Friday 1 September 2017

भाजपशिवाय 2019 च्या निवडणुका लढविण्याची शिवसेनेवर पहिलीच वेळ

भाजपशिवाय 2019 च्या निवडणुका लढविण्याची शिवसेनेवर पहिलीच वेळ

भाजपशिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुका लढविण्याची पहिलीच वेळ येणार असल्याने शिवसेनेने भाजपकडील 28 लोकसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार निश्‍चित करण्यावर भर दिला आहे. पुढील वर्षभर या नेत्यांचा चेहरा लोकसभा मतदारसंघात पोचविताना त्यांना काम करण्यासाठीचा वेळ मिळावा असा हेतू यामागे असल्याचे सूत्रांचे मत आहे.
लोकसभा निवडणुकांत आतापर्यंत शिवसेना भाजप युतीचे 26/22 सूत्र ठरलेले होते. यात भाजपला सर्वाधिक 28 जागांवर निवडणूक लढविण्याची संधी मिळत आहे. तर शिवसेना युतीतून 20 जागांवर निवडणूक लढली आहे. या 28 मतदारसंघांत भाजपला 2014 मध्ये पहिल्यांदाच मोठे यश मिळाले होते, त्यांचे 23 खासदार आहेत. तर शिवसेनेचे 18 खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत शिवसेनेला आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. त्यामुळे आगामी 2019 मध्ये शिवसेनेशिवाय सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. सध्याची भाजप व शिवसेनेतील राजकीय स्पर्धा पाहता भाजप युती करणार नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांची खात्री आहे.त्यामुळे आतापर्यंत भाजपकडे असलेल्या 28 जागांवर शिवसेनेने कधीही उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला नसल्याने संपूर्ण लोकसभा मतदारसंघाला परिचित असणारे "निष्ठावंत' शिवसैनिकांनाच संधी देण्याची राजकीय खेळी शिवसेनेने आखली आहे. यात संबंधित लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आजी-माजी आमदार, आजी-माजी मंत्री व आजी-जिल्हाध्यक्ष यांच्या नावावर विचार सुरू केला आहे. यापैकी अनेक मतदारसंघांतील अशा निष्ठावंत शिवसैनिक नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.