक्के
विकास- 7 टक्के

नोटाबंदीबाबत मत काय?
चांगला निर्णय – 55 टक्के
ठिक निर्णय – 22 टक्के
वाईट निर्णय – 19 टक्के
माहित नाही – 4 टक्के

भाजप सरकारचं कामकाज कसं आहे?
पूर्ण समाधानी – 37 टक्के
समाधानी- 32 टक्के
असमाधानी -14 टक्के
पूर्ण असमाधानी – 13 टक्के
प्रतिक्रिया नाही – 4 टक्के

जीएसटीबाबत मत काय?
चांगला निर्णय – 38 टक्के
ठिक निर्णय – 22 टक्के
वाईट निर्णय – 25 टक्के
माहित नाही – 15 टक्के

शंकरसिंह वाघेला यांनी काय करावं?
नवीन पक्षाची स्थापना करावी – 5 टक्के
भाजपसोबत जावं – 16 टक्के
काँग्रेसमध्ये परतावं – 11 टक्के
राजकारण सोडावं – 24 टक्के
प्रतिक्रिया नाही – 45 टक्के

कच्छ-सौराष्ट्रात कुणाला किती मतं?
एकूण जागा – 54
भाजप – 65 टक्के
काँग्रेस- 26 टक्के
इतर- 9 टक्के

उत्तर गुजरातमध्ये कुणाला किती मतं?
एकूण जागा – 53
भाजप – 59 टक्के
काँग्रेस- 33 टक्के
इतर- 8 टक्के

दक्षिण गुजरातमध्ये कुणाला किती मतं?
एकूण जागा – 35
भाजप – 54 टक्के
काँग्रेस- 27 टक्के
इतर- 19 टक्के
----------------------------------------------------------------------------------------------------------